सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक!

Submitted by profspd on 9 July, 2014 - 07:53

सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक!
मी हसताना पाहुन माझे दु:ख मुरडते नाक!!

करू कुणाची कशास परवा, मला कुणाचा धाक?
जळणा-यांनो, जळा कितीही खुशाल अन् व्हा खाक!

जगात असती नमुने ऐसे किती तरी ते पहा....
अपशकून करतात कापुनी स्वत:चेच ते नाक!

कशास दवडू स्वास्थ्य मनाचे? चिडू कशाला? सांग...
खुशाल ते खाजवोत त्यांचे सातत्याने नाक!

शेराशी सव्वाशेराची पडते जेव्हा गाठ.....
वर केलेले खाली होते, आपोआपच नाक!

पुन्हा पुन्हा तो दवडत बसतो तोंडाची त्या वाफ
माफ करा म्हणताना बसतो गुंडाळत तो नाक!

निलाजरेपण किती असावे तुडुंब कोणामधे....
खरेच आहे भोके उरती गेल्यावरती नाक!

बोला, झोडा, टाळा त्यांना भले कितीही तरी.....
पुन्हा पुन्हा ते धावत येती घासत त्यांचे नाक!

अडला नारायण म्हणती ते उगाच नाही अरे,
मूर्खाच्याही पडती पाया मुठीत धरुनी नाक!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही लागत नाही हो परवानगी वगैरे. फार विरोध झाला तर दारू पाजायची कवीला. किंवा त्याला चार पाच संमेलनांच्या तारखा द्यायच्या. दोन पोती गहू आणि पन्नास किलो इंद्रायणी देतो म्हणायचे. हाय की नाय काय. बाकी जे विरोध करतायत त्यांची गझल पुस्तकात घ्यायला नकार दिलाय का?

Pages