विषय क्र. १ मोदी जिंकले पुढे काय?

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 26 June, 2014 - 04:12

झाडुन सगळ्या ज्योतिष्यांनी सांगुनही अखेर मोदी पंतप्रधानपदी विराजमान झालेत. कित्येक ज्योतिष्यांनी सांगितले की यावेळेला एक स्त्रीच्या पदरीच पंतप्रधानपदाची माळ पडणार आहे. त्यामुळे मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही. शिवाय कित्येकांनी त्यांना अमका ग्रह वक्री असुन देशाला तमका ग्रह वक्री आहे. या सार्‍या ग्रहांना वक्रीकरत मोदी आपली पंतप्रधान पदाची गाडी व्यवस्थित हाकत आहेत.

नरेंद्र दामोदरदास मोदी गांधीनगर पासुन लगतच्या मेहसाना जिल्ह्यातील वडनगर येथ राहत होते. एक चहा विक्रेत्याचे पोर, संघशाखेत जाता जात असे. त्यातचे गुजरातची जबाबदारी त्यांचेवर होती. अडवाणी व मुरलीमनोहर जोशींच्या रथयात्रची जबाबदारी सांभाळल्या नंतर गुजरातचे २ वेळा मुख्यमंत्री राहिल्याने बराच अनुभव गाढीशी होता, याच अनुभ्वातुन त्यांनी घेतलेला पहिलाच अचंबित करणारा निर्णय जो सार्कदेशांच्या प्रमुख नेत्यांना शपथविधीला बोलावण्याचा तो त्यांच्या शेजारी देशाशी संबंध कसे सुरळीत राह्तील यादॄष्टीकोनातुनच घेतल्याचे जाणविते. शेजारीच जर वैरी असतील तर देशाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. याच हेतुने त्यांनी पहिला परदेश दौरा केला तो भूतान सारख्या छोट्याश्या देशाचा. हेतू हाच की मागिल सरकारने घेतलेल्या काही निर्णयाने भूतानसोबतचे संबंध बिघडले होते. त्यामुळे भूतान नाराज असल्याने भविष्यात जर त्यांचे चिन सोबतचे संबंध भारताला डोकेदुखीचे ठरतील याची जाणीव मोदींना होती. भूतान भारताकडून बहुतेक वस्तु आयात करतो. त्यावर भारत सरकार काही सबसिडी देते ती बंद केली तर भूतानची अर्थव्यवस्था डळमळीत होते. ती सबसीडी भावी सरकारने पुन्हा चालु करुन दोन देशाती संबंधाना पुन्हा चालना दिली.

मोदी पंतप्रधान होण्यापुर्वी देशात महागाईने कळस गाठला आहे. हा महागाईचा कळस येत्या ५ वर्षात कमी होण्याची शक्यता कमी आहे. परंतु, त्यांनी जे सुतोवाच केले की, थोडे सोसा आणि मग पहा. यामुळे त्याची कळकळ लक्षाते येते की देशाला प्रगतीवर आणायचे असेल तर असे निर्णय घेणे आवश्यक आहे.
देशातील गरीब दुर करंण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती झाली पाहिजे, अशा रोजगार निर्मीतीला प्रथम योग्य वातावरण देशात निर्माण करणे आवश्यक आहे.

देशात भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. मागील सरकार कोसळण्याला हेही कारण आहेच. जनेतेची कुठलीही कामे चिरीमिरी वा दलाला शिवाय होतच नाहीत. सरकार सुध्दा कित्येक योजना केवळ कागदोपत्री राबवुन जनतेला ठगवित आहे. मोदी सरकारने यावर काही उपाययोजना म्हणुन काँग्रेस काळातील काही सचिवांन आपला स्विय सहाय्यक नेमू नयेत असे आदेश बजावुन भ्रष्टाचाराची गंगोत्री नष्ट करण्याचे एक पाऊल असल्याचे दाखवुन दिले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी काही चांगल्या योजना राबिल्यात, कॄषी विकास, ज्योतिर्गाम योजना, झी ग्रामयोजना, अशा योजनातुन त्यांनी खेड्यापाड्यातील लोंकान पर्यंत ह्या योजना पोहचवुन खेडी विकसीत केली. आता पंतप्रधान पदी विराजमान होताना संसंदेच्या पायरीला नमस्कार करुन आत प्रवेश केला. आणि सांगितले हे ही एक मंदीरच आहे.

सध्या सरकारी कार्यालयात शुकशुकाट असतो मोदी हे स्वतः कार्यालयात लवकर येतात, तसेच आपल्या मंत्र्यांंनाही त्यांनी लवकर येण्याचे सुचवून काम करी दाम हे वचन पाळले पाहीजे तोच कित्ता सरकारी बाबुनांही लागु करुन सरकारी बाबुंनी कार्यालयात १० पर्यंत पोहोचण्यास ते आग्रही आहेत. याचा परिणाम एकदम जरी दिसत नसला तरी हळूहळू होईल.

भविष्यातील त्यांच्या काय योजना असतील हे आताच सांगणे शक्य नाही, काही देशात अराजकतेची स्थिती आहेच याचा परिणाम अर्थवेव्यस्थेवर होईल, त्यामुळे अच्छे दिन अजुन तरी लांब असल्याचे जाणवते. भारताची संपन्नतेकडे वाटचाल करण्यास मोदी यांची कार्यशैली निश्चितच समाधानकारक आहे. ज्या अमेरिकेनी मोदी यांना व्हिसा नाकारला त्यांनी पहिल्याच महिन्यात मोदींना अमेरिका वारीचे निमत्रण दिले आहे.

स्रर्वात जास्त महत्व भारत पाकिस्तान संबध दॄढ होण्यात त्यांची कुटनिती भारताला लाभदायी ठरेल. हे शरिफ यांच्या भारतात शपथविधीला येण्याने दिसुन आलेच. त्या खालोखाल चिन सोबतचे बिघडलेले भारताचे संबंध कसे सुधारतील हा प्रश्न ते कसा सोडवतात याची चुनक येणार्‍या दिवसात दिसणारच आहे.

दहशतवादा सोबतच नक्षलवादही फोकावतो आहे ही अंतर्गत समस्या कसे हाताळतील हे येणार्‍या दिवसात पहायला मिळेल. गोध्रा वगळता गुजरातेत गेल्या १२ वर्षात एकही दंगल झाली नसल्याने ह्या अंतर्गत समस्या ते योग्य प्रकारे हाताळतील असेही वाटते.

सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन ते सत्तेवर विराजमान झालेत. जशा सरकारकडू आपल्या काही अपेक्षा असतात, तशाच जनते कडूनही सरकारच्या अपेक्षा असतात. त्यामुळे देशाच्या विकासाला चालना देताना , वेगवेगळ्या योजना राबवितान जनता कशी योगदान देते हेही महत्वाचे ठरणार आहे.

विरोधी पक्ष किरकोळ गोष्टींनाही विरोध करत आहे. अशावेळी हतबल न होता सरकार कसे निर्णय घेते याची खरी कसोटी आहे. सध्या विरोधी पक्ष कमजोर आहे. त्यामुळे छोट्याही गोष्टीला विरोध करुन जन आंदोलन करुन जनतेची मने आपल्याकडे वळविण्याचा खटाटोप विरोधीपक्षाने चालविला आहे. त्याला जुमानत गेले तर मात्र ये रे माझ्या मांगल्या अशी स्थिती कायम राहील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाईन गेल्याने सुटलेली दुरूस्ती
>>अडवाणी व मुरलीमनोहर जोशींच्या रथयात्रची जबाबदारी सांभाळल्या नंतर गुजरातचे २ वेळा मुख्यमंत्री राहिल्याने बराच अनुभव गाढीशी होता, याच अनुभ्वातुन त्यांनी घेतलेला >>