ब्रेड रोल

Submitted by टीना on 7 June, 2014 - 11:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ब्रेड रोल

लागणारे जिन्नस :

Sandwich ब्रेड ,
आलू / बटाटा (उकडून) - १/२ किलो ,
कढीपत्त्याची पाने ,
१ कांदा बारीक कापलेला ,
हिरवी मिरची बारीक कापलेली - ३ ,
मोहरी - १/२ छोटा चमचा ,
जिर - १/२ छोटा चमचा ,
तिखट - १/२ छोटा चमचा ,
हळद - १/४ छोटा चमचा ,
मीठ - चवीनुसार
तेल - फोडणी व fry करण्यासाठी

क्रमवार पाककृती: 

कृती :

उकडलेले आलू कुस्करून त्याला २ मोठे चमचे तेलात सर्व जिन्नस (ब्रेड सोडून ) फोडणी द्यावे .

ब्रेड च्या बाहेरील कडा कापून बाजूला काढाव्या . एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात त्या ब्रेड ला बुडवावे . दोन्ही तळव्यात घेऊन दाबून त्यातील पाणी काढून टाकावे फोडणी दिलेल्या आलूच्या भाजीचे लांबट आकाराचे गोळे करून त्याला ब्रेडच्या मध्यभागी ठेवून ती ब्रेड त्यावर wrap करावी / गुंडाळावी (शब्दांसाठी चू भू द्या घ्या ). Pan मधे २ चमचे तेल गरम करून लालसर रंग येईपर्यंत Shallow Fry करावे . टोमाटो सॉस सोबत सर्व्ह करावे .

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

माहितीचा स्रोत:
आमच्या मातोश्री

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DSC00633.JPG

पोस्ट करताना मला फोटो टाकण्याकरिता option दिसले नाही … म्हणून फोटो मागाहून टाकत आहे … सॉरी .

टीना, फोटो पाहून तो.पा.सु. Happy
फोटोच्या प्रतिसादात तुला जी लिंक दिसत आहे ती कॉपी कर आणि तुझ्या लेखनात तुला हवी तिथे पेस्ट कर.

मस्त Happy कृती आणि फोटो पण. कमी वेळात कमी कष्टात सगळ्यांना आवडणारा पदार्थ.
मी डीप फ्राय करते. आता शॅलो फ्राय करेन. चाटून पुसून साफ होतात दर वेळेस.

बटाट्या ऐवजी इतर भाज्याही चालतील ना स्टफिंगला?>>>नक्कीच, खिमा घातला तर अफलातुन लागतात. व्हेज हवं असल्यास पनीरचे स्टफिंगही मस्त

मस्त!

दक्षिणा, बटाट्या ऐवजी स्वीट कॉर्नची भुर्जी (तेल जिर्‍याच्या फोडणीत ठेचा/ हिरवी मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट, स्वीट कॉर्न, गरम मसाला, मीठ इत्यादी घालून) किंवा पनीर भुर्जी घालूनही हे रोल्स छान लागतील.

स्वीट कॉर्न - सिमला मिरचीची भाजी किंवा चायनीज स्टाईल कोबी, गाजर, श्रावण घेवडा उभे चिरून केलेले स्टर फ्राय असते त्याचे स्टफिंग वापरूनही मस्त लागतो हा प्रकार.

बाकी घालून पन चविष्ट लागतील …

Saee >>
shallow fry केल्यानं कमी तेलात काम फत्ते होत …

अरुंधती कुलकर्णी >>
कल्पना छान आहे … करून बघेल मी पन … Happy