अमेरिकेत डोकं न वापरता उंधियू

Submitted by परदेसाई on 16 May, 2014 - 11:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

इथे अमेरिकेत शीतपेटीमधे उंधियूची पाकिटे मिळतात त्यातले एक.
१.२५ टेबलस्पून धणे पावडर
.७५ टेबलस्पून जीरे पावडर
१ टीस्पून मिरची पावडर (किंवा कमी).
३ टेबलस्पून तेल.
१/४ टीस्पून हळद.
३/४ टेबलस्पून ओवा.
२ टेबलस्पून खोबरे
१/२ टीस्पून आले पेस्ट
१/२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टेबलस्पून साखर...
१/२ टीस्पून मीठ

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यामधे पाकीटातल्या भाज्या टाका.. त्यात हळद, तिखट, धणेपूड, जीरेपूड, मीठ टाकून मिसळून घ्या.
पाच/दहा मिनीटानी त्यातले वांगे, आणि मुठिया वेगळ्या करा.
२ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात फक्त वांगे भाजून घ्या.. (नाहीतर वांगे शिजत नाही). Microwave मधे लावले तर वांगेही शिकते..
आता उरलेल्या भाज्या मसाल्यासकट टाका.
भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका. भाजी वाफेवर शिजणार आहे.
१२ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या.
मधल्या वेळात ओवा+खोबरे+ २ टेबलस्पून पाणी मिक्सर्मधे वाटून घ्या.
Timer झाला की आले/लसूण आणी वाटण घालून भाजी ढवळा.
उरलेले तेल घाला. मुठिया टाका.
परत भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका.
४ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या..
साखर टाका.. ढवळा.

(आवडत असल्यास साखर वाढवा... )

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

. वांगे शिकत नाही आणि मुठिया शिजलेल्याच असतात. (म्हणुन वेगळे).
. अगदी घड्याळ लावून करता येते.
. जास्त तेल घालू शकता (विकतच्या भाजीला असते तसे).
.डोके चालवावे लागत नाही.

http://www.maayboli.com/node/45519 'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे
http://www.maayboli.com/node/46057 मालवणी भाजाणे वापरून केलेल्या पाककृती (व्हिडिओ)
http://www.maayboli.com/node/45955 पास्ता
http://www.maayboli.com/node/45519 बाळ बटाटे
http://www.maayboli.com/node/42083 कोवळा फणस
http://www.maayboli.com/node/46123 डाळ पक्वानची डाळ

माहितीचा स्रोत: 
साबा व प्रयोग...
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या नशीबाने एक गुज्जु मैत्रीण बरीच वर्षे करून खायला घालत होती. आता दूर गेली पण आम्ही या डीशपासून थोडा ब्रेक घेतलाय पुन्हा वाटल्यास डोकं न चालवता इकडेच येऊ Wink

साती," पापलेटाची टकली " टाकच. यंदा पापलेट्ची तहान आपलं भूक टकलाच्या रेस्पिवर भागते का ट्राय करूया Proud

आधी सांगायचं ना, उग्गाच डोकं वापरलं Proud
रेस्पी मस्त! टायमर टीपांबद्दल धन्यवाद! इथे मात्र पाकीट नसल्यामुळे काय फेकून काय वापरावं याबद्दल अनिश्चितता आहे!

फ्रोजन भाजीएवजी मटणाचा खीमा चालतो का? फ्रीजरमधल्या दक्षिणेच्या कोपर्‍यात पडून आहे कधीचा... हा सुद्धा फ्रोजनच आहे. संपवायचा आहे म्हणून विचारतेय. Proud

------------------------------------------------------------------------------------------

मायबोलीची परंपरा राखूनच हा प्रश्ण विचारलाय ल्क्षात घ्या.

देसाई, काल ह्या डोकं न चालवता पद्धतीने उंधियु केला. प्रमाण अगदी मोजून मापून घेतलं नसलं तरी मला फार ड्राय, फडफडीत वाटला. बाहेरचा जो असतो त्यात भाज्या पोहतील इतकं तेल असतं. तेव्हा तेलात कंजूषी चालणार नाही असं दिसतंय.

देसाई, या पद्धतीनं उंधियो करून बघितला. मस्त झाला आहे. डोकं वापरू नका सांगितलं आहे तरी वापरलं आणि २ बदल केले. बा.ब., वांगी आणि मुटके तेलात परतून घेतले छान खरपूस आणि त्या ह्यांच्या रेसिपीमध्ये राजवाडी गरम मसाला घालायला सांगितला आहे म्हणून एक टी स्पून मसाला घातला. भाजी जरा कोरडी झाली. पुढल्यावेळी थोडं आधण आलेलं पाणी घालणार आहे. मुटके अगदीच २-३ आहेत. फ्रोझन मुटके वेगळे आणून ते पण थोडे जास्त घालेन. बाकी चव मस्तच आली आहे. एकुणात जास्तीची मंडळी जेवायला असतील तर करायला झटपट आणि वाढायला भारी आयटम होइल हा.

तेलच हवं. पाण्याने गिचगिचित होईल. >>> सायो, हे माझी पोस्ट टाकल्यावर वाचलं. मी थोडा वेगळा काढून त्यात अगदी थोडं पाणी घालून मावेमध्ये गरम केला तर अजिबात गिचगिचीत वाटला नाही. वाढताना १-१ चमचा तूप पण घातलं. सढळ हातानं तेल घालूनही भाजी जरा कोरडीच वाटली मला.

रेसिपी छान आहे. सिंडरेलाची वांगी-मुटके परतून घेण्याची आयडियाही आवडली.

इन्स्टन्ट पॉट उंधियूच्यापण रेसिपीज आहेत नेटवर.

परवाच प्रयोग केलेला म्हणुन लिहिते.
हिरवी मिरची,ओल खोबर,कोथिंबीर, ओवा,जिरे + धने पावडर, आल पेस्ट (कॉस्ट्कोची तयार्),लसून (ऑप्शनल) ( कडीपत्ता : खुप होता म्हणुन घातला),लिंबु रस सगळ एकत्र करुन मिक्सर मध्ये वाटून घेतल.
इन्स्टंट पॉट सॉते मोडवर ऑन केला. तेल घातल. जिरे घातले. वाटण १.५ मिनिट परतल. गरम मसाला एक मिनिट परतला.
फ्रोजन उंधियो भाज्यांची दोन पाकिट घातली. (फ्रोजनच. डिफ्रॉस्ट केल नाही. टाईम चेंज होईल नाहीतर. )एक कप पाणी घातलं.( जस्ट भिजतील निम्म्या भाज्या एवढच) .
झाकण लावून प्रेशर कुकर मोड हाय. सिल्ड. २मिनिट.
२ मिनिट झाल्यावर क्विक रिलिज. वरून थोड तेल सोडा हव तर.
अतिशय उत्तम भाज्या शिजल्या. अज्जिब्बात गिचका झाला नाही. वांगी चिवट झाली नाहीत. अगदी ताज्या भाज्यांप्रमाणे उंधियु लागत होता.
मी दोन मिनीट ठेवून बघितल कारण प्रयोग करत होते. आवडिप्रमाणे अजुन एक मिनिट वाढवू शकता.

मी यावेळी फ्रोजन पाकिट आणून उंदियो केला पण माझा फुकट सल्ला त्यापेक्षा त्याच भाज्या फ्रोजन पाकिटं आणून केल्या तर बरं. दोनच मुठिया आणि सर्व प्रकारचे दाणे नाहीत, हमखास न शिजणारी दोन वांगी, दीड बटाटा आणि इतर कंद नाहीत त्यामुळे मजा नाही आली. आता कुठल्या कंपनीचं पाकिट होतं तेही आठवत नाही. असो. कदाचित एकाच माणसाला एक-दोन वेळेसाठी फ्रोजन पाकिट चालावं पण मी तर नको म्हणेन.

पूर्वी एक दोन वेळा आणलेलं तेव्हा वांगी अजिबात शिजली न्हवती. आता सीमाच्या रेसिपीनी इंपॉ वर्जन बघू एकदा करुन.

कालच माझ्या फ्रीजरमधे हे पाकिट दिसलं कधी आणून ठेवलं होतं कोण जाणे?
मला वाटलं यातच मसाला दिलाय आणी मला फक्त तो टाकून भाजी शिजवायची आहे.
हिरवी मिरची,ओल खोबर,कोथिंबीर, ओवा,जिरे + धने पावडर , कडीपत्ता,लिंबु रस सगळ एकत्र करुन मिक्सर मध्ये वाटून घेतल.>>>>>>>>>>>>> कधी मूड आला तर करेन एवढं सगळं!

दीपचा असावा. स्टोअर मध्ये गेले कि बघून सांगते. बहीण येणार आहे थँक्स गिव्हिंगला . तेव्हा परत करेन. तेव्हा जरा डिटेलमध्ये लिहायचा प्रयत्न करते.
अंजली, मसाला हवा तो घाल. बाईंनी इथे कृती लिहिली आहे तो मसाला पण मस्त होतो एकदम.
मेन थिंग इज, इन्स्टंट पॉट मध्ये करन सोप आहे . आणि भाज्या अज्जिब्बात न मोडता , गिचका न होता, चिवट न होता शिजतात.
मसाला तुम्हाला हवा तो घाला.

पाच वर्षानी जाग आली? >>> बघा की, त्यापेक्षा आमचा शिट्टी बाफ बरा. टाका, टाका नवीन रेस्प्या टाका.

वेका, कुठल्या ब्रॅन्डचं पॅक होतं? मी जे वापरलं त्यात मुटके वगळता बाकी सगळे बीन्स, बटाटे, सुरण व्यवस्थित प्रमाणात आहेत.

अंजली, देसाईंनी दिलेलं प्रमाण वापरून डोळे झाकून भाजी कर, मस्त होते.

मेन थिंग इज, इन्स्टंट पॉट मध्ये करन सोप आहे . आणि भाज्या अज्जिब्बात न मोडता , गिचका न होता, चिवट न होता शिजतात.
मसाला तुम्हाला हवा तो घाला.>>>>>>>>>>>>>>>

अंजली, देसाईंनी दिलेलं प्रमाण वापरून डोळे झाकून भाजी कर, मस्त होते.>>>>>>>>>>>> ओके... Happy

माझ्याकडे दीप ब्रँडचं पाकिट आहे.

झक्की मोड:
अहो हे तर काहीच नाही. मी नुस्त्या तोंडाचा वापर करून दहा लोकांसाठी उंधियू करू शकतो. नुसते तोंड उघडून म्हणायचे "अग ए, आज उंधियू कर बरं का" झालं! तासाभरात उंधियू ताटात येतो! Proud

Pages