पासपोर्ट काढायचा आहे. काही प्रश्न.

Submitted by Rajesh K on 13 June, 2014 - 09:36

पासपोर्ट काढायचा आहे . काही प्रश्न.
१) गिवेन name मध्ये स्वतःचे नाव व वडिलांचे प्रथम नाव लिहायचे ना??? कि फक्त स्वतःचे प्रथम नाव?
उदा. "अक्षता सुरेश" कि फक्त "अक्षता" ? (लग्न झाले नाही अजून) अतात्पर्यंत सर्व ठिकाणी "अक्षता सुरेश पाटील" असेच नाव वापरत आले आहे. ( हे काल्पनिक नाव असून उदाहरणादाखल आहे. स्मित )

२) फोर्म भरल्यावर (घरातल्या PC ला प्रिंटर जोडला नसल्याने) कशी प्रिंट घ्यायची? मी नेहमी पेन drive मधून document घेवून बाहेरून प्रिंट काढतो. येथे तशी सोय आहे काय??

३) दोन references लागतात. ते कुटुंबातल्या व्यक्तींचे चालतील का ? नातेवायिक चालतील का ? हे २ refrences व पोलिस verification ला येतात तेंव्हाचे २ सह्या लागतात त्या सारख्याच व्यक्तींच्या कि वेगळे चालतात?

४) emergency contact हा घरच्या सदस्याचा चालतो का ?

अजून काही खबरदारी किंवा योग्य सल्ले असल्यास स्वागत. धन्यवाद. स्मित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम... बरेच कन्फूज दिसता ,

हम... बरेच कन्फूज दिसता , चला एक एक दूर करु.

१) गिवन नेम म्हणजे तुमचे नाव + मधले नाव ( वडीलांचे किंवा पतीचे)
आडनावासाठी वेगळा रकाना असतोच

२) फॉर्म भरल्यावर तो सेव्ह करा तो .xml या फॉर्म मध्ये असेल , तो पेन ड्र्राईव्ह मध्ये घेता येईल व प्रिंट काढता येईल. किंवा कोणत्याही नेट कॅफेवर जाऊन लॉगिन करा आणि प्रिट काढा.

३) दोन रेफरन्स कोणीही चालतात ते शक्यतो तुमच्या घराजवळ किंवा गावात राहणारे असावेत. पोलीस व्हेरीफिकेशनला त्यांच्या सह्या लागत नाही. समजा पोलीसांनी मागणी केलीच तर तुम्ही कोणीही दूसरे दोनउभे करु शकता . थोडक्यात वेगळे चालतील . पण पत्याचा पुरावा भक्कम असेल तर सहसा लागणार नाहीत.

४) इमर्जन्सी कॉन्टक्ट घरच्यांचा चालतो किंवा एखाद्या मित्राचाही देऊ शकता.

काही खबरदारी

१) फॉर्म व्यवस्थित भरा (स्पेलींग परत एकदा चेक करा) , पत्ता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदा प्रमाणे तंतोतंत तसाच लिहा. पत्यासाठी कोणतेही एकच डॉकूमेट जोडा.

२) ज्या वेळी अपॉईमेंट असेल तेव्हा वेळेत जा, त्या वेळी सर्व कागदपत्रे मूळ प्रतिसह एक झेरॉक्स कॉपी जवळ ठेवा. अपॉईंमेट लेटर ( बारकोड असणारे) . बरोबर न्या. आणि पॅन कार्ड घेवून जा.

३) पोलीस व्हेरीफिकेशन चे वेळी मराठीतच बोला. शांत रहा. त्या दिवशी सुटीच काढा , दिवस जातो सगळा.

पासपोर्टबाबत अजून एक धागा माबोवर आहे, तो वाचा

.xml या फॉर्मची प्रिंट काढावी लागत नाही.
आता ऑनलाईन झालय की..

आणि राजेशके, तिकडे एक सूचना पुस्तिका आहे ती वाचा की आधी व्यवस्थित.

सर्वांचे आभार. Happy

@ विज्ञानदास, होय तुमचे त्या धाग्यावरचे उत्तर वाचले. तुमचे उत्तर व मी नवीन धागा जवळपास एकाच वेळी काढला. त्यामुळे गोंधळ. Happy

माझा पासपोर्ट अजून १५ दिवसांनी संपणार आहे. घाई घाई करून तो गतप्राण होण्याच्या आधी करावा की नंतर केला तरी प्रोसिजर तीच असते? मला एवढ्यात कुठ्ठेच परदेशी जायचे नाही त्यामुळे गडबड करून जाण्यापेक्षा अजून थोडा आळशीपणा करून निवांतपणे जाता येईल. रिन्यु करण्याच्या पासपोर्टात पत्ता देखील बदलून घेणे आहे.

मेधा , गतप्राण व्हायच्या आधीच करा ना .
किन्वा आता होतोयच गतप्राण तर करूनच टाका , नंतर परदेशी जाताना घाई घाई कशाला ?

प्रोसिजर सेमच असते .

Have you ever been known by other names?
Have you ever changed your name? Have you ever changed your name?*

वरील दोन्ही प्रश्नांना "हो" असे लिहून माहेरचे नाव लिहायचे असते का?