Idols..

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"Idols" -One more time! Happy

Auditions मधे आवाजामुळे किन्वा इतर कारणाने लक्षात राहिलेले, नंतर Top 10 म्हणून निवडले गेल्यामुळं आणि दर आठवड्याला TV ला खिळून पाहिल्यामुळे अगदी 'ओळखीचे' झालेले ते दहा ' Idol ' प्रत्यक्षात दिसण्याचा दिवस उजाडला एकदाचा!

आम्ही अगदी पहिल्या सीझन पासून या कार्यक्रमाचे die hard फॅन्स. दर वर्षीचे Top 10 नेहमीच टूर वर इकडे यतात, पण या ना त्या कारणाने
कधी जाणं जमलं नव्हतं. यावेळी अगदी online ticket विक्री सुरु झाली त्या मिनिटाला प्रयत्न चालू करुनसुद्धा सुरवातीला चान्गल्या जागेवरची तिकिटं नाही मिळाली. पण मुलगा खट्टू होईल म्हणून नसल्यापेक्षा असूदेत म्हणून ठेवली पण नन्तर नशीबानं चा.गली तिकिटं मिळाली. लगेचच शो sold-out झाला.

रेडिओवर Idols च्या कार्यक्रमाबद्दल आणि बुश भेटीबद्दल ऐकायला मिळालं. तेव्हाच 'येतील की नाही' अशी शंका होती त्या मॅकफीबाई आल्याचे कळले. खरं तर त्या आदल्या दिवशी शो साठी पिट्सबर्गलाच पोचायच्या, पण त्या ९ तास Airport वर अडकून पडल्या तरी कश्याबश्या अध्यक्षांना भेटायला मात्र पोचल्या. कार्यक्रमात त्यानी घसा खराब असल्यानं डॉक्टरान्च्या सल्ल्यप्रमाणे दोनच गाणी गाईन असे सान्गितले. घसा थोडा बसल्यासारखा वाटला खरा!

शो ची सुरवात मॅन्डीसा ने दणक्यात केली. मग Ace आणि Kelly ने बोअर केले. केली बोलली चान्गली. White House टूर च्या वेळी तिथल्या लायब्ररीत असताना ती प्रत्येक बुकशेल्फ ढकलून काही सिक्रेट दरवाजा वगैरे उघडतो का बघत होती म्हणे! Happy लिझा, पॅरिस आणि बकी चान्गले गायले. त्या ढॅण ढॅण म्युझिक मधे आणि पोरीबाळींच्या किंकाळ्यात ख्रिस ने कोणती दोन गाणी म्हटली ते मला कळले नाही. Happy
इलियटची आई आली होती. त्याने तिच्यासाठी म्हणून खास एक गाणं म्हटलं.टेलत शेवटी आला. तो प्रेक्षकांतूनच गात गात स्टेजवर गेला. आमच्या जवळूनच गेला तो, पण त्याच्याकडे आणि माझ्या मुलाने वासलेला 'आ' बघण्यात फोटो काढायचे राहून गेले. त्याने त्याच्या नेहमीच्या 'श्टायल' मधे dance केला 'Do I make you proud' गायला.

धमाल आली. खचाखच भरलेल्या auditorium मध्ये, तरुण, शाळकरी मुलंमुली आणि parents ची गर्दी होती. बाहेर स्पोँसर Kellog, pop tarts फुकट वाटत होते. Happy Idols शो चे भांडवल करायला त्यांचे merchandise चे स्टॉल्स होते. भरमसाठ किंमती असूनही लोक काही ना काही घेत होते. हा शो खरंच किती लोकप्रिय आहे याची पुन्हा एकदा कल्पना आली.मुलं तर थोडाच वेळ जागेवर बसली असतील. सगळी आपापल्या आवडीच्या Idol च्या गाण्यावर नाचत होती. आणि (काही) आई वडील कानांत बोटं घालून हसत होते. Happy एकंदर अनुभव छान होता.

Tickets- $$$
Food & Drinks- $$
Parking- $$
Merchandise- $$

Friday evening with kids at 'Idol Live' $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$...... Happy

शो संपल्याबरोबर आम्ही धावत बाहेर! का तर undergroud पार्किन्ग मधून बाहेर येऊन गर्दीतून वाट काढत घरी पोहोचावं म्हणून. जरी रात्रीचे १० वाजले असले तरी ती शुक्रवारची रात्र होती आणि DC मधलं लाईफ तर नुकतं सुरु होत होतं.... Happy

प्रकार: