माज़ा अस्तित्वा तंजावरी मराठी बोली भाषेचा पॉडकास्ट

Submitted by शशिकांत ओक on 10 June, 2014 - 03:14

Capture.JPG

मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे.
आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत. जगभरात पसरलेल्या तंजावरच्या मराठी भाषी बांधवांना एकत्र करून या बोलीभाषेसाठी एक शब्दकोश करायचे काम चालू असल्याचे भाग ७ मधे श्री. साई जनार्दन यांच्या भाषणातून कळते. भाग 15 मधे पुढील भागातील झलक सांगतात.

हैयो हैयैयोंनी या स्थळाचा परिचय करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.
या शिवाय अन्य भागांचा परिचय मिसळपाव सदस्यांनी फावल्या वेळी ऐकून आपापल्या मित्रमंडळींना कळवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ही विनंती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहिती. धन्यवाद Happy

<जगभरात पसरलेल्या तंजावरच्या मराठी भाषी बांधवांना एकत्र करून या बोलीभाषेसाठी एक शब्दकोश करायचे काम चालू असल्याचे भाग ७ मधे श्री. साई जनार्दन यांच्या भाषणातून कळते>

असे दोन शब्दकोश अगोदरच अस्तित्वात आहेत.
एक - मराठी भाषेचा तंजावरी कोश - संपा. शं. गो. तुळपुळे, व्हीनस प्रकाशन, पुणे, १९७३.
दुसर्‍याचं नाव आणि संपादक विसरलो.

चिनुक्स,
माहिती बद्दल धन्यवाद. आपण ही माहिती जयाराव यांच्याकडे नोंदवली तर त्यांनाही आनंद होईल.