सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक!

Submitted by profspd on 9 July, 2014 - 07:53

सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक!
मी हसताना पाहुन माझे दु:ख मुरडते नाक!!

करू कुणाची कशास परवा, मला कुणाचा धाक?
जळणा-यांनो, जळा कितीही खुशाल अन् व्हा खाक!

जगात असती नमुने ऐसे किती तरी ते पहा....
अपशकून करतात कापुनी स्वत:चेच ते नाक!

कशास दवडू स्वास्थ्य मनाचे? चिडू कशाला? सांग...
खुशाल ते खाजवोत त्यांचे सातत्याने नाक!

शेराशी सव्वाशेराची पडते जेव्हा गाठ.....
वर केलेले खाली होते, आपोआपच नाक!

पुन्हा पुन्हा तो दवडत बसतो तोंडाची त्या वाफ
माफ करा म्हणताना बसतो गुंडाळत तो नाक!

निलाजरेपण किती असावे तुडुंब कोणामधे....
खरेच आहे भोके उरती गेल्यावरती नाक!

बोला, झोडा, टाळा त्यांना भले कितीही तरी.....
पुन्हा पुन्हा ते धावत येती घासत त्यांचे नाक!

अडला नारायण म्हणती ते उगाच नाही अरे,
मूर्खाच्याही पडती पाया मुठीत धरुनी नाक!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लढ बाप्पु - पड आडवा
गजल ( शब्दछल ) करायच सोडु नको

निंदा करतील लोक आपुली
परी घेतला वसा सोडु नको

धन्यवाद माझा मतला चोरल्याबद्दल !

मी लिहिलेला असला तरी तो बंडल होता, हे मला तेव्हाही मान्य होतं. पण इतकं बंडल लिखाण चोरावंसं वाटावं, ह्यातून तुमची अभिरुची कळली.

शरम वाटायला पाहिजे भटांचं नाव घेताना..
बडी बडी बातें, भीक मांगके खातें !

पोकळ वल्गना नुसत्या !! अभिरुची, सौंदर्यबोध अन् काय काय..! असल्या भंकस बोलण्याला आमच्या मुंबईत 'भकचोदी' असा मस्त शब्द आहे.[(शिवी नाही.) जोडा तुमच्या शब्दकोशात आणि ओढा एखाद्या काफियात !]

ही७ नाकांची गझल देवसरांनी त्यांच्या पहिल्या की दुसर्‍या अवतारातच पोस्टली होती तेव्हा मी नाके मोजली होती
एखादे नाक वाढवून आज परत तीच टाकलेली दिसतेय नाक ह्या शब्दांवरून असलेले वाक्प्रचार म्हणी ह्यात वापरल्या आहेत

हे त्या फडतूस जनिमीला दिलेलेच उत्तर आहे, मूळ गझल मोठी आहे मुट्यानी नाकाचा उल्लेख केला म्हणून एडिट करून इथे दिली!
टीप: माझे कल्पना दारिद्र्य कुणालाही कळेल जो माझ्या गझला वाचेल

सोम्या गोम्याच्या जमिनीची/मक्त्याची मला आवश्यकता नाही!

आता सोमेगोमे पण अभिरुची वगैरे अशोभनीय बोजड भाषा वापरू लागले की, काय?

माझ्या तमाम गझला व त्यावरील मायबोलीकरांचे साहित्यिक प्रतिसाद यांचे ग्रंथ लवकरच समाजात येतील!
कळू द्या तरी गझलेची अभिरुची जगाला!
जनताजनार्धनच फैसला करेल काय तो!

दुसरा ग्रंथ मी दिलेल्या पर्यायी गझलांचा, सोबत मूळ रचना शायराच्या नावासकट मायबोलीवरच्या असाही येत आहे

जनताजनार्धनच काय ते तय करेल
वेट अॅंड वॅाच!

.................प्राचार्य सतीश प्रभाकर देवपूरकर

'प्राचौर्य' असं लिहा..
<<<<<<<<<<<तुझ्या बुद्धीची खुजी झेप दाखवून दिलीच की अखेरी!

>>>>>दुसरा ग्रंथ मी दिलेल्या पर्यायी गझलांचा, सोबत मूळ रचना शायराच्या नावासकट मायबोलीवरच्या असाही येत आहे

जनता जनार्धनच काय ते तय करेल
वेट अॅंड वॅाच! <<<<<

हायला !! हा तर दरोडाच की सांगून सवरून !

फिल्मी वेरी फिल्मी !! Happy

धन्यवाद जितू
नाके सात होती हे माझ्या बरोबर स्मरणात राहिले म्हणायचे Happy

जनताजनार्धनच काय ते तय करेल<<<<<<<< आपुले मरण पाहिले म्यां डोळा हा अनुभव घ्यायची तीव्र खुमखुमी झालेली दिसतेय !!!!

>>>आपुले मरण पाहिले म्यां डोळा हा अनुभव घ्यायची तीव्र खुमखुमी झालेली दिसतेय !!!!<<<

अगदी खरे!

पण कोणाच्याही गझला त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या नावा सोबत दिलेल्या चालतात का?

म्हणजे
एक्स आय झेड
-रिया
त्याला माझा पर्याय पी क्यु आर

अस चालत का? एक्स वाय झेड प्रसिद्ध करण्याबाबत रियाला आक्षेप असेल तर?
हे म्हणजे प्रताधिकार भंग आहे ना?

>>>हे म्हणजे प्रताधिकार भंग आहे ना?<<<

प्रताधिकार हे अस्तित्वात नसलेले भूत आहे रीया! एक फोरम जेन्युईनली चालवायला असे कायदे पाळणे हे फोरमचा निर्माता स्वतःसाठी बंधनकारक समजतो व ते अतिशय रिस्पेक्टेबल आहे.

पण एक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी ह्या बाबी धाब्यावर बसवते.

उदाहरणार्थः

प्रोफेसर साहेब लिहितील की 'सोसो' गझल डॉक्टर कैलास गायकवाडांची आहे. आता बघा ह्याच जमीनीत मी गझल केली तर कशी गझल होते!

ह्यावर प्रताधिकाराचा बडगा कोण काढणार? Uhoh

इथे ठिकेय तेपण हे सर म्हणतायेत ना की ते पुस्तक काढणारेत?
प्रकाशक छापतील का? केस करता येईल ना याला चौर्य म्हणुन? तिथे असेलच की प्रताधिकाराचा एखादा कायदा?
सर, पर्सनल घेऊ नकात. हा मला पडणारा प्रश्न आहे जो मी विषय निघाला म्हणुन विचारतेय

कोणत्याही प्रकाशित/इप्रकाशित गोष्टीवर कोणीही लिहू शकतो/समीक्षा करू शकतो! त्याला परवान्याची आवश्यकता नसते कारण संदर्भ नावासकट दिलेला असतो!
शास्त्रीय संशोधन याच मार्गाने पुढे जात असते!
दुस-याची कलाकृती माझीच आहे असे म्हणणे मात्र गुन्हा आहे!

टीप: माझ्या मायबोलीवरील लेखनाचा कुणाला किती फायदा/तोटा झाला मला माहित नाही
पण मायबोलीवरील गझलांवर मी दिलेल्या अभ्यासपूर्वक प्रतिसादांचा मला मात्र भरपूर फायदा झाला आहे हे मी कबूल करतो व त्याकरता मी मायबली गुलमोहरचा ऋणी आहे!

माझा प्रश्न पर्यायी गझले संबंधी होता खर तर.
मी हिला पर्याय म्हणुन हे लिहिलं असं सांगताना त्या आधीच्या गझलकाराची परवानगी लागेलच की

जेव्हा आपण एखादी कलाकृती पब्लिश करतो तेव्हा कलाकाराची ओपन डिफेन्सला तयारी असायला हवी तसे असणे अपेक्षित असते!

कोणत्याही प्रकाशित/इप्रकाशित गोष्टीवर कोणीही लिहू शकतो/समीक्षा करू शकतो! त्याला परवान्याची आवश्यकता नसते कारण संदर्भ नावासकट दिलेला असतो!
>>>
मला वाटतय तरीही मुळ रचना प्रसिद्ध करता येत नसावी. त्यासाठी मुळ लेखकाची/ गझलकाराची/कवीची परवानगी हवीच की.

प्रकाशक छापतील का? केस करता येईल ना याला चौर्य म्हणुन? तिथे असेलच की प्रताधिकाराचा एखादा कायदा?
सर, पर्सनल घेऊ नकात. हा मला पडणारा प्रश्न आहे जो मी विषय निघाला म्हणुन विचारतेय<<<

किती प्रश्न एकाच प्रश्नात विचारलेस!

प्रकाशक छापतील का?<<<

पैसे देवपूरकरांचे असले तर प्रकाशक काहीही छापतील.

केस करता येईल ना याला चौर्य म्हणुन?<<<

वादग्रस्त बनून 'तरी' मोठे बनावे ह्यासाठी कित्येक प्रकाशक धडपडतायत

तिथे असेलच की प्रताधिकाराचा एखादा कायदा?<<<

तो कायदा एक भूत आहे, भूत मानणार्‍यांना भूत दिसते, न मानणार्‍यांना दिसत नाही.

सर, पर्सनल घेऊ नकात. <<<

ह्या वाक्यातील 'नकात'मधील 'त' 'अमराठी' आहे. असो! ते सर्व काही पर्सनली करतात, त्यामुळे पर्सनली घेऊ नका म्हणण्यात अर्थही नाही आणि तसे म्हणण्याचे प्रयोजनही! Happy

हा मला पडणारा प्रश्न आहे जो मी विषय निघाला म्हणुन विचारतेय<<<

व्हेरी गूड! पण ह्या प्रश्नांपासून त्यांचे स्वत्व लांब आहे. Happy

Pages