आजोबाच्या प्रिमीयरची तिकीटे मिळतील का असा माप्रांना इमेल केल्यावर ४ तिकीटे मिळणे अवघड आहे दोनच मिळतील असे उत्तर मिळाले वर थोडासा हिरमोड झाला. तशी दोन तिकीटे मिळाल्यामुळे निदान प्रिमीयरला तरी हजेरी लावता आली.
रुद्रने (मुलाने) मला नाही बघायचा आजोबा असा ऐनवेळी सपशेल नकार दिल्याने सिध्देशला (भाचा) व ऋताला सोडायला आम्ही सिटीप्राईड कोथरुडला पोचलो आणी दिलीप छाब्रीयां (डिसी) गाडीत आजोबा दिसले. आजोबाच्या प्रिमीयरला आजोबा येणार का हा लेकीचा प्रश्न होताच. तिला वाटले होते खराच बिबट्या येतो आहे की काय? पुणे म्हणले की हल्ली ढोल हवाच असे झाले आहे त्यामुळे बाहेरच एक ढोलपथक तयार होते. काही क्षणातच ढोल ताशे दुमदुमु लागले व गाडीत बसलेले आजोबा त्या तालावर नाचायला लागले.
आजवर प्रिमियरला एवढी गर्दी बघीतली नव्हती. हळुहळु सुजय डहाके, साकेत कानेटकर, विभावरी देशपांडे, केतकी माटेगावकर, हॄषीकेश जोशी, श्रीकांत यादव अशी अनेक मंडळी जमा झाली व चित्रपटगॄहात चांगलीच गर्दी झाली. हल्ली सर्वच मराठी कलाकारांचे वास्तव्य मुंबईला खूप अधिक झाले आहे हे पुण्यात असलेल्या कलाकारांच्या हजरीवरुनच जाणवले. मुंबई व पुणे दोन्हीकडे असलेली उर्मिला मातोंडकरची अनुपस्थिती मात्र अनेकांचा हिरमोड करुन गेली. या चित्रपटामुळे या चित्रपटाच्या खर्या नायीका असलेल्या डॉ. विद्या अत्रेय यांची उपस्थिती सुखावह होती. त्यांच्यासोबत बहूतेक त्यांचे सहकारी सुध्दा होते पण ते नीट कळले नाही.
सर्वांचे आजोबा व इतर कलाकारांसोबत फोटोसेशन संपल्यावर सगळे वरती निघाले. पहील्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाच्या प्रिमीयरला एवढी गर्दी झाली होती. एस्कलेटरवरुन बाहेर निघता न आल्याने काही जण पडायच्याच बेतात होते. वर गेल्यावर चिन्मय म्हणाला की जर खाली बसुन चित्रपट बघायची तयारी असेल तर चला पण दुसर्या दिवशी पहाटे उठुन निघायचे असल्याने व काहीच खरेदी केली नसल्याने चित्रपट मात्र बघीतला नाही. तिथे असलेल्या गर्दीमुळे व कलकलाटामुळे अनेक जेष्ठ नागरीक बाहेर जायचा रस्ता शोधु लागले होते.
चित्रपट बघीतलेली ऋता व सिध्देशची पहिली प्रतिक्रिया होती की वन्यजीवनावर असा काही चित्रपट बनेल असे वाटलेच नव्हते. चित्रपट सुरु होण्यापूर्वी सर्व कलाकारांची ओळख करुन देण्यात आली. वन्यप्राण्यावर संशोधन करणार्या पडद्यामागच्या कलाकारांची या निमित्ताने ओळख झाली. चित्रपटातील कार्टुन फार काही खास वाटले नाही. विहीरीत पडलेल्या बिबट्याला पकडुन त्याच्या शरीरात (शेपटीत) मायक्रोचीप बसवण्यात येते व त्याचे नामकरण करण्यात येते आजोबा. त्यानंतर त्याला माळशेज घाटात सोडण्यात येते व चालु होते एक मोठा प्रवास. या प्रवासात त्याने एकदाही कुणालाही इजा केलेली नसते. डॉ. पूर्वा व त्यांच्या टीमने घेतलेला बिबट्याच्या प्रवासाचा मागोवा व त्यामधे आलेल्या अडचणी यावर हा चित्रपट बेतलेला आहे. गावात पाणी पिण्यासाठी अनेक ठिकाणी बिबटे येत असत. त्यामधेच कधीतरी कुत्री पळवणे वगैरे घटनांमुळे उगाच त्याबद्दल एक प्रकारची भिती बसते. एकंदरीतच म्हातारा झालेला हा बिबट्या माळशेज घाटातुन १००-१५० किमीचा प्रवास करत संजय गांधी उद्यानात पोचतो. एकंदरीत चित्रपट मस्त होता. हा चित्रपट बघण्याची संधी दिल्या बद्दल मायबोलीचे अनेकानेक धन्यवाद.
क्रमशः फोटो व व्हिडीओ जमेल तसे /तेव्हा अपलोड करतो.
कलकलाटाबद्दल अगदी अगदी! अशा
कलकलाटाबद्दल अगदी अगदी! अशा वेळी गर्दीचे व्यवस्थापन करायला पब्लिक अनाउन्समेन्ट सिस्टीम सिटीप्राईडमध्ये असायलाच हवी असे वाटून गेले.
माझ्या शेजारी बसलेला बालचमू चित्रपटावर खुश होता.
तेच तर. बिचारे ज्येना हैराण
तेच तर. बिचारे ज्येना हैराण झाले होते.