जुन्या आठवणी

Submitted by कमलेश पाटील on 21 July, 2014 - 02:56

जुन्या आठवणीतले मासे

कोणाला प्लास्टीक वायरचे बास्केट (गाठी मारून करतात) ते येत का

20072014344_600x600_100KB.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मला यायचं पूर्वी.
आणि स्ट्रॉचे समोसे.
गाठी मारून मध्येमध्ये मणी घालून केलेले बास्केट /पर्स!

आणि हे माझे लटकवुन झुंबर करायचो आम्ही. मासे कुठल्याही रंगाचे चालायचे करडे सोनेरी, हिरवे पिवळे जशी वायर मिळेल तसे Lol

कुणाला ते लक्स साबणावर टाचण्यात मोति घालुन केलेला फ्लॉवरपॉट आठवतोय काय???

हे मासे कसे बन्वायचे ते मला माहीत आहे.पण मल ते बास्केट शिकवनारं मिळत नाही आहे.

3458304492_0b61a89e0a_b_600x600_112KB.jpg

हे बास्केट हवंय. कोणाला येतंय का.

सातीजी

तुम्हाला अजुन सामोसे येतात का स्ट्रा वापरून

कमलेश स्ट्रोचे सामोसे मला येतात करता. अर्थात बरिच वर्ष झाली करून. थोडी धूळ झटकली तर आठवतील पुन्हा Happy

mast... time pass chitrapaTaat prajakta( Ketaki maegaokar) chyaa gharaat tase ananas dakhawale aahe..
mast waaTal hot te baghitalyawar...

गाठी मारून मध्येमध्ये मणी घालून केलेले बास्केट /पर्स! ,लक्स साबणावर टाचण्यात मोति घालुन केलेला फ्लॉवरपॉट > खरेच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पिवळ्या मण्यांचे प्राणी (ऊंट आठवतोय त्यातला) , कुकरच्या गेलेल्या दोन रिंग वापरून आईने केलेली पर्स पण आठवली.

आणि अननस ? >> निळीच्या बाटलीवर करायचो आम्ही ते.

स्ट्रॉचे सामोसे मला येतात करता>> मला पण. त्याचा पडदा करायचा म्हणून खूप सगळे समोसे केले होते.

स्ट्रॉ मिळवायला पाहिजे. मिळालेतर नक्की शिकवीन मी समोसा.

स्ट्रॉ कुठेही मिळतील.पण तुम्ही शिकवनार कसं

मृणालजी प्लीज विचाराना तुमच्या मावशींना

सगळ्या स्टेपचे फोटो काढणार अन तुम्हाला पाठवणार पण त्यासाठी तुम्हाला तुमचा मेल आयडी पाठवावा लागेल संपर्कातून.
बेकींगपेपरची एक स्ट्रीप कापून करून पाहिला, मस्त जमतो त्यानेसुद्धा.

एकदम नोस्टॅल्जिक झाले! या वायरच्या कीचेन्स बनवता यायच्या मला..खूप बनवल्या होत्या तेव्हा! आत्ता ह्या क्षणी काहीही आठवत नाहीये! कदाचित हातात वायर आली की आठवेल. फिश वायर म्हणतात ना याला? की ती वेगळी?

याला फीश वायरच म्हणतात.

नलिनीजी इथेच धागा काढून फोटो टाका ना सामोशाचे म्हणजे सगळ्यांनाच येईल शिकता.

तुळशीबागेत नीलम (बहुतेक! एका कोपऱ्यावर आहे ते दुकान ) नावाच्या दुकानात मिळायची ही फिश वायर. आता मिळते का माहिती नाही.

मला ती तुलशी बागेत मिळाली पण त्यासाठी बेंगलोरला चौकशी करावी लागली आणी मग महावीर मध्ये मिळाली

आता मिशन प्लास्टीक बास्केट

हेच हवंय का तुम्हाला?

खूपच किचकट आणि पेशन्सवालं काम दिसतंय.
माझ्या बहिणीने बल्बचा आधार घेऊन नायलॉन दोर्‍यांचा फ्लॉवरपॉट बनवलाय. वेळ झाला की फोटो टाकतो.

हो तेच हवंय पण त्याचा काही उपयोग नाही.

विडीयो क्वालिटी खूप वाईट आहे.मी आधी पाहीला होता हा विडीओ

एका लाकडाच्या फ्रेमवर पेन्सिलने फुलपाखरू काढून त्याच्या आऊटलाईनवर बारिक चुका ठोकून त्यावर रेशिम गुंडाळून विविधरंगी फुलपाखरू केलंय का कुणी? मी केलं होतं ९वीत असताना. शेजारणीच्या रूखवतासाठी. खपली गव्हांचे दागिने ही.

Pages