निखिल वागळ्यांचं उत्तम भाषण

Submitted by pkarandikar50 on 23 July, 2014 - 01:23

एक उत्तम भाषण
’साधना’ ने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने आय.बी.एन.- लोकमतचे मुख्य संपादक निखिल वागळे यांनी पुण्यात ’प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावर केलेलं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. वागळे मनापासून आणि मनातलं बोलले. वाहिनीवर बोलताना ते काहीसं कर्कश आणि आक्रस्ताळेपणे बोलतात, पण ’त्या’ भाषणात ’तो’ सूर त्यांनी लावला नाही, तरीही त्यांचं निवेदन पुरेसं आक्रमक आणि एका अर्थी स्फोटक होतं.
माध्यमातले संपादक कोणत्या दबावाखाली आणि तणावाखाली काम करत असतात याची कल्पना अनेकांना आहे. हेच ’भाग्य’ जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या अनेक कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिंच्या वाट्याला येतं. तथापि, असह्य दबावाखाली आणि भ्रष्ट वातावरणात कार्यरत राहूनही काही सकारात्मक आणि दिलासादायक कामं करणारे अनेकजण आढळतात - माध्यमात, प्रशासनात, उद्योग व्यवसायात, न्यायपालिकेत, अगदी करमणूकीसारख्या तद्दन व्यापारी क्षेत्रातही. हे आपलं भाग्यच म्हणायला हवं, याची एक आश्वासक चुणूक पुन्हा एकदा वागळ्यांच्या भाषणात मिळाली.
’पेड न्यूज’ हा प्रकार तसा अलीकडे राजकारणात बराच रुळला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणूकीत तो आणखी प्रकर्षाने जाणवला. त्याहीपेक्शा तो घवघवीत यश मिळवून गेला ही चिंतेची बाब आहे. [म्हातारी मेल्याचं दु:ख्ख नाही, पण काळ सोकावतो!] २०१४ ही जगातली एक सर्वाधिक महागडी निवडणूक होती, एव्हढंच नव्हे तर ’माध्यमां’नी या निवडणूकीच्या निकालावर निर्णायक पकड मिळवल्याचं दिसलं. त्यावरची कडी म्हणजे निवडणूक संपल्यानंतरही, काही ठराविक उद्योगसमूह [सत्ताधारी पक्शाच्या आशिर्वादाने] पद्धतशीरपणे माध्यमं ताब्यात घेताना दिसताहेत. परीणामस्वरूपी, संपादकांचं ’अभिव्यक्ती-स्वातंत्र्य’, आणखीनच धोक्यात आलंय हे वागळ्यांनी अगदी ठणकावून, उदाहरणं देउन, सांगीतलं. खुद्द स्वत:वरही राजीनामा देउन बाहेर पडण्याची वेळ येउ शकते, हेसुद्धा त्यांनी ’खुल्लमखुल्ला’ सांगून टाकलं.
काही दिवसांपूर्वी, त्यांची प्रकृती बरी नसल्याने, त्यांना डॊक्टरांनी ’सक्तीची रजा’ घ्यायला लावली असल्याचं ऐकलं होतं. परंतु, बरेच दिवस झाले, वागळे त्यांच्या वाहिनीवरून गायबच राहिले आहेत. ते फक्त प्रकृतीच्या कारणाने की, त्यांच्यावरही, [त्यांच्या स्वत:च्याच भाकिताप्रमाणे] पायउतारा होण्याची वेळ आलीय, ते समजलं नाही. पण ते खरं असेल तर फारच चिंताजनक आहे. मी काही ’निखिल वागळे फॅन क्लब’मधला नाहीय पण तरीही, काही एक स्वतंत्र बाणा जपणार्या पत्रकारांमध्ये ते मोडतात, अशी माझी समजूत आहे आणि म्हणूनच, त्यांचं मुख्य प्रवाहातल्या माध्यमात असणं मला महत्वाचं वाटतं.
शेवटी, आपण चिंता करण्यापलीकडे तरी, काय करू शकतो? भ्रष्ट आणि सवंग माध्यमांपासून स्वत:चा पूर्ण बचाव करायचा म्हटलं तर टिव्ही बघायला नको आणि पेपरही वाचायला नको. बातम्या ऐकायच्यात? बी.बी.सी. पहा. ताज्या घडामोडी माहिती करून घ्यायच्यायत? ईंटरनेटवरचे काही मोजके आणि विश्वसनीय ब्लॉग वाचा. यातलं काहीच करावंसं वाटत नसेल तर ’हरी, हरी’ करत घरी स्वस्थ बसा!
-प्रभाकर [बापू] करंदीकर.
ता.क. निखिल वागळ्यांचं ’ते’ भाषण साधनाच्या २८ जुलैच्या अंकात वाचायला मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, कोण हे निखिल वागळे?
मी मराठी न्यूज चॅनेल्स पहात नाही त्यामुळे माहित नाहीत.
पण ते म्हणतायत हे ओपन सिक्रेट आहेच.

हेच "अच्छे दिन" आहेत.

न्यायपालिका पासुन ते मिडीया पर्यंत सगळे स्वतःच्या खिशात... कोणीही विरोधात बोलु नये आणि बोलले की अवघ्या काही मिनिटातच ती पोस्ट रद्द करायला लावतात..

निखिल वागळ्यांचं ’ते’ भाषण साधनाच्या २८ जुलैच्या अंकात वाचायला मिळेल.
>>>

आणि साधना कुठे मिळेल ?::फिदी:

वागळेंची पत्रकारिता मी ते साप्ताहिक दिनांक चे संपादक असल्यापासून पाहतो आहे. साधारण १९७५ च्या दरम्यान. त्यावेळी आता आमदार असलेले कपिल पाटील त्यांच्या सोबत होते. कपिल पाटील आणि वागळे यांच्यातले मतभेद फार प्रामाणिक नसावेत असे भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉग वरून आणि पुढे दोघांम्नी ज्या वाटा धरल्या त्यावरून दिसते आहे. नंतर वागळे महानगरमध्ये गेले. तेथे बाळासाहेब ठकरे यांचे शी त्यांचे वैर झाले.

वागळे पूर्वी माजगावकरांच्या माणूसमध्ये लिहित असत हे आता कोणाला पटणार देखील नाही. Happy
मात्र वागळेंना महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण याबद्दल सखोल जाण आहे.
ग्रेट भेट या कार्यक्रमात वागळ्यांचे वेगळेच रूप दिसते. त्यांच्या आवाजाचा टोन वेगळाच असतो. ते खरे वागळे असे मला वाटते. बाकी न्यूज जर्नॅलिस्ट हे त्यानी ब्रँडिण्ग करण्यासाठी घेतलेले वेगळे आणि कृत्रिम ' रूप ' आहे. त्यांना रजत शर्मासारखा स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे असे वाटते.

वागळे अँकरची भूमिका नीट करीत नाहीत असे माझे मत आहे. ते स्वतःच त्यात पार्टी म्हणून उतरतात आणि काही बाबी वदवून घेण्याचा त्यांचा अजेन्डा स्पष्त दिसतो. वाअस्तविक त्यांन्नी सूत्रसंचालन करणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा माझा वरील प्रसन्नाला मी अधिक मार्क देईल.

वागळ्यांचं ????
वागळे यांचे असे म्हणायचे का ?

मी सध्या बांधकाम क्षेत्रात काम करतो. इथे पत्रकारांचे आलेले अनुभव खूपच वाईट आहेत. १०० तून २-४ सोडले तर बाकीचे निव्वळ पैशासाठी हपापलेले वाटतात.चालू कामात व्यत्यय आणणे,आर्थिक मागणीसाठी कुरघोड्या करुन उगाच तमाशा करणे वगैरे .तसे त्यांना भिक घालणारे कमीच असतात पण त्यांच्यामुळे फावते ब-याचदा.

वागळे लबाड आहे मान्यच, पण तो चांगला पत्रकारही आहे.

आता कधीमधी पैशाची भूक लागते ती लागतेच...मग पत्रकाराची होळी होते. त्याला बिचारा वागळेतरी काय करणार!

शिवसेना ऐन भरात असताना बाळासाहेबांशी वैर पत्करलेला, त्यावरुन प्रसंगी मार खाल्लेला पत्रकार म्हणजे निखिल वागळे. महानगर मधुन शिवसेनेवर असा तुटुन पडायचा पठ्ठा, की यंव रे यंव!

प्रभाकरराव,

आयला, हा#ळया वा#ळया तुम्हाला एव्हढा आवडतो? ज्याम हसायला येतं त्याला बघून. इथे बघा काय लिहिलंय :

>> अठरा वर्षापुर्वी जे तत्वज्ञान कपील पाटिल यांना शिकवण्यासाठी निखील अक्कल पाजळत होता, ते त्याच्यासाठीच
>> पालथ्या घड्यावरचे पाणी नव्हते का?

बाकी चालू द्या!

आ.न.,
-गा.पै.

@वागळे अँकरची भूमिका नीट करीत नाहीत असे माझे मत आहे. ते स्वतःच त्यात पार्टी म्हणून उतरतात आणि काही बाबी वदवून घेण्याचा त्यांचा अजेन्डा स्पष्त दिसतो. वाअस्तविक त्यांन्नी सूत्रसंचालन करणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा माझा वरील प्रसन्नाला मी अधिक मार्क देईल.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

गामा तुम्हासनी नाय आवडणार हो.. तुम्हास्नी फिंक्सिंग इंटर्व्यु घेणारे रजत शर्माच आवडतील.. Biggrin
आणि करण थापर तर तुमचा जानी दुश्मन बनला असल ना Wink

वागळे यांचा ग्रेट भेट हा कार्यक्रम छान आहे.

त्यांच्या एकंदर भूमिकेवरून त्यांना लोकमत सोडावे लागेल असे वाटत नाही. Happy

पण वागळे बांधिलकी मानणारे पत्रकार आहेत. आता ती कुणाची व कशासाठी हे त्यांनीच खरोखर आत्मपरिक्षण करावे. आख्खा महाराष्ट्र बघतोय, काय म्हणाल तुम्ही, वागळे उत्तर द्या. Happy

भाउ तोर्सेकरांनी त्यांच्या ब्लॉग वरिल "About me" मोकळं का सोडलय? (की मला दिसत नाहिये Uhoh ), हे नक्की कोण आहेत हे पहायला गामांनी दिलेल्या लिंकवर गेलो पण मोकळं "About me" पाहुन, हात हलवत परत यावं लागल Uhoh

भाऊ तोरसेकर हे मोदी भाट आहेत एवढी माहिती पुरेशी आहे का?
ते महाराष्ट्रातील एक अतिमहत्त्वाचा पेपर 'पूण्यनगरी' यात स्तंभलेखकही आहेत.
हे त्यांचे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे.
त्यांचा मोदींवर मायेच्या दृष्टीकोनातून ठेवलेला 'जागता पहारा' मुळीच आक्षेपार्ह नाही हे त्यांचे एक तिसरे क्वालिफिकेशन आहे.

साती,

>> भाऊ तोरसेकर हे मोदी भाट आहेत एवढी माहिती पुरेशी आहे का?

तुम्ही इंग्रजीतली ही म्हण ऐकली असेल : If character is lost, everything is lost.

तर, भाऊ तोरसेकर आणि निखील वागळे यांपैकी कोणाचं कॅरॅक्टर लॉस्ट आहे त्याची चौकशी करून पहा.

आ.न.,
-गा.पै.

गामा, भाउ तोरसेकरने, मोदीवर योग्य टिकाकरणार्‍यांची बाजु घेतली आहे, असा एक तरी ब्लॉग दाखवा. मग सातिताई म्हणत आहेत त्यात काय चुक आहे?

भाऊ तोरसेकर आणि निखील वागळे यांपैकी कोणाचं कॅरॅक्टर लॉस्ट आहे त्याची चौकशी करून पहा.

>>>
ही चौकशी कंच्या खिडकीत करायची भौ ? ;:फिदी:

निखिल वागळे आवडतो.
त्याचा आक्रमकपणा आक्रस्ताळेपणाकडे झुकतो तेव्हा थोडा त्रास देतो, मात्र त्याचा सडेतोडपणा भावतो.
राजकारणातले मला तसे जास्त समजत नाही, (तसे पाहता आपल्याला समजतेय असे दावा करणारेही कित्येक गंडलेलेच असतात) तरीही निर्भीड पत्रकारीतेचे तो एक उदाहरण वाटतो.

चिरमुरा,

>> भाउ तोरसेकरने, मोदीवर योग्य टिकाकरणार्‍यांची बाजु घेतली आहे, असा एक तरी ब्लॉग दाखवा.

आजून भाऊ तोरसेकारांना मोदींचं वर्तन अयोग्य वाटलं नसावं. जर तसं वाटलंच तर ते केव्हाही टीका करू शकतात. निखील वागळ्यांचं तोंड बांधलेलं आहे तसं तोरसेकरांचे कोणी बांधून ठेवलेलं नाही.

आ.न.,
-गा.पै.

वागळेंना महाराष्ट्राच्या
राजकीय सामाजिक
आणि सांस्कृतिक जडणघडण
याबद्दल सखोल जाण आहे.
ग्रेट भेट या कार्यक्रमात
वागळ्यांचे वेगळेच रूप दिसते.
त्यांच्या आवाजाचा टोन
वेगळाच असतो. ते खरे वागळे
असे मला वाटते. बाकी न्यूज
जर्नॅलिस्ट हे त्यानी ब्रँडिण्ग
करण्यासाठी घेतलेले वेगळे
आणि कृत्रिम ' रूप ' आहे.
त्यांना रजत
शर्मासारखा स्वतःचा ब्रँड
बनवायचा आहे असे वाटते.>>>>> +1

मी एकदा रत्नाकर मतकरी यांच्याबरोबरची ग्रेट भेट पाहिली होती
वागळे छान मुलाखत घेत होते

लोकहो,

इथे निखील वागळ्यांची भरत दाभोळकरांसोबत इलेक्शन स्पेशल ग्रेट भेट आहे. जे प्रश्न वागळ्यांनी विचारायला पाहिजेत ते भरत दाभोळकर सांगताहेत. आपण एका व्यासंगी माणसासोबत बोलत आहोत याचं भान वागळ्यांना राहिलेलं नाही. पूर्वतयारी कच्ची पडली आहे.

आ.न.,
-गा.पै.

ग्रेट भेट मध्ये वागळे खूप संयमित वागतात, पण इतर वेळी आक्रस्ताळेपणा डोक्यात जातो. करण थापर कात्रीत पकडतो ते ऐकायला (मला) मजा येते, माणूस तुमच्या विचारसरणीचा नसला तरी, वागळे मुलाखत घेतात तेव्हा असं (मला) वाटलं नाही. आता बदलले असतील तर चांगलच आहे. वरचे विचार चांगले वाटले.

Pages