- ग्रंथ परिचय – विज्ञान अणि चमत्कार

Submitted by शशिकांत ओक on 11 June, 2014 - 02:05

- ग्रंथ परिचय –

Image.jpgविज्ञान अणि चमत्कार

भानामतीचे खेळ कोण करते? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का ? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो ? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौत शास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय? अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे ‘विज्ञान अणि चमत्कार’ हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या ‘विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’, ‘विज्ञान आणि बुद्धिवाद’ या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणाऱा हा ‘ग्रंथराज’ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
६६४ पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तानवनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित ते घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून तसे कळणार? किंवा ठरवणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिक शास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते जग वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.
जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा अंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणाऱ्यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.
पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तिन्हींचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही. नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात परंतु या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी या शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे.
ग्रंथपरिचय – विंग कमांडर शशिकांत ओक
लेखक – प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. मो. क्र. ९९०२००२५८५. वेदांत विवेक प्रकाशन. पृष्ठे - ६६४. किंमत – रु.४००. (नवी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकीच्यांचे राहूदे आपण तरी तो वाचलात का...
आजच्या बातमीने तर धमाल उडवून दिली आहे....
आता साक्षात दाभोलकरांचा आत्माच संपर्कात येत होता...
असे पोलिस दप्तरातील काहींनी अनुभवल्याचे ऐकतो...
आता आत्म्याचे अस्तित्व नाही किंवा आहे यावरील बितंबातमी अंनिस ला कळावी ही डॉ. ची कळकळीची इच्छा होती कि काय ...

मित्रांनो,
प्रा.अद्वयानंद गळतगे म्हणतात तसे आत्म्याचे अस्तित्व असेल कदाचित, पण प्रकाश काका यांचे सध्या अस्तित्व?

जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात.
----- मी कुठल्याही अर्थाने मोठा शास्त्रज्ञ नव्हतो पण काही काळ शास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे... वरिल विधान वाचताना मिठाचा खडा लागला आणि वाचकान्चा गैरसमज व्हायला नको म्हणुन थोडा खुलासा करतो आहे.

विज्ञानात verifiability and reproducibility अत्यन्त महत्वाचे आहे. एखादा प्रयोग ह्या दोन कसोटीन्वर पुर्ण उतरत नसेल तर त्याला विज्ञान म्हणता येणार नाही. काय म्हणायचे ते तुम्ही ठरवा पण विज्ञान दुरान्वयेही म्हणू नका.

reproducible results - तुम्ही आज केलेला प्रयोग आणि त्याचे मिळालेले परिणाम (results) हे तुम्हाला स्वतःलाच पुन्हा पुन्हा पडताळुन बघता यायला हवेत आणि प्रत्येक वेळी तुम्हाला तेच परिणाम दिसायला हवेत.

verifiable results - तुम्ही केलेल्या प्रयोगाचे जसेच्या तसे अनुकरण दुसर्‍या व्यक्तीने केले तर त्या व्यक्तीलाही तेच परिणाम दिसायला हवेत. (experimental method बदल न करता वापरली तर) वैज्ञानिक प्रयोगात मिळणारे परिणाम हे व्यक्तीसापेक्ष असतात.

A statement is considered nonscientific if no one can think of a test to falsify it.
A statement can be said to be scientific if someone can state a method by which it could be disproved. Science deals only with statements that can be disproved.

उदय,

तुम्ही उद्धृत केलेलं हे विधान रोचक आहे.

>> A statement is considered nonscientific if no one can think of a test to falsify it.

मी घरी दूरनियंत्रक (=रिमोट कंट्रोल) घेऊन खुर्चीत बसलोय आणि समोर तिपाईवर ठेवलेल्या दूरपश्यकाचं (=टीव्ही) च्यानेल बदलतोय. मला सांगा की मी आणि दूरपश्यक यांच्या मध्ये काही माध्यम आहे का? माझ्या नियंत्रकावरील अतिरक्त दिवा (इन्फ्रारेड बल्ब) बनवला गेलाय तो माध्यम आहे असं गृहीत धरून. याउलट दूरपश्यकावरील संवेदक (=सेन्सर) आकळण्यासाठी माध्यमाची आवश्यकता भासत नाही.

'माध्यम आहे' आणि 'माध्यम नाही' ही दोन्ही विधाने असत्यीकृत करता येत नाहीत. मग माध्यमाच्या अस्तित्वाविषयी कुठलंही विधान केलेलं अशास्त्रीय ठरावं, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

'माध्यम आहे' आणि 'माध्यम नाही' ही दोन्ही विधाने असत्यीकृत करता येत नाहीत. मग माध्यमाच्या अस्तित्वाविषयी कुठलंही विधान केलेलं अशास्त्रीय ठरावं, नाहीका?
-------- `माध्यम आहे` अथवा `माध्यम नाही आहे` असे कुठलेही विधान तुम्ही केले तरी ते विधान वैज्ञानिक असेल. कारण ?

तर त्या विधानाच्या सत्यतेची पडताळणी तुम्हाला तपासता येते. सत्यता, खरे-खोटेपणा याची पडताळणी करुन पहाण्यासाठी प्रयोग (experiment) सुचवता येतो... experiment मधुन जे उत्तर तुम्हाला मिळेल तेच उत्तर अजुन तिसर्‍या कुणालाही मिळेल. येथे प्रयोग कोण करतो आहे हे महत्वाचे नाही आहे.

The criterion by which we decide whether a statement is in the realm of science is: Whether it is possible, at least in principle, to disprove the statement.

उदय,

>> सत्यता, खरे-खोटेपणा याची पडताळणी करुन पहाण्यासाठी प्रयोग (experiment) सुचवता येतो

तुम्हाला इथे बहुधा चाचणीयत्व (=testability) अभिप्रेत असावी. अणुगर्भाच्या आत क्वार्क असतात. एका क्वार्कवर १/३ विद्युत्कणभार (= one third electronic charge) असतो हे सिद्ध करण्याचा एकही प्रयोग अस्तित्वात नाही. मग स्टॅडर्ड मॉडेल काल्पनिक धरावं का?

आ.न.,
-गा.पै.

<एका क्वार्कवर १/३ विद्युत्कणभार (= one third electronic charge) असतो हे सिद्ध करण्याचा एकही प्रयोग अस्तित्वात नाही>

http://arxiv.org/pdf/1307.4568v2.pdf

हा सन्दर्भ उपलब्द आहे. त्यात क्रॉस रेफ (४-५) पण बघा.

भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिक शास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे.
>>>+११११

उदय,

स्टँडर्ड मॉडेल गृहीत धरून क्वार्कचा विद्द्युद्भार काढलेला आहे. यात क्वार्क सुटा (=आयसोलेट) केलेला नाही. त्यामुळे हा प्रयोग conjectural knowledge या प्रकारचा वाटतो आहे.

मूळ मुद्दा चाचणीयत्वाचा आहे. अधिक माहिती : http://en.wikipedia.org/wiki/Falsifiability#Criticisms

तर conjectural knowledge च्या बेसिस वर चाचणी करावी का, असा प्रश्न आहे. माझी त्याला ना नाही. योगिक अदमास (conjectures) यांचीही चाचणी करून बघायला काय हरकत आहे? ज्ञानसंपादनाची प्रक्रिया फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तूंपुरतीच मर्यादित का करायची?

आ.न.,
-गा.पै.

"जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात.
----- मी कुठल्याही अर्थाने मोठा शास्त्रज्ञ नव्हतो पण काही काळ शास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे... वरिल विधान वाचताना मिठाचा खडा लागला आणि वाचकान्चा गैरसमज व्हायला नको म्हणुन थोडा खुलासा करतो आहे."
गामांनी सुयोग्य प्रतिसाद दिला आहे.
प्रा अद्वयानंद गळतगे सरांच्या एका वाक्या सरशी विचारांना प्रेरणा मिळाली. मित्रा आपण मोठे शास्त्रज्ञ नाही असे म्हणता तर मग गळतगे सरांच्या च्या लेखनाचा पूर्ण आस्वाद घ्यावा ही विनंती.

<<स्टँडर्ड मॉडेल गृहीत धरून क्वार्कचा विद्द्युद्भार काढलेला आहे. यात क्वार्क सुटा (=आयसोलेट) केलेला नाही. त्यामुळे हा प्रयोग conjectural knowledge या प्रकारचा वाटतो आहे. >>
------ सन्शोधनाची प्रक्रिया सुरु आहे... क्वार्क अजुन तरी सुटे करण्यात यश आलेले नाही, ते तसे करता येणार नाही याबद्दल अनेक अनेक शोध निबन्ध तुम्हाला मिळतील.

<<ज्ञानसंपादनाची प्रक्रिया फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तूंपुरतीच मर्यादित का करायची?>>
---- अशी मर्यादा विज्ञानात अजिबातच नाही आहे... परिणाम डोळ्यान्नी दिसायलाच हवेत असे नाही. अणुगर्भामधे असणारे प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, किवा Electrons यान्चे अस्तित्व डोळ्यान्नी दिसत नाही पण विज्ञानाने, तन्त्राने ते सिद्ध केले आहे, करता येते.

थोर शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफर्ड यान्नी अल्फा किरणान्च्या सहाय्याने अणु गर्भाचे रहस्य शोधले... तो जगप्रसिद्ध प्रयोग आज कुणाही व्यक्तीने, कुठल्याही स्थळी केला तर रुदरफर्ड यान्ना जे परिणाम (results) दिसले होते तेच परिणाम प्रयोग करणार्‍या व्यक्तीला मिळतील. विज्ञानात reproducibility आणि verifiability महत्वाची आहे.

क्वार्क पुर्णपणे सुटे करता येणारही नाही (असे आजचे ज्ञान सान्गते) किव्वा भविष्यात सुटे करण्यात यश मिळेलही... निकाल काय मिळायला हवेत यावर रुदरफर्ड (शास्त्रज्ञान्चे) यान्चे नियन्त्रण नसते... एक गोष्ट पुन्हा नमुद कराविशी वाटते, निकाल जे काही मिळतील ते reproducible आणि verifiable असतील तरच त्याला विज्ञान स्विकारेल.

मला विज्ञानाच्या मर्यादेत काय बसते त्यावरच भाष्य करायचे आहे. Happy

<<जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात.>>
---- असे मोठे मोठे शास्त्रज्ञ सोडा पण साधा १० च्या विद्यार्थ्याला पण हे मान्य होणार नाही. मानवी डोळा एक detector आहे आणि त्या detector च्या काही मर्यादा आहेत आणि हे १० वीचा विद्यार्थी पण जाणतो. protons, neutrons आणि त्यान्चे घटक तसेच electrons तुम्हाला डोळ्यान्नी दिसत नाही (कारण मानवी डोळ्याच्या मर्यादा आहेत) पण त्यान्चे अस्तित्व वैज्ञानिक प्रयोगान्नी अनेकदा सिद्ध केले आहे, सर्वमान्य आहे.

म्हणुन वरचे विधान चुकीचे आणि दिशाभुल करणारे आहे.

मित्रांनो, आपण गळतगे सरांच्या एका वाक्या सरशी अडून आहात. कदाचित आपल्याला त्यातील लेखनाबद्दल अधिक वाचायची इच्छा नसावी. त्यांच्या लेखनाची तोंड ओळख व्हावी हा उद्देश आहे.