प्रोफेसर सतीश देवपूरकरांचे वेचक शेर

Submitted by profspd on 25 June, 2014 - 11:13

गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या......
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!

.................प्रा.सतीश देवपूरकर

धाग्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलले आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"प्रोफेसरांचे निवडक शेर" हे शिर्षक चुकीचे आहे.

असे शिर्षक घेतले तर पेशाने प्रोफेसर असलेल्या पाचपन्नास गझलकारांचे शेर येथे द्यावे लागतील.

"एका प्रोफेसराचे निवडक शेर" असे शिर्षक चालून जाईल पण त्या निवडक शेरात प्रोफेसरपेशाच्या योग-क्षेम कुशलाचे प्रतिबिंब उमटायला पाहिजे, तरच त्या शिर्षकाला अर्थ.

गेलेल्या आयुष्याने पाडल्या सुरकुत्या इतक्या......
उरलेल्या आयुष्याला चेहरा राहिला नाही!

व्वा! बहूत खूब. अप्रतिम शेर.

मात्र या शेराचा प्रोफेसर या शब्दाशी काय संबंध आहे ते कळले नाही.

(गझलकार हा गझलकार असतो. गझलकाराचा दर्जा त्याच्या शेरातील ताकदीवर अवलंबून असतो. गझलकार त्याच्या खाजगी जीवनात प्राध्यापकी करतो, शेती करतो, व्यापार करतो, हमाली करतो की हजामती करतो, यावरून शेराचा/गझलेचा/गझलकाराचा दर्जा ठरवता येत नाही. मात्र कदाचित त्याच्या जीवनशैलीचा प्रभाव शेरावर उमटू शकतो.)

आता तुम्ही सगळे शेर इथे(च) देणार ?<<<<<
नाही उदयन आता ते त्यांचे सगळे(च) शेर इथे देणार असे मला वाटते

लिहीत प्रत्येक शब्द गेलो तुझा, जणू गोंदल्याप्रमाणे!
जपून मी ठेवला तुझा तो नकारही दागिन्याप्रमाणे!!

....................प्रा.सतीश देवपूरकर

जपून मी ठेवला तुझा तो नकारही दागिन्याप्रमाणे!!<<< व्वा

अहो प्रोफेसर,

स्वतःच स्वतःचेच शेर निवडक म्हणून काय टाकताय? आणि तेही 'प्रोफेसरांचे शेर' म्हणून? 'माझे निवडक शेर' असे तरी शीर्षक ठेवा? तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, कोणत्या ना कोणत्या विषयात प्रोफेसर असल्याशिवाय मायबोलीवर कोणीही सदस्य नाही होऊ शकत! त्यामुळे 'प्रोफेसरांचे निवडक शेर' ह्या टर्मिनॉलॉजीला काही अर्थच नाही आहे इथे!

तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, कोणत्या ना कोणत्या विषयात प्रोफेसर असल्याशिवाय मायबोलीवर कोणीही सदस्य नाही होऊ शकत! >> Lol

हे म्हणजे आमच्याइथे लोक स्वतःची अलिशान समाधी स्वतःच बांधून ठेवतात तसं वाटतंय.
मागच्यांना फक्तं आत बसवायचे काम शिल्लक.

"प्रोफेसर सतीश देवपूरकरांचे"

याचा शॅार्टकट

"प्रोफेसरांचे"

असा कसा व्हईल ब्वॉ?

"सतिशांचे" किंवा "देवपूरकरांचे" किंवा "सतिश देवपूरकरांचे" असा होऊ शकतो, या तर्‍हेची शिकवन आम्हाला आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या मराठीच्या प्रोफेसरांनी शिकवल्याचे आठवत आहे.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वःतच स्वःतच्या लेखाला शिर्षक द्यायचे असेल तर ते

"सतीशचे निवडक शेर" किंवा "देवपूरकरचे निवडक शेर" किंवा "सतीश देवपूरकरचे निवडक शेर" किंवा "माझे निवडक शेर"
असे असायला हवे.

मी काही मराठीचा प्रोफेसर नाही, त्यामुळे खरेखोटे देवच जाणे, एवढेच म्हणू शकतो.

जाणकारांनी प्रकाश टाकला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.

मी वेचक च्या जागी, "वचक" वाचले Uhoh

म्हटले प्रोफेसरांचा वचक असा सांगावा लागायला लागला की काय Proud

शिर्षकात तुम्ही देवपूरकरांचे वेचक शेर अस लिहिलय आणि एकच शेर लिहिलाय.
अस कस??? Uhoh

शेरातल काही कळल नाही तरी एक- अनेक कळतं इथे सगळ्यांना Happy

Pages