नमस्कार जनहो.
माझी एक जवळची नातलग आहे. ती पुण्याला मास्टर्स करते आहे. तिच्याच वर्गात एक मुलगा आहे तोही मास्टर्से करीत आहे. दोघे एकमेकांना १२वी पासून ओळखतात. आणि दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आता ह्या दोघांचे वय २४ पुर्ण होत आहे. मुलीचे वय २४ म्हणजे लग्नासाठी योग्य आहे आणि शिवाय शिक्षण बर्यापैकी झाले आहे म्हणून आता लग्न व्हायला हवे म्हणून घरातील लोक रोज रोज तोच विषय घेऊन बसत आहेत. मुलगा आणि मुलगी घरात एकुलते एक अपत्य आहे. मुलाचे म्हणणे पडते की त्याला अजून तीन चार वर्ष हवे आहेत लग्न करायला. तोवर नोकरीमधे तो सेटल होईल. ही गोष्ट आम्हालाही पटते आहे त्या मुलाची की मुलासाठी २४ हे वय लग्नासाठी जरा कमी पडते. पण म्हणून आम्ही मुलीचे वय वाढू देण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही.
मी मुलीशी बोललो की आपल्याच जातीतील अनुरुप असे स्थळ बघू का पण त्याला तिचा विरोध आहे. ती म्हणते आहे की ती त्या मुलासाठी वाट बघायला तयार आहे आणि ही वाट बघताना काय घडू शकते हेही तिला माहिती आहे. पण ती जरा जिद्दी आहे. ती असंमजस आहे असे नाही पण तिला अगदी अपरिचित मुलाशी लग्न करणे फार मोठा निर्णय वाटतो. त्यापेक्षा जो मुलगा नीट माहिती आहे त्याच्यासाठी वाट बघून पुढे त्याच्याशीच लग्न करायला ती तयार आहे. पण पालक म्हणून आम्ही खूप खोलवर विचार करतो.
हा प्रश्न कसा मिटवावा ह्या हेतूने मी हा धागा उघडला आहे. तुम्हाला जर वेगळा मार्ग सुचत असेल तर अवश्य सुचवा. मला असे वाटते की निदान मुलामुलीचा मास्टर्से पुर्ण झाल्यावर साखरपुडा करुन द्यावा. पण, तरीही पुढे साखरपुडा होऊन तीनएक वर्ष पहाणे अवघड वाटते आहे.
कृपया ह्या विषयाशी अनुसरुन उत्तरे लिहा.
धन्यवाद.
सेटल होणार म्हणजे नक्की काय
सेटल होणार म्हणजे नक्की काय हे विचारा पहिले... आयुष्यात लोकं रिटायर्ड होईपर्यंत सेटल होत नसतात. घर, गाडी, बायको, मुलं, त्यांच शिक्षण, लग्न अशा एक ना अनेक नवीन प्रकारची जबाबदारी वाढतच जाणार आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत आणि तरीही त्यांना जर निर्णय घेण्यात अडचण येते तर काय फायदा अशा शिक्षणाचा.
तीन वर्षांनी सेटल झाले, लग्न ही केलं आणि दोन चार वर्षात काही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक (कोरोना सारखे) कारणास्तव त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली तर काय जबाबदारी घेतीलच ना कि लगेच वेगळं होणार नाही ना. दोघांना ही सांगा जसं प्रेम केलं तसं जबाबदारी पण घ्या एकमेकांची. गरज पडल्यास तुम्ही आहातच. केवळ पैसा कमवुनच यशस्वी आणि सुखी आयुष्य जगता आलं असतं तर मग पैसेवाले का वेगळं होतात.
उदाहरणे खुप आहेत....
आता सात वर्षे उलटून गेलीत.
आता सात वर्षे उलटून गेलीत. लेकुरवाळे असतील सध्या ते
(पुढे काय झालं ते विचारायच होत पण आयडी देवाघरी गेलाय)
Pages