Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2011 - 06:18
===============================
हा दोष नगण्यत्वाचा कोणाच्या माथी मारू
अस्तित्व टिकवण्यासाठी हे लिहितो मी बाजारू
===============================
पुरे जाहला हा खटाटोप आता
पहा झोपले जग जरा झोप आता
उभा जन्म हा एक मिसरा असावा
करावा प्रभावी समारोप आता
स्वतःऐवजी पाहतो हा जगाचे
असा एक व्हावाच आरोप आता
फुका सावलीच्या अपेक्षेत होतो
कधी व्हायचे झाड हे रोप आता
मिळालास माझ्या प्रयत्नांमुळे तू
नशीबा न व्हावा तुझा कोप आता
-'बेफिकीर'!
===============================
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त मस्त. समारोप, आरोप आणि
मस्त मस्त.
समारोप, आरोप आणि मक्ता हे विशेष आवडले.
काही शेर उर्दू इश्कीया शायरीप्रमाणे वाटले, अर्थात आवडलेच!!
आरोप मक्ता काहि मला समजत
आरोप मक्ता काहि मला समजत नाही.... पण आवडली
आवडली........
आवडली........
समारोप आणि मक्ता लाजवाब.
समारोप आणि मक्ता लाजवाब.
अस्तित्व टिकवण्यासाठी हे
अस्तित्व टिकवण्यासाठी हे लिहितो मी बाजारू....जबरी
होप नाही कळाला....
मक्ता बढीया. . . बाकी ठीक ठाक!!
आवडली.
आवडली.
अस्तित्व टिकवण्यासाठी हे
अस्तित्व टिकवण्यासाठी हे लिहितो मी बाजारू....>
असे रुक्ष का सर्व गुत्ते म्हणालो
>> व्वाह्!!मस्त.
'होप' नाही कळाला....
पुरे जाहला हा खटाटोप आता पहा
पुरे जाहला हा खटाटोप आता
पहा झोपले जग जरा झोप आता
उभा जन्म हा एक मिसरा असावा
करावा प्रभावी समारोप आता
स्वतःऐवजी पाहतो हा जगाचे
असा एक व्हावाच आरोप आता
मला पाहुनी चोरटा होत आहे
कटाक्षास दे तू तुझ्या चोप आता
व्वा...सारेच खास आहे........
हा दोष नगण्यत्वाचा कोणाच्या माथी मारू
अस्तित्व टिकवण्यासाठी हे लिहितो मी बाजारू
हे फर्मास आहे...
बोहोत अच्छे
पुरे जाहला हा खटाटोप आता पहा
पुरे जाहला हा खटाटोप आता
पहा झोपले जग जरा झोप आता>>>
उभा जन्म हा एक मिसरा असावा
करावा प्रभावी समारोप आता>>>
स्वतःऐवजी पाहतो हा जगाचे
असा एक व्हावाच आरोप आता>>>
------------------------------
जगी झोपले आज सारे तरीही
तुझे जागणे आज वाटे हवेसे
उभा जन्म शोधीत जाती फुलांना
तुला वाटती काय काटे हवेसे
कशी सावलीलाच छाया मिळावी
अन् आगीस वाटे फुफाटे हवेसे
चु.भू.द्या.घ्या. बेफिकीर तुमची ही गजल खूप आवडली आणि हे सुचले.
क्या बात है!! समारोप, चोप,
क्या बात है!!
समारोप, चोप, आरोप, रोप... उत्तम!
खूप सुंदर गझल!!
मस्त. 'समारोप' शेर फार चांगला
मस्त.
'समारोप' शेर फार चांगला झाला आहे.
अतिसुंदर!
अतिसुंदर!
प्राजुशी सहमत... खूप सुंदर
प्राजुशी सहमत...
खूप सुंदर गझल!!
सुंदर्,आवडली. मला पाहुनी
सुंदर्,आवडली.
मला पाहुनी चोरटा होत आहे>>>>>वाक्याचा अर्थबोध होत नाही(मला पाहुनी चोरटा दक्ष आहे)
कटाक्षास दे तू तुझ्या चोप आता
छान स्वतःऐवजी पाहतो हा
छान
स्वतःऐवजी पाहतो हा जगाचे
असा एक व्हावाच आरोप आता .....मस्त
मला पाहुनी चोरटा होत आहे
कटाक्षास दे तू तुझ्या चोप आता ... मजेशीर आहे
फुका सावलीच्या अपेक्षेत होतो
कधी व्हायचे झाड हे रोप आता ... छानच
सुधीर
आवडली
आवडली
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
पुरे जाहला हा खटाटोप आता पहा
पुरे जाहला हा खटाटोप आता
पहा झोपले जग जरा झोप आता
व्व्वा व्वा मस्त शेर आहे.
मला पाहुनी चोरटा होत
मला पाहुनी चोरटा होत आहे
कटाक्षास दे तू तुझ्या चोप आता
भारी लिहिलंय सर.....
सुंदर
सुंदर