Vajir Pinnacle - वजीर सुळका

Submitted by सूनटून्या on 24 May, 2014 - 07:45

मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलाच फोटो बघुन धडकी भरली.
फोटो आणि वृत्तांत मस्तच.
तुम्हा सगळ्यांना ____/\___ Happy

आणि हमाल सतीश कुडतरकर.>>>>>>>:फिदी:

बापरे!!! कसला अवघड सुळका आहे हा!!! अभिनंदन!!!! वर उंचावर तो बॅनर घेऊन असलेला फोटो मस्त आहे अगदी. सविस्तर लिहायला हव खर तर कसे चढलात त्याबद्दल.

मोजकेच फोटो पण अतिव सुंदर!!!! खूप सुंदर शैली आहे तुझी. मजा आली वाचताना.

अवांतर:
माथ्यावर जायचा एव्हढंच अट्टाहास असेल तर वेगळा मार्ग निवडा आणि ठोका इंचावर इंचावर खिळे. पण एखाद्याने आपले सर्व कसब वापरून धाडसाने विजय मिळवला असेल आणि आपल्याला त्याने केलेल्या पराक्रमाची बरोबरी करता येत नसेल तर त्या बहाद्दराला मनोमन सलाम ठोकावा आणि आपण आपला वेगळा ''सुरक्षित'' मार्ग काढावा. पण असे फुटा-फुटावर खिळे ठोकुन त्याने केलेल्या पराक्रमाची अवहेलना करू नये.>>>> अगदी बरोबर!!!!

सगळेच फोटो " अ फ ला तू न " !!! या वजीर ला माहुलीवरुन पाहिलेय.. पण हिरवळीतला वजीर खूपच सुंदर नि आकर्षक !

व्वा जबरी... फोटु सुंदरच..
पण भर पावसात चढाई करता येते का ?

रोएमा, पावसाळ्यात चढाई केली म्हणजे धोपटमार्ग असावा. तरीपण धोका आहेच. Happy

सूनटून्या, धन्य आहे तुम्हा लोकांची! वर फलक फडकावतांना वारं नव्हतं?

आ.न.,
-गा.पै.

बी | 24 May, 2014 - 10:55
बापरे!!! कसला अवघड सुळका आहे हा!!! अभिनंदन!!!! वर उंचावर तो बॅनर घेऊन असलेला फोटो मस्त आहे अगदी. सविस्तर लिहायला हव खर तर कसे चढलात त्याबद्दल>>>>>

चढाई बद्दल सांगण्यात काही अर्थ नाही. कारण ३-४ फुटांवर खिळे असल्यामुळे चढाईतली मजा निघून गेली आहे. हि चढाई न राहता ''शिफ्टिंग'' झाली आहे. एका खिळ्यावरून दुसऱ्या खिळ्यावर. मी लेखात म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे सुद्धा अपुरा वेळ असल्याने आमचाच overhang मार्ग न निवडता हा सोप्पा मार्ग निवडला.

यो
पावसाळ्यात एकदा जरूर भेट द्या. एक छानसा ट्रेक होऊन जाईल. माथ्यावर नाही जाता आल तरी परिसर अतिशय सुंदर आहे. फक्त पाणी खालीच भरून घ्या वर पाण्याची सोय नाही.

रोहित
सह्याद्रीमध्ये साधारणपणे इतर मंडळी पावसाळ्यात मोहिम आखत नाहीत. पण गिरीविराजकडे साधारण ४० पावसाळी मोहिमांचा अनुभव गाठीशी आहे.
मी व्यक्तीशः इतरांना प्रोस्ताहन देणार नाही. शेवटी हे क्षेत्रच असे आहे कि अपघात कधीहि आणि कोणत्याही ऋतूमध्ये होत असतात. एक म्हण आहे ''एवरेस्ट केला आणि मोरीत पडला'' Happy

गामा
सुळक्यावर चढाई करण्यासाठी धोपट मार्ग वगैरे काहीही नसतं. २०० फुटी चढाईतहि शेवटची किंवा मधली ५-१० फुटांची चढाई काही वेळेस अशी कठीण बनते कि तिथूनच हिरमुसले होवून मागे फिरावे लागते. यश काही पावलावर दिसत असूनही गवसत नाही.

वर फलक फडकावतांना वारं नव्हतं?>>>>
कृपया नसत्या शंका घेऊ नका. Happy
मी लेखात आधीच म्हटल्याप्रमाणे, ते पावसाळ्याचे दिवस होते आणि उन पावसाचा खेळ चालू होता. नेहमीच्या ट्रेकर्सना याचा चांगलाच अनुभव असेल. अशा वेळेस वारा नसतो आणि वातावरणात आद्रता वाढलेली असते. अशा वेळेस घामाघूम व्हायला होते. म्हणून तो फलक फडकत नाही.

कौतुकाबद्दल सर्वांचे आभार!

सूनटून्या,

आता पावलोपावली खिळे आहेत तर तो धोपटमार्गच झाला की! अर्थात पावसाळ्यात करायचा म्हणजे धोका बराच जास्त आहे. Happy

वाऱ्याचं म्हणाल तर मी शंका घेतोय कारण ते दोघे जखडलेले दिसंत नाहीत. याबाबत चूकभूल देणेघेणे. वाऱ्याने तोल जाण्याची भीती वाटत नव्हती का हे विचारायचं होतं. Happy

आ.न.,
-गा.पै.

गामा
तुम्ही तर मागेच पडलात. Happy
असो, काळजी नसावी. माथ्यावार गेल्यावर सर्वात प्रथम कोणते गोष्ट केली जात असेल तर ती म्हणजे एखादा लांब ''पेग'' (अनुकुचीदार सळई) ठोकून त्यात कंबरेचा दोर जखडून ठेवणे. हि काळजी प्रत्येक वेळेस घेण्यात येते. वरील फोटो खूप दूरवरून घेतलेला असल्याने आपणास दोर निट दिसत नाही.

सतिश भाव... जिंकलत राव... पहिला फोटो एकदम कातिल!

IMG_3162.JPG

आम्ही फेब २०१२ मधे माहुलीच्या कल्याण दरवाजाने खाली उतरलो होतो तेव्हा या वजिर सुळक्याच दुरदर्शन झाल होतं. हा परिसर पावसाळ्यातच करायला पाहिजे, कारण पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आमचा जीव कासाविस झाला होता.

जबरदस्त थंडी????>>>>
एखादी रात्र थंडीच्या दिवसात माथेरानच्या कुठल्याही पॉइन्टवर काढल्यास याचा अनुभव नक्की येईल. थंडगार वारा असा काही झोंबतो बस रे बस.

इंद्रधनुष्य
हो खर आहे. माहुलीमध्ये पाण्याच दुर्भिक्ष आहे. पाण्याचे रेशनिंग करावे लागते. एक एक थेंब साठवून ठेवावा लागतो. ऐकायला घाण वाटेल पण इलाज नाही. परसाकडे गेल्यास टोयलेट पेपर तर हवाच अन्यथा झाडाची पाने, दगड इत्यादी नैसर्गिक गोष्टींची वानवा नाही. Rofl