"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961
गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते .
अशा या देशात अजित डोवाल सारख्या खमक्या माजी गुप्तहेर अधिकाऱ्याची मोदींचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाल्याच्या बातमीला माध्यमांमध्ये कुठेतरी कोपरयात किंवा मधल्या पानावर जागां मिळाली यात आश्चर्य ते काय ? त्या बातम्यांमध्ये पण डोवाल हे अडवाणी यांचे निकटवर्तीय असून पण मोदी यांनी त्यांची नेमणूक कशी केली असा आश्चर्यमिश्रीत खोचक सुर होता. पण सुदैवाने अजित डोवाल ला प्रसिध्द होण्यापेक्षा त्याचे काम अचूक करण्यात जास्त रस आहे. त्याची दीर्घ कारकीर्द तरी हेच सांगते .
मी डोवाल बद्दल पहिल्यांदा वाचले ते हुसैन झैदी च्या डोंगरी ते दुबई या दाउद इब्राहिम च्या उदयावर लिहिलेल्या अप्रतिम पुस्तकामध्ये . भारतीय गुप्तहेर खात्याने पाकिस्तान मध्ये दडुन बसलेल्या दाउद ला उडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत . पण एकदा ते त्याच्या खुप जवळ पोहोंचले होते . जावेद मियांदाद चा मुलगा आणि दाउद च्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस . छोटा राजन या दाउद च्या प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणी करून हा बेत आखण्यात आला होता . या टोळीचे दोन उत्कृष्ट नेमबाज फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा हे दुबई (जिथे विवाह सोहळा पार पडणार होता ) ला पोहोंचले पण होते.सर्व तपशील ठरवला होता . अगदी बारीक सारीक गोष्टी पण पक्क्या झाल्या होत्या . म्हणजे अगदी हे नेमबाज कुठे उभे राहणार आणि गोळ्या कधी झाडणार इथ्पर्यन्त. पण ……। कुठेतरी माशी शिंकली आणि अंतर्गत गडबडीमुळे हे योजना ऐन वेळेस बारगळली . हातातोंडाशी आलेला घास गेला. हुसैन झैदी च्या पुस्तकातले हे प्रकरणच (प्रकरण २२- हेरांचे संमेलन ) मुळातुन वाचण्यासारखे आहे. तर हे सगळे operation अजित डोवाल पार पाडत होता . ह्यानंतर अजित डोवाल या नावाबद्दल कुतूहल तयार झाले नसते तरच नवल ,
कळस म्हणजे हा अजित डोवाल चक्क पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून राहून आला आहे . ते पण काहुटा (पाकिस्तान ची पहिली आण्विक भट्टी जिथे आहे ) अशा ठिकाणी . त्यामुळेच अजित डोवाल ला पाकिस्तान आणि ISI याबद्दलचा तज्ञ म्हणून ओळखले जाते. operation Blustar च्या काही वेळ अगोदर हा पठ्ठ्या वेश बदलुन सुवर्ण मंदिरात जाऊन राहिला होता . कारकीर्दीच्या सुरुवातीलाच याने २० वर्ष खदखदणारा मिझोराम प्रश्न सोडवण्यात सक्रिय वाटा उचलला होता . अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला . गुप्तहेर खात्याबद्दल प्रचंड औदासिन्य असणार्या देशात या योद्ध्याला भारत रत्न किंवा गेला बाजार पद्मश्री मिळणे तर शक्य नाही . पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नेमणूक झाल्याने त्या पदाचा नक्कीच सन्मान झाला आहे . अजित डोवाल चि या पदावर नेमणूक झाल्याने दाउद , सलाउद्दीन आदी लोकांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल . बाकीचे माहित नाही पण राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तहेर खाते या आघाडीवर नक्कीच अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा
नितीनचंद्र, इंदरकुमार गुजराल
नितीनचंद्र,
इंदरकुमार गुजराल नामक माणसाने 'गुजराल धारा' म्हणून एक धोरण राबवले. त्यानुसार पाकिस्तानातील रॉचे जाळे नैतिक कारणास्तव नष्ट करण्यात आले. नरसिंह रावांच्या काळात चीनमधील आपले जाळे असेच नष्ट केले गेले असं म्हणतात.
अधिक माहितीसाठी दोन इंग्रजी दुवे आहेत :
१. http://www.dnaindia.com/india/report-gujral-the-man-behind-the-raw-doctr...
२. http://www.cfr.org/india/raw-indias-external-intelligence-agency/p17707
आ.न.,
-गा.पै.
http://hindi.webdunia.com/ent
http://hindi.webdunia.com/entertainment-film-gossip/%E0%A4%B8%E0%A4%A8%E...
हा घ्या.
बॉलीवुड की टॉप हीरोइन की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम से मुलाकात की खबर ने बॉलीवुड में धमाल मचा दिया है। एक विदेशी मैग्जीन ने लिखा है कि इस बॉलीवुड हीरोइन ने दाऊद से मुलाकात कर उससे अपनी फिल्म में पैसा लगाने को कहा है। यह फिल्म बड़े पैमाने पर हॉलीवुड में बनाई जाएगी। इसमें हॉलीवुड का सुपरस्टार नजर आएगा। अंग्रेजी के साथ-साथ हिंदी में भी यह फिल्म रिलीज होगी। इस एक्ट्रेस ने गुपचुप तरीके से दाऊद से मुलाकात की। उस समय दाऊद का एक करीबी दोस्त भी मौजूद था।
यह बॉलीवुड की टॉप एक्ट्रेसेस में से एक है और इस हीरोइन की पिछली कुछ फिल्मों ने बॉक्स ऑफिस पर सफलता हासिल की है। यह हीरोइन भारत के साथ-साथ विदेश में भी लोकप्रिय है। अब यह लंबी छलांग लगाने के फिराक में हैं। बॉलीवुड के बाद हॉलीवुड पर इसकी नजर है ताकि इस हीरोइन की लोकप्रियता अंतरराष्ट्रीय स्तर तक हो। दिमाग पर जोर लगाएंगे तो इस हीरोइन का नाम आपको मिल जाएगा। इस हीरोइन की पहुंच कितनी तगड़ी है इसका अंदाजा इस बात से ही लगाया जा सकता है कि वह अपनी बात डॉन तक पहुंचाने में कामयाब हो गई, जबकि दाऊद तक पहुंचना अत्यंत ही मुश्किल काम है।
कोण ही? मल्लिका शेरावत ? पण
कोण ही? मल्लिका शेरावत ? पण ती टॉपची हिरॉईन नाहीये.
केके?
केके?
इस हीरोइन की पहुंच कितनी
इस हीरोइन की पहुंच कितनी तगड़ी है इसका अंदाजा इस बात से ही लगाया जा सकता है कि वह अपनी बात डॉन तक पहुंचाने में कामयाब हो गई, जबकि दाऊद तक पहुंचना अत्यंत ही मुश्किल काम है।>>>>
थोडेसे अवांतर: जर भारतीय
थोडेसे अवांतर: जर भारतीय बाह्य-गुप्तहेर खात्याच्या (R&AW) स्थापनेपासून ३० वर्षांच्या कारकिर्दीबद्दल नि:पक्षपाती आणि फर्स्ट हँड माहिती वाचायची असेल तर The Kaoboys of R&AW: Down Memory Lane, लेखक B Raman हे पुस्तक आवर्जून वाचा.
दुर्दैवाने रामन मागल्याच वर्षी कँसरने वारले. जवळपास शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी ब्लॉग व ट्विटरद्वारे जगाशी संपर्क ठेवला. त्यांचे ब्लॉगदेखील अत्यंत वाचनीय. एकेकाळच्या कट्टर इंदिरा गांधी/काँग्रेस समर्थक असलेल्या रामन यांची मोदी निवडून यावेत अशी तीव्र इच्छा होती. शेवटच्या त्यांच्या अत्यंत वेदनादायी अवस्थेतदेखील ते मोदी सरकारने गुप्तहेर/इंटेलिजन्स एजन्सीजमध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत ह्याबद्दल कळकळीने लिहीत होते.
केके? ----- दीपिका प. ....?
केके?
----- दीपिका प. ....?
gossip chya links deun lok
gossip chya links deun lok tyavar navanche andaz bandhat aahet. keval bindokpana. maaybolichaa upyog ashya baseless, sambhram nirman karnarya manoranjanpar goshti pasarvanyasathi hou naye ashi asha.
changlya lekhala anavashyak aani agambhir valan.
धन्यवाद टण्या! तुमची माहीती
धन्यवाद टण्या! तुमची माहीती अजिबात अवांतर नाही.
आ.न.,
-गा.पै.
चमन, तुमच्याशी तत्त्वत: सहमत.
चमन,
तुमच्याशी तत्त्वत: सहमत. मात्र इथे ही बातमी केवळ वावडी (गॉसिप) या सदरातली नाहीये. याचे भारताबर अनर्थकारी परिणाम संभवतात.
आ.न.,
-गा.पै.
चमन.. गॉसिप साठी वेगळे बीबी
चमन.. गॉसिप साठी वेगळे बीबी आहेत. तिथे मी काही लिहित नाही
यास्मिन जोसेफ ला विसरलात काय ?
tumhi je vaachta tasech tumhi
tumhi je vaachta tasech tumhi lihita, bolta aani vaagta asa ek juna vichar aahe.
ek tar webduniya he kahi standard news portal nahiye. sawang patrakarita mhana hava tar. aani tumhi tumhi swatahach varti dileli weblink bagha. kuthlya sadrakhali ti baatmi aaleli aahe. entertainment n gossip.
सुविचाराबद्दल धन्यवाद हो.. !
सुविचाराबद्दल धन्यवाद हो.. ! दोन शब्दात एन आहे ना, मग झालं. त्यात काही सत्य असेल तर पुढे येईलच. संजय दत्त सारखे. आपण वाट बघू.
असो, मूळ विषय पुढे जाऊ द्या.
बावरा मन, धन्यवाद, एक
बावरा मन,
धन्यवाद, एक चांगली बातमी शेअर केल्याबद्दल !!
छान माहिती.
छान माहिती.
सर्वाना धन्यवाद
सर्वाना धन्यवाद
अरे वा.. या माहितीसाठी
अरे वा.. या माहितीसाठी धन्यवाद..!
गा.पै. इंदरकुमार गुजराल नामक
गा.पै.
इंदरकुमार गुजराल नामक माणसाने 'गुजराल धारा' म्हणून एक धोरण राबवले. त्यानुसार पाकिस्तानातील रॉचे जाळे नैतिक कारणास्तव नष्ट करण्यात आले. नरसिंह रावांच्या काळात चीनमधील आपले जाळे असेच नष्ट केले गेले असं म्हणतात.
ही माहिती धक्कादायक आहे. अस म्हणल जात कि पंतप्रधान कोणीही झाल तरी विदेशनितीमध्ये फारस फरक पडत नाही. परराष्ट्रांशी संबंध या विशयात आपले इंदिराजींच्या काळात इस्त्रायलशी चांगले संबंध नव्हते. याचे एकमेव कारं मा. इंदिरा गांधी यांचे यासर अराफात यांच्याशी असलेले मैत्रीपुर्ण संबंध.
मा. नरसिंह्रराव यांच्या काळात इस्त्रायलशी संबंध सुधारले. महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या परराष्ट्र नितीत सुधारणा होत गेली. पण राष्ट्रीय सुरक्षा धोरणात मात्र अक्षम्य हेळसांड होउन हानी झालेली असावी. याच कारण अस्थीर सरकारे असे असावे. नरसिंह रावांच्या काळात चीनमधील आपले जाळे असेच नष्ट केले गेले याचे कारण कम्युनीस्ट पक्षाने पाठींबा देताना ही अट घातली असावी.
अजित डोवाल यांचे काही
अजित डोवाल यांचे काही लेखः
http://www.vifindia.org/author/shri-ajit-doval
नितिनचंद्र , नरसिंह रावांच्या
नितिनचंद्र ,
नरसिंह रावांच्या काळात चीनमधील आपले जाळे असेच नष्ट केले गेले याचे कारण कम्युनीस्ट पक्षाने पाठींबा देताना ही अट घातली असावी.
अश्या अटी घालणारे कम्युनिस्ट पक्षा चे नेते आणी त्या मान्य करणारे काँग्रेसचे नेते दोन्ही धन्य !! नरसिंव्हा रावां कडून अशी राजकीय खेळी अपेक्षीत नव्हती. त्यांनी त्याच वेळेला जर कम्युनिस्ट पक्षाला त्यांची जागा दाखवली असती तर किती बर झाल असत. किमान त्यांनी अश्या अटी घालणार्या नेत्यांच्या संभाषणाच्या
रेकॉर्डींग करुन ठेवले असते तर बरे झाले असते. अर्थात कम्युनिस्ट पक्षाला अश्या अटी घालण्याच कारण ही
उघडच आहे. ह्या पक्षाला सर्व प्रकारचा पाठींबा (अर्थीक ) चीन कडून होत असावा. पुरुलियात शस्त्र विमानातुन
टाकली होती मागे. त्या प्रकरणाचा तपास किती झाला ? त्या मागे कोणाचा हात होता ? कोणाला त्याचा फायदा होणार होता ?
खूप छान लेख.. मला वाटतं, खरा
खूप छान लेख..
मला वाटतं, खरा गुप्तहेर यशस्वी तरच ठरत असावा, जर लोकांना त्याच्याबद्दल कमीत कमी माहिती असेल..
असो,
लेखासाठी खूप शुभेच्छा ..
शेखर - नंद्या, ही अट घातली
शेखर - नंद्या,
ही अट घातली असावी असा माझा अंदाज आहे. खात्री नाही. चीनमधले आपले नेटवर्क नरसिंहरावांच्या काळात उध्वस्थ होण्याचे दुसरे लॉजीकल कारण काय असावे ?
उदा. आणखी एक उदा. नक्षलवाद्यांच्या घटना जेव्हा केंद्रात कम्युनीस्ट यांच्या पाठींब्यावर येते तेव्हा वाढतात. जेव्हा १९८४ पर्यंत केंद्रात काँग्रेसचे सरकार बहुमतात होते तेव्हा नक्षली कारवायांचा मागमुसही नव्हता.
नितीनजी Dynasty and Maoists
नितीनजी
Dynasty and Maoists अशा काहीतरी शीर्षकाचा लेख इंडिअन एक्स्प्रेस मधे वाचला होता. लिंक सापडली तर देतो.
http://online3.esakal.com/New
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4617125832997614888&Se... >मस्तं
वाह ! मस्त धागा .. हा धागा वर
वाह !
मस्त धागा .. हा धागा वर आणला ते उत्तम झाले..
अजित डोवल चांगलाच नाकी नऊ आणणार दिसतय दुश्मनांच्या
म्यानमार हे अतिरेक्यांच्या
म्यानमार हे अतिरेक्यांच्या बाबतीत झीरो टॉलरन्स असलेला देश आहे. आता वेळ पाकिस्थानात घुसण्याची आहे.
पाकिस्थानच्या हे लक्षात आल्यामुळे आम्ही म्यानमार नाही. आमच्या विरुध्द अश्या कारवाईचा विचार करु नका अशी दर्पोक्ती पाकिस्थानचे अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांनी केली आहे. ( संदर्भ दै. सकाळ ११- जुन २०१५ )
आम्हाला बॉर्डर इंटेलिजेंस कोर
आम्हाला बॉर्डर इंटेलिजेंस कोर ची माणसे सतत भेटत असतात आचाट माणसे असतात सिविलियन सारखी वेषभुषा असते , कधी दाढ़ी वाढवून कधी कसे एकदा एक अस्खलित गढ़वाली भाषा बोलणारा केरळी अधिकारी भेटला होता! एकदा आमच्या पोस्ट वर एक माणुस आला होता तो सांगत होता की जेव्हा डोवल सर हे आयबी ला एक वरिष्ठ अधिकारी होते तेव्हा खालिस्तानी दहशतवाद परमोच्च बिंदु वर होता त्या काळी पोस्ट चा कुठला ही बड़ेजाव न करता ते अंडरकवर काम करत बनियान पायजामा घालुन डोक्यावर गमछा घेऊन साइकिल रिक्षा चालवत एका विशिष्ठ गावातल्या एका ख़ास गुरुद्वार्या समोर अन गंमत म्हणजे ह्या वेळी ते एखादा तरुण अधिकारी पैसेंजर म्हणुन रिक्षात बसवत व त्या रिक्षा च्या सीट खाली एक लोडेड ए के ४७ ठेवलेली असे
एपिक चेनलवर त्यांच्यावरचा
एपिक चेनलवर त्यांच्यावरचा एपिसोड खूप छान होता ...
म्यानमारने असे काही
म्यानमारने असे काही म्यानमारच्या भूमिवर घडले असल्याचा ऑफिशियली इन्कार केलेला आहे. त्याछ्या म्हणण्यानुसार ही चकमक भारताच्या हद्दीत घडलेली आहे.
नितिनचंद्र, पाकिस्तान हा
नितिनचंद्र, पाकिस्तान हा ब्रह्मदेश नाही. त्यांच्याकडे स्वतःची अतिरेक्यांची कुमक आहे. शिवाय पाकिस्तान नामक माकडाच्या हातात अण्वस्त्र नामक कोलीत अगोदरच आहे. आणखी बरेच मुद्दे आहेत ज्याने अशा प्रकारच्या कारवाईसाठी सरळ पाकिस्तानात घुसणे कर्मकठीण आहे. तेव्हा अशी इच्छा मनात धरणे चूक नसले तरी जाहीर दर्पोक्ती कुणीही करु नये.
अवांतरः विकीपिडियावरुन साभारः
ब्रह्मदेशः In English, the official name chosen for the country at the time of independence was "Burma". This was already the name that the British called their colony before 1948. This name most likely comes from Portuguese Birmania and was adopted by English in the 18th century. The Portuguese name itself came from the Indian name Barma which was borrowed by the Portuguese from any of the Indian languages in the 16th or 17th century. This Indian name Barma may derive from colloquial Burmese Bama, but it may also derive from the Indian name Brahma-desh.
Pages