Submitted by वैभव फाटक on 8 July, 2014 - 10:43
विस्कटलेल्या जिवास या ती बघत असावी
म्हणून माझी जखम अता साकळत असावी
दुनियेवर का उगाच लांछन मलीनतेचे ?
आजकालची विचारसरणी मळत असावी
हाता-तोंडाशी आलेला पैसा जातो
अर्ध्या रस्त्यामधून लक्ष्मी वळत असावी
कष्ट सोसल्याचे फळ प्रत्येकाला मिळते
म्हणून बहुधा साय दुधावर धरत असावी
केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी
दुर्देवी हे झाड किती आक्रंदत आहे !
वेल तोडली गेलेली कळवळत असावी
वैभव फाटक ( ८ जुलै २०१४)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर गझल आधी वाचली होतीच!
सुंदर गझल आधी वाचली होतीच!
केव्हाचा कोसळतो आहे पाउस
केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी<<<<सर्वाधिक आवडला
इतर शेरही कमीजास्त आवडले सगळेच चांगले वाटले एकंदर गझल आवडली
धन्स
सुंदर गझल
सुंदर गझल
मळत, जळत सगळ्यात जास्त
मळत, जळत सगळ्यात जास्त आवडले
धन्यवाद
अर्ध्या रस्त्यातून लक्ष्मी
अर्ध्या रस्त्यातून लक्ष्मी वळत असावी<<< रस्त्यामधून असे केल्यावर मात्रा बरोबर होतील.
गझल छान झालेली आहे.
केव्हाचा कोसळतो आहे पाउस
केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी
व्वा
काही ओळीही स्वतंत्रपणे आवडल्या.
धन्यवाद बेफिजी, 'लक्ष्मी'
धन्यवाद बेफिजी, 'लक्ष्मी' शब्दाचा उच्चार आधी चुकीचा गृहीत धरला होता.
बदल करतो आहे.
छान
छान
केव्हाचा कोसळतो आहे पाउस
केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी
व्वा. पहिली ओळ अधिक आवडली.
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
कष्ट सोसल्याचे फळ प्रत्येकाला
कष्ट सोसल्याचे फळ प्रत्येकाला मिळते
म्हणून बहुधा साय दुधावर धरत असावी
केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी
<<<
मस्तच .
छान गझल .
'मळत' आणि 'धरत' हे सर्वात
'मळत' आणि 'धरत' हे सर्वात छान.
छान !
छान !