ए आई......अहो बाबा

Submitted by बेफ़िकीर on 28 July, 2014 - 11:35

आईला 'ए आई' अशी हाक मारणे व वडिलांना 'अहो बाबा' अशी हाक मारणे ही पद्धत बहुधा खालील कारणामुळे पडलेली असावी.

आधीच्या पिढीत बायका नवर्‍यांना 'अहो' आणि नवरे बायकांना 'ए' म्हणायचे. संगोपन व जडणघडणीच्या अगदी सुरुवातीच्या काळात आई बहुधा मुलांना 'बाबा आले, बाबा निघाले, बाबा येतील, बाबांना सांग' असे म्हणत असल्यामुळे वडिलांना उद्देशून 'अहो' हे रूप वापरायचे ठसवले जाणे होत असावे. आता दोघेही एकमेकांना 'ए' असे संबोधतात व कदाचित लहानपणापासून मुलांनाही 'बाबा आला का बघ, बाबाला विचार किती वेळ लागेल' असे ऐकायची सवय झाल्यामुळे वडिलांनाही 'ए' असे संबोधणे होत असावे.

पूर्वी एकत्र कुटुंबात आपल्या वडिलांना उद्देशून त्यांचे थोरले वा धाकटे भाऊ, बहिणी, आजी, आजोबा हे सगळेच 'ए' हे संबोधन वापरतात हे समजूनही पूर्वी 'अहो बाबा' म्हंटले जायचे ह्याचेही कारण बहुधा हेच असावे की प्रत्यक्षात 'त्या' बाबाच्या मुलाशी बाबांबद्दल बोलताना मात्र सगळे 'तुझे बाबा कुठे आहेत, तुला बाबा आवडतात की आई आवडते' असे बोलत असल्यामुळे मुलांना असे वाटत असावे की बाकी कोणीही बाबांना उद्देशून काहीही म्हणत असो, आपण मात्र 'अहो'च म्हणणे अपेक्षित आहे. फरक पडत असलाच तर इतकाच की त्या बाबांना बहुसंख्य लोक जर इतर काही नावाने, जसे आप्पा, अण्णा, नाना, दादा वगैरे संबोधत असतील तर मूल 'अहो बाबा' ऐवजी उदाहरणार्थ 'अहो आप्पा' म्हणे!

'ए' म्हंटल्याने 'आदर कमी पण ममत्व जास्त' किंवा अहो म्हंटल्याने 'ममत्व (तुलनेने) कमी पण आदर जास्त' असे समजण्याचा हा जमानाही नाही आणि ते योग्यही वाटत नाही.

हेही तितकेच खरे की 'ए' म्हंटल्याने ममत्व वाढते असेही नाही.

'ए' म्हंटल्याने जवळीक मात्र वाढते. आपण वयाने खूप लहान असलेल्या पण परक्या असलेल्या व्यक्तीलाही 'अहो' म्हणून संबोधतो तर नव्वद वर्षाचा असूनही आपला मामा असला तर त्याला 'ए' असे संबोधतो.

ममत्व व जवळीक ह्यातील फरक काय हे लिहिण्याची गरज नाही, पण मोह आवरत नाही. लव्ह आणि कंफर्ट झोन ह्यात असलेला फरक म्हणजेच हा फरक!

ह्या विषयावर मागे एका वाहत्या पानावर चर्चा केली होती व तेथील बहुसंख्यांचे मत मला पटले होते की 'ए बाबा' म्हणणे गैर नाही. (कालपासून) आज माबोवर हा विषय एका धाग्यावर निघत आहे व तेथेही साधारण अशीच काही चर्चा होत आहे.

कोणत्यातरी कारणास्तव 'ए बाबा' असे संबोधणे (मला व्यक्तिशः) आवडत नव्हते. पण 'असे का' ह्याबाबत नीटपणे स्वतःचे मत मला बनवता येत नव्हते. आज दुपारी मी ते बनवू शकलो म्हणून हा चर्चाप्रस्ताव लिहावासा वाटला.

'ए' म्हणण्यात जी 'कंफर्ट लेव्हल' येते ती त्याच्या मुळाशी आहे असे वाटते.

नेमकी आज एकत्र कुटुंब पद्धती विशेष अस्तित्वात नाही, हेही एक आहेच.

सर्वात जवळच्या दोन व्यक्तींपैकी दोघींनाही 'ए' असे संबोधण्यामुळे पुढे जाऊन ज्यांना 'अहो' म्हणावेच लागेल अश्यांबाबत मनात एक परकेपणा निर्माण होणे संभव वाटते. ह्यात शिक्षक, शेजारपाजारचे, काही नातेवाईक, पूर्णपणे परके लोक हे सगळे आले. दोन माणसे एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा 'अहो' ह्या संबोधनातून अभिप्रेत असलेले परकेपण जपूनही संवाद परिणामकारकपणे साधणे हे नैसर्गीक आहे व जीवनात आवश्यक आहे ही भावना निर्माण होण्यास वेळ लागू शकतो. अर्थात इंग्रजी माध्यमातून शिकताना 'यू, ही,शी' अशी संबोधने असल्यामुळे तोही प्रश्न बर्‍याच प्रमाणात निकालात निघतो, तरी कुठेतरी तो प्रश्न उद्भवतोच.

'अहो' ह्या संबोधनात 'एक आदराची भावना' आहे असे मला तरी म्हणायचे नाही. असे म्हणायचे आहे की 'ज्यांना आपण ए म्हणू शकत नाही अश्यांबरोबरही बरेच सहजीवन व्यतीत करावे लागते' हे पचनी पडण्याचे प्रमाण वाढू शकते.

ह्याशिवायः

बुवा येईल, राक्षस येईल अशी भीती दाखवून मुलांना गप्प बसवण्यात येई. कधी ऐकण्यात नाही की कोणी बाई येईल, हडळ येईल, तेव्हा आता गप्प बस!

पुरुषाची रफ स्कीन, दाढी मिश्या, धिप्पाडपणा, राकटपणा, आवाजातील घोगरेपणा ह्या गोष्टी काही काळानुसार बदलल्या नाहीत. (अपवाद निराळे).

खूप लहान असताना आई व इतर स्त्रियांनी केलेले लाड आणि वडील व इतर पुरुषांचे धडाकेबाज वर्तन ह्यातील फरक बहुधा अंतर्मनावर कोरला जात असावा. अश्या अवस्थेत 'आईला ए' आणि 'बाबांना अहो' म्हणणे हा स्त्री पुरुष भेद ठरत नसून त्या कोवळ्या वयात 'कोठे आपण हवे तसे वागू शकतो आणि कोठे थोडे वचकायला हवे' ह्याचे अप्रत्यक्ष संस्कार होत असावेत. प्रत्यक्षात बाप बुळचट आणि आई खमकी अशी हजारो उदाहरणे असतील, तरीही 'कोठे हवे तसे वागू शकतो आणि कोठे नाही' ह्याचे संस्कार होणे हे पुढील आयुष्यासाठी उपयुक्त ठरत असावे. पुढील आयुष्यात ती व्यक्ती फक्त स्त्रियांसमवेतच हवी तशी आणि पुरुषांपासूनच जपून राहील वगैरे अर्थछटा निघू नयेत, म्हणायचे इतकेच आहे की कंफर्ट झोन सोडून अनेक कृत्ये करावी लागतात आणि तरीही मानसिकता आधीच्या पिढीतील मुलांइतकीच टफ ठेवावी लागते हे शिक्षण मिस होत आहे.

आज बाबांना 'ए बाबा' म्हणणारी मुले परफॉर्म करत नाहीत असे नाहीच. ती करतात. खरे तर त्या 'ए बाबा'पेक्षाही जास्तच परफॉर्म करतात. पण त्यामध्ये एक स्पर्धात्मक ताण असतो. हा ताण असा असतो की जो जर काही कारणाने नाही सोसता आला तर घरी येऊन म्हणता येते की 'अरे बाबा, तुला माहितीय ना तूच त्या दिवशी काकाला म्हणत होतास की हा माझ्यापेक्षाही ब्राईट आहे?'

त्या 'ए बाबा'ची मानसिकता त्याच्या स्वतःच्या लहानपणी इतकी टफ नसे की तो त्याच्या 'अहो बाबांना' हे ऐकवू शकेल.

प्रश्न आदर, ममत्व, जवळीकता, भीती, धाक ह्यांचा नाही. प्रश्न हा आहे की घरातच एक स्थान असे असावे जेथे 'नॉनपरफॉर्मन्स'चा जाब द्यावा लागतो आणि तो जाब दिल्यानंतर क्षमाशीलपणे जवळ घेणारी एक 'ए आई' असावी लागते हे आवश्यक आहे की नाही ह्याचा!

ह्या भूमिका उलट्याही होऊ शकतात.

म्हणजे 'ए बाबा' म्हणणे सगळ्यांनाच आवडत असेल तर 'अहो आई' म्हणा!

पण आयुष्यात परक्यांच्या मर्जीनुसार वागावे लागू शकते ही शिकवण ह्या 'ए' आणि 'अहो' मधून काही प्रमाणात तरी मिळते असे मला वाटते.

चूक भूल द्या घ्या

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न हा आहे की घरातच एक स्थान असे असावे जेथे 'नॉनपरफॉर्मन्स'चा जाब द्यावा लागतो आणि तो जाब दिल्यानंतर क्षमाशीलपणे जवळ घेणारी एक 'ए आई' असावी लागते हे आवश्यक आहे की नाही ह्याचा! >>
ही दोन स्थाने वेगळी असावी अशी मला गरज वाटत नाही. कुठल्याही एका पालकाने जाब विचारणे आणि त्यानेच/तिनेच नंतर योग्य ती समज देऊन जवळ घेणे अपत्य संगोपनात काही बाधा आणेल असे वाटत नाही.

कष्टाची विभागणी करायचीच असेल तर पालकाच्या लिंगानुसार न करता त्यांच्या स्कील अनुसार केले तरी ठीकच - एका बाबतीत एका पालकाने जाब विचारणे उदा: दिलेले पैसे कसे खर्च केलेस? हे आईने विचारणे किंवा गृहपाठ पूर्ण आहे का हे रोज वडिलांनी विचारणे इ इ.

हाक ए मारायची का हा पर्सनल प्रश्न आहे. मुलांना आईला आणि बाबांनासुद्धा 'अहो' म्हणायला शिकवणाऱ्या फ्यामिली पण पाहिल्या आहेत. त्याबद्दल मला काहीही मत नाही.

हा धागा संस्कृती विषयात का असावा हे नीटसे समजले नाही.

कष्टाची विभागणी करायचीच असेल तर पालकाच्या लिंगानुसार न करता<<<

चर्चा भरकटवू शकणारे मत!

मी कुठेही म्हणालेलो नाही की कष्टाची विभागणी लिंगानुसार होते.

आता कृपया तुम्हाला अनुमोदने, प्लस वन, प्लस वन करोड वगैरे देणार्‍यांसकट थोडे थांबावेत.

नम्र विनंती आहे.

(जे लोक ही चर्चा भरकटवतील त्यांचे प्रतिसाद मी येथे कोट करेन).

हा धागा संस्कृती विषयात का असावा हे नीटसे समजले नाही.<<<

कोणता धागा कुठे असावा हेच नीटसे समजलेले नसताना एवढा मोठा प्रतिसाद?

व्वा!

सीमंतिनी | 28 July, 2014 - 21:33 नवीन

तुम्ही किंवा इतर कुणीही समजावलं तर लहान प्रतिसाद द्यायची तयारी आहे.
<<<

प्रतिसादाच्या लांबीचा प्रश्न नाही, अचूकतेचा आहे.

ही दोन स्थाने वेगळी असावी अशी मला गरज वाटत नाही. कुठल्याही एका पालकाने जाब विचारणे आणि त्यानेच/तिनेच नंतर योग्य ती समज देऊन जवळ घेणे अपत्य संगोपनात काही बाधा आणेल असे वाटत नाही. >> पटले. किंबहुना असे नसणे, म्हणजे एकाने जाब विचारणे आणि दुसऱ्याने क्षमाशीलपणा दाखवणे हे जास्त धोकादायक नाही का? कुठल्या आई/ बाबा ला आवडेल की आपला पार्टनर आपण जाब विचारताना शांत न राहता/ आपली बाजू न घेता क्षमाशील होतोय.
तसेच जो क्षमाशील त्याच्याशी जवळीक आणि जो जाब विचारतो त्याच्याशी नाही... असं खरंच होतं का?
मला जो अर्थ समजला त्यावरून प्रतिसाद देतोय.

माझ्या माहितीनुसार संस्कृतात आदरार्थी बहुवचन नसतं. (कोणाला माहिती असेल तर माझी माहिती योग्य आहे का ते सांगा.)
मग मराठी/हिंदीत कुठून आलं असेल हे खूळ असा प्रश्न पडला हा लेख वाचताना.

म्हणजे ओरिजनल रामायणात राम दशरथाला 'अहो बाबा' म्हणत नसूनही त्याच्या इच्छेखातर चौदा वर्षं वनवासात गेला, आजच्या काळात 'माजा म्हातारा' म्हणणारा बापाचं प्रेमाने करतानाही दिसतो आणि 'अहो बाबां'ना वृद्धाश्रमात पाठवणारेही असतात. असं असताना संबोधन एकेरी आहे किंवा कसं हा फारच नॉन-इश्यू वाटतो.

मला जो अर्थ समजला त्यावरून प्रतिसाद देतोय.<<<

बहुतेक लोक तेच करतात.

मला असे म्हणायचे नाही की एक जण रागावत असताना त्याचक्षणी दुसर्‍याने जवळ घेऊन थोपटावे.

>>> सीमंतिनी | 28 July, 2014 - 21:36 नवीन

चुकल काय मग?
<<<

प्रतिसादात लिंगभेदाचा विषय आणणे!

माझ्या माहितीनुसार संस्कृतात आदरार्थी बहुवचन नसतं<<<

माझ्या माहितीनुसार संस्कृतात काय होतं हाच आज मोठ्ठा नॉन इश्यू आहे.

बेफिकीरजी, अपत्याने एका पालकाला 'ए' हाक मारली तर भिन्नलिंगी पालकाला 'अहो' हाक मारावी असा विषय मांडला आहे ना? मग माझा प्रतिसाद का बर चुकला?

इब्लीस सर Happy

मला म्हणायचं की एकच माणूस दोन्ही गोष्टी करतो. रादर कराव्यात. तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण मला खूप ढोबळ काळा - पांढरा विभाजन वाटतंय.
परिस्थिती प्रमाणे आई/ बाबा वेगवेगळ्या गोष्टीत जाब विचारतील. जो जेव्हा जाब विचारेल तेव्हा त्याला अहो म्हणायचं का?

>>> सीमंतिनी | 28 July, 2014 - 21:43 नवीन

बेफिकीरजी, अपत्याने एका पालकाला 'ए' हाक मारली तर भिन्नलिंगी पालकाला 'अहो' हाक मारावी असा विषय मांडला आहे ना? मग माझा प्रतिसाद का बर चुकला?
<<<

कारण (ह्या शब्दापासून वाक्य सुरू करत नसतात हे बहुधा ##कर सांगतीलच)

भिन्नलिंगी नव्हे, आईला 'ए' आणि वडिलांना 'अहो'!

तुम्हाला लेख पुन्हा वाचावा लागेल दुर्दैवाने!

लोकहो,

कृपया पहिल्या अतिशय रिअ‍ॅक्टिव्ह प्रतिसादातून आलेले मत तितक्याच तुच्छपणे खोडले गेले तर कृपया अचानक भूमिका बदलून 'मला तसे नव्हे, असे म्हणायचे होते' वगैरे स्टँड घेऊ नका.

मला पण स्वातीप्रमाणे हा नॉन इश्यू वाटला.
'कोठे हवे तसे वागू शकतो आणि कोठे नाही' ह्याचे संस्कार होणे हे पुढील आयुष्यासाठी उपयुक्त ठरत असावे. ..
म्हणायचे इतकेच आहे की कंफर्ट झोन सोडून अनेक कृत्ये करावी लागतात >>>>>> केवळ वडील वा आईला 'अहो' म्हटल्याने असली काही शिकवण मिळते असे वाटत नाही. शाळेत आणि बाहेर समाजात वावरताना हळू हळू ही जाणीव येत असावी.
बाकी ते एकाने जाब विचारणे आणि दुसर्‍याने जरा हळुवार पवित्रा घेणं ही " गुड कॉप / बॅड कॉप" पद्धत बर्‍याच घरात असते आणि ती वर्क पण होते बर्‍याच केसेस मधे. आणि यात गुड कॉप दर वेळी आईच / बाबाच असेल असे नाही, या भूमिका प्रसंगानुरूप बदलू शकतात.
सो बेसिकली ए आणि अहो ने काही फरक पडत नाही, तो फक्त एक व्यक्तिगत चॉइस असतो हे माझे मत.

>>>या भूमिका प्रसंगानुरूप बदलू शकतात.<<<

हे तर मी म्हणालेलो आहेच की!

(पुनरावृत्ती)

>>>शाळेत आणि बाहेर समाजात वावरताना हळू हळू ही जाणीव येत असावी.<<<

घरातून येणे हे सर्वांगीणरीत्या उपयुक्त असणे ह्याबाबत मी लिहिले Happy

माझं थोडं कंफ्यूजन झालं आहे धाग्याच्या नक्की प्रयोजनाबद्दल.
तुम्हे लिहिलं आहे -
"ह्या विषयावर मागे एका वाहत्या पानावर चर्चा केली होती व तेथील बहुसंख्यांचे मत मला पटले होते की 'ए बाबा' म्हणणे गैर नाही. (कालपासून) आज माबोवर हा विषय एका धाग्यावर निघत आहे व तेथेही साधारण अशीच काही चर्चा होत आहे.

कोणत्यातरी कारणास्तव 'ए बाबा' असे संबोधणे (मला व्यक्तिशः) आवडत नव्हते. पण 'असे का' ह्याबाबत नीटपणे स्वतःचे मत मला बनवता येत नव्हते. आज दुपारी मी ते बनवू शकलो म्हणून हा चर्चाप्रस्ताव लिहावासा वाटला
"

>>> म्हणजे ए बाबा म्हणण्यात काहिच गैर नाही हे तुम्हाला मान्य आहे पण मनापासून आवडत मात्र नाही आणि तुम्ही तुम्हाला ते का आवडत नसावं याची कारणं शोधत होता? ती कारण काय असावेत ते तुम्ही पुढच्या भागात लिहिलय आणि ते बरोबर आहे का यावर चर्चा करायची आहे का?

आजोबांना 'अहो' आजोबा, आजीला 'ए 'आजी म्हणतात, मग ज्याला अहो बाबा म्हणतो ते 'ए' आजीला 'ए' म्हणण्याने आपण त्यांना 'अहो' संबौधतो त्यावर त्यांचा आजीला 'ए' म्हणण्याचा काय परिणाम होतो... व आपण जिला 'ए' म्हणतो ति आजी आजोबा दोगांना आहो म्हणते ,परंतु बाबा ए आणि अहो असा दुहेरी वापर करतात ,तर एकंदर ए आणि आहोचा परस्परांवर कसा इफेक्ट होत असावा... :भेजाफ्राय झालेला बाहुला:

जाता जाता ....
बेफी, एकदा पणजी - मिरज या गाडीने प्रवास करत असताना कोल्हापुर मधुन पुढे, कंडक्टरने एका वृद्ध व्यक्तीला अरे तुरे केल्यामुळे मोठा गजहब उडाला. बर्‍यापैकि भांडण झाले. एकाने कंडक्टरला विचारले कि घरी बापाला (?) असेच अरे तुरे करतो का? तो हो म्हणाला. भांडण मिटले ...... Wink

आपल्याला काय सांगायचंय हे एकदा निश्चित झालं की मग प्रतिसाद पण येतील तसे.
आता तरी भरकटलेल्या विचारांचं संकलन असं स्वरूप वाटतंय ( सदर प्रतिसाद हेडर मधे टाकला तरी चालेल )

तो हो म्हणाला. भांडण मिटले <<<

प्रवास, शहरा-शहरातल्या कंडक्टर ड्रायव्हरसोबत, देशभर, मी केला आहे निपा.

वरील वाक्यावरून भांडण मिटलेले असणे अशक्य आहे.

Happy

चु भु द्या घ्या, पण,

ज्या परिस्थितीत कंडक्टर तसे म्हणाला ती परिस्थिती विषद करायची राहिलेली आहे किंवा पुढे तुम्ही डोळा मारलेला आहेत त्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे.

Happy

म्हणजे ए बाबा म्हणण्यात काहिच गैर नाही हे तुम्हाला मान्य आहे पण मनापासून आवडत मात्र नाही आणि तुम्ही तुम्हाला ते का आवडत नसावं याची कारणं शोधत होता?<<<<<<

होय!

ती कारण काय असावेत ते तुम्ही पुढच्या भागात लिहिलय आणि ते बरोबर आहे का यावर चर्चा करायची आहे का?<<<<<<

होय

बेफि गोव्यात सगळे अरे तुरे (माका तुका टाइप) करतात. अगदी दुसर्‍या मोठ्या व्यक्तिला पण. म्हणुन प्रॉब्लेम झाला होता. हि खरी हकिकत आहे.

म्हणुन प्रॉब्लेम झाला होता<<<

म्हणजे तो प्रॉब्लेम होता तर!

ओक्के!

ते तर मीही म्हणतोच आहे 'एका विशिष्ट दृष्टिकोनातून'! Happy

मला वाटले की कंडक्टर म्हंटला की हो मी माझ्या बापाला अरे तुरे करतो की भांडण मिटते असे काही तुम्ही म्हणू इच्छीत आहात. Happy

Pages