माहीती हवी आहे.

Submitted by कविता१९७८ on 16 August, 2014 - 05:30

माझ्या काकुला गेल्यावर्षी स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले, लगेचच शस्त्रक्रिया करुन एक स्तन काढण्यात आला. कीमो सुरु झाली. साधारण ३ कीमो नंतर तिचा स्तन काढलेल्या बाजुचा हात सुजला, डॉक्टरांनी आधी सांगितले की पाणी झाले असेल म्हणुन हात सुजलाय, व्यायाम करा, काही उतार पडेना मग त्यांनी "फिगारो" च्या ऑलिव्ह ऑईल ने मसाज करायला सांगितले, त्याने ही काही फरक पडला नाही. जानेवारी २०१४ ला तिला शेवटची किमो देण्यात आली. हात तर अद्याप बरा झालेला नाही उलट आता अजुनच सुजलाय आणी दुखतोय, कडक झालाय, डॉक्टरांचे म्हणणे आहे की आता ह्याला काही इलाज नाही हा हात शेवट पर्यंत असाच राहणार.

ट्रीटमेंट त्यांनी परस्पर घेतली कुणालाही कंसल्ट केले नव्हते आणी डॉक्टरांवर खुपच विश्वास ठेवला त्यांनी , आमच्याशीही त्यांनी ट्रीटमेंट बाबतीत काही जास्त डीस्कस केले नाही पण काकुचा हात पाहुन खुपच वाईट वाटले, अद्द्यापही "फिगारो" च्या ऑलिव्ह ऑईल ने मसाज करणे चालुच आहे, मला तर वाटत नाही की त्याने काही फरक पडतो.

आपल्या मायबोलीवर खुप चांगले डॉक्टर्स आहेत , थोडी माहीती मिळाली तर बरे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या एखाद्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांचे मत अजमावले का (second opinion), डॉकने कुठल्या physiotherapist कडे पाठवले नाही का?

मी सुचवले होते पण दुसर्‍या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांचे मत नाही घेतले अजुन ,डॉकने कुठल्याच physiotherapist कडे पाठवले नाही उलट सांगितलं की ह्याला काही उपाय नाहीये.

१. http://www.webmd.com/breast-cancer/guide/side-effects-lymphedema
२. http://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK13600/
३. http://www.hopkinsmedicine.org/healthlibrary/test_procedures/gynecology/...

"Arm Edema after breast cancer surgery" असे गूगल करून भरपूर माहिती सापडेल. त्यातल्या काही चांगल्या लिंका वर दिलेल्या आहेत. वाचून झाल्यावर पुनः प्रश्न विचारा, उरलेल्या शंकांचे निरसन करीन.

ट्रीटमेंट त्यांनी परस्पर घेतली कुणालाही कंसल्ट केले नव्हते आणी डॉक्टरांवर खुपच विश्वास ठेवला त्यांनी , आमच्याशीही त्यांनी ट्रीटमेंट बाबतीत काही जास्त डीस्कस केले नाही>>>

हे लिहीलयत त्याचा टोन पटला नाही.
असो.
ईकाकांनी दिलेल्या लिंकांत डिटेल माहिती आहेच.

किमोचा नाही.
रॅडिकल मॅस्टेक्टोमीचा.
ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी त्याच साईडच्या अ‍ॅक्सिलात असलेल्या लिंफनोडमध्ये दडून बसतात.
पुन्हा कॅन्सर उदभवू नये याकरिता हे लिंफ नोडही बर्याचदा काढले जातात.
तसेच रेडिएशनमध्ये जळूनही जातात.
त्यामुळे हाताकडून येणारा एक लिंफ नावाचा पातळ द्रव जो आधी बगलेतल्या लिंफ नोडमध्ये आणि तिथून एका पातळ नळीतून एका नीलेत(व्हेनमध्ये)सोडला जातो त्याला अडथळा येतो. आणि हात सु़जतो.
वर ईकाकांनी दिलेल्या लिंकेत सगळं डिट्टॅलात लिहिलं आहे.
कॅन्सर पुन्हा उदभवून जीव जाण्यापेक्षा हात सुजलेला केव्हाही परवडतो.
खरे तर प्रत्येक सर्जरीच्या /किमोच्या आधी सगळी संभाव्य ़काँप्लिकेशन्स पेशंटला समजवलेली असतात आणि सही घेतलेली असते.
हे पेशंटच्या ़जवळच्या नातेवाईकांनाच सांगितलेले असते.
त्यांच्या दृष्टीने त्याक्षणी पेशंटचा जीव वाचणे हे महत्वाचे असल्याने ते पटापट तयारही होतात.
नंतर भेटायला येणार्या नातेवाईकांना यातलं काही माहिती नसल्याने 'काय की बाई, कसं की बाई, या डॉ़टरला काय कळतं की नाही' चालू असतं.

हे ़खालचं कविताच्या प्रश्नाशी संबंधित नाही पण आमचा नेहमीचा अनुभव-
रूग्णाचं काही बरं वाईट झाल्यास डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची मोडतोड इ करण्यातही हे लांबचे नातेवाईक, राजकारणी नातेवाईक पुढे असतात तर जवळचे /सही केलेले नातेवाईक मूग गिळून गप्प आसतात , परस्पर बिल भरायचं कटलं तर बरं म्हणून.

सर्वांना धन्यवाद ,

साती

<<<ट्रीटमेंट त्यांनी परस्पर घेतली कुणालाही कंसल्ट केले नव्हते आणी डॉक्टरांवर खुपच विश्वास ठेवला त्यांनी , आमच्याशीही त्यांनी ट्रीटमेंट बाबतीत काही जास्त डीस्कस केले नाही>>>

हे लिहीलयत त्याचा टोन पटला नाही.
असो.>>>

मी अश्यासाठी लिहिलंय की इतका मोठा आजार झाल्यावर निदान सेकंड ओपिनियन घ्यायला हवं. आम्ही मुंबईपासुन १०० की.मी, अंतरावर राहतो. आम्हाला एखाद्या स्पेशालिस्टकडे ट्रीटमेंट घ्यायची झाल्यास मुंबईलाच जावे लागते. काकीची ट्रीटमेंट बोरीवलीच्या करुणा हॉस्पीटल मधे झाली तेव्हा काकांचा मुलगा म्हणाला की आधी ६० वेगवेगळ्या टेस्ट्स केल्या गेल्या पण बाकीचे जे नातेवाईक , मित्रमंडळी ज्यांच्या कुणा ना कुणाला कर्करोग झालाय ते म्हणाले की इतक्या टेस्ट्स नसतात. दर २१ दिवसांनी कीमो देणार होते पण २ कीमो नंतर जे कॅन्सरतज्ञ होते ते तिसर्‍या कीमोला अपॉईंटमेंट देउनही आले नाहीत. नंतर थोडे दिवस ते अपॉईंटमेंटच देत नव्हते, शेवटी त्यांनी त्यांचे प्रायव्हेट हॉस्पीटल जे घाटकोपर ला आहे तिथे बोलावले व स्वतःची जास्तीची फी मिळाल्यावर काकीची किमो सुरळीत सुरु झाली. म्हणुन ह्या सर्व प्रकारातुन मला वाटतं की हे जे मोठे आजार असतात की ज्याने माणुस ऐकुनच घाबरुज जातो त्यासाठी निदान कुणाशी डीस्कस करायला हवं म्हणुन मी तसं लिहिलंय.

आणी तरीही असं वाटत असेल तर ते वाक्य मी काढुन टाकते.

नमस्कार
एका मैत्रिणीला breast cyst आढळून आलाय. तिला कॅन्सिरची history आहे . टाटा मध्ये तिला local oncologist शोधा फोलो अप साठी असे सांगितलं . ठाणे /डोंबिवली मध्ये कोणी oncologist माहितीचे आहेत का? सध्या ती खूप काळजीत आहे लवकर माहिती मिळाली तर बर होइल

इथे एक दोन धाग्यांवर एकाच वेळी विचारतेय.

प्राणा, इथे मुलुंड व ठाणे बाफवर ठाण्यातले बरेच जण अ‍ॅक्टिव्ह असतात. तिथे पण पोस्ट करा. त्यांच्यापैकी कोणी ना कोणी तुम्हाला नक्कीच मदत करु शकेल.