जाहले कैसे पराभव, शोध आता कारणे!

Submitted by profspd on 2 June, 2014 - 12:53

जाहले कैसे पराभव, शोध आता कारणे!
शीक थोडेसे तरी सत्यास तू स्वीकारणे!!

एकमेकांनाच ते ओवाळती, नावाजती.....
पाहिले जवळून मी त्यांचे अरे, सत्कारणे!

त्रस्त ते झाले भयाने संपण्याच्या केवढे....
झुंडशाही, दांडगाई, चालले धिक्कारणे!

स्वप्न दाखवलेस तू मजला बिलोरी देखणे.....
तूच शिकवावे अता, ते स्वप्नही साकारणे!

मी भिडस्तासारखा जात्याच आहे जन्मलो.....
धैर्य दे थोडे मला अन् शिकव मज नाकारणे!

सांडतो आहे बहर माझ्या सुरांचा चौकडे.....
या मुक्या, बहि-यांमधे माझे सुरू झंकारणे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाहले कैसे पराभव, शोध आता कारणे!
शीक थोडेसे तरी सत्यास तू स्वीकारणे!!<<<

प्राचार्य साहेब,

ता कारणे आणि स्वीकारणे आल्यावर अलामत भंगली ना? पुढचे काफिये कसे काय बसवायचे? नाही, भटसाहेबांचा परीसस्पर्श तुमच्या गझलेला झाला आहे म्हणून विचारतोय! माफी असावी.

होय इथे अलामत भंगते आहे माझ्या लक्षात योजतानाच आले पण तरीही लिहिले! लिहावेसे वाटले म्हणून! अनावधानाने हे झाले नाही

अलामत म्हणजे काय ते सांगाल का?
<<<<<<<<<<<<

माझी गझलेबद्दलची माहिती शून्य म्हणावी इतकी आहे. मात्र बेफिकीर यांनी म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतंय कि 'ता' कारणे च्या नंतर 'स्वी' आल्यामुळे ते झालं असावं. ता आले असेल तर गा, धा, यायला हवं होतं असं मला वाटतंय. मात्र तसं काही न मिळाल्यामुळे त्यांनी वाक्याला अर्थपूर्ण करण्यासाठी स्वीकारणे हा शब्द घातला असावा. मात्र तसं केल्याने जर ती गझल होत नसेल तर त्यास गझल म्हणू नये हे योग्य.
... थोडक्यात अलामत म्हणजे असं काही कि जी भंगली कि काहीतरी बिलामत येते हे नक्की. Happy

गंमतीचा भाग वगळता, अभ्यासूंनी योग्य ती माहिती द्यावी.

अ/इ/उ अलामत मतल्यात वापरले तर चालते मग आ/ई/ऊ/अं.....का चालू नये असा एक विचार मनात आला!
काफियातील बदलणारे अक्षर,जे न बदलणा-या अक्षरांच्या आधी येते ते गुरू ठेवून पाहू यात कसे वाटते ते असा विचार आला जेव्हा मतल्याच्या दोन ओळी लिहिल्या तेव्हा! असे चालत नाही हे मला माहीत आहे! पण निव्वळ प्रयोग म्हणून लिहिले! स्वरकाफियांची गझल लिहितात, मग असे लिहिले तर कसे वाटेल हे मला पहायचे होते!

या रचेनेला गझल न म्हणता गझलसदृश रचना असे मी म्हणेन!
अलामतीच्या स्वरातील गोडवा व शेरातील एकंदर दम पाहून मी हे तसेच ठेवले!
...............प्राचार्य सतीश देवपूरकर