ट्रायथलॉन

Submitted by हर्पेन on 9 July, 2014 - 04:03

हा धागा, ट्रायथलॉन विषयीच्या माहितीची आदान प्रदान करायला उघडत आहे.

ट्रायथलॉन म्हणजे पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे यांचे ठराविक नेमस्त अंतर पाठोपाठ पार करणे. सर्वसामान्यपणे ही स्पर्धा ४ प्रकारात घेतली जाते.

1. स्प्रिंट अंतर - ह्यात ७५० मी पोहोणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे समाविष्ट असते.

Sprint Distance; 750-meter (0.47-mile) swim, 20-kilometer (12-mile) bike, 5-kilometer (3.1-mile) run

2. ऑलिम्पिक अंतर ह्यात १.५ किमी पोहोणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट असते.

Intermediate (or Standard) distance; commonly referred to as the "Olympic distance": 1.5-kilometer (0.93-mile) swim, 40-kilometer (25-mile) bike, 10-kilometer (6.2-mile) run

3. दीर्घ पल्ला - ह्यात १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते.

Long Course; commonly referred to as 70.3 (total distance in miles, equivalent to 113.1 km) or the 'half-Ironman'; 1.9-kilometer (1.2-mile) swim, 90-kilometer (56-mile) bike, and a 21.1-kilometer (13.1-mile) run (half marathon)

4. अती-दीर्घ पल्ला – ह्या मधे ३.८ किमी पोहोणे, १८०.२० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी (फुल मेरेथोन) धावणे समाविष्ट असते.

Ultra Distance; commonly referred to as 140.6 (total distance in miles, equivalent to 226.2 km) or the 'Ironman'; 3.8-kilometer (2.4-mile) swim, 180.2-kilometer (112.0-mile) bike, and a 42.2-kilometer (26.2-mile) run (full marathon)

ऑलिंपिक मधेही या स्पर्धेचा समावेश असतो. तसेच खासगी आयोजकांतर्फे 'आयर्न मॅन' नावानी घेतली जाणारी स्पर्धा जगभर प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
http://eu.ironman.com/#axzz36xIofIxX

आपल्या शारिरिक क्षमतेचा दीर्घकालीन कस पाहणारा हा स्पर्धा प्रकार सध्या भारतातही लोकप्रिय होत आहे. ह्या स्पर्धाप्रकारात नव्यानेच भाग घेऊ पाहणार्‍या स्पर्धकांकरता नवख्यांसाठी अंतर (Novice category) ज्यात ३५० मी. पोहोणे, १० किमी सायकलिंग आणि ३ किमी धावणे समाविष्ट असते.

ट्रायथलॉन मधे भाग घेतलेले कोणी मायबोलीकर असतील तर त्यांनी आपापले स्पर्धेचे, त्याच्या तयारीबद्दलचे अनुभव इथे मांडावे ही विनंती.

तसेच भाग घेऊ पाहणार्‍या नवीन लोकांकरता हा धागा उपयुक्त ठरू शकेल अशी आशा आहे.

भारतात अशा स्पर्धा कोणातर्फे, कुठे, कधी आयोजित केल्या जातात, ई. माहिती देखिल इथे लिहू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंडन ऑलिम्पिक्सची वुमेन ट्रायथलॉन जबरी झाली होती.. फोटो फिनिश होता रिझल्स साठी..... आणि मेन ट्रायथलॉन मध्ये पण एकदम काटें की टक्कर झाली होती.. हे यु ट्युब वर आहे का? असेल तर लिंक दे ना

अगो, मस्त बातमी. ही बातमी निसटलीच होती वाचनातून. किती लहान आहे तो, अजून शिकतोय. इतक्या लहान वयात हे करू शकणे निश्चितच कौतुकास्पद आहे.

अगो इंद्रा - शुभेच्छांकरता धन्यवाद.

आणि इंद्रा आधीच स्पर्धेचे टेंशन आहे, ती आधी नीट पार पडू दे अजून वृत्तांताचे टेंशन नको देऊस Wink

हर्पेन ऑल द बेस्ट !! Happy
कुठल्यातरी अंतराची ट्रायथलॉन करणं टू डू लिस्टवर आहे.. बघू कधी होतय.

ऑल द बेस्ट हर्पेन !!
देव तुम्हांला पहिल्या नंबराने जिंकवो..... Happy
म्हणजे आम्हांला पार्टी.. Proud

इन्ना अर्जिता धन्यवाद.

अर्जिता, बाप रे! माहित आहे का, देवाला किती काम करावे लागेल, मला पहिल्या क्रमांकाने जिंकवायचे असेल तर.... मी पहिला नाही आलो तर काय झाले, कितवाही आलो तरी करू की पार्टी! आपल्याला काय पार्टीशी मतलब Happy

पोहणे, सायकल चालवणे आता शक्य आहे , पळण्याचा सराव नाही , तरीही आपल्याकडे अशी स्पर्धा असल्यास कळव मी भाग नक्की घेईन.

किकु- डिसेंबरात आहे अशी स्पर्धा पुण्यात, कळवेल तुला, तोवर पळण्याचा सराव करून ठेव Wink
मी नताशा, धन्यवाद
हिम्सकूल बघतो ती लिंक, मंडळ आभारी आहे Happy

हर्पेन....

क्षमस्व...काहीशा उशीरा तुमचा हा धागा पाहिला.... म्हैसूर ट्रायथलॉनमध्ये तुम्ही भाग घेणार असल्याचे वृत्त वाचून मला जितका आनंद झाला तितकाच तुमच्या जिद्दीचा अभिमानही वाटतो कारण या दिवसापर्यंत तुम्ही अशा गटातील स्पर्धेत भाग न घेताही केवळ आत्मविश्वासाच्या बळापर्यंत तिथे जाणार आहात ही बाब कौतुकाचीच आहे.

स्वीमिंग, सायकलींग, रनिंग....तिन्ही गटासाठी स्पर्धकाकडे असायला हवी ती दम कायम ठेवण्याची क्षमता. स्वीमिंगनंतर लागलीच सायकलींग असते आणि अंगावरील पाण्याची ओल तसेच ट्रंक पळत पळत बदलावी लागत असल्याने एकीकडे कोरड्या टॉवेलने डोके पुसणे, तर दुसरीकडे सायकलींग कॉस्च्युम चालत्या अवस्थेत चढविणे... यात वेळे जाऊ शकतो....सायकल लावण्याचे ठिकाण आयोजक ठरवितात....आपली ती लेडी कुठे आहे हे अगोदर निश्चित करावे लागते....पण पाण्यातून बाहेर येऊन त्या धावपळीत जागा हुकतेच....ते सांभाळण्यासाठी दम वाढवावा लागतो. रनिंग सुरेख रस्त्यावरच असेल याची खात्री नाही....मी ट्रायथलॉनच्या ज्या व्हिडिओ पाहिल्या आहेत त्यामध्ये रस्त्यापेक्षा डोंगरदर्‍याच जास्त होत्या.

या तीन प्रकारातील स्वीमिंग व रनिंग हे दोन घटक तुमच्या कौशल्यावर अवलंबून असून त्याला सर्वस्वी तुमचीच तयारी मदत करते....पण सायकलींगच्या यशस्वीततेमध्ये सर्वात मोठा किडा कुठला असेल तर तुम्ही वापरणार असलेली सायकल. तुम्हाला माहीत असेलच स्पर्धा सायकलींच्या किंमती....अक्षरशः डोळे पांढरे करतात ह्या किंमती... मागील वर्षी "कॅनॉनडेल' ची किंमत होती ३५,०००/- तर त्यानंतर प्रसिद्ध असलेल्या "श्वेनस्पोर्टेरा" ची २८,०००/-. अर्थात अमुक एका ब्रॅन्डची सायकल स्पर्धकाकडे असली पाहिजे अशी अट नसते...(म्हैसूरच्या संयोजकांनी तसे तुम्हाला कळविले असल्यास प्रश्नच मिटला)....पण सायकल नित्यनेमाने चालविणे आणि अशा स्पर्धेसाठी चालविणे यात निश्चित कुठला फरक असेल तर तो सायकलीच्या दर्जाचा.....अर्थात तुम्हालाही याची माहिती असेल असे गृहित धरतो. मुद्दा असा की, जर हे आयुध उत्कृष्ट दर्जाचे असेल तुमच्याकडे तर ते ४० किलोमीटरचे अंतर सहजपणे पार करण्यास सहाय्यभूत ठरू शकते.

मी स्वीमिंग आणि रनिंग हे दोन्ही प्रकार केले आहेत, स्पर्धेत भाग घेऊनही....(माझ्या कॉलेज जीवनाच्या काळात), सायकलींग करत होतो अगदी पन्हाळा, विशाळगड इथपर्यंत...पण हर्क्युलस वा रॅले वापर करून...स्पर्धा केलेली नाही.

डिसेंबरमध्ये म्हैसूर असल्याने तुम्हाला तयारीला चांगला वेळ आहे....सायकलची कंपनी आत्ताच निश्चित करून तसा सराव करा....आयत्यावेळी जी सायकल न्याल तिची सवयही तुमच्या पायाला होणे आवश्यक आहे.

धन्यवाद अशोक. मामा, कळकळ पोचली. पण स्पर्धा १० ऑगस्ट्ला आहे. माझ्याकडे भारतीय बनावटीची १३००० रुपये किंमतीची हर्क्युलस एसीटी ११० आहे. माझा पुर्ण सराव मी त्याच्यावरच केला आहे. माझ्या स्पर्धागटानुसार मला ९० किमी सायकलींग करावे लागणार आहे. माझे लक्ष, मी ही स्पर्धा किती वेळात संपवतो या पेक्षा मी नीटपणे कशी पार पाडतो आहे यावरच आहे. मी उद्याच निघतोय पुण्याहून म्हैसूरला जायला....

मानुषीताई शुभेच्छांकरता धन्यवाद. तुझ्या हेप्टॅथलॉनच्या अनुभवांबद्दल ऐकायला आवडेल.

हर्पेन ........ खुप खुप शुभेच्छा .....कित्ती मना पासुन करता तुम्ही .....तुमच्या जिद्दीचा अभिमान वाटतो... ऑल द बेस्ट ....

हर्पेन....

म्हैसूर स्पर्धेसाठी माझ्या शुभेच्छा आहेतच.... पण एक सूचना अवश्य विचारात घे.....ती म्हणजे नित्याप्रमाणे डोक्यावर भरपूर केस ठेवू नकोस....डोके अगदी सफाचाट करून नाही घेतले तरी चालेल, पण मिलिटरी स्टाईलने पातळ कट ठेव. स्वीमिंगसाठी ते उपयुक्त ठरते.....शिवाय पाण्यातून बाहेर आल्या आल्या सायकलकडे पळावे लागणार आहे, सबब ती कृती करता करताच तुला डोक्यातील पाणीही निथळून घ्यायचे आहे....आणि नेमका इथेच स्पर्धकाचा बहुमोल असा वेळ वार्‍यावरून उडून जात असतो.

प्राची, सुहास्य धन्यवाद, इन्ना - रुलाकेही मानोगे आप तो...

मामा उपयुक्त सुचनेबद्दल धन्यवाद

अशोकमामा.. आजकाल स्विमिंग करताना टोपी घालूनच स्विमिंग करतात बहुतेक जण .. क्वचितच बिन टोपीचे पहायला मिळतात.. सगळे जण ओळखता यावेत म्हणून एकाच रंगाच्या टोप्या पण बघितल्या आहेत ऑलिम्पिक्स मध्ये.. शक्यतो फ्लुरोसंट हिरव्या रंगाच्या..

हिम्या म्हणतोय ते अगदी खरे आहे, बहुतेक नव्हेच तर सर्वच स्पर्धकांना टोपी घालणे अनिवार्य असते.,सुरक्षेच्या दृष्टीकोनातून

पण मामा, भावना पोचल्या तुमच्या...:)

हिम्सकूल...

मान्यच आहे मला. स्वीमिंग कॅप्स आणि डोळे जळजळू नयेत म्हणून वॉटरगॉगल्स सक्तीचे केले जातात. पण दाट केस असले म्हणजे पोहताना त्यात पाणी जाऊन डोके जडही होते. हे मी अनुभवाने सांगतो. मी विद्यापीठ पातळीवरील जलतरणच्या फ्री स्टाईल आणि बटरफ्लाय या दोन गटात (१५०० मी फ्री...आणि २०० मी. बफा) अधिकृत भाग घेतला होता...माझ्या कॉलेज जीवनात...अर्थात त्यावेळी अशा कॅप्स आम्हाला कॉलेजने दिल्या नव्हत्याच....(दरिद्रीपणाचा अतिरेक दाखवित असे कॉलेजचा जिमखाना विभाग, पैसे नाहीत म्हणून...त्यातही जलतरणपटूंना महत्व न देता कोल्हापूरात फूटबॉलवाल्यांना डोक्यावर घेत असत...ही गोष्ट १९७५-७६ ची....आजही त्यात काही फरक पडलेला नाही) त्यामुळे आम्ही मोकळ्या डोक्यानेच पाण्यात सूर मारत असू.....जडपणा येऊ नये पोहताना म्हणून इन्स्ट्रक्टर स्पर्धेच्या अगोदर केस कापून घेण्याची सूचना करत...ती मान्यही होत असेच.

हैद्राबाद मध्ये १२ ऑक्टोबरला ट्रायथलॉन होत आहे. माझी मुलगी सोनाली प्रधान ही या
स्पर्धेच्या संयोजक समितीची एक सदस्या आहे.
अधिक माहितीसाठी: http://www.hyderabadtriathlon.com/
येथे पहावे.

अरे वा मस्तच कआ, धन्यवाद रविंद्र प्रधान,

या वेळी हैदराबाद येथे ३/४ आयर्न मॅन होणारे ना?

तुमची मुलगी मायबोलीवर आहे का? नसेल तर तिला पण यायला सांगा की..

म्हणजे तिच्याकडून सर्व माहीती कळेल इथल्या मंडळींना

रच्याकने

मी थोन्नूर येथील दीर्घ पल्ल्याची स्पर्धा साधारणपणे (प्रत्यक्ष वेळ कळायची आहे) ९ तास लावून पुर्ण केली. आपल्या सर्वांच्या सदिच्छा कामी आल्या, मस्त वाटते आहे Happy

Pages