Submitted by मोहना on 23 July, 2014 - 08:07
सोपा आणि न भाजता केलेला ग्रॅम क्रॅक्रर्स (एक्लेअर) केक
साहित्य:
२ (३.४ औंस) व्हॅनिला इन्स्टंट पुडींग पावडर पाकिटं
३.५ कप दूध
१२ औंस कुल व्हिप
२ (१४.४) औंस ची ग्रॅम क्रॅकर्सची पाकिटं
फ्रॉस्टींग
६ चमचे तूप
६ चमचे दूध
६ चमचे कोको पावडर
६ चमचे साखर
कृती:
दूध, व्हॅनिला पुडींग पावडर एकत्र करा. ते मिश्रण कुल व्हिप मध्ये घालून व्यवस्थित ढवळा.

पसरट भाड्यांत (ट्रे) ग्रॅम क्रॅकर्स पसरा. (तळ झाकण्यासाठी तुकडे तुकडे करावे लागतील.)
त्यावर वरील पुडींग, कुलव्हिप मिश्रणातील पाव भाग पसरा
सर्वात वर ग्रॅम क्रॅकर्स येईपर्यंत क्रॅकर्स, पुडींग कुलव्हिप चं मिश्रण वापरा.


फ्रॉस्टींग कृती:
दूध आणि तूप मायक्रोव्हेवमध्ये ४५ सेंकद गरम करा. (दोन्ही मिळून येण्यापुरतं)
त्यात कोको पावडर आणि साखर घालून व्यवस्थित ढवळा.
केकवर पसरा आणि रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.



विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त