आर आर आबा - राजिनामा मागनं बरोबर होत का ?

Submitted by Babaji on 12 June, 2014 - 02:18

नाव : रावसाहेब रामराव पाटिल
जन्म : १६ अगस्त १९५७ ,वय ५७
गाव : तासगाव
शिक्शण : वकिलि
वर्न : उजल
धन्दा : राजकारन
पद : मन्त्री (ग्रुह)

हे ग्रुहमन्त्री असुन त्यान्च्याबद्दल आजपन आदरच आहे सर्वाना. या पदावर यापुर्वि असताना मुम्बई हल्ल्याच्या वेळि केलेल्या एका वक्तव्यमुळे त्यान्ची नोकरि गेलि होति. काहि वर्षानि पुन्हा कामावर गेतल पन उपमुख्यमन्त्रिपद मिलाल नाहि. फक्त ग्रुहमन्त्रिपद मिळाल. ते क्लिन मनुश्य म्हनुन सर्वाना माहित आहेत. त्यांचि मुले झेडपिच्या शाळेत शिकतात. भाउ पोलिसात असुन त्याला बढतिसाठि कधि नियम वाकवले नाहित.

या आधि विरोधि पक्शात असताना ते गाजले होते. सन्सदेत लक्शवेध केल्यामुळे लक्शवेधि आमदार अशि पन त्यान्चि ओळख होति. त्यानन्तर ग्रामविकास खात्यात काम करतान त्यानि सफाई मोहिम राबवुन गाव साफ केलि. त्या मोहिमेच कौतुक देशात झाल. पन उपमुख्यमन्त्रिपदि बढति मीळाली आणि अतिरेक्यानि हल्ला केला. त्यावेळि त्यान्च्य तोन्डुन नकळत एक वाक्य निघुन गेल ते मेडियान लावुन धरल. त्यानन्तर तम्बाखु प्रकरनात त्याना झापन्यात आल. नन्तर अनेक प्रकरनात ते असहाय वाटले. शक्ति मिल अत्याचार, गुन्डगिरि, दन्गलि आनि महिला, दलित अत्यचाराच्य केसेसमधे त्यान्च्या राज्यात वाढ झालि. केस नोन्दवुन पन घेतल्या जाट नाहित. याबद्दल सुप्रिम कोर्टने गेल्या वर्षि झापले आहे.

आताच्या घटनेत पन महिला अत्याचारासंदर्भात ते एक वादग्रस्त वाक्य बोलले (घराघरात पोलिस दिला तरि अत्यचार थाम्बनार नाहि ) अस मेडियातुन सांगिन्तल जात आहे. काल सगळिकड त्यान्च्या राजिनाम्याचि मागणि होत होति. त्यानि विधानसभेत एक स्टेटम्न्ट केल ज्यावर विरोधकानि हल्ला चढवला. बाहेर मेडियाशि बोलताना त्यानि वादग्रस्त वक्तव्य केल अस मेडिया म्हनत आहे. तर मि तस बोललोच नाहि अस आबा म्हनत आहेत. अस ते बोलले. आता नविन माहितिनुसार आबा मेडियावर हक्कभन्गाचा गुन्हा नोन्दवनार आहेत.

विधानसभेत ते नक्की काय बोलले आणि मेडियात काय आल यात खर कोन हे त्यानन्तर कळल. पन ज्या वाक्यावरुन गदारोल झाला ते रेकोर्ड झाल होत का ? त्यान्च्या नोकरिचा राजिनामा मागनं बरोबर होत का ? राजिनाम्याने प्रश्न सुटल का ? अत्याचाराच्या घटना थाम्बतिल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न जर गृहमंत्र्यांचा राजीनामा लोक मागत असतील ( सकाळी मी लिंक दिली होती) तर त्याला आधार आहे. १५ वर्षामधे लोक जो काही अनुभव घेताहेत त्याचं प्रतिबिंब लोकसभेच्या निकालात उमटलेलं आहे. बाहेरच्या राज्यात काय आहे याची आकडेवारी लोकांना देऊन काय उपयोग ? अन्याय अत्याचाराच्या घटना राजरोस घडताहेत. वाळू माफीया, पेट्रोल माफीया, डिझेल माफीया, लॅण्ड माफीया असे अनेक माफीया उभे राहीलेले आहेत. माहीती अधिकाराच्या कार्यकर्त्यांचा खून होणे, डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाचा तपास, खैरलांजी ते खर्डा अशी सामाजिक न्यायाची हेळसांड, भर मुंबईत सामूहीक बलात्कार होणे, शक्ती मिलसारख्या जागा असुरक्षित जागा राजधानीत असणे अशा अनेक घटनांची नोंद लोकांनी घेतलेली असते. त्यातच घोटाळे, आदर्श, मंत्रालयाला आग अशा घटनांची भर पडणे, जिल्हाधिका-याला जाळण्यापर्यंत गुंडांची हिंमत होणे हे सर्व कुठल्या राज्याचं लक्षण आहे ?

आता या घटनेला निर्भयासारखी प्रसिद्धी मिळवून देण्यात मीडीयाला रस नसणार.

हरियाणा राज्यामधून दोन अडीच महीन्यापूर्वी चार बहीणी दिल्लीत आल्या आहेत. या बहीणींवर गँगरेप झाला आहे. पोलीस आणि प्रशासनाने हाकलून दिलं. आईवडीलांना दम दिला. त्यावेळी त्यांना दिल्लीत निर्भया केस मधे मिळाला तसा न्याय मिळेल असं वाटल्याने त्या दिल्लीत आल्या. फूटपाथवर त्यांनी बोर्ड लावले आहेत. निर्भया प्रकरणात रस्त्यावर आलेले एकही मीडीयाकर्मी, मेणबत्तीवाला, महीला संघटनावाले तिकडे फिरकलेले नाहीत. पण सामान्य नागरिकांचा पाठिंबा त्यांना वाढतो आहे. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला गेला. पण सगळेच निवडणुकीत गर्क होते. आज बदायूं प्रकरणात मीडीया जज्जच्या थाटात निकाल देतोय, पण या चार बहीणीही दलितच आहेत, मग तिकडे लक्ष का देत नाही हा अखिलेशचा सवाल रास्तच आहे.

याचा अर्थ अखिलेश सरकार क्लीन आहे असा होत नाही. तर घटनेचं भांडवल मेडीया कुणासाठी करतोय आणि त्यातून काय फरक पडणार परिस्थितीत हा मुख्य प्रश्न आहे.

http://act.watchdog.net/petitions/4126?share_ref=56AERju48os

अंजु बाला केस. देशी मीडीयात उल्लेख नाही पण विदेशी मीडीयात चर्चा. देशाची काय अब्रू जायची ती बाहेर गेलीच आहे, पण मीडीया, राजकारणी कशात गर्क आहेत ? देशातल्या जनतेला गंधवार्ताही नाही.

http://ofmi.org/2013/08/lynched-gang-raped-dalit-girl-championed-by-sout...

https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=_MKoQeMUoPU

या परिस्थितीत फक्त निवडणूक असलेल्या राज्यांवरच लक्ष देणं हे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं वाटतं. सत्तेत असलेले न्याय देत नाहीत आणि ज्यांना सत्तेची आशा आहे ते सध्या सत्तेत असलेल्या राज्यात काय दिवे लावताहेत हे इथं उघड होतंय.

दिल्लीमधे जंतरमंतर येतेहे ६ एप्रिलपासून चालू असलेल्या गँगरेप पीडीत बहिणींच्या आंदोलनाबद्दलची ही लिंक. अद्याप कुठल्याही टीव्ही चॅनेलला वेळ मिळालेला दिसत नाही. याच जंतरमंतर वर अण्णा उपोषणाला बसले तेव्हांच वातावरण कसं होतं हे आठवतं.

http://www.eni.network24.co/india/alleged-gang-rape-victims-protesting-a...

शुध्द्लेखन आणि शुद्धलेखन -दोन्हीमध्ये 'ध' अर्धाच आहे की...दोन्हीत 'द'लाच जोडलेला आहे.ती टायपो लिखाणात झालेली चूक आहे.ती दुरूस्ततो इथून पुढे. सोपा वाटला तोच टायप झाला.असो.. बेफि़कीरजी धन्यवाद. साती यांनी आवाज उठवला,म्हणून प्रश्न सुटला..याला म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे...प्रश्न विचारील तयांचे.. Happy

आर.आर यांनी गेल्या दहा वर्षात काय काय केले त्याची यादी देऊ शकाल का?अगदी मोजक्याच दिल्यात तरी चालेल.त्यातही त्यांनी स्वत:च्या मनाने निर्णय काय घेतलेत याचेही मुद्दे येऊ द्यात.

दुका,
मी तुमच्या बाजूनेच आहे.तुमच्यावरती कुणाचाही रोष नाही.कोणीही तुम्हाला रागावणार नाही.(बेफि़कीरजी 'सुद्धा') ('द्ध' जमला Proud ) तरी आपण जिथे असाल तिथून घरी परत यावे.(म्हणजे डूआय काढून आयडू तरी व्हावे.खरे अवतरलात तर बेस्स्स)
धन्यवाद.

विदन्यानदासजि
आपल्या प्रश्नचे उत्तर मि गझलेच्या धाग्यवर देईन. तुम्हि सान्गितलेला सराव पन तिकडच चालु आहे. इथ विशयावरच बोलु. बघा बाकिच्याना कसलिच अडचन आलेलि नाहि.

मला आर आर यान्चेबद्दल जेव्हढि माहिति होति तेव्हडि सुरुवातिलाच दिलि. तरि आपन आपल्याकडुन मोलाचि भर घालावि हि इशवरचरणि प्रार्थना आहे.

शुद्धलेखन महत्वाच का अपमान करन महत्वाच
अपमान करणे जरी महत्वाचे नसले शुद्धलेखनापेक्षा तरी महिला ऐवजी मैला लिहीणे म्हणजे जरा जास्तच. जरा शिकायला, प्रयत्न करायला हरकत नाही, नसेल जमत तर दुसर्‍याकडून शिका. निदान ह. बा. यांनी लिहीलेले नियम अचरणात आणले तरी बरीच सुधारणा होईल. बोली भाषा नि लिखित भाषा यात फरक असतो. अशुद्ध बोलणे जसेच्या तसे तरी उद्धृत केले तरी सगळेच तसे लिहीले तर त्याबद्दल मत चांगले होत नाही.

तुम्ही जे लिहीलेत तेच जर जरा शुद्ध लिहीलेत तर लोक मुद्द्याला धरून बोलतील अशी आशा करायला जागा आहे.

नाहीतर तुमच्या मूळ मुद्द्याचा प्रभाव पडत नाही. कळतच नाही कित्येकांना - इतकी आपल्या भाषेची विटंबना बघवत नाही.

हिन्दुत्वाच्या राज्यात पब्लिकला खरं रुचत नाही. लबाड बोलायला हवं होतं...
पहिले दोन शब्द वगळता तुमचे वाक्य जागतिक पातळीवर सत्य म्हणून अनेकांना माहित आहे.

तुमचा आधीचा विनोद पण समजलेला नाही रॉबीनभाऊ. तुम्ही इथले पगारी विनोदवीर असाल तर तुमचे विनोद कळत नाहीयेत ही अडचण आहे ब्वॉ ! क्षमस्व !!

ए अरे ए दुकानबाबा, एवढे सगळे लोक कंठशोष करून सांगत आहेत तर जरा निट लिहिण्याचे मनावर घे की.
एवढे काही अवघड नाहीये.
विषय तर मारे अवघड अवघड निवडतो आहे, इतरांना जुलाब केल्यासारखे लिहिता असे म्हणतो आहे,
मग स्वतःला लिहिताना कळत नाही का की आपण जे लिहितो ते वाचनीय नाहीये.
सरावाने अगदी सहज लिहिता येऊ शकते माबोच्या प्रतिसाद विन्डोमधे. कशाला पाहिजे बरहा न फिरहा. Angry

वि.सू. : मी जे लिहिले आहे ते त्राग्यानेच लिहिले आहे. याला अपमान समजा किंवा काहीही समजा.
एकतर चुकीचे लिहित सुटायचे आणि वर सर्वांना शिकविल्यासारखे लिहायचे की विषयाल महत्व द्या. हे काय आहे ? Angry

द्रोणाचार्याना फोन कर आणि शिकवणी लाव>> किंवा एकलव्य व्हा, चुका द्रोणाने बोटे मागितली म्हणजे

अरे अरे, चिदता कशाला, मि म्हनल मि प्रेक्टिस सुरु केलि आहे हलुहलु. पन दुस-या धाग्यवर. इथ विशयावा बोलु इतकच म्हनल.

५०+

दुर्योधन कानतोडे साहेब - माझा सुरवातीचा प्रतिसाद पुसल्या गेला :अरेरे:.

आबानी राजिनामा देण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणा जिभेला लगाम द्या आणि कारवाई केलेली लोकाना दाखवा. बाते कम, काम जादा. या म्हणीचे स्मरण द्या त्यान्ना.

तुमचे मुद्दे नेहेमीच ज्वलन्त विषयावर असतात, येथे सब्जेक्ट कन्टेन्टला पण महत्व आहे...
तुमचे लिखाण वाचायची आणि वाचुन समजावुन घेण्याची कला अवगत मला अवगत झाली :स्मित:.

तुमचा आधीचा विनोद पण समजलेला नाही रॉबीनभाऊ.
नाही कळायचा. फक्त तीन आठवडे आहात इथे तुम्ही. आम्ही दोघेहि प्रत्येकी १२ वर्षांहून अधिक काळ इथे आहोत. तेंव्हा सगळे संदर्भ तुम्हाला लागायचे नाहीत.

बाकी रॉबिनहूड, दुगाण्या झाडण्यात तुम्ही इतके निष्णात की बाकीच्यांना सामन्यातून माघारच घ्यावी लागते. तर तुमचे चालू द्या - दुगाण्या झाडणे. काही नवीन अनभिज्ञ लोक इथे येतात नि तुमच्याशी बरोबरी करू बघतात. तुम्ही हां हां म्हणता त्यांचा धुव्वा उडवाल, नि तुमचे हां हां ऐकून इतर जण पळून जातील!

अरेच्चा !
ही गाडी तर धुव्वा स्टेशनाकडे निघालीय. अहो सरजी, बरोबरीचा प्रश्नच येत नाही हो, तुम्हीच म्हटल्याप्रमाणं कशाची कशाला टोटल लागत नसल्यानं कळलं नाही तर असं साफ साफ विचारलेलं बरं असं इतरत्र आलेले अनुभवाचे बोल सांगतात. इकडे तो अनुभव चालत नसेल याची तरी काय कल्पना ! तुम्ही एव्हढं सांगितल्याने ज्ञानात बरीच भर पडली. नाहीतर नुसत्या आयडीवरून तरी काय कल्पना येणार ? ब्रह्मांड आठवले या नावावरून अंदाजपंचे पंच मारणे आणि नुसतं झक्की या नावावरून अमेरीकेत डोळ्यावर काळी पट्टी बांधून, डोक्यावर काऊबॉय सारखी हॅट घालणारा, कमरेला पिस्तूल लटकवणारा आणि घोड्यावरून फिरणारा कुणी इसम इथे लिहीत असावा अशी कल्पना बाळगून काहीबाही लिहीण्यापेक्षा विचारून घेतलेलं बरं, असं वाटल्याने प्रश्न विचारले. विनोद केलात तर तसं सांगत चला म्हणजे एण्जॉय देखील करता येईल एव्हढंच म्हणणं हो..

अधिक उणं झाल्यास सपशेल माफी. मोठ्या मनाने माफ करून टाकाल अशी का कुणास ठाऊक आशा वाटते.

अधिक उणं झाल्यास सपशेल माफी. मोठ्या मनाने माफ करून टाकाल अशी का कुणास ठाऊक आशा वाटते.
अहो, स्पष्ट विचारले म्हणून स्पष्ट उत्तर दिले, त्यात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. माफी कसली मागता? खरे बोलल्याची? स्पष्ट बोलण्याची? अहो याला माफी काय मागायची? या तर अनुकरणीय गोष्टी. जरा खरे बोलण्याचा, स्पष्ट बोलण्याचा राजकारणाशी, धंद्याशी काही संबंध नसतो, पण वैयक्तिक संबंधांत त्यासारखे दुसरे योग्य काही नाही!

Pages