ट्रायथलॉन

Submitted by हर्पेन on 9 July, 2014 - 04:03

हा धागा, ट्रायथलॉन विषयीच्या माहितीची आदान प्रदान करायला उघडत आहे.

ट्रायथलॉन म्हणजे पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे यांचे ठराविक नेमस्त अंतर पाठोपाठ पार करणे. सर्वसामान्यपणे ही स्पर्धा ४ प्रकारात घेतली जाते.

1. स्प्रिंट अंतर - ह्यात ७५० मी पोहोणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे समाविष्ट असते.

Sprint Distance; 750-meter (0.47-mile) swim, 20-kilometer (12-mile) bike, 5-kilometer (3.1-mile) run

2. ऑलिम्पिक अंतर ह्यात १.५ किमी पोहोणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट असते.

Intermediate (or Standard) distance; commonly referred to as the "Olympic distance": 1.5-kilometer (0.93-mile) swim, 40-kilometer (25-mile) bike, 10-kilometer (6.2-mile) run

3. दीर्घ पल्ला - ह्यात १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते.

Long Course; commonly referred to as 70.3 (total distance in miles, equivalent to 113.1 km) or the 'half-Ironman'; 1.9-kilometer (1.2-mile) swim, 90-kilometer (56-mile) bike, and a 21.1-kilometer (13.1-mile) run (half marathon)

4. अती-दीर्घ पल्ला – ह्या मधे ३.८ किमी पोहोणे, १८०.२० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी (फुल मेरेथोन) धावणे समाविष्ट असते.

Ultra Distance; commonly referred to as 140.6 (total distance in miles, equivalent to 226.2 km) or the 'Ironman'; 3.8-kilometer (2.4-mile) swim, 180.2-kilometer (112.0-mile) bike, and a 42.2-kilometer (26.2-mile) run (full marathon)

ऑलिंपिक मधेही या स्पर्धेचा समावेश असतो. तसेच खासगी आयोजकांतर्फे 'आयर्न मॅन' नावानी घेतली जाणारी स्पर्धा जगभर प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
http://eu.ironman.com/#axzz36xIofIxX

आपल्या शारिरिक क्षमतेचा दीर्घकालीन कस पाहणारा हा स्पर्धा प्रकार सध्या भारतातही लोकप्रिय होत आहे. ह्या स्पर्धाप्रकारात नव्यानेच भाग घेऊ पाहणार्‍या स्पर्धकांकरता नवख्यांसाठी अंतर (Novice category) ज्यात ३५० मी. पोहोणे, १० किमी सायकलिंग आणि ३ किमी धावणे समाविष्ट असते.

ट्रायथलॉन मधे भाग घेतलेले कोणी मायबोलीकर असतील तर त्यांनी आपापले स्पर्धेचे, त्याच्या तयारीबद्दलचे अनुभव इथे मांडावे ही विनंती.

तसेच भाग घेऊ पाहणार्‍या नवीन लोकांकरता हा धागा उपयुक्त ठरू शकेल अशी आशा आहे.

भारतात अशा स्पर्धा कोणातर्फे, कुठे, कधी आयोजित केल्या जातात, ई. माहिती देखिल इथे लिहू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन....तुमच्या स्पर्धा सहभागाची इतकी चांगली बातमी देताना ती "रच्याकने" असा उल्लेख का करता ? फार मोठी कमाई आहे तुमची....पुणे ते थोन्नूर जायचे, स्पर्धेत उत्साहाने भाग घ्यायचा....९ तास निथळायचे.....तिन्ही गट किती दम खाणारे आहेत....असू शकतात, याची प्रचिती मला दोन गटातील सहभागाद्वारे मिळाली होतीच यापूर्वी त्यामुळे तुम्ही इकडे मायबोलीवर केव्हा येता आणि तुमच्या समाधानी सफारीचे वर्णन सांगता, याची वाट पाहात आहे.

स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.

हर्पेन .. अशोक शि सहमत...रच्याक म्हणायची अज्जिबातच गरज नाही .......

स्पर्धा पुर्ण केलित ..सहीच ..खुप खुप अभिनदन .....सविस्तर लिहालच .....

धन्यवाद आडो, हिम्या (तुझे इथले नाव लिहिताना फार घोळ होतात त्यामुळे इथे तुला इतर जे म्हणतात तेच मीही म्हणतोय, हिम्या Happy ) अगो, अशोक. आणि सुहास्य

अशोक मामा, खरे आहे तुम्ही म्हणता ते, माझ्यासाठीही खूप मोठीच गोष्ट आहे, पण आज कळल्यानुसार त्यांचा कट-ऑफ साडेआठ तासाचा असल्याकारणाने, मला वेळेसकट प्रशस्ती पत्र मिळेल की नाही याची खात्री नाहीये. जरा कणसूर लागला, त्यामुळे रच्याकने असे लिहिले गेले. पण प्रशस्तीपत्र वेळेसकट मिळो अथवा न मिळो मी ती स्पर्धा पुर्ण केली त्यामुळे समाधानी आहे.

हैदराबादला कोण जाणारे का?

चनस, मनीष आणि बस्के धन्यवाद.

अजून एका ट्रायथ्लॉन बद्दल माहीती मिळाली आहे. ही स्पर्धा चेन्नई मधे होते. या वर्ष्री १३ जुलैला झाली. अधिक माहीती साठी पहा. बाप लेक, मुलगा, आई आजोबा अशा जबरदस्त कॉम्बिनेशन्स मधे या मधे भाग घेतला गेला होता.

http://www.chennaitrekkers.org/2014/07/chennai-triathlon-enticer-sprint....

हर्पेन.. टायमिंग चेक केले.. स्विमिंग टू सायकलींग ट्रान्झिशनला ११ मिनिटे लागली.. त्यात काय काय करावे लागते?

हिम्या, करायला फार काही नाही लागले पण पोहोणे नैसर्गिक तलावात होते, त्याला ओबड धोबड पायर्‍यांचा काठ होता, त्याच्या शेवटच्या काही पायर्‍या घसरड्या होत्या, त्या चढून वर येऊन सायकली लावलेल्या ठिकाणी येऊन अंग पुसुन, पॅडेड शॉर्टस, टीशर्ट, बूट, हातमोजे, हेल्मेट घालून, वाटेत खायला घेण्याचे सामान कमरेच्या पाऊच मधे घेतले होते तो पाऊच विसरलो होतो, तो लावून, पाणी पिऊन, केळे खाऊन निघायला इतका वेळ लागला. (शिवाय पायाला रेताड माती लागली होती ती काढण्यात वेळ गेला कारण मग ती बूटात टोचत राहीली असती)

खरेतर मी हे सगळे खूप भरभरच केले

पण माझ्यामते (पश्चात बुद्धी) ते जरा शांत चित्ताने करायला हवे होते.

ह्या ट्रान्झिशनच्या वेळेला जे जे करायचे आहे त्या प्रसंगाची उजळणी मनात वारंवार करायला हवी होती आणि प्रत्यक्ष करताना शांतपणे करायला हवे होते, पण असो. आता पुढच्या वेळेस...:)

पराग्, स्प्लिट टायमिंग म्हणजे अर्ध्या अंतराची वेळ आहे. म्हणजे ऑलिंपिक अंतराची लूप्स आम्हा लाँग कोर्स वाल्यांना २ वेळा करायला लागत होती त्यापैकी एक-वेळा, किती वेळात झाले हे स्प्लिट टायमिंग बघून कळू शकते.

हर्पेन, सोनाली मायबोलीची सदस्या नाही. ितने फरीदा िहला ०९४९०३९३६९६ या नंबरवर िकंवा
farida@ghac या ईमेलवर संपर्क साधावा असे कलवले आहे.

अभिनंदन हर्पेन. खूप मस्त वाटले वाचून. ९ तास म्हणजे खूप थकवा येत असेल ना स्पर्धेनंतर, तो भरून येण्यासाठी काय काय करावे लागते?

धन्यवाद रविंद्र प्रधान, फरीदाशी संपर्क साधेन.

रूनी - थकवा येतच नाही असे मी म्हणणार नाही. पण स्पर्धा पुर्ण केल्यावर आपल्या मनाला जे काही वाटत असते त्यामुळे त्या दिवशी तरी लगेच काही जाणवत नाही.

अर्थात अशा मोठ्या स्पर्धांनंतर, नीट स्ट्रेचिंग, भरपूर गाढ झोप व यथायोग्य भरपूर आहार याला पर्याय नाही. काहीवेळा हा रिकव्हरी पिरीयड ४-५ दिवसांचा देखिल असू शकतो.

Aaple lok aalshi aahet.tyana fakt dusravar tika karayla sanga . Harpenrao yanna sakali kiti vajta utatat te vichara...aaso baki chalu dya

मला हैदराबाद येथे जाता आले नव्हते.

माझे काही मित्र जावून आले. स्पर्धा पुर्ण करून आले. हवामान बरे होते उन्हाचा फार त्रास झाला नाही. आयोजन चांगले होते.

तर मी आज संध्याकाळी निघतोय गोव्याला जाण्यासाठी..
समुद्रात पहिल्यांदाच पोहोणार आहे त्यामुळे पोटात बाकबूक होतंय

माबोकरांच्या शुभेच्छा नेहेमीच असतात त्यामुळे पुर्ण करेनच बहुतेक वेळ किती लागेल माहीत नाही.

Pages