Submitted by सुशांत खुरसाले on 9 June, 2014 - 13:11
पुन्हा चेकाळलो होतो नजर बघण्या दिवाणी मी
पुन्हा धिक्कारलो गेलो तुझा कोणीच नाही मी
स्वतःचा गंधही नाही,स्वतःचे तेजही नाही
तुझ्या आशेवरी श्रुंगारलेला परप्रकाशी मी
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी
मला हे सांग की तुझिया मनाचे दार का उघडू ?
स्वतःच्याही मनाची हरवुनी बसलोय चावी मी
मला जगण्यास पुरतो जर चिमुकला दूरचा तारा
कुण्या आकाशगंगेची झळाळी का जगावी मी ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी
मला हे सांग की तुझिया मनाचे दार का उघडू ?
स्वतःच्याही मनाची हरवुनी बसलोय चावी मी
मला जगण्यास पुरतो जर चिमुकला दूरचा तारा
कुण्या आकाशगंगेची झळाळी का जगावी मी ?<<< वा वा
संपूर्ण गझल आवडली धन्यवाद
संपूर्ण गझल आवडली
धन्यवाद
धन्यवाद बेफिकीरजी , जयदीप .
धन्यवाद बेफिकीरजी , जयदीप .
छान ! आवडली !!
छान ! आवडली !!
निनावी सर्वात छान वाटला.
निनावी सर्वात छान वाटला.
सुरेख. निनावी व शेवटचा विशेष
सुरेख. निनावी व शेवटचा विशेष आवडले.
भाऊ , उकाका , ह.बा. ....अनेक
भाऊ , उकाका , ह.बा. ....अनेक आभार .
लोभ असावा .
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी
>> व्व्व्वा!!!!
त्यातही पहिली ओळ तर कमाल आवडली...
मतला कमी आवडला बाकीचे चार खूप
मतला कमी आवडला
बाकीचे चार खूप आवडले
सुंदर, आवडली.
सुंदर, आवडली.
आनंदयात्रीजी , वैवकुदा ,
आनंदयात्रीजी , वैवकुदा , अमेयजी ...thanx a lot ..
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी
मला हे सांग की तुझिया मनाचे दार का उघडू ?
स्वतःच्याही मनाची हरवुनी बसलोय चावी मी >>>>> मस्तय.
धन्स मुटेसर ..
धन्स मुटेसर ..:)
क्या बात है, सुशांत !! सुन्दर
क्या बात है, सुशांत !!
सुन्दर गझल !
छान गझल. चावी हा शेर खूप
छान गझल.
चावी हा शेर खूप आवडला.
धन्यवाद मंडळी .
धन्यवाद मंडळी .