खरंतर एप्रिल-मे महिन्यात सह्याद्रीतील भटकंती थोडी कमीच होते. पण यावर्षी मात्र मे महिन्याच्या सुरूवातीला सांदण दरी आणि शेवटी मायबोलीकर इंद्रधनुष्य, जिवेश, संदिप आणि नरेश यांच्यासोबत रायलिंग पठार अशी सोप्पी भटकंती झाली.
मुंबई-पुण्याहुन नसरापूर मार्गे वेल्हाच्या दिशेने राजगड, तोरणा यांना नमस्कार करत भट्टी मार्गे पासली या गावातुन केळद घाटातुन केळद खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूला मोहरी या गावाकडे जाणारा रस्ता (?) आहे (याच रस्त्यावर एके ठिकाणी राजगड-तोरण्याचा संपूर्ण आकार नजरेस पडतो). रायलिंग पठारावर पोहचण्यासाठी आधी मोहरी गाव गाठावे लागते. मोहरी गावातून साधारण पाऊण एक तासाची वाटचाल केल्यानंतर आपण रायलिंग पठारावर पोहचतो. येथुन देखणा लिंगाणा आणि राजबिंड्या रायगडाचे दर्शन होते. घाट आणि कोकण यांना जोडणार्या सिंगापूर नाळ आणि बोराट्याची नाळेचा रस्ता देखील इथुनच आहे. लिंगाणा सर करणे ये अपने बस कि बात नही, सो रायलिंग पठारावरूनच यांचे रांगडे सौंदर्य टिपले. येथुन दिसणारा सह्याद्रीचा नजारा केवळ वर्णनातीत. समोर उभा असलेला देखणा लिंगाणा, त्याच्या मागे दुर्गदुर्गेश्वर रायगड, टकमक टोक इ., लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेले पाने अन् दापोली ही छोटीशी गावं, कोकणदिवा आणि कावळय़ा-बावळय़ाची खिंड कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नव्हते.
वृत्तांतात जास्त काहि लिहिण्यासारखे नाही, पण एक अनुभव मात्र शेअर करतो:
काजळ काळी गर्द रात अन् कंप कंप अंगात
सळसळणार्या पानांनाही रातकिड्याची साथ...
दोन-तीन दिवसांपूर्वी अमावस्या होऊन गेल्याने चांगलाच अंधार दाटलेला. साधारण नऊच्या दरम्यान गावातल्याच एका वाटाड्याला घेऊन आम्ही निघालो. वाट गर्द रानातून जात होती, त्यात तृतियेच्या चंद्रकोरीचा कितीसा तो उजेड? विजेर्यांच्या प्रकाशात चालत होतो. सोबत फक्त पानांची सळसळ आणि रातकिड्यांची किरकिर.घाटमाथ्यावर असल्याने हवेत किंचितसा गारवा होता पण सह्याद्रीतील चढउतारात आणि मे महिन्यामुळे अंगात घामाच्या धारा लागलेल्या. पुढे पुढे वाट अधिकच दाट झाडीतुन जाऊ लागली आणि अंधारातुन चालताना अचानक एका वळणावर......
एका झाडावर अगणित काजवे चमकताना दिसले. संपूर्ण झाड काजव्यांनी भरलेलं होतं. एकाच वेळी सगळ्या काजव्यांचे स्विच ऑन ऑफ होत होते. झाडासोबतच समोरची दरीही हजारो काजव्यांनी लखलखत होती. निसर्गाचा तो अद्भुत खेळ पाहताना भान हरपले. आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळं पहात होतो, अनुभवत होतो. वर नभांगणात लाखो तारका तर इथे जमिनीवर हजारो काजवे लुकलुकतं होते. आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी हि "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरूवातीला हा "काजवा महोत्सव" भरतो. हा सारा खेळ कॅमेर्यात साठवता आला नाही पण मनात मात्र कायमचा जपून ठेवला आहे.
ये रात ये खामोशी, ये ख्व़ाब से नज़ारें
जुगनू हैं या जमींपर उतरे हुए हैं तारें
Believe me कधीही विसरता येणार नाही असे दृष्य होते.
प्रचि ०१
वेल्ह्यामार्गे कुंबळे या गावी जाणारी "स्वारगेट-कुंबळे" एस्टी
(गेल्यावर्षीच्या मढेघाट सह्यमेळाव्यातील गोप्या घाटमार्गे केळदला येणार्या मायबोलीकरांना हि यष्टी नक्कीच आठवत असणार. )
प्रचि ०२गरूडाचं घरटं - किल्ले तोरणा
प्रचि ०३तोरणा किल्ल्यावरची बुधला माची
प्रचि ०४किल्ले तोरणा आणि बुधला माची
प्रचि ०५तोरणा-राजगड
प्रचि ०६मोहरीगावाच्या दिशेने
प्रचि ०७संधीप्रकाशातील लिंगाणा आणि किल्ले रायगडावरील टकमक टोक
प्रचि ०८
प्रचि ०९
मुंबईहुन साथ देणारी आमची स्विफ्टुकली मोहरी गावचा उंबरठा ओलांडण्यास राजी नव्हती. पायापडुन, मनधरणी करूनही ती पुढे येत नव्हती. उलट एकाच जागी उभी राहुन चाक गरागरा फिरवत आपला राग व्यक्त करत होती. सो स्विफ्टुकलीला तेथेच एका सुरक्षित जागी उभी करून १० मिनिटे चालत मोहरी गावात पोहचलो.
रागावलेली स्विफ्टुकली आणि मनधरणी करणारे आम्ही
प्रचि १०SN=Singapoor Naal & RP = Railing Pathar
प्रचि ११रायलिंग पठार आणि लिंगाणा
प्रचि १२
प्रचि १३आमचा टेन्ट
प्रचि १४आकाशगंगा आणि टेन्ट
प्रचि १५
प्रचि १६आकाशगंगा
प्रचि १७
प्रचि १७ (अ)
प्रचि १७ (ब)
प्रचि १७ (क)
प्रचि १७ (ड)
(प्रचि सौजन्यः जिवेश म्हात्रे)
सूर्योदय
प्रचि १८
प्रचि १९विविध अँगलने लिंगाणा
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७लिंगाण्याच्या पोटातील गुहा
प्रचि २८
लिंगाण्याचा माथा. या फोटोवरून कल्पना येईल कि लिंगाण्याच्या माथा गाठणे कुण्या येर्यागबाळ्याचे काम नव्हे. आशुचॅम्प तुला कडक सलाम रे!!
प्रचि २९कोकणदिवा
प्रचि ३०आमचा टेन्ट
प्रचि ३१आणि हा शेजार्यांचा टेन्ट
प्रचि ३२
मीलों के हैं फ़ासले तुमसे न जाने क्यूँ
अनजाने हैं सिलसिले तुमसे न जाने क्यूँ
सपने हैं पलकों तले तुमसे न जाने क्यूँ
कैसे बतायें क्यूँ तुझको चाहें, यारा बता ना पाएँ....
प्रचि ३३
(रायलिंग पठारासंबंधित अधिक माहिती, नाश्ता जेवणाची सोय "सह्याद्री गुगल" अर्थात मायबोलीकर "सह्याद्रीमित्र" म्हणजेच ओंकार ओक याने करून दिली. याला कधीही, कुठेही आणि सह्याद्रीसंबंधित कुठलीही माहिती विचारा न कंटाळता सांगतो. अगदी किती किमी अंतरावर कुठले गाव आहे, त्याच्यानंतर किती मीटरवर कुठला टर्न आहे, गावचा सरपंच कोण आहे, त्याचा मोबाईल नंबर सगळं ह्याला तोंडपाठ. म्हणुन सह्याद्रीत कुठे भटकायला जायचे असले तर गूगलवर सर्च करत बसण्यापेक्षा सरळ ओंकारला एक फोन करतो. सगळी माहिती क्षणात मिळते.
मनापासुन धन्यवाद रे ओंकार).
(तटि: प्रचि तितकेसे खास आलेले नाही. )
जाम भारी.......... आकाशगंगा
जाम भारी.......... आकाशगंगा
फोटोज चांगले आहेत जिप्सी.
फोटोज चांगले आहेत जिप्सी. रायलिंग पठारावरूनच ही वाट 'बोचेघोळ नाळी'तून रायगडावर जाते. मस्त आहे एकदम.
तंबु, आकाशगंगा सगळं पाहुन
तंबु, आकाशगंगा सगळं पाहुन जळफळाट झाला रे!!
आशुचॅम्पला खरच सलाम!! लिंगाण्याचे फोटो धडकी भरवणारे!
स्विफ्टुकली...
मस्त फोटो... ! सिंगापूर ला
मस्त फोटो... !
सिंगापूर ला नाही गेलास ?
लै भारी
लै भारी
अप्रतिम रे..
अप्रतिम रे..
मस्त फोटोज आणि वृतांत
मस्त फोटोज आणि वृतांत
Khup Sundar
Khup Sundar
तटि लिंगाणाच्या रुद्रावतार
तटि
लिंगाणाच्या रुद्रावतार

रात्रीचे फोटो लै भारी
रात्रीचे फोटो लै भारी आलेत.
पेशन्सच काम आहे.
मस्त फोटोज आणि
मस्त फोटोज आणि वृतांत
आकाशगंगा सही आहे.
प्रचि १५ २७ आणि ३३ अप्रतिम
प्रचि १५ २७ आणि ३३ अप्रतिम !!
जिप्सी जियो !
आणि लिंगाणा पाहुन खरच मनात धडकी भरत आहे ! आशुच्यॅम्पला खरचं कडक सलाम !!
ग्रेट्ट्ट्ट्ट्ट फोटोज...
ग्रेट्ट्ट्ट्ट्ट फोटोज...
फोटो आणि वृतांत दोन्ही मस्त.
फोटो आणि वृतांत दोन्ही मस्त.
फोटो आणि वृतांत दोन्ही मस्त.
फोटो आणि वृतांत दोन्ही मस्त. >>>+१००....
म्हणुन सह्याद्रीत कुठे भटकायला जायचे असले तर गूगलवर सर्च करत बसण्यापेक्षा सरळ ओंकारला एक फोन करतो. सगळी माहिती क्षणात मिळते.>>>>> हे ओंकारपंत नारदासारखे फक्त "सह्याद्रीभ्रमण" करत असतात का सतत ?? एकंदरीत पंत हे भारीच प्रकरण दिसते आहे ....
पंतांना शिरसाष्टांग ____/\____
लय भारी.. रायगडाचा झूम फोटो
लय भारी..
रायगडाचा झूम फोटो असेल टाक ना ...
का त्या साठी वेगळा धागा काढणार आहेस,
वेगळा धागा असेल मग काहीच हरकत नहीं.
मस्तच!!!!!!!!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!!!!!!!!
इन्द्रा, तुझ्या फोटोतला
इन्द्रा, तुझ्या फोटोतला अॅन्गल जबरदस्त आहे.
मस्त रे !
मस्त रे !
मस्त फोटो....
मस्त फोटो....
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
रायलिंग पठारावरूनच ही वाट 'बोचेघोळ नाळी'तून रायगडावर जाते.>>>>हो हा आणि निसणीची वाट या रूटबद्दल ऐकलं आहे.
सिंगापूर ला नाही गेलास ?>>>नाही दिनेशदा, सिंगापूर फाट्याहुन मोहरीला गेलो.
तटि::हाहा:>>>> हो रे इंद्रा, फोटो तितकेसे खास वाटत नाहीए मला.
लिंगाणाच्या रुद्रावतार>>>>>एकदम बेस्ट.
रायगडाचा झूम फोटो असेल टाक ना ...>>>>> सकाळी वातावरण तितकेसे क्लियर नसल्यामुले झूम फोटो नाही काढता आला.
त्या रायलिंग पठाराची
त्या रायलिंग पठाराची रायगडाच्या दिशेने कोसळणारी सपाट भिंत खुणावतेय. पाहूया कधी योग येतोय.
प्रची सुंदर आहेत.
प्रची ३२
नुसताच पाहत का उभा आहेस. जटाधारी लिंगाण्याला मुजरा कर! :P:-P:
सिंगापुरचा व्हीसा नव्हता का?
सिंगापुरचा व्हीसा नव्हता का?
Star Trail Photography चा चांगला चान्स दवडलेला दिसत आहेत.
इंद्रा थरारक फोटो.
जटाधारी लिंगाणा>>>> मस्तच
जटाधारी लिंगाणा>>>> मस्तच
सिंगापुरचा व्हीसा नव्हता का? फिदीफिदी>>>>>केपी
Star Trail Photography चा चांगला चान्स दवडलेला दिसत आहेत.>>>>>>स्टार ट्रेलचा जिवेशकडे मस्त फोटो आहे. मी ट्रायपॉड घेऊन जायला विसरलो होतो.
मस्त रे जिप्सी. स्टार ट्रेलचा
मस्त रे जिप्सी.
स्टार ट्रेलचा जिवेशकडे मस्त फोटो आहे. >>> म्हणजे नक्की काय? हा फोटो काल होता का रे प्रदर्शनात? असला तर तुला काय म्हणायचे ते कळाले.
हा फोटो काल होता का रे
हा फोटो काल होता का रे प्रदर्शनात? असला तर तुला काय म्हणायचे ते कळाले.>>>>हो मोनाली. स्टार ट्रेलचा फोटो होता प्रदर्शनात.
जबराट आहेत प्रचि, लिंगाणा तर
जबराट आहेत प्रचि, लिंगाणा तर __/|\__
जबरदस्त ! जर ती तळटीप गंमतीत
जबरदस्त !
जर ती तळटीप गंमतीत नसेल तर यापेक्षा खास प्रचिंची लिंक मिळेल का?
आकाशगंगा आणि टेंट बघताना मी इथे ऑफिसमध्ये झक मारतोय असे वाटून गेले.
लिंगाण्याला तर पुर्ण प्रदक्षिणा घालून टिपलाय वाटते. त्या गुहेबद्दल उत्सुकता लागून राहिलीय. आशूचँप त्यात डोकावला होता का..
बाकी त्याच्या माथ्यावर पोहोचणार्याला खरेच कडक सलाम !
अप्रतिम .................
अप्रतिम .................
काजव्यांचा नजारा... भारीच
काजव्यांचा नजारा... भारीच की. काही गोष्टी कॅमेर्यात साठवण्याची धडपड करण्यात वेळ वाया घालवू नये अश्याच असतात.
इंद्रा, तू टाकलेला फोटू बघूनशिनी धडकी भर्ली!
Pages