मोदी जिंकले... पण

Submitted by संदीप आहेर on 28 May, 2014 - 05:00

युपीए (काँग्रेस) सरकारचा गेल्या १० वर्षाच्या कामगिरीचा आलेख उतरत्या दिशेने जाताना पाहून, कोणालाही आनंद होण्याची काही गरज नाही, पण सर्वांना दु:ख होण्याचं कारण नक्कीच आहे. त्यांच्या (सरकारच्या) कामगिरीने एक भारतीय म्हणून सर्वांच्याच जीवनावर खूप प्रभाव पडतो. त्यातूनच खंबीर नेतृत्व पुढे येण्याची गरज अधोरेखीत झाली,

नोकरी ऐवजी उद्योगाची कास धरलेल्या मला जेव्हा समोर नरेन्द्र मोदी x राहूल गांधी पतंप्रधान म्हणून दिसू लागले, तेव्हा त्या दोघांतून नरेन्द्र मोदींची निवड स्वाभाविक होती. (माझ्यासाठी)

अनेक रेंगाळलेले मुद्दे, त्यातून एकंदर अर्थव्यवस्थेवर आलेली मरगळ, हे थोडं स्पष्ट करतो...
कमी होत चाललेली GDP
वाढत चाललेली बेरोजगारी
FDA (ह्यावर शेवटची ओळ वाचावी)
भ्रष्टाचार प्रचंड वाढला. (युपिए मधील अनेक मोठे घोटाळे)
सर्वात महत्वाचे म्हणजे महागाई प्रंचड वाढली.
फसलेली (अतिशय महत्वकांक्षी तितकीच महत्वाची) आधारकार्ड योजना.
अट्टाहासाने पूर्ण केलेली Food Security Bill योजना. (केवळ लोकप्रियता)

(माझ्या अल्पमतिनुसार) सरकारात बरचशी धोरणे ठरवायला, IS आधिकारी (खूप शिकलेली मंड्ळी) असतातच पण ती धोरणे राबवणारी कोणी खंबीर व्यक्ति राजकारणी असावी लागते.
ह्यासर्वांचा परिपाक म्हणजे मोदी जिंकले, हे त्यादृष्टीने योग्यच. पण हि सर्व प्रक्रिया ज्या पद्धतीने पार पडली (त्यातील जनतेचा सहभाग) ते मला तरी खटकतयं.

काय खटकतयं...
निकालापूर्वी अनेक जण त्रिशंकू सरकार आल्यावर कशी परिस्थिती असेल ह्यावर चर्चा करण्यात मग्न होते.
कारण वरील मुद्दे जरी ग्राह्य नि योग्य असले तरी जातीय राजकारणाचा भारतीय राजकारणावरील प्रभाव पाहता, मोदी बहुमतात येणं हे कोणिचं स्विकारलं नव्हतं.

निवडणूकीपूर्वी आणि नंतरही हिंन्दुनी एकत्र या (ह्या कट्टरतावादाचं बीजारोपण),
सोशल मिडीया ह्याबाबतीत सर्वात पुढे, ह्यात निव्वळ पेड न्यूज होत्या असे नाही तर त्या न्यूज पासून अंधानुकरण (क्षणात बदलणारी सध्याची पिढीतील मोठा वर्ग) त्वरित प्रेरित होऊन स्व:तही त्याबाजूने जोशात उभे राहणारे ती चळवळ फुकटात पुढे नेणारेही होते. (कसे काय)

केजरीवाल आठवतात का? की विस्मृतीत गेले... विस्मृतीत गेले तर का गेले.
त्यांनी भष्ट्राचाराविरुद्ध रान उठवलं सगळे (तरुण पिढी, मिडिया) त्यांच्या मागे धावले दोन नाट्कं चुकिची केली सगळ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.

मला अपेक्षित असलेलं खंबीर नेतृत्व... मोदींनी अंर्तगत (संघ, भाजपातीलही काही जण, मित्र पक्ष) कोणाचीही भीड न बाळगता पाकिस्थानला शपथविधी साठी बोलावलं त्यांच्याशी चर्चा केली. केवळ स्वःताची हिन्दुत्ववादी प्रतिमेच्या पुढे जाऊन भारताच्या पंतप्रधानपदाची प्रतिमा मोठी करणं हे मला भावलं ते सर्व थरावर त्याच प्रकारे भावणं अपेक्षित होतं पण पाकिस्थानची कशी जिरवली टाईप व्यक्तव्य पुन्हा जोमाने वर येऊ लागली हे खटकतयं आता हे काहीच व्यक्ति करत असतील पण पुन्हा समोर तो अंधानुकरण करणारा वर्ग जो दिवसेंदिवस मोठा होत आहे त्यांनी कोणत्या भावनेला जवळ केलं असेल हे सोशय मिडिया सांगतोच आहे, हेच खटकतयं.

काळ असा बदलतो, मी हिंदू आहे हे म्हटल्याबरोबर पुरातणवादी/मुसलमान द्वेष्टा असल्यागत सर्व समानता वादी त्यावर तुटून पडायचे आणी आज कोणी क्राँग्रेसला सर्पोट केला कि त्याला पाकिस्थानचा असल्यासारखे वागवतात. सर्व धर्म समभाव ह्यांची अतिशायोक्ति झालेली होती, आलेला काळ त्याचाच परिणाम आहे. त्यामुळे आता देखील फार सावध रहावे लागणार आहे, जेणेकरून समाज दुसर्‍या टोकाला जाणार नाही.

(एक मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून दुसर्‍या एका धाग्यावरील ही कमेंट घेतो आहे)
"भाषा, धर्म प्रांत आणि जात असल्या मुद्द्यांपेक्षाही "नक्की तुम्ही करणार काय?" हा प्रश्न मतदारांनी विचारलेला आहे आणि त्याचे उत्तरही शोधले आहे.">>>> हीच जर खरी वस्तुस्थिती असेल तर येणार्‍या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमधे प्रादेशिक पक्ष, भाषा, धर्म, प्रांत ह्याच्या पुढे जाऊन मतदान होणं अपेक्षित आहे. (निकालानंतरच बोलणं योग्य) तरिही त्या निवडणुकित माणसं गुजराती आमदाराला मराठी आमदाराच्या विरुद्ध मत देतील का? फक्त काम पहाण्या पेक्षा गुजराती मराठी हे पाहिलचं जाणार नाही का?

आज जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न होता... हिन्दु म्हणून साद घातली गेली, जी प्रमाणा बाहेर यशस्वीही झाली. उद्या आपल्या राज्याला प्रश्न असणार आहे तेव्हा मराठी अस्मितेला साद घातली जाईल, असं करता करता आमच्या गल्लीतील माणूस आमचा इथ पर्यंत परिस्थिती कधी येईल ते सांगता येत नाही. कट्टरतेचा जन्म कितीही मोठ्या गोष्टीसाठी, चांगल्या हेतुने झाला तरीही तो झिरपतं खालपर्यंत येताना वाईट गोष्टी घडवून जातो.

आज जे नाक्यावर हिंदु म्हणून मोंदीनी पाकिस्थानची कशी जिरवली ह्या साठी जोरदार पाठिंबा देताहेत, ऊर अभिमानाने भरुन आला आहे, ते उद्या मुलगी गुजराती मुलाबरोबर लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्यातील हिन्दुला सोयिस्कररित्या विसरुन मराठी अस्मितेवर छाती फुगवतील, उद्या उद्या काय ... आज काय परिस्थिती आहे कोकणातील व्यक्ति देशावरच्याला घाटी म्हणते... त्याच्यात किती विवाह होताहेत.

कोणा सायनिस्टिट्ला मोठा ऑवार्ड मिळाला, भारतीय वंशाचे म्हणून मिडिया नाचू लागली,
ते तेव्हा अमेरीकेत होते, त्यांना स्पष्ट केलेलं माझ्या कामासाठी ते ऑवार्ड मिळालं आहे, त्यात देशप्रेमाचा पुळका येऊ देऊ नका.

भारतात पुरेश्या सोयी - सुविधा असत्या तर आज ते येथे संशोधन करत असते. त्या सोयी सुविधा निर्माण करण्याऐवजी निर्मित सोयी - सुविधांना कोणाचं नाव द्यावं ह्याकडे जास्त कल राहिला.

संपूर्ण पाकिस्थान काही बॉम्ब टाकत नाही, काही एक गट असतात वाईट हेतु वाले,
संपूर्ण भाजपा किंवा क्राँग्रेस काही वाईट नाहीत पण काही एक गट असतात वाईट हेतु वाले,

फॉरेन इनव्हेस्टमेटं किराणा क्षेत्रात येऊ न देण्यासाठी भाजपाने (काहीजणांनी) तमाशे केले, सामान्य किराणा व्यापार्‍यांच नुकसान होईल... फॉरेन वाला आला तर सामान्य किराणा वाल्याचं नुकसान पण रिलायन्सवाला आला तर नाही. तो आपला आहे. उद्या महाराष्ट्रात फक्त पिंताबरी वाल्यालाच प्राधान्य देणार का? तो आपला आहे.

आपण जे कोणी आहोत त्याबद्दल अभिमान जरुर असावा. पण...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला या लेखामधलं का ही ही समजलेलं नाही!!! नक्की काय उद्देश आहे या लेखाचा? माझ्या कमेंटमधील एकच वाक्य घेण्याऐवजी ती पूर्ण कमेंट वाचाल का प्लीज? बरेचशे मुद्दे सरमिसळ केलेले आहेत आणि कशाच कशाला संबंध नाहीये.

लेखामधलं एक बेसिक प्रीमाईस आहे की, मोदींना "हिंदू" म्हणून लोकांनी मत दिलं. प्लीज, पुन्हा एकदा मतदानाचा आलेख बघून घ्याल का? भाजपाला एकंदरीत मिळालेल्या मतांमध्ये नुसते हिंदूच नव्हे तर, मुस्लिम, नवबौद्ध, ख्रिस्चन या सर्व समुदायांपैकी मतं भाजपाकडे आलेली आहेत. ती नक्कीच "हिंदुत्ववादासाठी" आलेली नाहीत. याउलट या निवडणुकीमध्ये लोकांनी धर्मापेक्षाही जास्त महत्त्व इतर मुद्द्यांना दिलेले आहे ("फतव्याचा" काहीही उपयोग झालेला दिसत नाहीये)

(निकालानंतरच बोलणं योग्य) तरिही त्या निवडणुकित माणसं गुजराती आमदाराला मराठी आमदाराच्या विरुद्ध मत देतील का? >>> महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किती गुजराती व्यक्ती उभ्या असतील? आणी जे कोण उभे असतील त्यांच्या त्या विधानसभा मतदार संघाशी काही तरी संबंध असेलच ना? "आप" सारखे तिकीटवाटप प्रत्येक पक्षात होत नसते हो.

आज जे नाक्यावर हिंदु म्हणून मोंदीनी पाकिस्थानची कशी जिरवली ह्या साठी जोरदार पाठिंबा देताहेत, ऊर अभिमानाने भरुन आला आहे, ते उद्या मुलगी गुजराती मुलाबरोबर लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्यातील हिन्दुला सोयिस्कररित्या विसरुन मराठी अस्मितेवर छाती फुगवतील, उद्या उद्या काय ... आज काय परिस्थिती आहे कोकणातील व्यक्ति देशावरच्याला घाटी म्हणते... त्याच्यात किती विवाह होताहेत.>>> याचा "मोदी पंतप्रधान असण्याशी" कसा संबंध आहे?

त्या मोदींना जरा काम तर करू द्यात की उगाच यं व केले तर त्यांव होइल आणि मग अमक्याचे नुकसान होइल टाईप लेख पाडायला सुरूवात. जिथे आधीपासून ही चर्चा चालू आहे तिथेच ही कमेंट टाकली असती तरी चाललं अस्तं.

हा गुलमोहर ललित लेखन ग्रूप आहे, अशा चर्चा राजकीय घडामोडी ग्रूपमध्ये केल्यात तर बरं होइल.

संदीप आहेर,

>> पुन्हा समोर तो अंधानुकरण करणारा वर्ग जो दिवसेंदिवस मोठा होत आहे त्यांनी कोणत्या भावनेला जवळ केलं
>> असेल हे सोशय मिडिया सांगतोच आहे, हेच खटकतयं.

पाकिस्तानची जिरवणं यात अंधानुकरण ते कसलं? सीमेवर जे भारतीय जवान मारले जाताहेत त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का?

आ.न.,
-गा.पै.

.