विठ्ठलाचे काही शेर

Submitted by वैवकु on 8 July, 2014 - 11:32

दिनांक ९/०७/२०१४ रोजी आषाढी एकादशी (देवशयनी) आहे .हे व्रत करणार्‍या सर्वांना ते विशेष फलप्रद व पुण्यप्रद ठरो ही विठ्ठलचरणी प्रार्थना

विठ्ठलाचे काही शेर

जेव्हा हवे घेशी बुडवशी विठ्ठला स्वतःमधे
आयुष्य माझे का तुला बिस्कीट-खारी वाटते
______________________________________

फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
______________________________________
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते
______________________________________
नको बोलावणे धाडूस आषाढात यंदाच्या
पुन्हा शब्दांमुळे माझ्या तुझा पेटेल गाभारा
______________________________________
ना तुझा भार वाहणे माये
विठ्ठलाचा हमाल आहे मी
______________________________________
अन् मनाची तल्खली जोमात वाढू लागली
बस् तुझ्या यज्ञातली समिधा बनावे वाटले
______________________________________

साल हे आणेलही दुष्काळ बहुधा
वाटले नव्हते कमी भरणार वारी
______________________________________

~वैवकु Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...

फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
... मस्तच

छान