पनीर भुर्जी

Submitted by सायु on 22 May, 2014 - 03:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर : २५० ग्राम
कांदे : २ मध्यम आकाराचे (बारिक चीरलेले)
टोमाटो : ३ (बारिक चीरलेले)
हिरव्या मिरच्या: २ (अगदी बारिक चिरलेल्या)
कोथिंबीर : १ छोटी वाटी (बारिक चीरलेली)
जीरं : १ छोटा चमचा
धणे पुड : २ चमचे (चहाचा)
जीरे पुड : १/२ चमचा (चहाचा)
हळद : १/२ चमचा (चहाचा)
तिखट : १ चमचा (चहाचा)
साखर : १/२ चमचा (चहाचा)
तेल : एक पळी
मीठ : अंदाजे

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम पनीर स्वच्छ धुवुन किचन न्यापकीन नी कोरडे करुन घ्या.. आता किसणी नी वन साइड ग्रेट करुन घ्या.
म्हणजे किसतांना एकाच दिशेनी किसायचे.. हात रिवर्स नाही आणायचा.. नाही तर भुर्जी चा लगदा तयार होईल..
आता कढईत पळी भर तेल टाकुन त्यात अर्धा चमचा जीर घाला (मोहरी नको.. लुक जातो भुर्जी चा) त्यानंतर हिरवी मिरची, बारिक चिरलेला कांदा परतवुन घ्या, नंतर त्यात हळद, तिखट, धणे- जीरे पुड घाला, चांगले परतवुन मग टोमाटो घाला... एक वाफ काढली की त्यात किसलेले पनीर घाला, मिठ, साखर घालुन परतवुन घ्या..
अगदी ५ मिनीट झाकण ठवुन वाफ काढुन घ्या... कोथिंबीर पेरुन गरनीश करा... झाली भुर्जी तय्यार...

सकाळी मुलांच्या डब्यासाठी झटपट आणि सोयीचा पदार्थ आहे...

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी
अधिक टिपा: 

फक्त ग्रेटींग च टेकनीक फोलो करा.. आणि भुर्जी जास्त वेळ शिजु देउ नका.. फक्त पाच मिनीटच

माहितीचा स्रोत: 
धाकटी बहिणः सौ. दिपा नगरकर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी झट्पट डीश आहे ही. भाजी होत आली की त्यात सिमला मिर्चीचे मध्यम तुकडे घालून एक वाफ काढायची. थोडा क्रंच असू द्यावा. तेल सढळ हाताने घालावे लागते. वरून लवंग दालचिनीची तुपातली फोडणी घालून वेगळी लज्जत आणता येते. कॅलरी मोजणार्‍यांच्या कामाचं अजिब्बात नाहीये Happy

पुण्याचीविनीता, हो खरच. चुलीवर च्या भाजीची लज्जत काही औरच असते नाही!
दा, तिकडे पनीर नाही मिळत का?
चिन्नु तु सांगतेस ते वेरियेशनस नक्की ट्राय करीन.. खुप इन्ट्रेस्टींग वाटतायत...

छान पाककृती. श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे शाकाहारी वैविध्यतेची गरज आहे त्यासाठी एकदम परफेक्ट पाककृती.

यात मी कधीकधी गरम मसाला, लसूण पेस्टही घालते. कधी तेलात जिऱ्याची फोडणी करण्याअगोदर एखादी लवंग, दोन मिरीदाणे, तमालपत्राचा व दालचिनीचा तुकडा (खडा मसाला) घालून परतते व मग त्यात जिरे व बाकीचे फोडणी साहित्य.
या भुर्जीत कांद्याबरोबर कांदापातही छान लागते, तसेच स्वीटकॉर्नही!
पनीरवर मीठ, तिखट, धणेजिरेपूड, गरम मसाला भुरभुरून ते जरा मॅरिनेट करायचे (दहा पंधरा मिनिटे) आणि मग थेट फोडणीत कांदा, टोमॅटो परतून त्यात घालायचे, असेही करता येते.

मोहरी,हळद-हिंग,हिरवी मिर्ची, कडिलिंबाची फोडणी करायची, प्रखर आचेवर (पाणी अजिबात सुटत नाही) कांदा टोमॅटो परतुन किसलेले पनीर घालायचे. मिठ, चवीला साखर घालुन लगेच गॅस बंद करायचा. वरुन लिंबु पिळायचे. एकदम मस्त खमंग चव येते.

मस्तच. आमची आवडती डिश.

मी धने जिरे पूड नाही घालत. फोडणी नेहेमीसारखी करते आणि घरी पनीर करून करते बऱ्याचदा त्यामुळे लगदाच असतो. आले-लसूण-मिरची ठेचा किंवा तुकडे घालते. चीजही घालते बरोबर.