अतिरीक्त लहान कमाई कशी व कोठे गुंतवणूक करावि…

Submitted by avinash jadhav on 18 May, 2014 - 06:24

नमस्कार
कधी एखादे काम झाले कि ५-१० हजार अतिरिक्त कमी मिळते. ती कमी फालतू खर्चामध्ये न उडवता मला गुंतवणूक करायची आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतावानुकींचा विचार होता पण त्या संबधित मला काही माहित नाही. मला long tearm आवडेल.
कृपया पर्याय

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही ऑर्गॅनिक अंडी विकत घ्या. एक कोंबडी विकत घ्या.
२१ दिवसांनी पिल्ले येतील. ती वाढवा. मग चांगल्या कोंबड्या झाल्या की विका.
मग त्या पैशातून एक मेंढ्यांची जोडी विकत घ्या.
त्यांना खूप पिल्लं होतील. ती मोठी करून विका किंवा मेंढ्या भादरून त्यांची लोकर विका.
मग त्या पैशातून एक गाय आणि बैल विकत घ्या.
गाईला खूप वासरं येतील ती वासरं आणि गाईचं दूध विकून जे पैसे येतील त्यात एक शेत विकत घ्या.
शेतीतून जे पैसे येतील त्यात एक घर बांधा.
मग आरामात रहा किंवा अ‍ॅग्रोटुरिझम / मामाचं घर टाईप्स लॉज चालवा.
ऐष करा.

५ ते १० हजार जर प्रति महिना बचत होत असेल तर
एखादे घर लोन काडुन विकत घ्या ज्याचा हप्ता ५ ते १० हजार असेल

अविनाश - तुम्ही मासिक ५००० रुचे म्युचलफंडचे SIP (Systematic Investment Plan) account उघडा आणी महिना ५०००रु भरा
काही चांगले परतावा देणारे म्युचलफंड

Birla Sun Life Top 100 Fund (D)
HDFC Top 200 Fund (D)
ICICI Pru Top 100 Fund (ड)

आता हे गुरू कोण ते पण सांगा.>>
सांगण्याची काय गरज आहे, तेही अशाच खवचट सल्ल्यांच्या पिंका टाकत असतात इथे तिथे!!

अविनाश ही ५-१० हजार रु. अतिरीक्त कमाई जर frequently होत असेल तर वर राजू यांनी सांगितल्या प्रमाणे सीप घ्या. परतावा चांगला असतो.
अधून मधून अशी कमाई होत असेल तर सोने-चांदी खरेदी करु शकता. कींवा Infosys,TCS असे blue chip शेअर्स जे दिर्घ मुदती साठी नक्कीच चंगला परतवा देतील.
शुभेच्छा !! Happy

सिपसाठी रेग्युलर वरकड उत्पन्न असणे गरजेचे आहे.
जर ही रक्कम लाँग टर्म मध्ये (किमान तीन वर्षे, रादर पाच वर्षे) वापरायची नसेल, तर त्या त्या वेळी तर एखाद्या diversified equity mutual fund मध्ये गुंतवा. फार विचार करायचा नसेल तर इन्डेक्स फंडमध्ये गुंतवा.

तुम्ही किती धोका पत्करू शकता (आर्थिक्/मानसिक दृष्ट्या) हेही पहा.