कुण्या आकाशगंगेची झळाळी का जगावी मी ?

Submitted by सुशांत खुरसाले on 9 June, 2014 - 13:11

पुन्हा चेकाळलो होतो नजर बघण्या दिवाणी मी
पुन्हा धिक्कारलो गेलो तुझा कोणीच नाही मी

स्वतःचा गंधही नाही,स्वतःचे तेजही नाही
तुझ्या आशेवरी श्रुंगारलेला परप्रकाशी मी

पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी

मला हे सांग की तुझिया मनाचे दार का उघडू ?
स्वतःच्याही मनाची हरवुनी बसलोय चावी मी

मला जगण्यास पुरतो जर चिमुकला दूरचा तारा
कुण्या आकाशगंगेची झळाळी का जगावी मी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी

मला हे सांग की तुझिया मनाचे दार का उघडू ?
स्वतःच्याही मनाची हरवुनी बसलोय चावी मी

मला जगण्यास पुरतो जर चिमुकला दूरचा तारा
कुण्या आकाशगंगेची झळाळी का जगावी मी ?<<< वा वा

पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी

>> व्व्व्वा!!!!
त्यातही पहिली ओळ तर कमाल आवडली...

पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी

मला हे सांग की तुझिया मनाचे दार का उघडू ?
स्वतःच्याही मनाची हरवुनी बसलोय चावी मी >>>>> मस्तय.