ऑनलाइन गिफ्ट ऑर्डर

Submitted by ज्ञाती on 3 August, 2014 - 21:38

मला एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी गिफ्ट पाठवायचे आहे. ती दुसर्‍या राज्यात असल्याने ऑनलाइन निवडून पाठवणे सोयीचे पडेल जसे फुले किंवा गिफ्ट बास्केट.
तुम्ही याकरिता कुठल्या साइट वापरल्या असतील आणि अनुभव चांगला असेल तर इथे लिहा. धन्यवाद!

मला ७ ऑगस्ट ला तिला सनीवेल मध्ये मिळेल असे गिफ्ट पाठवायचे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या राज्यात कधी पाठवले नाही पण आर्चिज ऑनलाईन शॉपीमधुन भारतात पाठवले होते .. अगदी वेळेवर , व्यवस्थित पोचलं गिफ्ट!

ज्ञाती तू अमॅझॉन वर खरेदी करून गिफ्ट रॅप पर्याय वापरून डायरे़क्ट तिच्याकडे शिप करू शकतेस ना. मी खूपदा केले आहे असे. अर्थात फुले नाही मी पाठवली.

भारतात असे पाठवायचे असेल तर कोणते चांगले पर्याय आहेत ?
फुलांपेक्षासुद्धा काहीतरी भेटवस्तु विथ गिफ्टपॅक ?

इथे पण बघा एकदा .. www.sheepstop.com

व्यवस्थित गिफ्ट पॅक केलेले टी-शर्ट तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पाठवतात..

फ्लिपकार्ट आणि एमेझॉनची प्रॉडक्ट रेंज व सर्विस एकदम मस्त > सहमत. गिफ्ट रॅप करून पाठवता येईल.

फ्लिपकार्ट आणि एमेझॉनची प्रॉडक्ट रेंज व सर्विस एकदम मस्त >>++

अवांतर -
फ्लिपकार्टची गिफ्ट कूपन्सही असतात. मला मागे मिळालेले, मस्त हवी ती पुस्तके घेतली.

धन्यवाद सर्वांना!

पर्सनल क्रिएशन च्या साइट वरून गिफ्ट ऑर्डर केले आहे. इथे अनुभव लिहीनच.

एडिबल अ‍ॅरेन्जमेंट खूप आवडल्या पण मैत्रीण भारतातून आलीये, म्हणून तिला तिकडे नेता येइल अशी नावीन्यपूर्ण वस्तू शोधली.

अप्डेट

तर पर्सनल क्रिएशन वरून पाठवलेले गिफ्ट अगदी वेळेत आणि जसे साइटवर वर्णन आहे तसे पोचले. ऑर्डर करताना कळले की काही वेळा २५ % सूट असे प्रमोशन असते.

फ्लिपकार्ट आणि एमेझॉनची प्रॉडक्ट रेंज व सर्विस एकदम मस्त >>++
अवांतर -
फ्लिपकार्टची गिफ्ट कूपन्सही असतात. मला मागे मिळालेले, मस्त हवी ती पुस्तके घेतली.>>>> +१
फ्लिपकर्ट बेस्ट. बर्‍याचदा वापरलेय. व एकदा गिफ्ट कूपन मिळाले आहे.
रच्याकने - एकदा स्नॅपडील वापरले. वा.दि नंतर ८-१० दिवसांनी गीफ्ट पोहोचलेले. Sad

मी एक- दोनदा http://www.gifts-to-india.com/ ने भारतात आणि अमेरीकेत राखीपोर्णिमा, वाढदिवसा निमित्त भेटवस्तु पाठवल्या आहेत ( फुलं , मिठाई, ड्रायफ्रुट्स वगैरे )
अगदी ऑनटाईम आणि व्यवस्थित सर्विस !
फुलं आणि मिठाया तर एकदम फ्रेश होत्या म्हणे !! ( रिसिव्हिंग एंड एकदम खुश होतं Happy

आणि ऑफकोर्स अ‍ॅमेझॉन जिंदाबाद Happy