शुभ्र...सुंदर ??

Submitted by pinkswan on 11 June, 2014 - 21:01

पुन्हा एकदा क्रोचेट ...
अवल च्या मार्गदर्शनानुसार हा स्कर्ट करायला घेताना मोठ्या उत्साहात घेतला...पण धागा निवडताना केवळ आवडला ...म्हणुन घेतला,इतक्या छोट्या धाग्याचा स्कर्ट पुर्ण व्हायला किती वेळ लागेल याचा विचारच केला नाही Lol . विणत असताना खुपदा पेशन्स संपल्यात जमा..पण अवल ने मधे मधे प्रोत्साहन सुरु ठेवले..आणि हुश्शः...झाला एकदाचा Happy
झाला म्हणजे ....बनत आलाय हे दिसल्यावर तो घालण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्याची ठरलेली डिझाइन न विणताच संपवला. आणि वाढ्दिवसाला 'माझी मलाच भेट' ...म्हणुन घालुन मिरवला Wink

new size skirt photo.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त .. असाच एक मी महाबळेश्वर मध्ये घेतलाय पण थोडा लाँग होईल ..
हॅपी बड्डे..

मस्त !!!!

अ प्र ति म !!
प्रचंड मेहेनत करुन विणलेला आहेस आणि तुझी मेहेनत पूर्ण सार्थकी लागलीये Happy
जेव्हा जेव्हा तू हा स्कर्ट घालशील.... चर्चे तो हो के ही रहेंगे Happy
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा Happy

वॉव.. सुर्रेख झालाय आणी सुंदर दिस्तोय

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

चक्क हाताने विणलेला स्कर्ट... ग्रेट!!!!!!

अप्रतिम दिसतो आहे...
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा Happy

धन्यवाद सगळ्याना.
@ मनीमोहोर >>किती दिवस लागले करायला?
आठ्वड्याचे ५ दिवस ..एक ते दिड तास रोज ....यातही मधे मधे अनेक कारणांमुळे खंड .. (मुलांची शाळा, तब्बेत ) कधी कधी १५ दिवस / आठ्वड्याचे आउटिंग( भारतातुन आई -बाबा आल्यामुळे) ....यामुळे सलग वेळ किती हे नाही सांगता येणार...पण हे सर्व करुन ६-७ महीने लागले. Happy

वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढच्या. वाढदिवसाच्या साठी असाच काही जिगरबाज प्रकल्प हाती घ्या.त्यासाठीही खुप शुभेच्छा .स्कर्ट मस्तच ह.