बॉल मिल गया!

Submitted by लाल्या on 15 July, 2014 - 02:50

काही मुलं टेनिस क्रिकेट खेळत आहेत. खेळता खेळता चेंडू जमिनीतल्या एका होल (गोल खड्डा) मध्ये जातो. हे होल डायामीटर मध्ये चेंडू पेक्षा १ मिमी जास्त आहे, आणि जवळ जवळ एक फूट खोल आहे. मुलं युक्तीने तो चेंडू बाहेर काढतात आणि पुर्ववत खेळायला लागतात. त्यांना पुन्हा ते होल बुझवावंसं देखिल वाटत नाही.

मुलांनी काय केलं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) न्युटनचा सिद्धांत चुकीचा आहे हे बॉलला पटवुन द्या तो आपोआप बाहेर येईल.
२) बॉलला सांगा मा.बो. गझलाकारांचा भुमीगत गझलगायनाचा कार्यक्रम आहे तो घाबरुन बाहेर येईल.
३) रात्र होण्याची वाट पहा बॉलला भुक लागली की आपोआप बाहेर येईल.
४)उंदरांना कळवा त्यांच्या बिळात बॉलने अतिक्रमण केलय तेच बाहेर काढतील त्याला.
जर या सर्व प्रयत्नांनी नाहीच आला तर त्याला वविच आमंत्रण द्या Happy

बॉलच्या बाजूने खणत खाली जायचे. बॉल च्या खाली १.५ मीटरच्याखाली खालच्या दिशेला १० फूट खोल खड्डा खणावा. म्हणजे खड्ड्याच्यावर आणि बॉलच्याखाली यामधे १.५ मीटर जाडीचं अर्थ कव्हर राहील. आता बॉलचं वजन, पृष्ठभागापासूनचं एक फूट अंतर आणि बॉलच्या खालचं १.५ मीटर जाडीचं अर्थकव्हर हा डाटा न्युक्लीयर एक्सप्लोजनच्या फॉर्म्युलात टाका. त्यातून तुम्हाला थोरिअम ची अमाउंट मिळेल. साधारण १.५ टीएनटी एव्हड्या क्षमतेचं एक्प्लोजन होऊन असा चार्ज भरून एक बॉम्ब सर्वात खालच्या खड्ड्यात ठेवा. आता बॉम्ब वाल्या खड्ड्यात जाणारा जिना रॅपिड सेटिंग सिमेंट वापरून बंद करून टाका. टायमर लावून ठेवा आणि धूम ठोका. एक्प्लोजन होईल पण अर्थ कव्हर मधे शॉक अ‍ॅब्सॉर्ब होऊन कॅल्क्युलेशन प्रमाणे फक्त १.१ फूट उसळी मारेल इतकाच धक्का बॉलला खाली बसेल. बॉल वर आला रे आला की साईडला गलोल मधे दगड घालून जमिनीलगत झोपलेल्या सवंगड्याने अलगद दगड सोडायचा आहे. बॉल वर येण्याचं टायमिंग आणि दगड भिरकावणे हे एकाच वेळी झाले की बॉल पुन्हा खड्ड्ड्यात न पडता बाजूला पडेल.

टायमिंग चुकले की पुन्हा पहिल्यापासून..

पृथ्वी उलटी करून जरा हलवायची म्हणजे मिळेल बॉल >>>>>> महेश जी क्षमा असावी....

एक तर तुम्ही कामात असतात... त्यात तुम्हाला इतरांचे काम करायला वेळ नाही वर भरीत भर तुम्ही मायबोलीवर असतात आणि मोबाईल वर कँडी क्रश खेळत असतात..

अश्या वेळी पृथ्वी उलटी करणार कोण ? नेहमी प्रमाणे तुम्ही ऐनवेळेला टांग देणार ..... मग ते काम रजनिकांत करणार आणि फुकट ची प्रसिध्दी घेणार....

तुम्ही जगासमोर कधी येणार मग ?

>>आणि मोबाईल वर कँडी क्रश खेळत असतात..
हे एवढे सोडून बाकीचे बरोबर आहे, कँडी काय आणि क्रश कशाशी खातात काहीच माहिती नाहीये. Sad

>>अश्या वेळी पृथ्वी उलटी करणार कोण ? नेहमी प्रमाणे तुम्ही ऐनवेळेला टांग देणार Lol

१. खड्ड्याभोवती धरणे धरावे. बॉल वैतागून बाहेर येईल. धरणे धरण्याबद्दल मार्गदर्शन पळपुटे बाबा उर्फ एके-४९ यांच्याकडून मिळू शकेल.
२. धरणे धरण्यास बॉल न बधल्यास उपोषणास बसावे.
३. प्लँचेट करून अर्जुनाच्या आत्म्यास पाचारण करावे. तो धनुष्यबाणाने बॉल काढून देईल. प्लँचेट विषयी सविस्तर माहीती पुणे पोलीसांकडून मिळवावी. अर्जुनाऐवजी फिल्ड इंजिनियर म्हणून कर्णही चालू शकेल.
४. बॉलवर नवीन सिरीयल लिहीण्याची चिन्मय मांडलेकरांना सुपारी द्यावी. बॉलच्या मुख्य भूमिकेतही त्यांचीच निवड करावी. त्या कल्पनेनेच बॉलला धडकी भरुन तो शरणागती पत्करेल आणि आपणहून भोकातून बाहेर येईल.
५. ज्या वेगाने देवपुरकर गझला पाडतात त्याच वेगाने त्या भोकाच्या काठावर बसून समुहगान करीत बॉलला ऐकवाव्या. यशाची हमखास गॅरेंटी.

बॉलवर नवीन सिरीयल लिहीण्याची चिन्मय मांडलेकरांना सुपारी द्यावी. बॉलच्या मुख्य भूमिकेतही त्यांचीच निवड करावी. त्या कल्पनेनेच बॉलला धडकी भरुन तो शरणागती पत्करेल आणि आपणहून भोकातून बाहेर येईल. >>>

रात्र होण्याची वाट पहा बॉलला भुक लागली की आपोआप बाहेर येईल.>>>>

Rofl
कालपासून हा बाफ वाचून प्रचंड हसतेय. असंबद्ध गप्पांना मागे टाकलंय या धाग्याने.

नशीब ते होल म्हणजे गोल खड्डा लिहिले नाहीतर माझा आजचा अक्खा दिवस दिवाणखान्यातला बॉल कसा बाहेर काढायचा याचे डोके खाजवण्यात गेला असता.>>>>>>>

दिवाणखान्यातला बॉल???

हे काय लिहीलयं समजलंच नाही Sad

बाकी हहपुवा Lol

काठीच्या टोकाला वेलक्रो ची काटेरी पट्टी (सॅंडल च्या पट्ट्यांना असते ती) लावायची व वरुन ती चेंडुवर दाबायची की चेंडु त्या पट्टीला चिटकेल व चेंडु बाहेर काढता येईल

त्या बॉलला फक्त सांगायचं की श्रीपाल सबनीस त्यांचे १५० पानाचे अध्यक्षीय भाषण वाचण्याचा सराव या खड्ड्याच्या काठी बसून करणार आहेत.
नाक घासत वर येइल..

Pages