नको कोणताही खटाटोप आता!

Submitted by profspd on 23 May, 2014 - 02:30

नको कोणताही खटाटोप आता!
करू जिंदगीचा समारोप आता!!

किती यातना सांग सोसायच्या मी?
नको दु:ख, माझाच कर लोप आता!

अता राजकारण...चिखलफेक, धुळवड!
कसे लोक करतात आरोप आता!!

निसर्गाविरोधी किती वागतो तू....
पहाशील तू माणसा कोप आता!

पहा पेंगतो तू, किती रात्र झाली....
उद्या बोल दु:खा, परी झोप आता!

मराठी गझल केवढी बघ बहरली....
भटांचे फुलू लागले रोप आता!

किती यत्न केलेस जमले तुला जे....
स्वत:ला नशीबावरी सोप आता!

किती वेळ मृत्यूस टांगायचे रे?
तुझी वळकटी बांध, आटोप आता!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users