Submitted by _आनंदी_ on 22 May, 2014 - 10:48
बी.ई. केल आहे..
आत्ताची नोकरी नीट आहे ... पण लेक्चरर प्रोफेसर ई शिकवण्याच्या बाबतीत इंटरेस्ट आहे...
मागे माय्बोलिवरच एक धागा होता तिथेही हा प्रश्न विचारल होता पण तो धागाच सापडत नाहिये...
१) मला विचारायचे होते सेट नेट ची गरज नाही ना?
आणि २) त्याच कॉलेज मध्ये एम ई करत तिथेच शिकवण्याचे पण ऑप्शन असतात अस ऐकुन आहे..
क्रुपया अनुभव शेअर करा महिती द्या...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
??
??
सध्या एम. ई. पूर्ण असणे
सध्या एम. ई. पूर्ण असणे अवश्यक आहे असे ऐकून आहे. नेट्/सेट ची गरज नसते. पण UGC appointment in case of open category जरा अवघड असते.
M.E. karane aawshyak aahe.
M.E. karane aawshyak aahe. Ph D pan kelit tar pramotions lawkar milun jatat.
प्राध्यापकी अजिबात करू नका.
प्राध्यापकी अजिबात करू नका. रोज नवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर, बौद्धीक आणि थोडे शारिरीक श्रम घ्यायची इच्छा असेल तर, निर्मितीतला आनंद घ्यायचा असेल तर, बहुगुणी लोक संग्रह वाढवायचा असेल तर प्राध्यापकी करू नका.
पण वासरात लंगडी गाय व्हायचं असेल तर, बूड न हलवता कमीत कमी बौद्धीक आणि शारिरीक श्रमात धाप लागण्यासरखा पगार घ्यायचा असेल तर, कुणाच्या तरी मुंजीला किंवा केळवणाला वगैरे जायचं कारण सांगून कधिही दांडी मारायची असेल तर, नुसते पुस्तकी ज्ञान पाझळून सर्व जगाची अक्कल मलाच दिलेली आहे हा क्वालेज मधल्या पोरा-टोरां बरोबर राहून आलेला गैरसमज मिरवायचा असेल तर, पिएचडी साठी अप्लाय करून बरीच कामं विद्यार्थ्यांकडून घ्यायची असली तर, पुढच्या वेतन आयोगा साठी संप करायचा असेल तर प्राध्यापकी करा.
तुर्रमखान यांन अनुमोदन..
तुर्रमखान यांन अनुमोदन..
हेतु इतके वरवरचे
हेतु इतके वरवरचे नाहीत...
मुलगी लहान आहे .. तिला जस्तित जस्त वेळ देता येउन अत्ताची चांगला प्रोफाईल आणि जबाबदार्या असलेली नोकरी सोडुन साधी नोकरी (लेक्चररशिप साधी ई. वाद नको प्लिज) आणि त्यात आवड पण असल्याने .. लेक्चरर चा विचार करत आहे...
एम ई गरजेच आहे ऐकुन आहे .. म्हणुनच "त्याच कॉलेज मध्ये एम ई करत तिथेच शिकवण्याचे पण ऑप्शन असतात अस ऐकुन आहे.." हे लिहिल आहे .. असे शिकत लेक्चररशिप करण्या बद्दल कोणाला माहिती आहे का?
_आनंदी_, मायबोलीवर प्रज्ञा९
_आनंदी_, मायबोलीवर प्रज्ञा९ म्हणून एक आयडी आहे, त्यांच्याशी संपर्क साधलात तर आवश्यक ती माहिती मिळू शकेल.
ओके मंजूडी... बोलते
ओके मंजूडी... बोलते त्यांच्याशी...
>>> १) मला विचारायचे होते सेट
>>>
१) मला विचारायचे होते सेट नेट ची गरज नाही ना?
आणि २) त्याच कॉलेज मध्ये एम ई करत तिथेच शिकवण्याचे पण ऑप्शन असतात अस ऐकुन आहे..
क्रुपया अनुभव शेअर करा महिती द्या...>>
१) इंजिनीयरिंगच्या प्राध्यापकीस गरज नाही- अजून तरी
२_ हे ऑप्शन आहे पण कवडीभर पगार मिळेल.
तुर्रमखान यांच्याशी अंशतः सहमत --- खरोखर काही अचिव्ह करायचे असेल तर शिकवायच्या भानगडीत पडू नका. अर्थार्जन कमी, जॉब समाधान शून्य, शिकणे फारसे नाही
हा पर्याय पन्नाशी नंतर योग्य आहे, त्या आधी बकक्ळ कॉर्पोरेट अनुभव कमवा. मग एम ई ची गरज नाही.
पण
>>मुलगी लहान आहे .. तिला जस्तित जस्त वेळ देता येउन अत्ताची चांगला प्रोफाईल आणि जबाबदार्या असलेली नोकरी सोडुन साधी नोकरी (लेक्चररशिप साधी ई. वाद नको प्लिज) आणि त्यात आवड पण असल्याने .. लेक्चरर चा विचार करत आहे...
हा निर्ण य कॉन्शसली, सर्व बाजू ध्यनात ठेवून घेत असाल तर योग्य आहे
अधिक माहिती/ चर्चेसाठी वि पू करा. मी हा मार्ग अ वलंबला असून अजून शिकवत आहे.
नुसते पुस्तकी ज्ञान पाझळून
नुसते पुस्तकी ज्ञान पाझळून सर्व जगाची अक्कल मलाच दिलेली आहे हा क्वालेज मधल्या पोरा-टोरां बरोबर राहून आलेला गैरसमज मिरवायचा असेल तर,
क्या बात है! हजारवेळा सहमत
रेव्यु धन्यवाद.. विपु केली
रेव्यु धन्यवाद.. विपु केली आहे..
म्हणतात ना आपल्या देशात जो
म्हणतात ना आपल्या देशात जो इतर काहीही बनू शकत नाही तो शिक्षक बनतो.
नुसते पुस्तकी ज्ञान पाझळून
नुसते पुस्तकी ज्ञान पाझळून सर्व जगाची अक्कल मलाच दिलेली आहे हा क्वालेज मधल्या पोरा-टोरां बरोबर राहून आलेला गैरसमज मिरवायचा असेल तर,
क्या बात है! हजारवेळा सहमत >>>>>>
काहीही हुशारी दखवायची नाहिये... मुलगी आणि मुलगी .. हा एकच वीक पॉईंट आहे.. काहीही बॅकग्राऊंड माहिती नसताना येवढ्या आत्म्विश्वासाने कसे प्रतिसाद देता?
फायनांशिअल प्रॉब्लेम्स आहेत्च .. आई बाबांची जबाबदारी आहे.. म्हणुन अगदीच नोकरी न सोडता तिला वेळ देता येईल असा ऑप्श्न शोधत आहे..
अगदी लेक्च्रर्शिप सोडुन पण जर कोणाकडे काही पर्याय असतिल तर सुचवावेत...
म्हणतात ना आपल्या देशात जो इतर काहीही बनू शकत नाही तो शिक्षक बनतो.
>>>>>>>
???? समजलाच नाही प्रतिसाद..... खुप कमी लोक शिक्षक असतिल कदाचित इतर नोकर्यांच्या तुलनेत ...
काही बनू शकत नाही हे तर माझ्या बाबतित तर लागूच होत नाही..
चांगल्या पगाराची नोकरी आहेच .. काम पण ओके आहे.. मुलिला वेळ देता येत नाही म्हणून अगदीच नोकरी सोडुन घरी बसण्यापेक्शा काही दुसरे पर्याय आहेत का बघत आहे...
त्यतल्या त्यात शिकवायला आवडत म्हणुन इथे हा प्रश्न ..
कुठल्याकुठे साध्या प्रश्नाला घेउन जाताय??
आनन्दी तुम्ही लेक्चर शिप
आनन्दी तुम्ही लेक्चर शिप करण्यासाठी B.E. चालत का M.E. पण करावे लागते का लेक्चर शिप करताना पण M.E केल तर चालत का ??? कुठे जागा असेल तर तिथे जाउन चौ कशी करा कॉलेज मधे जाउन .... आधीच नोकरी सोडू नका
कॉलेज मधील शिक्षकी पेशा सोपा
कॉलेज मधील शिक्षकी पेशा सोपा नाही. तिथले challenges वेगळे.
१. नोकरी मिळताना M. E. नाही म्हणून ad-hoc appointment होऊ शकते. ती नोकरी contract based असल्याने नियमित नेमणुकीचे फायदे नाहित. पगारही असणार. आणि बर्याच ठिकाणी फक्त रविवारी सुट्टी असते. (पुण्यात एका कॉलेज मध्ये शनिवार-रविवार सुट्टी हवी असेल तर उरलेले ५ दिवस ८-८. तास असे कामाचे तास असतात.)
२. M. E. झाल्यावर तुमचा industrial experience किती आहे त्यावर lecturer/sr. lecturer appointment होऊ शकते. (पुन्हा open category हा एक आहेच)
३. आधी लिहिल्याप्रमाणे UGC appointment हा एक असतो त्यासाठी तशी opening असावी लागते.
४. कॉलेज मध्ये गेल्यावर आयुष्य सोप्पा असेलंच असं नाही. जे जुने शिक्षक असतात ते वर्षानुवर्षे शिकवत असलेला असे नाही.
५. त्याच बरोबर बहुतांशी शिक्षक हे शिक्षण पूर्ण करून थेट शिक्षकी आलेले असतात आणि वर्षानुवर्षे तिथेच असतात. त्यामुळे politics खूप मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता असते.
६. हवी असतील promotions हवी असतील तर PhD गरजेचे होते.
ता. क. Pune University ने ह्या वर्षी नियम काढला आहे की M. E. च्या admission GATE score वर असणार आहेत.
मनस्विता खुप धन्यवाद... तुमचे
मनस्विता खुप धन्यवाद...
तुमचे सगळे मुद्दे विचारात घेईन ..
काहीही हुशारी दखवायची
काहीही हुशारी दखवायची नाहिये... मुलगी आणि मुलगी .. हा एकच वीक पॉईंट आहे.. काहीही बॅकग्राऊंड माहिती नसताना येवढ्या आत्म्विश्वासाने कसे प्रतिसाद देता?
अहो हा प्रतिसाद तुम्हाला नाही. फक्त त्या विधानाबद्दल आहे. मला त्याचा फारच अनुभव आल्यामुळे दिलाय. क्षमस्व!
पण वासरात लंगडी गाय व्हायचं
पण वासरात लंगडी गाय व्हायचं असेल तर, बूड न हलवता कमीत कमी बौद्धीक आणि शारिरीक श्रमात धाप लागण्यासरखा पगार घ्यायचा असेल तर, कुणाच्या तरी मुंजीला किंवा केळवणाला वगैरे जायचं कारण सांगून कधिही दांडी मारायची असेल तर, नुसते पुस्तकी ज्ञान पाझळून सर्व जगाची अक्कल मलाच दिलेली आहे हा क्वालेज मधल्या पोरा-टोरां बरोबर राहून आलेला गैरसमज मिरवायचा असेल तर, पिएचडी साठी अप्लाय करून बरीच कामं विद्यार्थ्यांकडून घ्यायची असली तर, पुढच्या वेतन आयोगा साठी संप करायचा असेल तर प्राध्यापकी करा.>>> दुर्दैवी प्रतिसाद असेच खेदाने म्हणावे लागेल.

अतुलजी, आपल्याकडुनदेखिल अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. असो.
_आनंदी, तुम्ही visiting faculty म्हणुन सुरुवात करु शकता. किंवा डिप्लोमा/इंजिनियरींगच्या मुलांचे क्लासेस घेऊ शकता. शुभेच्छा!
अतुलजी, आपल्याकडुनदेखिल अशा
अतुलजी, आपल्याकडुनदेखिल अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती.
माझ्या प्रतिसादाचा कृपया चुकीचा अर्थ घेऊ नका. मी स्वतः शिक्षक आहे. आनंदी यांनी जरुर प्राध्यापकाचा पेशा पत्करावा. अतिशय "नोबल" म्हणतात तशा तर्हेचे ते काम आहे. मला स्वतःला ते काम करायला मिळतं याचा आनंद तर आहेच. पण माझे जे आदर्श आहेत त्यात टिळक, आगरकरांपासुन ते नरहर कुरुंदकर, जीएं पर्यंत सारेच प्राध्यापक होते हा देखिल भाग आहे.
माझे विधान मला पीएच डी करताना आलेल्या काही अत्यंत कटु अनुभवाशी संबंधीत आहे. काही माणसे तशी असतात.
बाकी प्राध्यापकाच्या पेशाबद्दल अतिशय आदर आहेच.
भ्रमर आणि इतरही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास येथेच पुन्हा क्षमा मागतो.
आनंदी - म्हणजे तुम्हाला फारसे
आनंदी - म्हणजे तुम्हाला फारसे काम न करता, आरामात, घरचे, मुलीचे, नातेवाईकांचे सांभाळुन पगार पाहीजे आहे तर. असे संस्कार करू नका मुलीवर. तिला वाटेल आयुष्य असेच सोपे आहे. पैसे मिळवायला फार कष्ट करायला लागत नाहीत.
काय भयानक मानसिकतेचे लोक आहेत
काय भयानक मानसिकतेचे लोक आहेत हे
_आनंदी_, ह्या असल्या प्रतिसादांकडे तू दुर्लक्ष करशीलच. कोणाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नकोस. नको तिथे आपली ऊर्जा वाया नाही घालवायची.
@मंजुडी - हे माझ्यासाठी होते
@मंजुडी - हे माझ्यासाठी होते का?
नको तिथे आपली ऊर्जा वाया नाही घालवायची.>>>>>>> तसे ही आनंदी कमीत कमी उर्जा घालवून जास्तीत जास्त फायदा देणार्या जॉब चीच चौकशी करत होती.
ह्यात इतके राग येण्या सारखे
ह्यात इतके राग येण्या सारखे काय आहे. माझ्याच माहितीती किमान ४ लोक अशी आहेत की ज्यांना यूजीसीची पोस्ट मिळाली पण M. E. करण्यासाठी प्रोजेक्ट बाहेर २५००० रुपये देवून केलेले होते. इतके करून एक जन नापास झाला. मग त्याच्या एका नातेवाईकाने त्याला करून दिले आणि त्या बेसिस वर ती व्यक्ति आता इंजिनियरिंगला शिकवते. विचार करा हेच लोक पुढे PhD अश्याच पद्धतीने करणार. मग वरच्या पडला गेल्यावर काय दिवे लावणार? आज तेच दिसते आहे. नुसतेच म्हणायला सगळे इंजिनियर पण ह्यातले खरोखर किती एखादे प्रोडक्ट बनवू शकतात? ह्याचमुळे उच्च शिक्षणाची सगळी वाट लागली आहे. पण आपल्याला फक्त आपला स्वार्थ पहायचा आहे. बाकी इतके वर्ष हेच चालू आहे त्यामुळे फार कंठशोष करून उपयोग होणार नाही. हे असेच चालू राहायचे.
मनस्विता यांच्या प्रतिसादाला
मनस्विता यांच्या प्रतिसादाला दाद देईन.त्यांनी मोजक्या मुद्द्यात योग्य माहीती दिली आहे.
जरी तुम्हाला हाच जॉब सध्या करणं आवश्यक वाटत असेल तरी या जॉबमधल्या निगेटीव्ह मुद्द्यांकडे आधी लक्ष्य द्यावत.
शिक्षकीपेशा सोपा आहे असं म्हणून करायला जात असाल तर हा समज मनातून काढा.तो डिसेंट जॉब आहे,ठराविक वेळेत आहे हे मुद्देही सेकंडरी आहेत.
शिक्षकांचीच आजच्या शिक्षकाबद्द्लची मतं बदलायला लगलियेत...सगळेच कार्पोरेट्सला प्राधान्य देऊ लागले तर चांगले शिक्षक कसे मिळणार?थोडा संयम ठेवाव लागतो या जॉबमध्ये,मला वाटतं हे सगळ्यांनाच मान्य आहे.
तुम्ही आत्ता Ad-Hoc basisवर राहून पुढे अनुभवाच्या जोरावर चांगल्या कॉलेजला शिकवू शकता.स्वतःच्या क्लासेसचा पर्याय चांगला.पण तिथेही विद्यार्थी मिळेपर्यंत धीर धरावा लागतो.तुम्ही CHB+Classes हा पर्यायही निवडू शकाल.
बाहेर कुठे इंजि. क्लासेस असतील तर त्यांना विचारून पहा.
११वी,१२वी च्या क्लासचा पर्यायही आहे जोपर्यंत लेक्चररचा जॉब शोधता आहात्,तोवर प्रायवेट क्लासेसला विचारून बघायला हवं.त्यांना गरज असते शिक्षकांची.तात्पुरता ठिक वाटतो हा पर्याय.
तुर्रमखान यांच्या,'आजचा शिक्षका'च्या व्याख्येत न बसणारा शि़क्षक होण्याची बाकी छान संधी आहे.
शुभेच्छा..!
आपल्याला फक्त आपला स्वार्थ
आपल्याला फक्त आपला स्वार्थ पहायचा आहे. >>Exactly...Agree by all means w.r.t. Teaching Profession.
बाकी इतके वर्ष हेच चालू आहे त्यामुळे फार कंठशोष करून उपयोग होणार नाही. हे असेच चालू राहायचे.>>नक्की दोष कुणाचा आहे? या कॉलेजांमधे काय-काय चालतं माहीत नाही कां?पण बोलणार कोण?
विद्यार्थीच आज-काल शिक्षकांच्या चुका काढतो.त्याचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतंचय...अरे वरती नाव असतं 'अमुक अमुक इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च'...तिकडे रिसर्चच्या नावाने ठणठणपाळ असतोच पण मॅनेजमेंटसुध्दा काय शिकवतात त्यांनाच माहीत...मग याला कारण कोण?
(हा प्रतिसाद फक्त सलील यांच्या पोस्ट्ला आहे.त्यावर इतर लोकही विचार करू शकतात.)
====================================
Self Educated Person/Student Is Second Best Teacher In The World.First Is Experience.
बोटं अक्षरशः शिवशिवताहेत...
बोटं अक्षरशः शिवशिवताहेत... कंट्रोल.....
विज्ञानदास, ह्याला खूप
विज्ञानदास, ह्याला खूप वेगवेगळी करणे आहेत पण मुख्य कारण म्हणजे सरकारने घातलेला घोळ. लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी कॉलेजेस आणि शाळा नाहीत. बर तिथेही खरोखरच ज्याला शिकवायची आवड आहे आणि हा पेशा पुढील पिढीला घडवण्यासाठी आहे हेच आता फार कोणाला मान्य नाहीये. माझ्या घरात माझे आई,वडी,,काका, काकू, आजोबा शिक्षक होते. अजूनही लोक आठवण काढतात पण सध्या पोराला शिकवायचे म्हणजे क्लास लावलाच पाहिजेल. मग शाळा/कॉलेजेस हवेच कशाला. आपल्या सोयीसाठी आणि जास्त काम नको ह्या नावाखाली लोक शिक्षक झालेली बघितली आहेत. इथे आनंदी ह्यांना दोष देणे हा हेतू नसून खरोखर तळमळ व्यक्त करणे इतकाच उद्धेश आहे. पण मुळात भारत हा असा देश आहे की लोक इथे आधी इंजिनियर वगैरे होतात आणि मग आपल्याला काय करायचे आहे हे ठरवतात.
खरे आहे... माझेही
माझेही आई-वडील्,आज्जी-आजोबा सगळेच शिक्षकी पेशात.आणि खरे असं वाटतं ज्यांच्या घरी हे या पेशातलं वातवरण आहे त्यांनाच जास्त तळमळ आहे या फिल्डबद्दल.बोटं शिवशिवणार नाहीत तर काय...मी पेशा वगैरे म्हणतोय्,पण तो तसा रहिलाय का खरच..? सगळ्यांन माहीत्ये...जाऊ दे ती चर्चा इकडे नकोच.
सलिल, तुम्ही माहितीमधिल ४
सलिल, तुम्ही माहितीमधिल ४ जणांवरुन सध्याच्या 'शिक्षकांवर बोट ठेवलंय आणि तुमच्या घरातील ४ जण किती चांगले शिक्षक होते असा दाखलाही देतांय. !! आपल्याला विचारु शकतो कां, की आपण काय शिक्षण घेतलय आणि सध्या काय करता??
प्रत्येक क्षेत्रात चांगले-वाईट आहेतच, पण वर काही आयडींनी सरसकट शिक्षकी पेशा (प्राध्यापकी म्हणा हवं तर) हा कमी श्रमात पैसे कमावण्याचा मार्ग वगैरे वगैरे अस जे काही म्हटलय, त्याचं नक्कीच वाईट वाटलं.
काय भयानक मानसिकतेचे लोक आहेत
काय भयानक मानसिकतेचे लोक आहेत हे >> +१
कमीत कमी उर्जा घालवून जास्तीत जास्त फायदा देणार्या जॉब चीच चौकशी करत होती.>> काय वाईट आहे? अहो यालाच तर एफिशियन्सी म्हणतात, आणि त्यांना शिकवण्याची आवड आहे, वेळ फ्लेक्झिबल हवाय. दिलेले काम मन लावून करायची तयारी दिसतेय.
मंजूडीचा दुसरा सल्ला न मानता उर्जा वाया दवडलिच. क्षमस्व.
Pages