Submitted by _आनंदी_ on 22 May, 2014 - 10:48
बी.ई. केल आहे..
आत्ताची नोकरी नीट आहे ... पण लेक्चरर प्रोफेसर ई शिकवण्याच्या बाबतीत इंटरेस्ट आहे...
मागे माय्बोलिवरच एक धागा होता तिथेही हा प्रश्न विचारल होता पण तो धागाच सापडत नाहिये...
१) मला विचारायचे होते सेट नेट ची गरज नाही ना?
आणि २) त्याच कॉलेज मध्ये एम ई करत तिथेच शिकवण्याचे पण ऑप्शन असतात अस ऐकुन आहे..
क्रुपया अनुभव शेअर करा महिती द्या...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राध्यापकी अजिबात करू नका.
प्राध्यापकी अजिबात करू नका. रोज नवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर, बौद्धीक आणि थोडे शारिरीक श्रम घ्यायची इच्छा असेल तर, निर्मितीतला आनंद घ्यायचा असेल तर, बहुगुणी लोक संग्रह वाढवायचा असेल तर प्राध्यापकी करू नका. ( -1 )
माझे मत वेगळे आहे. पुर्वीच्या काळी एक डॉयलॉग होता. बघीन बघीन नाहीतर मास्तर होईन ( चांगल्या नोकरीच वाट पाहिन नाहीतर मास्तर होईन ) पण आता असे नाही. प्राध्यापकाला सुध्दा अपडेट रहावे लागते. नविन ज्ञान असे सहजासहजी मिळत नाही. शिवाय मिळाल्यानंतर त्यातले काय द्यायचे काय नाही हा विचार करुन द्यावे लागते.
प्रत्येक विषय कसा इंटरेस्टींग होईल याचे तंत्र विकसीत करत जावे लागते. नुसते पाट्या टाकणे असे नाही तर यात सुध्दा निर्मीतीचा आनंद आहे.
नितिनचंद्र+१. शिकवू कोणीही
नितिनचंद्र+१.
शिकवू कोणीही शकत असेल, पण चांगला शिक्षक होणे हे आरामात होण्यासारखे काम नाही. इथेही चॅलेंजेस असतातच.
शिक्षकांनाच सरसकट डाउनग्रेड
शिक्षकांनाच सरसकट डाउनग्रेड करायला बघितलं जातंय ह्याचाच अर्थ "शिक्षण" ह्या समाजाचा कणा असलेल्या गोष्टीलाच डाउनग्रेड केल्यासारखं आहे. थोडेफार पाट्या टाकणारे लोक सगळ्याच क्षेत्रात असतात. पण शिक्षकी पेशाची अशी सरसकट नालस्ती प्लिज करु नका.
मी ४ वर्षांची असताना श्रीगणेशा गिरवला तेव्हा तर शिक्षकांना देवासमान मानायची घरची शिकवण होती. काळ बदलत गेला तसतसं शिक्षकांना टोपण नावे ठेवणे, त्यापुढे जाऊन त्यांच्या मागे त्यांना अरे तुरे करणे, त्या पुढे जाऊन त्यांना शिव्या (:-( ) देणे ही स्थित्यंतरेही पाहण्यात आली आहेत. पण शिकून सवरुन करियर करणार्या मॅच्युअर पिढीनेच अशी पातळी गाठली तर विद्यार्थीदशेतल्या कोवळ्या पिढीला काय आदर उरणार आहे शिक्षकांबद्दल.
उद्या वरील मुक्ताफळे एखाद्या नाठाळ, नालायक विद्यार्थ्याने कसला तरी (चुकीचा वा बरोबर) राग काढण्याच्या निमित्ताने शिक्षकांच्या तोंडावर फेकून मारली तर नवल नाही.
आनंदी, तुम्ही तुम्हाला सोयिस्कर असलेले कुठलेही प्रोफेशन निवडा. पण वरील काही प्रतिसाद दुखवून गेले म्हणून लिहिलं.
I am working as Associate
I am working as Associate Professor since 2000. Now a day’s it’s difficult to work in private institutes.
1. In engg institute professor should be updated himself as students are very smart.
2. In engg institutes feedback of faculty is compulsory (twice in a semester) and in some institutes if feedback is less than threshold then management can tell faculty to resign from his post. So your teaching must be perfect.
3. If you wish to get university approval then ME is compulsory for Assistant Professor but to get promotion to Associate Professor or Professor, Ph. D. is compulsory.
4. As per AICTE, teaching is only one part in job. Along with teaching you should contribute in various activities such as admissions, cultural , NSS, Technical activities, university syllabus and exam related work and everyday administrative work such as timetable coordinator, Class teacher, NBA coordinator, departmental exam., result analysis, website coordinator, Laboratory incharge, subject incharge etc etc etc
5. Research is compulsory as per AICTE. Associate Prof and Professor should publish their research in reputed international journals.
So teacher in engg institute contribute as a teacher, administrator and researcher also.
You are BE computer, you will get lecturer position in Engg College with ad –hoc salary.
But after finishing masters you will get UGC approval with good salary.
Sorry for typing in English as I never typed in Marathi.
माहितीपूर्ण लेख , चांगली
माहितीपूर्ण लेख , चांगली माहिती मिळाली.धन्यवाद वैशाली.
आम्हाला शिकवायला अगदी
आम्हाला शिकवायला अगदी इंजीनिरींग,मॅनेजमेंट जे मिडल एज आणि वयस्क प्रोफे. होते त्यांनीच चांगलं असं सर्व शिकवलेय.नवीन आणि तरूण लेक्चरर्स बद्द्ल आमचा फिडबॅक नेहमी 'Low Rated' होता,तसाच तो सत्यही होता.
त्यांना काही नवीन असं जमतच नसे.बर काही विचारलंच तर त्यांना उत्तरं न येण्याने आम्हालाच नंतर काही विचारणं कसंतरी वाटायचं.पण असं नसतं ना हो...
शिक्षकी पेशाची नालस्ती वगैरे नाहीये चालू इकडे...फक्त त्यातलं सत्य असं आहे.ए ग्रेड कॉलेजेस सोडले तर इतर कॉलेजेसमध्ये किमान ५०% स्टाफ हा,इतर ठिकाणी नोकरी नको/नसते,९ ते ५ चं प्रोफेशन्,डोक्याला कमी कटकट्,मुलं स्मार्ट झालीत-सबब शिकवण्याचा कंटाळा केला तरी चालतो,स्वतःचं डोकं फार लावावं लागत नाही,दोन-तीन लेक्चर्स बाकी टेबल वर्क एवढ्या कारणांसाठी हे प्रोफेशन घेतात.लेक्चरर कमी क्लार्क जास्त असं असतं.
नोकरी लागायची म्हणून शिक्षण घेणारा बहुतांश समाज आपला...थ्री इडीयटस टाळ्या वाजवून बघतो.त्यातल्या प्रोफेसरांच्या झालेल्या चेष्टा बघून हसतो,शब्दच्छळाने केलेले युक्तीवाद आवडतात...याचा अर्थ काय्?
आपण विद्यार्थी असताना जे शिक्षकाकडून अपेक्षितो ते शिक्षक झाल्यानंतर(आजकाल) विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो काय?
जुने दाखले निदान देण्याचे टाळावेत.जुने शि़क्षक होते तसेच.आताही काही नवीन लोकं आहेत तशी.पण काहीच.
आनंदी यांनी कुठलंही प्रोफेशन घ्यावं.परंतु केवळ नाईलाज म्हणून,फार डोकं लाववं लागू नये म्हणून हे प्रोफेशन घेऊन,विद्यार्थ्यांच्या टवाळकीचा विषय बनू नये असं वाटतं.तुमची प्रेरणा घेऊन या वाटेकडे वळणारे दहा जण असतीलच.जर तुम्हाला विद्यार्थ्यांना काही द्यायचं आहे,नवं काही शिकवायाचंय आणि प्रत्यक्षात उतरवायचं आहे तर आणि तरच या क्षेत्रात या.(माफ करा स्पष्ट बोलत आहे.)
आम्हाला इतकंच म्हणायचंय शिक्षक व्हायचं असेल तर मन लावून ते व्हावं...सातत्य राखणं आलच...आणि कमीतकमी ५ वर्षांचा ठोक इंडस्ट्रीयल अनुभव असेल तर ठीक अन्यथा दहा एक वर्ष छान इंडस्ट्रीत राहून मग या शिकवायला.तुम्हालाही मजा येईल शिकवायला.पुढे ME आणि PhD ला वेळ मिळेल.मुलगीही मोठी झाल्याने तेव्हा मॅनेज करणं सोपं होईल.
ध.
हम्म. मी वरती केलेलं विधान
हम्म.
मी वरती केलेलं विधान उगाच काहीतरी बरळायचं आणि धुराळा उडवून मज्जा बघण्यासाThee केलेलं नाहिये. त्या मागे चिक्कार अनुभव आहेत. उगाच आता असतीलही शंभरात एक उदाहरण म्हणून माझं म्हणणं बदलणार नाहिये. बहुतेक पुरुष प्राध्यापक कोर्पोरेट जगतात डाळ शिजत नाही म्हणून इकडे आलेले असतात. स्त्रियांची घरी वेळ देता येणं वगैरे घरगुती कारणं असतात. आजकाल किती प्राध्यापक पॅशन म्हणून मोठ-मोठ्या पगाराच्या, परदेशातल्या वगैरे नोकर्या सोडून आलेले आहेत? खरी कारणें वरचीच असतात, पण मग मनाची समजूत घालण्यासाठी आवड वगैरे आहे म्हणतात.
मला शिकवणारे सगळेच्या सगळे प्राध्यापक आणि प्राध्यापिकांना त्या विषयाचं काडीचं ज्ञान नव्ह्तं. काही काही जण तर आपलं पितळ उघडं पडलं तर? या चिंतेने विध्यार्थ्यांच्या प्रश्नांना घाबरत असतं. सहज आठवलं म्हणून, एका महाभागाने 'ऑप्टीक फायबर' शिकवताना आता एक दोन वर्षात टेलिफोनच्या सगळ्या तारा काढून ऑप्टीक फायबर बसवणार आहेत. इतकच नाही तर पुढच्या आठ-दहा वर्षात, एमएसईबीच्या तारा जाउन तिथं सुद्धा ऑप्टीक फायबर येणार आहेत असं सांगितलं होतं. आता बोला.
आता इतक्या वर्षांनी नाही तर त्याही वेळेला असलं ऐकून हसू यायचं. पण इंटरनल मार्क हातात असल्यामुळं काही करता यायचं नाही. माझी काही वर्गबंधू-भगिनी दोन-तीन वर्ष प्रयत्न करून कुठंही नोकरी मिळाली नाही म्हणून लेक्चरशिप करताहेत. आणि कंपन्यांमध्ये नोकर्या करणार्या आमच्यासारख्यांना बळंच फेसबुक वर रेक्वेस्टा पाठवून कँपससाठी कॉलेजला येण्याची गळ घालताहेत.
आत्ताची नोकरी नीट आहे ... पण
आत्ताची नोकरी नीट आहे ... पण लेक्चरर प्रोफेसर ई शिकवण्याच्या बाबतीत इंटरेस्ट आहे...
----- शिकवणे तुम्हाला आवडत असेल तर जरुर विचार करा...
प्रत्येक व्यावसायाचे फायदे आणि तोटे आहेत, सर्वात महत्वाचे तुम्ही करत असलेल्या कामातुन तुम्हाला समाधान, आनन्द मिळायला हवा. मग ते काम कुठलेही असो.
शिक्षकी पेशात रोज तुम्हाला नविन काही शिकायला मिळते असा माझा अनुभव आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन बॅचला शिकवत असताना, प्रत्येक विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धत वेगाळी असते, नव-नवे प्रश्न समोर येतात. तुम्ही शिकवत असताना तुम्हाला स्वत:ला शिकण्याची सन्धी मिळते. मी स्वत: शिक्षकाचे काम करतो आहे आणि मला रोज नवे काही शिकायला मिळते. मी मुलान्ना प्रश्न विचारण्याची पुर्ण मुभा दिलेली आहे. तुम्ही प्रत्येक वर्षी तेच ते शिकवत असलात तरी कामाकडे बघण्याचा दृष्टीकोनात तुमचा आनन्द सामावलेला आहे. मला माझा व्यावसाय मनापासुन आवडतो.
अता हे सर्व आदर्शवत वाटत असले तरी भारतात काही ठराविक ठिकाणी परिस्थिती थोडी वेगळी आहे (हे असे का झाले त्याला काराणे आहेत पण तो वेगळा विषय आहे). कॉलेजात तुम्हाला नोकरी मिळेल... पण पगाराच्या बाबत मोठी रड आहे. वेळेवर होतोच याची शास्वती नाही आहे. पुर्ण पगार देतिलच असेही नाही. कागदावर एक आणि प्रत्यक्षात निम्मा.... मुलान्ची अॅडमीशन कमी झाली असे कारण दाखवुन मॅनेजमेन्ट पगार देताना खुप खळखळ करते. याला अपवाद आहेतच...
पुणे विद्यापिठातील अत्यन्त नावाजलेल्या कॉलेजात पागार वेळेवर होतील. पण चिखली सारख्या ठिकाणी किन्वा नाशिकच्या कॉलेजात तुम्हाला १० आठवड्याने पगार मिळेल...
अनेक - अनेक वर्षे निम्या पगारावर (सही करतानी रक्कम वेगळी) काम करणारे माझे मित्र आहेत. १९८०- २००० पर्यन्त कागदावर असलेल्या पगाराच्या रकमेच्या निम्म्या रकमेवर काम करवुन घेणे असे प्रकार सर्रास होत.... मग खुप तक्रारी झाल्यावर सरकारचे नियम तयार झालेत... सम्पुर्ण पगार हा बॅन्केत जमा व्हायला हवा. पण त्याचा अम्मल होत नाही. सरकारने चेकनेच बॅन्केत पैसे जमा करा असे सान्गितले तर मॅनेजमेन्ट कॅश मधे अर्धा पगार परत घेणार.
तुम्ही नोकरी ज्या ठिकाणी करणार आहात त्या कॉलेजची व्यावस्थित माहिती काढा, तेथे काम केलेल्या ५- १० लोकान्कडे सखोल चैकशी करा... सर्व बाजुन्चा विचार करुन शिक्षकी व्यावसायात शिरा. निर्णय घेण्यासाठी आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा...
अनेक - अनेक वर्षे निम्या
अनेक - अनेक वर्षे निम्या पगारावर (सही करतानी रक्कम वेगळी) काम करणारे माझे मित्र आहेत. १९८०- २००० पर्यन्त कागदावर असलेल्या पगाराच्या रकमेच्या निम्म्या रकमेवर काम करवुन घेणे असे प्रकार सर्रास होत.... मग खुप तक्रारी झाल्यावर सरकारचे नियम तयार झालेत... सम्पुर्ण पगार हा बॅन्केत जमा व्हायला हवा. पण त्याचा अम्मल होत नाही. सरकारने चेकनेच बॅन्केत पैसे जमा करा असे सान्गितले तर मॅनेजमेन्ट कॅश मधे अर्धा पगार परत घेणार. >>>>> बिझिनेस म्हणून जिकडे तिकडे भूछत्रांसारखी कॉलेजेस उघडली जातात तिथे होत असेल असा भ्रष्टाचार बहुतेक. अर्थात अश्या संस्थांमुळे अख्खं शिक्षण क्षेत्र वाईट ठरत नाही. कित्येक खूप जुन्या संस्था अजून त्यांची आब राखून आहेत.
पाट्या टाकणार्यांनी ह्या क्षेत्रात येऊन क्षेत्राचं नाव खराब करुच नये. अर्धा दिवसच शिकवू शकत असाल तर तो अर्धा दिवस पुर्णपणे गुरुच्या भुमिकेत शिरुन शिकवा. जीव तोडून शिकवणार्या अनेक शिक्षकांना सरसकट बोल ह्यांच्यामुळेच लावला जातोय. बोल लावणारे त्या हाडाच्या शिक्षकांचा विचारच करत नाहीत. काही संस्थांमध्ये तर ऋषीतुल्य शिक्षक होऊन गेले असतील.
जुन्या गोष्टी जाऊदेत. पण काही वर्षांपुर्वी जावा बेसिक आणि अॅडव्हान्स केलं तेव्हा तिथला तिशीतही न शिरलेला शिक्षक असा काही जीव तोडून आणि विद्यार्थ्यांना पटकन कळेल अश्या पद्धतीने शिकवायचा, की तो देखिल हाडाचा शिक्षक ह्या कॅटॅगरीतच धरला पाहिजे.
एकादा शिक्षक पाट्या टाकतच असेल तर विद्यार्थ्यांनी टॉपिक कळेपर्यंत विचारुन विचारुन समजून घ्यायचं. शिक्षक हैराण झाले तरी चालतील. त्यांनाही कळेल की शेंड्या लावून चालणार नाही.
असो...खूप अवांतर होतंय. मीच बहुतेक आउट डेटेड आहे
मी अजूनही थोड्या काळापुरतीही जेव्हा विद्यार्थिनीच्या भुमिकेत शिरते तेव्हा समोरचा शिक्षक (irrespective of gender and age) मला अत्यंत आदरणीयच असतो. मला त्या टॉपिकमधलं थोडंफार आधीच माहित असेल तरी मी अगदी ओला मातीचा गोळा होऊन बसते. त्या शिक्षकाला जे शिकवायचंय ते शिकवू देते आणि एकंदर जे माझ्याकडे जमा होईल त्याचं जास्तितजास्तं चांगलं ब्लेंड स्वतःमध्ये उतरवून ठेवायचा प्रयास करते. मेमरी चिप उडाल्यामुळे जेवढं घेतलं त्यातलं थोडच स्टोअर होत असेल, त्याला इलाज नाही 
सहज आठवलं म्हणून, एका
सहज आठवलं म्हणून, एका महाभागाने 'ऑप्टीक फायबर' शिकवताना आता एक दोन वर्षात टेलिफोनच्या सगळ्या तारा काढून ऑप्टीक फायबर बसवणार आहेत. इतकच नाही तर पुढच्या आठ-दहा वर्षात, एमएसईबीच्या तारा जाउन तिथं सुद्धा ऑप्टीक फायबर येणार आहेत असं सांगितलं होतं. आता बोला. >>>> अरे बापरे!
शाळेत असताना एका कवितेत "उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मिरात" अशी ओळ होती. आमच्या नेहमीच्या बाई आल्या नसल्याने त्या ऑफ तासाला दुसर्या एका शिक्षकांनी येऊन ही कविता शिकवली होती. त्यांनी चक्क "नाशिकमध्ये उन्हाळा जास्त असतो. तिथले वारे इतके उष्ण असतात की काश्मिरातले गुलाबही सुकतात" असा अर्थ सांगितला होता. अतिशयोक्ती नाही. आमचे चेहरे बघण्याजोगे झाले होते. पण कुणीच त्या सरांची खिल्ली उडवली नव्हती. नंतर आमच्या परांजपे बाई आल्यावर त्यांना पुन्हा ती कविता शिकवायला सांगितली. त्या सरांनी सांगितलेला अर्थ बाईंना सांगितल्यावर त्यांनी त्या सरांबद्दल काहीच निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली नाही आणि आम्हाला काहीच उत्तर न देता सरळ शांतपणे पुन्हा कविता शिकवली. बाईंच्या ह्या वागण्यातूनही मी काही शिकले
काय शिकालात?
काय शिकालात?
"उष्ण वारे वाहती नासिकात,
"उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मिरात" <<
ही ओळ भूगोलामधे कुठे काय पिकते/ बनते वगैरे टाइपच्या गोष्टी पाठ करण्यासाठी जे गाणे बनवले जाइल त्यातली आहे.
या ओळीची फोड 'बघा नाशकात उष्ण वारे वाहतायत आणि तरी येडे लोक गुलाब सुकवण्याचे काम काश्मिरात करतात' अशी होते...
(हा विनोद आहे. आणि तो सिरीयसली करणारे अस्तित्वात असू शकतात!)
धागा भरकटत
धागा भरकटत चाललाय.....
लेक्चरर शक्यतो टाळा, एकतर त्यातून मिळणारे उत्पन्न फारसे नाही आणि दूसरे संस्थामधील नियम ,अटी ,शिस्त हे जरा जास्तच असते. शक्य असल्यास एम टेक करण्याचा प्रयत्न करा. सहायक प्राध्यापक म्हणून जॉब मिळू शकेल, पुण्यात किंवा मुंबईत काही ठिकाणी बाहेरून एम टेक (बाय डिस्टन्स ) करणे शक्य झाले आहे. सध्याची नोकरी सांभाळून ते करता येईल.
धागा भरकटत चाललाय.....>>>
धागा भरकटत चाललाय.....>>> मान्य. सॉरी
भरकटत वगैरे काही नै हो. होउदे
भरकटत वगैरे काही नै हो. होउदे (ब्यांदविड्थ) खर्च!
मुळात इतर इतर पेशांपेक्षा डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापकांवर थोडीशी जास्त सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. केवळ नोकरी जाइल या भितीने पुर्णपगारावर सही करून अर्धा पगार घेणारी लोक उद्याचे नागरीक काय घडवणार? असल्या कुचकामी शिक्षणामुळे अनेक सेल्स इंजिनीअर्स बीई झालेले असतात. मागच्या वर्षी पुणे विद्यापिठाच्या बीईच्या कितितरी हजार शिटा रिकाम्या होत्या. एक चार पाच क्वालेजेस सोडली तर बाकिच्या प्रत्येक कॉलेज मध्ये प्राध्यापकांना प्रत्येकी किमान पाच विद्यार्थी आणायला सांगितलं होतं. याही वर्षी अशीच परिस्थिती असणार आहे.
परवा मनिपाल मुक्त विद्यापिठाचा फोन आला होता. एम्टेक किंना एम्बिए करा म्हणत होते. मी विचारलं लेक्चर्स कुठे होणार आहेत? कोण आहेत लेक्चरर्स, त्यांचं प्रोफाइल बघायला मिळेल का? फीझ किती आहे? तुमच्या कडे ल्याब आहे का? त्यात कोणकोणते टूल्स-एक्वीपमेंट्स आहेत? पुस्तकांची लायब्ररी आहे का? ऑनलाईन अॅक्सेस आहे का? नमांकीत प्रकाशन आय ट्रीपल ई, सायन्स डायरेक्ट वगैरेंचे पेपर वाचता येतील का? हे प्रश्न ऐकून तो त-त-प-प करायलागला. त्याचं एकच म्हणणं होतं की दोन लाख भरा आणि परिक्षा सोपी असणार आहे, तुम्ही कंपनीत काम करत असल्यामुळे तुम्हाला सगळं येतच असणार आहे आणि तुम्हाला डीग्री मिळेल जेणेकरून तुम्हाला प्रमोशन मिळेल. त्याला झापून फोन कट केला.
केवळ मुलींशी बोलतो म्हणून माझ्या एका हुशार मित्राची इंटर्नल एका प्राध्यापकाने ठेवली होती. त्याच्या थेअरी पेपर मध्ये तो वर्गात हायस्ट होता. तो म्हणायचा गुरूपोर्णिमेच्या मुहुर्तावर त्याला जोड्यानी मारलं पाहिजे.
ज्यांनी हा धागा उघडला आहे
ज्यांनी हा धागा उघडला आहे त्यांचे विचार ऐकायचे आहेत....
इब्लीस्,तुर्रमखान्,उदय आणि त्यांच्यासारखे इतर..>>अनुमोदन...खरय अगदी...तो ऑप्टीकल फायबरवाला किस्सा माझ्या मित्रासोबतपण घडला होता.तुमची कॉलेजं,'गुरू' सेम की काय हो...
चांगले शिकवणारे आहेत नाही कोण म्हणतय...पण किती आहेत तसे?
मला वाटतय की बाहेरच्या शैक्षणिक परीस्थीतीची जाणीव आपल्याला असावी. MIT,VIT,COEP,SINGAD,PICT किंवा Welingkar,Bajaj,SNDT किंवा तत्सम इंजी. आणि मॅनेजमेंट्च्या संस्थांवरून सगळ्ं ठरवलं जाऊ नये.हे म्हणजे पूण्या-मुंबईला होईल तो आपल्या देशाचा,राज्याचा 'ग्रोथ रेट' खरा असं होईल. बाकीचे जिल्हे बसलेत वाट बघत...आणि सरकारला(उगाचच) दोष देत हो.
AICTE/UGC चे नॉर्म्स बर्याच ठिकाणी पाळले जातात कां?विद्यापिठांचं त्यावर लक्ष्य आहे कां?BE,MBA केलं आणि नोकरी मिळत नाही म्हणून रडकुंडीला आलेली मुलं/चिंतातूर आई-वडील मी जवळून बघीतलेत.त्यांचे आई-वडील शिक्षणावर खर्च करतात.यावर उपाय काय? कुणी बोलेल का? कुणाकडे प्रॅक्टीकल उपाय असल्यास सांगीतले जावेत.ते करायची धमक आहे का?कायदेशीर मार्ग आहेत का काही?पगार कमी मिळणे,निम्माच मिळणे किंवा इतर...उपाय काय आहेत...?
बाकी आनंदी यांना बरेच परर्याय सुचवले गेलेले आहेत...आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत पर्याय संपलेले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ही चर्चा वेगळीकडे वळली तरी हरकत नसावी.
खरतर बोलणं सोपं आहे.पण चांगला पगार मिळाला,सगळं व्यवस्थित फॉलो झालंच,तर किती इंडस्ट्री वर्कींग लोक येतील शिकवायला कॉलेजांवर???
***
तुम्ही सल्लागार (Consultant)
तुम्ही सल्लागार (Consultant) म्हणून देखील काम करु शकता.
आय एस ओ गुणवत्ता प्रणाली,
ई आर पी (एन्टरप्रायझेस रिसोर्स प्लॅनिंग)
सर्वसाधारण विमा क्षेत्रामध्ये सर्वेक्षक (जनरल इन्शुरन्स सर्वेयर)
फिक्स्ड इंडस्ट्रीयल व्हॅल्युएटर
औद्योगिक प्रशिक्षक
अशा अनेक क्षेत्रां मध्ये आपण आपल्या सोयीनुसार दिवसाचा कमी अधिक वेळ देत कार्यरत राहून घरगुती जबाबदार्या देखील पार पाडू शकता.
मी देखील मागील पाच वर्षांपासून सल्लागाराचाच व्यवसाय स्वीकारला आहे. नोकरी, व्यापार आणि उद्योग या सर्वांपेक्षा जास्त समाधान देणारे हे चरितार्थाचे एक चांगले साधन आहे.
>>>>पण चिखली सारख्या ठिकाणी
>>>>पण चिखली सारख्या ठिकाणी किन्वा नाशिकच्या कॉलेजात तुम्हाला १० आठवड्याने पगार मिळेल... >>>>
उदयन
सामान्यिकरण करू नका ही नम्र विनंती
मी व माझे बरेच मित्र नाशिकला शिकवतात.
पगार ५ तारखेस नियमित मिळतो.
बहुतेक ठिकाणी ही समस्या नाही
धन्यवाद
उदयन सामान्यिकरण करू नका ही
उदयन
सामान्यिकरण करू नका ही नम्र विनंती
मी व माझे बरेच मित्र नाशिकला शिकवतात.
पगार ५ तारखेस नियमित मिळतो.
----- मी सर्व ठिकाणी आहे असे म्हणत नाही आहे. "हे सर्व आदर्शवत वाटत असले तरी भारतात काही ठराविक ठिकाणी परिस्थिती थोडी वेगळी आहे (हे असे का झाले त्याला काराणे आहेत पण तो वेगळा विषय आहे)." हे मी वर म्हटले आहे. गैर समज व्हावा हा माझा हेतू नाही. बोदवडला माझ्या मित्राने सुरवातीला काही वर्षे बिनपगारी शिक्षकाचे काम केले आहे, आज मिळतो आहे पुर्ण पगार आणि स्थिर झालेला आहे. माझ्या माहितीत अजुन काही उदाहरणे आहेत आणि हा १ केवळ अपवाद आहेत असेही नाही. गरिब, अडलेल्या व्यक्तीचे असे समर्थन असते "माझे कुणी आबा/बाबा/टग्या ओळखीचे नाही आहे, माझ्या कडे देणगी (लाच) म्हणुन देण्यासाठी लाखात पैसेही नाही आहेत, मी खुप काही दैदिप्यमान/ कर्तबगार व्यक्ती नाही आहे, मग घरात रिकामे बसण्यापेक्षा बिनपगारी काही महिने/ वर्षे काम केले तर बिघडले कुठे?" मॅनेजमेन्टच्या (ज्यान्ना शिक्षाणाशी आणि शिक्षकाशी काही घेणे देणे नाही - केवळ पैसे कमावण्याचा एक व्यावसाय म्हणुन ते खुर्चित बसले आहेत) मते 'तुम्ही नाही तर तुमच्या जागा घ्यायला अनेक लोक रान्गेत उभे आहेत.'
तुमचा अनुभव वेगळा आहे हे वाचुन आनन्द झाला.
@विज्ञानदासः बरोबर आपल्याकडे
@विज्ञानदासः बरोबर
आपल्याकडे शिक्षणखेत्राचीच वाट लागली आहे, त्यात मुक्त विद्यापिठाचं, बाहेरून डिग्र्या मिळवण्याचं पीक आलं आहे. मुलाखतींमध्ये मी खूपदा दोन-तीन वर्षांचाच अनुभव असेल किंवा असल्या बाहेरून मिळवलेल्या डिग्र्या रिसुम्येवर असतील तर मी उमेद्वाराला, आभ्यासक्रमात कोणकोणते विषय होते? त्यात कुठले प्याईंट्स होते, कुठली पुस्तकं रिफर केली होती असे प्रश्न विचारतो. आधी केलेल्या प्रोजेक्टस मध्येही कोणतीही गोष्ट मुळापासून समजून घेण्याची, पुस्तकं वाचायची, मेहनतीची तयारी खूप कमी जणांमध्ये दिसून येते. बहुतेकजण इथून-तिथून गोळा करून काहीतरी 'जुगाड इंजिनीअरींग' केलेलं असतं. यासाठी इतर घटकां बरोबरोबरच नालायक शिक्षक आणि प्राध्यापक जबाबदार आहेत.
बहुतेकजण इथून-तिथून गोळा करून
बहुतेकजण इथून-तिथून गोळा करून काहीतरी 'जुगाड इंजिनीअरींग' केलेलं असतं. यासाठी इतर घटकां बरोबरोबरच नालायक शिक्षक आणि प्राध्यापक जबाबदार आहेत.
याची कारणं:-
१-(सॅलरी)पैशाच्या मूल्यात मोटीव्हेशनचा अभाव आहे.(या सोबत अनुभवाचा अभावही जोडायला हवा.सॅलरी आत्ता कमी आहे असे अनुभवी शि़क्षकसुध्दा चांगले शिकवतात.विद्यार्थ्याला समजून घेतात्,असं दिसतं)
२-शिक्षक नालायक नसतो.वरचा मुद्दा परत विचारत घ्या.तो तसा कां वागतो.
३-त्याला वाटत असतं आपल्याला टिकायचंय इकडे.हातचं राखून शिकवा वगैरे ही मानसिकता काही बाबतीत आहे.
४-पोरं बाहेर क्लासेस लावतायत.कशाला शिकवायचं वर्गात.(किंवा हा स्वत: बाहेर त्याचे क्लासेस घेत असतो)
५-आपल्याकडची 'सरसकट' शिक्षण पद्धतसुद्धा जबाबदार.
६-NET/SET ची मनामध्ये भिती तसेच मार्गदर्शनाचा अभाव.
७-मुळात शाळेपासूनच संशोधक वृत्तीच्या अभावाने PhD,MPhil चं पाट्या टाकून बस्तान असणे.Phdला मग्रूर,माज असलेला कधी ढिसाळ गाईड मिळणे.गाईड न मिळणे.
८-वाढलेली लोकसंख्या व त्याचे करीअर ऑप्शनशी आपण घातलेले अजब प्रपोर्शन.अजब शैक्षणिक हायरार्की...
९-UGC/AICTE/NAAC/NAB-यांची ढिसाळ धोरणे.
काही ठिकाणी ही परीस्थिती मात्र बदलतेय नक्कीच.पण परत,काहीच ठिकाणी.
मला वाटतंय आपण दोन-चारच बोलतोय.कुणी बोलायला तयार नाही याचा अर्थ एक तर त्यांना हे पटतय किंवा त्यांना त्याच्याशी घेणे-देणे उरलेले नसावे.नेहमीची मराठी रड आहे ही.श्वानांचा कसा त्रास होतोय त्यावर आवर्जून बोलणं चालु आहे पण अशा विषयावर कुणाचे कसे काहीच बोलणे न यावे.का?(माफ करा परत स्पष्ट बोललो.)या आधी कुठे अशी चर्चा झाली आहे का?
---------
मुलगी लहान आहे .. तिला जस्तित
मुलगी लहान आहे .. तिला जस्तित जस्त वेळ देता येउन अत्ताची चांगला प्रोफाईल आणि जबाबदार्या असलेली नोकरी सोडुन साधी नोकरी (लेक्चररशिप साधी ई. वाद नको प्लिज) आणि त्यात आवड पण असल्याने .. लेक्चरर चा विचार करत आहे...>>>>>>>>>>
आता समजा तुम्हाला हवी तशी शिकवायची नोकरी मिळाली. पुढे मुलगी मोठी झाल्यावर आणि तुमच्यावर तिची डिपेंडन्सी कमी झाल्यावर तुम्हाला परत ती नोकरी करायची आहे का शैक्षणिक क्षेत्रातच करीयर करायचे आहे हे नक्की ठरवा.
शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा सॉफ्ट्वेअर डेवलपमेंट क्षेत्रात असो..डेडिकेशनची गरज सगळीकडे असेलच. पुढे तुम्ही शिकवायची नोकरी सोडुन परत डेवलपमेंट क्षेत्रात यायचे म्हटले (काही वर्षानी) तरी तो पीस ऑफ केक असणार नाही. आणि शैक्षणिक क्षेत्रातही आरामाचे काम असेल असे मला वाटत नाही.
(I am assuming you are in software development but my statement is generic..it applies to all sectors).
मुलगी लहान आहे आणि तिला द्यायला वेळ हवा असेल तर आहे तिथेच पार्ट टाईम काम करणे किंवा कामचे तास कमी करुन घेणे, किंवा वर्क फ्रॉम होम असे काही पर्याय यावर जरुर विचार करा.
शि़क्षण क्षेत्राला फारच नावे
शि़क्षण क्षेत्राला फारच नावे ठेवली जात आहेत इथे...........
या क्षेत्रातही चांगले करिअर आहेच ना.सहायक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक किंवा प्राध्यापक यांचे पे स्केल चांगले आहे. काही खाजगी संस्थात पगार वेळेवर होत नाही,अर्धा पगार मिळतो वगैरे यात तथ्य आहे,मात्र सर्वच संस्थांत असे होत नाही. नाण्याच्या दोन बाजू प्रत्येक क्षेत्राला आहेत तसेच इथेही आहे.
वेळ मिळावा म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारु नये.त्या नोकरीत अशी शक्यता धूसर आहे. मात्र आवड असल्यास या क्षेत्रात भरपूर वाव आहे.
Pages