नेमकी ज्याचीच धास्ती, तेच झाले शेवटी!

Submitted by profspd on 24 May, 2014 - 10:44

नेमकी ज्याचीच धास्ती, तेच झाले शेवटी!
दार ना ठोठावता ते मरण आले शेवटी!!

खंगले आयुष्य अठराविश्व दारिद्र्यामधे.....
चार पैसे कनवटीला पार आले शेवटी!

त्या लपंडावात यश जिंकायचे रे, नेहमी......
पार वार्धक्यात मजला यश मिळाले शेवटी!

एकमेकांना लळा बघ लागला हा केवढा....
सल उरामधलेच माझे यार झाले शेवटी!

राहिला रस्ताच खडतर सोबतीला माझिया.....
सोबती ज्यांना म्हणालो ते पळाले शेवटी!

खूप धरला धीर, दारू प्यायची नाही म्हणे.....
वेंधळ्या हातांमधे आलेच प्याले शेवटी!

मी भले लावून बसलो दार हृदयाचे तरी.....
त्या कटाक्षांचे उरी शिरलेच भाले शेवटी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

वाटायचे उडणार नाही पण उडाले शेवटी

- 'बेफिकीर'!

प्राध्यापक महोदय,

आपण सध्या काही इतरांच्या जुन्या गझलांच्या जमीनी (किंचित मॉडिफाय करून का होईनात) हाताळताय असे आपल्याला वाटत नाही काय? हे तिसरे उदाहरण पाहिले म्हणून लिहिले.

जमिनीवर/शब्दांवर/रदीफावर/काफियांवर/वृत्तावर/प्रत्ययांवर कुणाचीही मालकी नसते
ज्याचा त्याचा पिंड हा शेरातून अभिव्यक्त होत असतो!

खयाल अपना अपना
.................प्रा.सतीश देवपूरकर

प्राध्यापकमहाशय,

वार्धक्यातले यश म्हणजे बायको असे धरले तर ही गझल राहुल गांधीला (किंवा दिग्गी खानला पण) चपखल लागू पडते. Lol

अभिनंदन!

आ.न.,
-गा.पै.

जमिन,रदीफ,कवाफी यावर कुणाची मालकी नसते पण खयाल सुद्धा शेम टु शेम?

वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी

हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी

लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी

भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी
लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी

देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी,
पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी

भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा
तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी

जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे
घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवटी ?

डॉ.कैलास गायकवाड.

O.gif

Sad

सर आहेत की चोर आहेत असं म्हणावंसं वाटतय पण मोठ्यांना असं मबोलू नये म्हणुन मनातल्या मनात म्हणून घेते

ते मला माहीत आहे.

म्ळा वाटलं मैबोलित नवी स्मैली आली काय.

हे देअवपुरकर ही खूऊप स्मायल्या वापरायचे. गझल नको पण स्मायली आवर असे व्हायचे

बै बै काय अभद्र आणि मोठ्या स्मायल्या असायच्या. आता त्या स्मैली सोडुन देउन हे जमिनी चोरायच्या धन्द्यात घुसलेत

इथे आता गप्पा सुरु करुयाइ>>>>
Lol

नको बाबा... कशाला उगाच टीआरपी वाढवायचा धाग्याचा? Wink लोकं शिव्याशाप देतील आपल्याला हा धागा वर बघुन Proud

जमिनीवर/शब्दांवर/रदीफावर/काफियांवर/वृत्तावर/प्रत्ययांवर कुणाचीही मालकी नसते
ज्याचा त्याचा पिंड हा शेरातून अभिव्यक्त होत असतो!

अगदी मान्य.
मात्र नवीन जमीन शोधून त्यात अभिव्यक्त होणे ही सोपी गोष्ट नाही.
कोणताही महत्त्वपूर्ण शायर अभ्यासला तर लक्षात येइल की रिवायती जमीनींसोबत त्याने स्वतःच्या जमीन शोधल्या.
नवीन जमीन शोधण्यातली गंमत वेगळी, आव्हान वेगळे.
तसेही नवीन जमीन बहुधा नवीन कल्पनांकडे नेते.
रिवायती जमीनीत तेच ते खयाल थोड्याफार फरकाने येत राहू शकतात.
ह्याच विचाराने एक शेर लिहिला होता मी:

कधी वाटते करण्यासाठी बरेच आहे
गु-हाळ ह्या जगण्याचे होऊ नये कधीही

असो, निर्णय तुमचाच.

समीर

वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी

हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी

लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी

भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी
लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी

देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी,
पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी

भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा
तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी

जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे
घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवटी ?

डॉ.कैलास गायकवाड.
************************************************

नेमकी ज्याचीच धास्ती, तेच झाले शेवटी!
दार ना ठोठावता ते मरण आले शेवटी!!

खंगले आयुष्य अठराविश्व दारिद्र्यामधे.....
चार पैसे कनवटीला पार आले शेवटी!

त्या लपंडावात यश जिंकायचे रे, नेहमी......
पार वार्धक्यात मजला यश मिळाले शेवटी!

एकमेकांना लळा बघ लागला हा केवढा....
सल उरामधलेच माझे यार झाले शेवटी!

राहिला रस्ताच खडतर सोबतीला माझिया.....
सोबती ज्यांना म्हणालो ते पळाले शेवटी!

खूप धरला धीर, दारू प्यायची नाही म्हणे.....
वेंधळ्या हातांमधे आलेच प्याले शेवटी!

मी भले लावून बसलो दार हृदयाचे तरी.....
त्या कटाक्षांचे उरी शिरलेच भाले शेवटी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

वर दिलेल्या दोन गझलांमधे रदीफ/काफिया/वृत्त सोडून कोणते साधर्म्य आहे जे आक्षेपार्ह आहे? दोन्ही गझलांमधील व्यक्तिमत्वे अगदी वेगवेगळी आहेत जे कोणी नवशिक्याही सांगेल!

हा आमच्यातील न्यूनगंड तर बोलत नाही ना?
प्रा.सतीश देवपूरकर

निमित्तालाच ते आहेत अगदी टेकले आता....
जरासेही पुरे खुसपट तुला झिडकारण्यासाठी!

इति प्रोफेसर

चांगल्या जमिनीत स्वत:चा अस्सल प्रत्यय मांडण्यात काय गैर आहे बुवा?

आणि

कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्यात काय गैर आहे बुवा?

या दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकच आहे. मात्र उत्तर व्यक्तिसापेक्ष राहू शकते.
अशा तर्‍हेचे प्रश्न सामुदायिक आणि सामुहिक समाजरचनेला घातक ठरत असतात.
अशा तर्‍हेचे प्रश्न विचारणाराला समाज स्वत:मध्ये सामावून घेत नाही, असा इतिहास आहे.

Pages