सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 May, 2014 - 10:23

लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे. ती हाक तशी नुसती लिहून ऐकवता येणार नाही,ती ऐकवूनच लिहायला पाहिजे,अशी आहे.हा आमचा मद्राशी शास्त्री...तिथून आपला (बालाजी-सारखा)भारदस्त देह घेऊन जाता..जाता त्याला नेहमी ती हाक मारतो.सुरेsssssssssशं..,यंडगुंडो गुलिकुंद्डो??? मग तो सुरे..शं'ही त्याला तसल्याच वेड्यावाकड्या जिल्ब्यां-मधे काहितरी उत्तर देतो.मग आमचा हा तामिळ डॉन ( Lol ) मद्राशी-शास्त्री आपला तो बालाजी-देह घेऊन,सुरेश'च्या गाडी मागे पाण्याच्या पिंपाजवळ उभा र्‍हातो,आणि सुरेशं त्याला "शा...स्त्री,यंडौड्गोड्गुडो...यिड्ली!" ..असं म्हणून त्याच्या हतात,गरमा-गरम यिड्ली-सांबारची डिश ठेवतो. मग आमच्या या मद्राशी-शास्त्री'चे मनसोक्त 'होई'पर्यंत त्या दोघांच्या गप्पा त्या रम्य तामिळीत चालतात.(आणि त्या तिथे ऐकायला अजूनच रम्य-मज्जा येते.) मग जरावेळानी मद्राशी-शास्त्री'ची 'नजर' माझ्याकडे पडते.आणि बशीतल्या यिड्लीला-सांबारात चमच्याने मौत-देत तो मला विचारतो...

मद्राशी-शास्त्री:-आंsssssss,शाsssस्त्री..यिदर कैसे आज?'स्लॅक' है क्या??? (दुष्ष्ष्ट!!! )

मी:-नै जी!..आज सुबे का काम खतम हो गया,अब दिनभर रिकामा है।

मद्राशी-शास्त्री:-आ..आ..आ..आ...(हा त्याच्या हसण्याचा आवाज बरं का! तामिळ्यांच्या भाषेतच काय?पण हसण्याच्या उच्चारी आवाजात सुद्धा काही स्वराक्षरव्यंजनं,अस्तित्वातच नाहीयेत!म्हणूच त्यांचा ह्हा..ह्हा..ह्हा..ह्हा..! -हा हसण्याचा आवाजसुद्धा, आ..आ..आ..आ..! असा..घश्यात काडी अडकल्यासारखाच येतो.) आणि मग मी 'मोकळा-सापडल्याच्या' आनंदात मला तो दुपारच्या कामाची ऑफर देतो...बिज्जी नै ए..तो चलो दोपर को अमारे सात..वानव्डी मे नव्ग्र का जप और हवन ए! बओत पैसा मिलेगा...आते क्या? (ही मद्राश्यांची 'शेवटाला-गाजर' दाखवण्याची सवय,आपण जसा 'पहिल्यांदा'च-मुळा' दाखवतो..तश्शीच आहे!)

मी:-तुम्हारे बहोत पैसे मे,आज कितना रुपैय्या मिलने वाला है!!!? (है..य्या! =)) जय भवानी! जय शिवाजी! =)) )

मद्राशी-शास्त्री:-(परत)..आ..आ..आ..आ..,तुम बओत अ(ह)रामी है साला..चलो,देंगा तुमको..जित्ना चाईये उत्ना! दोपर को,रैट्ट २ बजे मेरे गर को आव!

मी:- हां जी..आता है जी! ( Lol )

मद्राशी-शास्त्री:- चलो..अब तंबाकू निकालो! (हलकट मेला!!! Lol )

असला काहिसा संवाद होतो,आणि माझी गाडी परत सुरेशच्या गाडीकडे वळते.मग मी नेहेमीप्रमाणे पहिलं, १ डब्बल यिड्ली (हवं तेव्हढं) सांबार घेऊन संपवतो.आणि नंतर तिथला माझा अत्यंत अवडता बट्टाट्टावडा घेऊन तेव्हढ्याच सांबारात परत उडवतो. आणखि जागा र्‍हायली असेल तर मुखशुद्धीसाठी डाळवडा/चटणी! मग पुढच्या एका पेश्शल ठिकाणी "चाsss!",किंवा मूड आला तर पूर्वीच्या भवानी केटरर्स्स कडची काssssपी! (२ वर्षापूर्वी ती चांगली मद्रासी मेस तिथनं गेली राव! Sad ) आणि अत्ताच्या त्याच्या समोर असलेल्या दुसर्‍या एका तसल्याच मेसवरची काssssपी! नंतर कँम्पातलं बर्फावरचं थंडग्गार पान(आपल्या समोर बर्फावर ठेऊन लावलेलं!) मग जरावेळ ते हिमालयी पान नीट चघळून..."झालं!" ( Wink ) ...की तसाच पुढे शिवाजीमार्केटातला इराणी चहा,आणि त्याच्यावर एक कडक डबलबार लावला..की कँम्पातनं घरापर्यंत कसं...फुलपाखरासारखं तरंगत..तरंगत..यायला मिळतं.हा सगळा कार्यक्रम ज्या आमच्या मन-पसंत यिड्ली,आणि प्रामुख्यानी सांबारा'मुळे होतो,त्या सुरेsssssssssशं च्या या येकनंबरी यिड्ली-सांबारच्यागाडीची आणि तिथल्या पदार्थांची,आधी...ही एक नुसती फोटोरूपी झलक पाहू.

१) यात 'रंगीत छत्री' पासून पुढे वाढलेलं जे भक्तगणांचं कोंडाळं दिस्तय ना..ती सुरेsssssssssशं च्या गाडीची जागा!
https://lh5.googleusercontent.com/-Y9DkQsOu1Ds/U3CNAx9RxHI/AAAAAAAACxI/phgNUe9SSy0/s512/IMG_20140512_110130-1.jpg
२) ही सुरे...शं'ची गाडी! फक्त यात दिसतोय तो सुरेश नाही,त्याचा हेल्पर आहे.सुरेशंचा या फोटोत फक्त-हात आहे! Wink
https://lh6.googleusercontent.com/-lsaNmXMx4wI/U3CMFNApB0I/AAAAAAAACw8/zG3PgImzvHg/s512/IMG_20140512_105038-1.jpg
३)यातही पाटिआड दिसतोय..तो सुरेशंचा भाऊ आहे.आता खुद्द सुरेश हा दुसरा हायफाय श्टॉल चालवत असल्यानी या मूळपीठावर कदिमदीच दिसतो.पण कधी गेलात तर सहज ओळखाल! बघताक्षणीच कळतं,हा अण्णा आहे. कुरळे(मॅगीनुडल्स)केस,कानात सोन्याच्या रिंगा,कपाळाला त्यांच्या श्टाइलचं गंध (आणि घामही! Wink )
https://lh6.googleusercontent.com/-ROR8IZy0Uow/U3CInHQRBLI/AAAAAAAACwg/Nl5MPNFdU9A/s640/IMG_20140512_104549-1.jpg
४) आणि ही'च ती भट्टी! Wink सांबार रटारटा तापवणारी!
एक कॅन-'खाली'...एक कॅन-'वर'..।
पिण्यापूर्वी जमिनीत..पिल्यानंतर-वर॥ Lol
https://lh3.googleusercontent.com/-ugNUgZmjeAo/U3CJZBnS1NI/AAAAAAAACwo/6qZm22exQg4/s512/IMG_20140512_104912.jpg
५)ह्ये आमचं लाडकं सुरेssssssशकडचं यिड्ली सांबार!
https://lh4.googleusercontent.com/-mdVpXW_fRvw/U3CBVNg7KvI/AAAAAAAACwU/3fKI7hHpKtg/s512/IMG_20140512_104417-1.jpg
६)आनी ह्यो त्याच सांबारातला बट्टाट्टावडा...वरनं निस्तेज वाटला,तरी आतल्या आलं/लसूणाच्या (आता..क्वचितच मिळणार्‍या) मसाल्या मुळे-दणका उडवणारा!
https://lh3.googleusercontent.com/-Ti9neL1SId0/U3CMhol0g3I/AAAAAAAACxE/RWn9fKZTOD0/s512/IMG_20140512_105136-1.jpg
७) हे आमचं बर्फा-वरचं Lol पान!!!
https://lh6.googleusercontent.com/-ZEhH8K4gBKA/U3CTKwvOVqI/AAAAAAAACxk/tBPIuVVpep0/s512/IMG_20140512_123830-1.jpg
८) ह्यो शिवाजीमार्केटातला श्टाइल-सह-इराणी चहा!
hhttps://lh3.googleusercontent.com/-ZkUGjbn-Q5w/U3CUheOhQgI/AAAAAAAACxw/El1Qbwud5XU/s512/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A7_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A9.jpgअपोलो टॉकिजकडून (रास्तापेठ) के.ई.एम.हॉस्पिटलकडे जाणर्‍या रस्त्यावर उजव्या बाजुच्या..पहिल्याच गल्लीत-आत,हा आमचा सुरेsssssssssशं-यिड्लिवाला असतो. तो २/३ गल्ल्यांचा सगळा भागच त्यांचा आहे. आणि त्या गल्लीच्या एका टोकापासून ते अय्यप्पा देवीच्या पुढे..चौकापर्यंत अनेक इडली-सांबार-वडा सांबार विकणारे स्थिरावलेले आहेत.त्यांच्यापैकी ७५ ट्क्के गाड्या शुद्धमराठी-माणसांच्या आहेत.पण जशी त्यांची कॉफी(उच्चारी-काsssपी!) आपल्याला जमत नाही,तसेच त्यांचे काहीच आपल्याला जमत नाही,हे या सगळ्या गाड्या सिद्ध करतात.एव्हढच कशाला? उरलेल्या २५ टक्क तामिळ्यांपैकी सुद्धा ह्यो आमचा सुरेsssssssssशं सोडला तर एकाकडेही सांबाराची ती अस्सल चव आता (अस्तित्वातच) उरलेली नाही,हे ही खरं आहे. इतकच काय? इडलीलाही त्यांन्नी,महागाईच्या नावाखाली गेल्या १५ वर्षात भरपूर 'सोडा'...मारलेला आहे.अश्यात हा आमचा सुरेsssssssssशं म्हणजे क्या केहेने!!!? त्याच्या कडचं सगळ्यात काही अस्सल असेल,तर त्यानी आजतागायत जशीच्यातशी ठेवलेली त्यांच्या पदार्थांची चव आणि भाव! महागाई..महागाई..कित्तीही जरी असली,तरी मूलभूत गोष्टींमधे फरक करायचा नाही,म्हणजे दुष्काळातही आपलं गिर्‍हाइक ठाम रहातं. हे खर्‍या अर्थशास्त्राचं गणित त्याच्या रक्तापेक्षा मला वाटतं,त्याच्या स्वभावधर्मामधे असावं.(तिथल्या त्याच्या'च जातभाइंनी हे सिद्धही केलेलं आहे!)माझी आणि त्याची तोंडओळख सुद्धा नाही.किंवा मी त्याचं रोजच गिर्‍हाइक सुद्धा नाही. मी कधिही म्हणजे..अगदी त्या भागातून गेलो,तरी सुद्धा "---तिकडे गेलो की ---तिथे जायला(च) पाहिजे" असलं श्रद्धाळू गणितही ठेवलेलं नाही.

मला सुरेशच्या कडच्या सांबाराची अचानक तहान लागते,हेच माझं तिथे जाण्याचं खरं कारण आहे. माझ्यालेखी त्याच्याकडे मिळणार्‍या सांबारच्या चवीची तूलना ही एखाद्या नि'रव शांतता देणार्‍या देवालयासारखी आहे. तिथे जसं तो भगवंत आणि आपण हे श्रद्धेचं निस्सिम अधिष्ठान काम करून जातं,तसं या सुरेsssssssssशंच्या गाडीवरचं सांबार आणि मी ..त्याच्या बरोबरीच्या इडली आणि वड्यांबरोबर डायरेक स्वर्गात जातो.अश्यावेळी इहलोक..हे स्वर्गात जाण्याचं (काहि क्षण का होई ना!? Wink ) साधन आहे,या (खर्‍या-आध्यात्मिक Lol ) सत्यावर माझा विश्वास बसतो.
ते गरम..गरम सांबार पिताना काय काय होतं म्हणून सांगू??? आहाहाहाहाहा...!!! एकदा का ती बशी तोंडाला लागली आणि हळूहळू (परंतू नॉनश्टॉप ) ते सांबार प्यायला लागलो..की डोक्यावरची केसंपण त्याच गतीनी हळूहळू उगवणार्‍या गवतासारखी वर...वर..येऊ लागतात! आणि..मस्ताकातून थंड पाण्याचा प्रवाह अंतर्मनापर्यंत जात असल्याचा भास होतो. ब्रम्हचर्य..नावाच्या निरर्थक वाळवंटातून नाइलाजास्तव मार्ग-क्रमणा करणार्‍या युवकास,अचानक एखादी....(जाऊ द्या..लोक हो,अनुभव-शून्य जातकास,त्या प्रांतातील-सत्याची,सम्यक भाषाSप्रचीती येइलच..असे नाही!..नाही का?) ................................................
असो!!!
त्या सांबारात तो काय वापरतो? आणि काय नाही? हे विचारायच्या भानगडीत मी आजपर्यंत पडलेलोही नाही,आणि पडणारंही नाही.फक्त ती गाडी ४० वर्ष जुनी आहे,अशी माहिती मला तिथेच एकदा कानावर आली होती.

एक मात्र खरं त्याच्या गाडीवर त्या एरियातलं सगळं पब्लिक अगदी रतीब लावल्यासारखं येतं. सगळं म्हणायचं,कारण तो एरिया ख्रिश्चन/मोमिनांपासून..ते (हल्लीचे) भय्ये/मराठी लोकांपर्यंतचा,असा सर्वांचा आहे. नाश्टा काय करावा? किंवा अमकाच रोज करावा का? या बाबतीत,आपणा मराठीजनांचं वैशिष्ठ्य म्हणावं असं फारसं काहि नाही,पण उरलेल्या समाजांचं ते-तसं (आजही) आहे. एरवी ते तसे दुसर्‍यांच्या कोणत्याच ठिकाणांवर वारंवार हजेरी लावत नाहीत,पण सुरेशकडची चव त्यांना खेचून अणत असावी,असं आपलं 'मला मात्र' खात्रीनी वाटतं. नाहितर त्या एरियात 'त्यांची हॉटेलं' मुबलक असताना,त्यांच्यातलेच अ नेक-इन्सान सुरेश'ची चव चाखायला आलेच कशाला असते? अहो.. हा चविचा खेळ आहे हो,त्याला वरतून मुद्दाम तयार केलेली..ती.."वेगळेपणाची-भेळ"..फार काळ दूर ठेऊ शकत नाही! शेवटी आध्यात्मिक सत्य ही सार्वत्रिक चव नसली,तरी "चव" हे सार्वत्रिक आध्यात्मिक सत्य आहेच आहे! ते नाकारून बदलता येणार नाही...स्विकारल्यामुळे हलकं करता येइल..इतकच काय ते!!! Wink

असो!
======================
मंडळी...पुन्हा (लवकरच) भेटू अश्याच एका अव्वल-खादाडीच्या ठिकाणावर! तो पर्यंत.... राम राम!
कळावे...
आपलाच इहलोकीचा अत्रुप्त..आणि..काहि क्षणांचा स्वर्ग-वासी...आत्मा! Wink
======================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं. बरेच वर्षांत असं मस्त झणझणीत बटाटेवडा-सांबार खाल्लेलं नाही हे लक्षात आलं...
पुढच्या पुणे दौर्‍यात 'अवश्य भेट द्यायच्या ठिकाणांमधे' त्या मंगला टॉकिजजवळच्या मिसळीबरोबरच हेही खाद्यस्थळ यादीत समाविष्ट केलं आहे. धन्यवाद. Happy

व्व्व्व्व्व्वा आत्म्या तुझी लिहायची ही दिलसे स्टाईल मला फार आवडते

सुरेsssssssशं ची यिड्ली खावीच लागणार आता

असो
उत्तम लेखन
लिखते रहो

धन्यवाद Happy

एकदम सहि, रीलेट झालं. चेंबुरच्या मणीचा इडली-वडा-सांबार - हि (अशी) माणसं चिरकाल जगावी.

मुंबईत बरेच ठिकाणी रस्त्यावरच्या अण्णा लोकांकडे मिळणारे मेदूवडे जाम लुसलुशीत असतात. दुर्दैवाने सांबारमध्ये दम नसतो, कारण ते त्यांना परवडणारेही नसते म्हणा, पण तरी खायला मजा येते. कुठे गर्दी दिसली की घुसायचे बिनधास्त ..

बाकी, बर्फाच्या लादीवरचे पान, वाह क्या बात है, कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. स्टडीनाईटस मारताना तुडुंब चरून झाल्यावर माटुंग स्टेशनला आम्ही मुद्दाम ते पान खायला म्हणून जायचो.

@दक्षिणा
तुम्ही नको तेव्हा बरोब्बर खाण्याचे बीबी काढता... >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gif
का का का असे अत्याचार? >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif
=============
@वरदा

पण त्या असंख्य गाड्यांमधून नेमकी ही गाडी कशी ओळखायची? अ ओ, आता काय करायचं>>> वरती लेखनात सांगितलं आहे.. अपोलो टॉकिजकडून (रास्तापेठ) के.ई.एम.हॉस्पिटलकडे जाणर्‍या रस्त्यावर उजव्या बाजुच्या..पहिल्याच गल्लीत-आत,हा आमचा सुरेsssssssssशं-यिड्लिवाला असतो.... त्या गल्लीत दुलारी नावाचं १ जुनं हॉटेल आहे. त्या हॉटेलपुढच्या चौकात समोरच एका भल्या मोठ्ठ्या झाडाखाली ही एकच गाडी असते. (फोटो क्र.१) गाडीच्या समोर १ देऊळ आहे.

@ वरदा
त्या मंगला टॉकिजजवळच्या मिसळीबरोबरच हेही खाद्यस्थळ यादीत समाविष्ट केलं आहे. धन्यवाद.>>> इथे गेल्यावर एक गोष्ट आवर्जून पहायची.. आमचे मिसळवाले टोपिवाले-मामा, उभे असतात..त्याच्या शेजारी तर्रीचं पातेलं असतं.ते त्यांनी उघडलं की निम्म्याच्या वर आहे का खाली बघायचं. खाली असेल,तर १५/२० मिनिटानी यायचं.कारण निम्म्याखाली गेलेली तर्री नुस्तीच तिखट-जाळ रहाते. तीला तो आमचा पेश्शल करंssssट येत नाही मग! Happy

मी मायबोलीवर इडली स्टॉल लावेलेला असताना ह्यो सुरेश कोण ?
असो ,आमचा वर्च्युअल स्टॉल जगात कुठेही इडली देतो.

शेवटी आध्यात्मिक सत्य ही सार्वत्रिक चव नसली,तरी "चव" हे सार्वत्रिक आध्यात्मिक सत्य आहेच आहे! >+१ क्या बात है... झकास लिहिलयं.

जल्ला इडली सांबार म्हटलं की आम्हाला माटुंग्याचा 'मणीस'च आठवतो.

तेच म्हटले हे कुठे पाहिलेय.... तिथून पुढे गेले गल्लीच्या शेवटी की जि बिल्डिंग लागते (पुर्वी तिथे गिरणी होती ना) त्याशेजारी तंबाकूवाड्यावर झालेल्या बिल्डिंगीत माझे माहेर (आता तिथे कुणीच नाही) बाबा गेले ४ वर्षांपुर्वी आणि आईला मी एकटी राहू देत नाही
तात्पर्य सुरेश इडली भन्नाट वडे ही मस्त असतात

मस्त लिहिलंय Happy

जल्ला इडली सांबार म्हटलं की आम्हाला माटुंग्याचा 'मणीस'च आठवतो.>>>>आणि आम्हाल माटुंगा फुल बाजारातील अण्णा. Happy

वरदा,वैवकु,राज,चनस,तुमचा अभिषेक,दक्षिणा,सायो,
इडलीवाला,इंद्रधनुष्य,जाई,पुण्याचीविनिता,जिप्सी,नियती>>> सर्वासर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! Happy