कढी सांड्गे

Submitted by सन्कुल on 25 May, 2014 - 13:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक चिरलेला कांदा - १
दही - ४ चमचे
कढीपत्ता - ४/५ पाने
फोडणीचे साहित्य
पाणी - २ कप

क्रमवार पाककृती: 

१. सांड्गे भाजून / तळून घ्या. (मी मा.वे. मध्ये भाजून घेतले आहेत)
२. एका कढई मध्ये तेल, जीरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन घ्या.
३. बारीक चिरलेला कांदा घालुन गुलाबी होईपर्यन्त परतून घ्या.
४. त्यात दही व पाणी घालून, कढीला उकळी येऊ द्या.
५. जेवायला घेण्याआधी सांड्गे क्रश करुन कढीमध्ये घाला.

माहितीचा स्रोत: 
फूड-फूड वाहीनी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात सांडगे कुठे आहेत? म्हण्जे त्याची कृती...
>>>>>>>
सांडगे बाजारात रेडीमेड पण मिळतात की, ते वापरायचे.
आम्ही तेच करतो.

बाकी सांडगे आणि कढी दोन्ही माझे फेवरेट .. कॉम्बिनेशनही भारी लागत असावे..

साती, मान गए आपकी पारखी नजर और सुपर निरमा दोनों को!

बाकी साबुदाण्याच्या फेण्यांवर असा अत्याचार करणे झेपणार नाही.