नेमकी ज्याचीच धास्ती, तेच झाले शेवटी!

Submitted by profspd on 24 May, 2014 - 10:44

नेमकी ज्याचीच धास्ती, तेच झाले शेवटी!
दार ना ठोठावता ते मरण आले शेवटी!!

खंगले आयुष्य अठराविश्व दारिद्र्यामधे.....
चार पैसे कनवटीला पार आले शेवटी!

त्या लपंडावात यश जिंकायचे रे, नेहमी......
पार वार्धक्यात मजला यश मिळाले शेवटी!

एकमेकांना लळा बघ लागला हा केवढा....
सल उरामधलेच माझे यार झाले शेवटी!

राहिला रस्ताच खडतर सोबतीला माझिया.....
सोबती ज्यांना म्हणालो ते पळाले शेवटी!

खूप धरला धीर, दारू प्यायची नाही म्हणे.....
वेंधळ्या हातांमधे आलेच प्याले शेवटी!

मी भले लावून बसलो दार हृदयाचे तरी.....
त्या कटाक्षांचे उरी शिरलेच भाले शेवटी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages