आईला 'ए आई' अशी हाक मारणे व वडिलांना 'अहो बाबा' अशी हाक मारणे ही पद्धत बहुधा खालील कारणामुळे पडलेली असावी.
आधीच्या पिढीत बायका नवर्यांना 'अहो' आणि नवरे बायकांना 'ए' म्हणायचे. संगोपन व जडणघडणीच्या अगदी सुरुवातीच्या काळात आई बहुधा मुलांना 'बाबा आले, बाबा निघाले, बाबा येतील, बाबांना सांग' असे म्हणत असल्यामुळे वडिलांना उद्देशून 'अहो' हे रूप वापरायचे ठसवले जाणे होत असावे. आता दोघेही एकमेकांना 'ए' असे संबोधतात व कदाचित लहानपणापासून मुलांनाही 'बाबा आला का बघ, बाबाला विचार किती वेळ लागेल' असे ऐकायची सवय झाल्यामुळे वडिलांनाही 'ए' असे संबोधणे होत असावे.
पूर्वी एकत्र कुटुंबात आपल्या वडिलांना उद्देशून त्यांचे थोरले वा धाकटे भाऊ, बहिणी, आजी, आजोबा हे सगळेच 'ए' हे संबोधन वापरतात हे समजूनही पूर्वी 'अहो बाबा' म्हंटले जायचे ह्याचेही कारण बहुधा हेच असावे की प्रत्यक्षात 'त्या' बाबाच्या मुलाशी बाबांबद्दल बोलताना मात्र सगळे 'तुझे बाबा कुठे आहेत, तुला बाबा आवडतात की आई आवडते' असे बोलत असल्यामुळे मुलांना असे वाटत असावे की बाकी कोणीही बाबांना उद्देशून काहीही म्हणत असो, आपण मात्र 'अहो'च म्हणणे अपेक्षित आहे. फरक पडत असलाच तर इतकाच की त्या बाबांना बहुसंख्य लोक जर इतर काही नावाने, जसे आप्पा, अण्णा, नाना, दादा वगैरे संबोधत असतील तर मूल 'अहो बाबा' ऐवजी उदाहरणार्थ 'अहो आप्पा' म्हणे!
'ए' म्हंटल्याने 'आदर कमी पण ममत्व जास्त' किंवा अहो म्हंटल्याने 'ममत्व (तुलनेने) कमी पण आदर जास्त' असे समजण्याचा हा जमानाही नाही आणि ते योग्यही वाटत नाही.
हेही तितकेच खरे की 'ए' म्हंटल्याने ममत्व वाढते असेही नाही.
'ए' म्हंटल्याने जवळीक मात्र वाढते. आपण वयाने खूप लहान असलेल्या पण परक्या असलेल्या व्यक्तीलाही 'अहो' म्हणून संबोधतो तर नव्वद वर्षाचा असूनही आपला मामा असला तर त्याला 'ए' असे संबोधतो.
ममत्व व जवळीक ह्यातील फरक काय हे लिहिण्याची गरज नाही, पण मोह आवरत नाही. लव्ह आणि कंफर्ट झोन ह्यात असलेला फरक म्हणजेच हा फरक!
ह्या विषयावर मागे एका वाहत्या पानावर चर्चा केली होती व तेथील बहुसंख्यांचे मत मला पटले होते की 'ए बाबा' म्हणणे गैर नाही. (कालपासून) आज माबोवर हा विषय एका धाग्यावर निघत आहे व तेथेही साधारण अशीच काही चर्चा होत आहे.
कोणत्यातरी कारणास्तव 'ए बाबा' असे संबोधणे (मला व्यक्तिशः) आवडत नव्हते. पण 'असे का' ह्याबाबत नीटपणे स्वतःचे मत मला बनवता येत नव्हते. आज दुपारी मी ते बनवू शकलो म्हणून हा चर्चाप्रस्ताव लिहावासा वाटला.
'ए' म्हणण्यात जी 'कंफर्ट लेव्हल' येते ती त्याच्या मुळाशी आहे असे वाटते.
नेमकी आज एकत्र कुटुंब पद्धती विशेष अस्तित्वात नाही, हेही एक आहेच.
सर्वात जवळच्या दोन व्यक्तींपैकी दोघींनाही 'ए' असे संबोधण्यामुळे पुढे जाऊन ज्यांना 'अहो' म्हणावेच लागेल अश्यांबाबत मनात एक परकेपणा निर्माण होणे संभव वाटते. ह्यात शिक्षक, शेजारपाजारचे, काही नातेवाईक, पूर्णपणे परके लोक हे सगळे आले. दोन माणसे एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा 'अहो' ह्या संबोधनातून अभिप्रेत असलेले परकेपण जपूनही संवाद परिणामकारकपणे साधणे हे नैसर्गीक आहे व जीवनात आवश्यक आहे ही भावना निर्माण होण्यास वेळ लागू शकतो. अर्थात इंग्रजी माध्यमातून शिकताना 'यू, ही,शी' अशी संबोधने असल्यामुळे तोही प्रश्न बर्याच प्रमाणात निकालात निघतो, तरी कुठेतरी तो प्रश्न उद्भवतोच.
'अहो' ह्या संबोधनात 'एक आदराची भावना' आहे असे मला तरी म्हणायचे नाही. असे म्हणायचे आहे की 'ज्यांना आपण ए म्हणू शकत नाही अश्यांबरोबरही बरेच सहजीवन व्यतीत करावे लागते' हे पचनी पडण्याचे प्रमाण वाढू शकते.
ह्याशिवायः
बुवा येईल, राक्षस येईल अशी भीती दाखवून मुलांना गप्प बसवण्यात येई. कधी ऐकण्यात नाही की कोणी बाई येईल, हडळ येईल, तेव्हा आता गप्प बस!
पुरुषाची रफ स्कीन, दाढी मिश्या, धिप्पाडपणा, राकटपणा, आवाजातील घोगरेपणा ह्या गोष्टी काही काळानुसार बदलल्या नाहीत. (अपवाद निराळे).
खूप लहान असताना आई व इतर स्त्रियांनी केलेले लाड आणि वडील व इतर पुरुषांचे धडाकेबाज वर्तन ह्यातील फरक बहुधा अंतर्मनावर कोरला जात असावा. अश्या अवस्थेत 'आईला ए' आणि 'बाबांना अहो' म्हणणे हा स्त्री पुरुष भेद ठरत नसून त्या कोवळ्या वयात 'कोठे आपण हवे तसे वागू शकतो आणि कोठे थोडे वचकायला हवे' ह्याचे अप्रत्यक्ष संस्कार होत असावेत. प्रत्यक्षात बाप बुळचट आणि आई खमकी अशी हजारो उदाहरणे असतील, तरीही 'कोठे हवे तसे वागू शकतो आणि कोठे नाही' ह्याचे संस्कार होणे हे पुढील आयुष्यासाठी उपयुक्त ठरत असावे. पुढील आयुष्यात ती व्यक्ती फक्त स्त्रियांसमवेतच हवी तशी आणि पुरुषांपासूनच जपून राहील वगैरे अर्थछटा निघू नयेत, म्हणायचे इतकेच आहे की कंफर्ट झोन सोडून अनेक कृत्ये करावी लागतात आणि तरीही मानसिकता आधीच्या पिढीतील मुलांइतकीच टफ ठेवावी लागते हे शिक्षण मिस होत आहे.
आज बाबांना 'ए बाबा' म्हणणारी मुले परफॉर्म करत नाहीत असे नाहीच. ती करतात. खरे तर त्या 'ए बाबा'पेक्षाही जास्तच परफॉर्म करतात. पण त्यामध्ये एक स्पर्धात्मक ताण असतो. हा ताण असा असतो की जो जर काही कारणाने नाही सोसता आला तर घरी येऊन म्हणता येते की 'अरे बाबा, तुला माहितीय ना तूच त्या दिवशी काकाला म्हणत होतास की हा माझ्यापेक्षाही ब्राईट आहे?'
त्या 'ए बाबा'ची मानसिकता त्याच्या स्वतःच्या लहानपणी इतकी टफ नसे की तो त्याच्या 'अहो बाबांना' हे ऐकवू शकेल.
प्रश्न आदर, ममत्व, जवळीकता, भीती, धाक ह्यांचा नाही. प्रश्न हा आहे की घरातच एक स्थान असे असावे जेथे 'नॉनपरफॉर्मन्स'चा जाब द्यावा लागतो आणि तो जाब दिल्यानंतर क्षमाशीलपणे जवळ घेणारी एक 'ए आई' असावी लागते हे आवश्यक आहे की नाही ह्याचा!
ह्या भूमिका उलट्याही होऊ शकतात.
म्हणजे 'ए बाबा' म्हणणे सगळ्यांनाच आवडत असेल तर 'अहो आई' म्हणा!
पण आयुष्यात परक्यांच्या मर्जीनुसार वागावे लागू शकते ही शिकवण ह्या 'ए' आणि 'अहो' मधून काही प्रमाणात तरी मिळते असे मला वाटते.
चूक भूल द्या घ्या
-'बेफिकीर'!
मुद्दे ओढूनताणून लिहिलेला
मुद्दे ओढूनताणून लिहिलेला पूर्णपणे अनावश्यक लेख.
ज्या पिढीला उद्देशून लिहिलाय ती मंडळी त्यांना काय हवंय तेच म्हणणार!
मला तर ते डॅडा, ए बाबा
मला तर ते डॅडा, ए बाबा वगैरे फार गोड वाट्ते. आदर भीती पेक्षा आजकालचे बाबा मित्र आहेत. आणि थोडी त्यांनाही आपली व्हल्नरेबिलिटी दाखवायला मिळते. अहो बाबा पब्लिक रागिट/ मारकुटे मुले मजेत पत्ते खेळत असतना आवाज होतो म्हणू ते बंबात टाकून देणारे, राखुंड्या टाईप होते. अपल्या मनातले त्यांच्यासमोर बोलूनच दाखवता येत नसे.
आता डॅडा संडेला उठून मुलांबरोबर आईसाठी ब्रेकफास्ट बनवतो. आईला मीटिंग असली तर म मुलांना पिक अप करतो शाळेला सोडतो. त्यांच्या जीवनात इन्वॉल्वड आहे. मला एम बी ए करायचे नाही फोटो ग्राफी करत जग हिंडायचे आहे हे अश्या बाबाला सांगता येते. फॅमि लीचे स्वरूपच बदलले आहे. बदलते आहे. पुण्याचे सोडा. इतरत्र!
शिवाय दोन गे बाबा असतील तर मूल काय म्हणेल.? सोचो सोचो अपनी सोच का दायरा बढाओ. दोन पिढ्यां मागचे काय आता राहिले आहे म्हणून हे राहावे.
फुकट टंकितो मनुष्य.
"ए बाबा" म्हणणे नाही पटत आणि
"ए बाबा" म्हणणे नाही पटत

आणि "अहो बाबा" म्हणणार्या मुलांची वडिलांशी जवळिक नसतेच असे का गृहित धरून चालले आहेत लोक ?
तुमच्या पटण्याने काय
तुमच्या पटण्याने काय होतंय?
पॉपकॉर्न हवेत का?
धागा अनावश्यक वाटला.
धागा अनावश्यक वाटला.
मला काही कळत नाहीये मी जर
मला काही कळत नाहीये
मी जर म्हणलं -

१)अहो बाबा म्हणल्याने प्रेम कमी होतं असं नाही - तर ते लेखात पण लिहिलंय.
२)ए बाबा म्हणल्याने आदर संपतो असं नाही- तर हे ही लेखात लिहिलय
३)ए बाबा, अहो बाबा याने नेमक्या प्रेमात, आदरात आणि वाटणार्या धाकात काही फरक पदत नाही कारण धाक, आदर,प्रेम हे 'ए,अहो' या शब्दांमधे नसुन तो बाबा आपल्या घरात, आपल्या मुलांशी कसा वागतो यात आहे. तर ते ही काईंड ऑफ लेखात लिहिलय
मग इथे काय चर्चा अपेक्षित आहे?
चर्चा अपेक्षितच नाही गं
चर्चा अपेक्षितच नाही गं रिया!! अनेक मतधारांचाही एक संपूर्ण लेख होऊ शकतो एवढेच असावे!
"जो जे वांछिल तो ते लाहो" असे
"जो जे वांछिल तो ते लाहो" असे असेल बहुतेक
मला वाटतं कीं 'अरे' किंवा
मला वाटतं कीं 'अरे' किंवा 'अहो' म्हणणं यावरून तसं संबोधणार्यांच्या 'कंफर्ट झोन'ची व्याप्ती ठरवणं तितकंसं योग्य होणार नाही. कारण अनेक ठीकाणीं [ कोकण, विशेषतः गोवा] व अनेक समाजात वडिलाना 'अरे' म्हणण्याची पद्धत पारंपारिक आहे व अनेक कुटूंबांत नवर्याने बायकोला 'अहो' म्हणण्याचीही . त्यामुळे, आपण ज्या वातावरणात वाढलो तिथं वडिलाना /आईला जसं संबोधतात तसं संबोधलेलं ऐकणं हा आपला 'कंफर्ट झोन' असतो, इतकंच !
जो जे वांछिल तो ते लाहो >>>
जो जे वांछिल तो ते लाहो >>>
भिंत बिंत चाळवली कि काय ?
>> भिंत बिंत चाळवली कि काय
>> भिंत बिंत चाळवली कि काय ?
तुम्हाला चालवली असे लिहायचे आहे ना ?
उत्तर - हो चालवली ना. वेद सुद्धा म्हणवून घेऊ शकतो.
आणि चाळवली असेच म्हणायचे असेल
आणि चाळवली असेच म्हणायचे असेल तर काय देशिल उत्तर?
<< चाळवली असेच म्हणायचे असेल
<< चाळवली असेच म्हणायचे असेल तर काय देशिल उत्तर? >> 'डॉ. फिक्स इट' !
भाऊ महेश, हो चालवली ना.
भाऊ
महेश,
हो चालवली ना. >>> सहाशे वर्षांपूर्वी आमच्याकडे फेसबुक होतं असं पण म्हणू शकता
वेद सुद्धा म्हणवून घेऊ शकतो >> काय राहीलंय अजून? अपौरुषेय लेख आहे असंही म्हणाल. तुमच्या पोस्ट्स वाचून नेहमी शोलेतया एका प्रसंगाची आठवण होते.
आता डॅडा संडेला उठून
आता डॅडा संडेला उठून मुलांबरोबर आईसाठी ब्रेकफास्ट बनवतो. आईला मीटिंग असली तर म मुलांना पिक अप करतो शाळेला सोडतो. त्यांच्या जीवनात इन्वॉल्वड आहे. मला एम बी ए करायचे नाही फोटो ग्राफी करत जग हिंडायचे आहे हे अश्या बाबाला सांगता येते.>>>>>>>>>>>
माझ्या लेकीचा बाबा ही असाच आहे. पण ती त्याला अरे तुरे न करता अहो म्हणते. आणि लेकीची आई ए म्हणते. मग????????
ए भाऊ, जेवायला चल .... अगदी
ए भाऊ, जेवायला चल ....
अगदी बारावीपर्यंत मी माझ्या वडिलांना अशीच हाक मारायचो.
.......आणि मग मला अक्कल(?) आली. वडिल हे आदरणीय व्यक्तीमत्व असून त्यांचा उल्लेख आदरार्थीच करायला हवा.
आणि मी "ओ भाऊ, जेवायला चला" म्हणू लागलो.
आणखी काही वर्षांनी मला खरीखुरी अक्कल आली आणि समजले, एकेरी संबोधन हे अनादराचेच असते असे नसून आपलेपणाचेही असू शकते.
पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, आता फिरून ए भाऊ पुकारणे कठीणच.
असो, आता माझी मुलगी मला काय पुकारेल हे सर्वस्वी तिची चॉईस आहे, माझीच इच्छा म्हणाल तर तिला मला एकेरी हाक मारावीशी वाटली तर जास्त आवडेल
हर्पेन, यू टू ? असो, तर मुळ
हर्पेन, यू टू ?
असो, तर मुळ मुद्दा ए की अहो ?
जर आहो मराठीत म्हणत असतील तर ठीक आहे,
पण जपानी भाषेत म्हणाले तर मात्र
इथे काय संस्कार देण्याचे वर्ग
इथे काय संस्कार देण्याचे वर्ग चालु केलेत का बेफीनी??????????
बरोब्बर, या जागा शिल्लक आहेत
बरोब्बर, या जागा शिल्लक आहेत अजुनही
यांच्यासारख्यांकडुन शिकावे
यांच्यासारख्यांकडुन शिकावे इतके ही वाईट दिवस आले नाही महेश........
बर ! _/\_
बर ! _/\_
प्रश्न आदर, ममत्व, जवळीकता,
प्रश्न आदर, ममत्व, जवळीकता, भीती, धाक ह्यांचा नाही. प्रश्न हा आहे की घरातच एक स्थान असे असावे जेथे 'नॉनपरफॉर्मन्स'चा जाब द्यावा लागतो आणि तो जाब दिल्यानंतर क्षमाशीलपणे जवळ घेणारी एक 'ए आई' असावी लागते हे आवश्यक आहे की नाही ह्याचा!
>> बेफी.. कदाचित तुम्हाला माझा प्रश्न थोडा अवांतर वाटेल परंतु
"हे असे का?" असं विचारण्याची (पुर्वीच्या काळी) मुभा नसणे
किंवा पु.लं. ज्याला "गप्प बसा संस्कृती" म्हणतात
किंवा "मोठ्यांचा आदर करणे = ते जे करतील ते सर्व बरोबर किंवा त्यांना त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या माणसाने त्याबद्दल जाब विचारणे योग्य नाही"
यापैकी कश्याचेही समर्थन करता का?
लेख आणि प्रतिसाद अजून वाचले
लेख आणि प्रतिसाद अजून वाचले नाहीत पण पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना दडपून टाकण्यासाठी वा स्त्रियांचे स्थान दुय्यम राखण्यासाठी जे काही केलेय त्याचाच हा एक भाग अश्या आशयाची चर्चा इथे चालू आहे का?
...तरच वाचतो आणि तरच चर्चेत उतरतो, तेव्हढाच सुट्टीचा विरंगुळा
एक सेंटी वाक्य - आपल्या संस्कृतीत देवांचा उल्लेख हा नेहमीच वा बरेचदा एकेरीच केला जातो.
अमा, एकदम पटेश
अमा, एकदम पटेश
अहो बेफिकीर...बघा ईथे किती
अहो बेफिकीर...बघा ईथे किती अनावश्यक प्रतिसाद आणि प्रतिसादक जमलेत.....
या चर्चेचा मूळ विषय ज्यांना
या चर्चेचा मूळ विषय ज्यांना अहोजाहो केलं जात होतं ते पूर्वीचे प्रोटोटाईप बाबा- करारी,तत्वनिष्ठ , त्यागी . घरात दरारा. मुलांशी वर्तन 'लालयेत पंचवर्षानि , दशवर्षानि ताडयेत ' या सुभाषितावर ठामपणे आधारलेलं.
कुटुंबप्रमुखाच्या या रोलला आदरार्थी बहुवचन क्रमप्राप्त ! जसं की ओफिसात बॉसच्या खुर्चीला असतोच ना आदर .पण बाबांच्या बॉसिझमचा काळ डोळ्यांदेखत बदलत जातो तेव्हा आधी नात्यात मित्रत्वाचा गोडवा येतो, नंतर बाबा आपलं मूल झालेत असाही त्यांच्या असहाय वार्धक्याचा काळ येतो!
या शेवटच्या पर्वात बाबांच्या डोळ्यात दिसतं निरागस अर्भक आपल्यावर विश्वास टाकणारं , आपल्याकडे कौतुकाने बघणारं तेव्हा पोटात तुटतं. कद्धी लाड आणि प्रेम उतू जाऊ न दिलेल्या बाबांचे आपण लाड करतो बाळासारखे.
आणि ते गेल्यावर त्यांच्या फोटोकडे पहाताना चकित होतो. माझ्या बापा ! असा एकेरी उल्लेख येतो मनात , प्रेमाची ही सर्व रूपं अनुभवल्यावर.
मग ही आताची शहाणी पिढी सुरुवातच तिथून करते आहे,नवल काय ?
मी पाहिलेला अनुभव स्थळ :
मी पाहिलेला अनुभव स्थळ : दवा़खाना, वय वर्ष ५ मुलगा आपल्या बाबाना म्हणाला- 'ए बाबा तुल काहि अक्कल नाही, तु गप्प बस.' या वर वडील मुलाला एकास शब्द बोलले नाही. हेच जर तो मुलगा वडीलाना आहो जाहो करत असता तर तो हे म्हणु शकला नसता. नात्याचा मान राहिला पाहिजे.
Mee joshi Tumhee amache
Mee joshi
Tumhee amache kuldeepak ani tyacha baba yana tar bhetale nahee na ?
मी जोशी , तो मुलगा आईला 'तुला
मी जोशी , तो मुलगा आईला 'तुला काही अक्कल नाही तू गप्प बस म्हणाला तर चालेल का हो?'
तिथे अगं जागं म्हणूनही नात्याचा मान कसा रहातो.
ते ही सोडा, तो बाप जर मुलाला 'तुला काही अक्कल नाही तू गप्प बस' असे म्हणाला तर नात्याचा मान रहातो का हो?
आईला 'ए' आणि बाबांना 'अहो'
आईला 'ए' आणि बाबांना 'अहो' म्हणून घरात 'कर्ताधर्ता, सर्वेसर्वा, अखेचा शब्द ज्याचा असा तो श्रेष्ठ पुरूष' अशी प्रतिमा तयार करण्याचा आपल्या संस्कृतीरक्शकांचा अनेक पिढ्यांचा कट होता. स्त्रियांना दुय्यम स्थान देणे हे मूळ कारण. धाकबिक फक्त 'बापाचा माल' कधीही नव्हता व नाही. आता जेव्हा 'ए' मुळे मुलांशी जवळीक जास्त होते हे रहस्य उलगडले आणि वर लिहीलेेले 'क स अ श ज्या अ तो श्रे पु' फुसके वाटू लागले तेव्हा 'ए बाबा' सुरू झाले.
चर्चेचा विषयच नाही.
Pages