कैरीचे लोणचे - जरा वेगळा प्रकार

Submitted by सुभाषिणी on 6 June, 2014 - 14:05

कैरीचे लोणचे.
साहीत्य - कैरी - एक , गुळ - कैरीचा गर निघेल तेवढा., कैरी लोणचे मसाला - लहान एक चमचा (मसल्याच्या ड्ब्यातील चमचा.) तिखट - एक ल. च्मचा. मिठ - चवीप्रमाणे.
क्रुती - पन्ह्यासाठी उकदतो तशी कैरी उकडुन घ्यावी. थंड झाल्यावर गर काढुन घ्यावा. तेवढाच गुळ चिरुन कैरीचा गर आणि गुळ एकत्र शिजवावा. साधारण मधाइतका घट्ट झाला की लाल तिखट मीठ लोणच्याचा मसाला घालुन छान हलवावे. लगेच गैस बंद करावा.थं ड झाल्यावर बर्णीत भरावा. पुण्याच्या हवेला बहेरही चांगला राहतो..(फ्रिजमधे न ठेवता.
स्त्रोत - मैत्रीण
गुळाचे प्रमाण आवदीनुसार कमी जास्त केले तरी चलते.
लोणचे मसाला धातल्यावर फार वेल गीसवर ठेवु नये. लोणचे कडु होन्याची शक्यता असते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast

आश्चर्य ! मी हे कालच याच पद्धतीने केलं होतं. उकडल्यामुळे अन गरच घेतल्याने शिवाय गुळामुळे कैरीचा जाचक आंबटपणा दूर झाला, खूप सोपं आणि मस्त चवीचं. मी वरून पुन्हा थोडी हिंग-जिरे-बेडेकर लोणच्याचा तयार मसाला याची फोडणीही थंड करून घालून कालवली.
''जो बात तुझमें हैं तेरे तस्वीरमें नही '' हे गाणं गात फोटोही आयता काढला होताच,म्हणून देतेच इथे अंकू Happy
 कैरीचे लोणचे.jpg

होय दक्षिणा, सुभाषिणीचे आभार हे इथे टाकल्याबद्दल, कमी त्रासात ज्यांना जेवण रुचकर बनवावंसं वाटतं त्या सर्वांसाठी आहे ही पाकृ Happy

भारती छान वाटले. आणि आभारचे म्हणाल तर तुमचे मानायला हवेत. फोटो मुळे पटकन आयडीया येते. तर काय माझे लेखन आणि तुमचा फोटो, मस्त जमली पाकक्रुती.