विस्कटलेल्या जिवास या ती बघत असावी

Submitted by वैभव फाटक on 8 July, 2014 - 10:43

विस्कटलेल्या जिवास या ती बघत असावी
म्हणून माझी जखम अता साकळत असावी

दुनियेवर का उगाच लांछन मलीनतेचे ?
आजकालची विचारसरणी मळत असावी

हाता-तोंडाशी आलेला पैसा जातो
अर्ध्या रस्त्यामधून लक्ष्मी वळत असावी

कष्ट सोसल्याचे फळ प्रत्येकाला मिळते
म्हणून बहुधा साय दुधावर धरत असावी

केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी

दुर्देवी हे झाड किती आक्रंदत आहे !
वेल तोडली गेलेली कळवळत असावी

वैभव फाटक ( ८ जुलै २०१४)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2014/07/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी<<<<सर्वाधिक आवडला

इतर शेरही कमीजास्त आवडले सगळेच चांगले वाटले एकंदर गझल आवडली
धन्स

अर्ध्या रस्त्यातून लक्ष्मी वळत असावी<<< रस्त्यामधून असे केल्यावर मात्रा बरोबर होतील.

गझल छान झालेली आहे.

केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी

व्वा

काही ओळीही स्वतंत्रपणे आवडल्या.

छान

कष्ट सोसल्याचे फळ प्रत्येकाला मिळते
म्हणून बहुधा साय दुधावर धरत असावी

केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी
<<<
मस्तच .

छान गझल .