लग्नातील हे अडथळे कसे दुर करावे?

Submitted by हर्ट on 12 May, 2014 - 01:40

नमस्कार जनहो.

माझी एक जवळची नातलग आहे. ती पुण्याला मास्टर्स करते आहे. तिच्याच वर्गात एक मुलगा आहे तोही मास्टर्से करीत आहे. दोघे एकमेकांना १२वी पासून ओळखतात. आणि दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आता ह्या दोघांचे वय २४ पुर्ण होत आहे. मुलीचे वय २४ म्हणजे लग्नासाठी योग्य आहे आणि शिवाय शिक्षण बर्‍यापैकी झाले आहे म्हणून आता लग्न व्हायला हवे म्हणून घरातील लोक रोज रोज तोच विषय घेऊन बसत आहेत. मुलगा आणि मुलगी घरात एकुलते एक अपत्य आहे. मुलाचे म्हणणे पडते की त्याला अजून तीन चार वर्ष हवे आहेत लग्न करायला. तोवर नोकरीमधे तो सेटल होईल. ही गोष्ट आम्हालाही पटते आहे त्या मुलाची की मुलासाठी २४ हे वय लग्नासाठी जरा कमी पडते. पण म्हणून आम्ही मुलीचे वय वाढू देण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही.

मी मुलीशी बोललो की आपल्याच जातीतील अनुरुप असे स्थळ बघू का पण त्याला तिचा विरोध आहे. ती म्हणते आहे की ती त्या मुलासाठी वाट बघायला तयार आहे आणि ही वाट बघताना काय घडू शकते हेही तिला माहिती आहे. पण ती जरा जिद्दी आहे. ती असंमजस आहे असे नाही पण तिला अगदी अपरिचित मुलाशी लग्न करणे फार मोठा निर्णय वाटतो. त्यापेक्षा जो मुलगा नीट माहिती आहे त्याच्यासाठी वाट बघून पुढे त्याच्याशीच लग्न करायला ती तयार आहे. पण पालक म्हणून आम्ही खूप खोलवर विचार करतो.

हा प्रश्न कसा मिटवावा ह्या हेतूने मी हा धागा उघडला आहे. तुम्हाला जर वेगळा मार्ग सुचत असेल तर अवश्य सुचवा. मला असे वाटते की निदान मुलामुलीचा मास्टर्से पुर्ण झाल्यावर साखरपुडा करुन द्यावा. पण, तरीही पुढे साखरपुडा होऊन तीनएक वर्ष पहाणे अवघड वाटते आहे.

कृपया ह्या विषयाशी अनुसरुन उत्तरे लिहा.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीचे पालक म्हणून तुम्हाला वाटणारं दडपण समजण्यासारखं आहे. पण मुलीला एवढं शिकवलंत तर तिच्या परिणाम लक्षात घेवून स्वतःच्या जीवनाचे निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही जरा विश्वास कां नाही ठेवत ? त्याकरतां ती आतां अगदीं अल्पवयीन तर नक्कीच नाही.

मुलीच्या निर्णयावर विश्वास ठेवायला मन ५० टक्के तयार आहे कारण मधे जर मुलाचा निर्णय बदलला तर जातीमधेच लग्न जुळवायला वय आड येईल.

बी,
तिला वाट पहायची इच्छा आहे तर तसे न करायला फोर्स करु नका , respect her priorities !
Honestly अमुक एक वयात लग्नं झालं पाहिजे वगैरे मेंटॅलिटी बदलायची गरज आहे.
लग्नसंस्था अतिशय Overhyped आहे आणि वयाचे नॉर्म्स वगैरे गौण आहे तिच्या इच्छे पुढे !
लोक काय म्हणतील याची जास्तं चिन्ता केली जाते मुलामुलीच्या मर्जी पेक्षा ..

मुलीला हि नोकरी मिळून आर्थिक स्वातंत्र्य येइलच ना तोवर(आणखी ३ वर्षाने) जे तिला आवश्यक व चांगले ठरेल. २७ काही फार वय नाही आज काल.(असे माझे मत).
मुलगी आर्थिक दॄष्ट्या स्वतंत्र नसेल व अजून शिकत असेल तर कशाला आधीच जबाबदारी वाढवा? मुलाला काहीच उत्पनाचे साधन नसेल तर आता त्याची तयारी नसताना उगाच जबाबदारीत ढकलले म्हणून तुम्हाला व मुलीला उगाच दोष द्यायला नको पुढे.
आणि तुम्ही मुलाची खात्री केली आहेत ना? तो दुसर्‍या शहराबाहेर कुठे जाणार आहे का? मुलाचे वर्तन चांगले असेल व त्याचे ठावठिकाणे माहित असतील तर तुम्ही वरचेवर भेटु शकता की (जर चिंता असेल की मुलगा पळून गेला वगैरे :)) .
इतकी चिंता करून काय होणार?(अ. मा. म.). दुनिया को मारो गोली. आजूनही जाती, आमची कम्युनिटीचे प्रेशर चालतेच का?(कठिण आहे). हे बोलणे तुम्हाला आवडणार नाही, पण भारतात एखादे लग्न जुळवून जरी ठेवले तरी लोकं बोलतातच, तुटले तरी बोलतातच. आणि मुलगा जर वाईटच निघाला तर (गॉड फॉरबिड्स) तर खरं खोटं होवून जाईलच ना.(हे तुम्ही ५० टक्केच विश्वास आहे लिहिले त्यावरून मी अंदाज बांधलाय की तुम्हाला भिती वाटतेय मुलाची म्हणून लिहिलेय.) नाही आवडले तर दुर्लक्ष करा.

मुलगी हुशार आहे ना? तिला पुर्ण विश्वास(मुलावर) आहे हे लक्षात घेतलय का?

योग्य निर्णयास शुभेच्छा तुम्हाला!

२४ म्हणजे लहान नाही.
तिचे निर्णय घ्यायला आणि त्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला ती पुरेशी मोठी आहे.
तिच्या निर्णयाचे स्वागत करा, तिला पाठींबा द्या.
तुम्हाला कितीही काहीही वाटलं तरी आयुष्य तिला जगायचंय त्यामुळे ते तिला तिच्या निर्णयांवरच जगू द्या.
तिचा निर्णय चुकू शकतो तसाच तुमचाही चुकू शकतो. तुमच्या चुकीच्या निर्णयांची शिक्षा तिलाच भोगावी लागणार आहे तुम्हाला नाही. निदान तिचा निर्णय मानला गेला तर ती 'हा निर्णय चुकल्यास काय?' या गोष्टीसाठी मनातून तयार तरी असेल.

प्रश्न असा आहे की आमचे कुटुंब इतके ब्रॉड थिंकींग करत नाही. तुम्ही जो विचार केला तो मला मनापासून आवडला. पण घरी हे सर्व अमलात आणायला अनेकांचा विरोध असणार आहे. मुलगी घरात एकुलती एक आहे. तिला आई नाही. वडील असून नसल्यासारखे. सगळी भिस्त माझ्यावर आहे. मी खूप अनुभवी आहे असे नाही की खूप अनभिज्ञ आहे असेही नाही. कुणीतरी योग्य मार्गदर्शन करावे. आपले विचार योग्य दिशेकडे जात आहेत की नाही ते मी इथे बघत आहे.

बी, तुम्ही त्या मुलाला स्वतः भेटून खात्री करून घेतलीय का?

मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते की जर मुलगा खात्रीचा असेल तर लग्नं सेटल झाल्यावर आरामात करू शकतो.
आम्ही माझ्या घरून परवानगी मिळाल्यावरही जवळपास पाच वर्षांनी लग्नं केलं.
मात्रं दोघांच्या घरच्यांबरोबर रेग्युलर भेटिगाठी चालूच होत्या.
माझ्यामते तुम्ही मुलाशी आणि त्याच्या घरच्यांशी बोलून खात्री करून घ्या, तुमच्या कॉमन ओळखीतल्या लोकांना इनवॉल्व करून एक बैठक करून घ्या.
यामुळे बर्याचदा मुलावर नैतिक जबाबदारी येते लग्नाची.
आणि हो, समजा हे काही कारणानी मोडलंच तर नंतर लग्नं जातीतच आणि ठरवून केलं पाहिजे असे थोडेच आहे.
दुसराही कुणी जातीतला/ जातीबाहेरचा योग्य मुलगा मिळू शकतो.

बी, आपल्या दृष्टीने तिच्या निर्णयाचे सर्व संभाव्य परिणाम मोकळेपणाने तिच्यासमोर मांडावे , तिला विचार करायला वेळ द्यावा व नंतरच्या तिच्या निर्णयाचा आदर करावा, हें सर्वोत्तम. [ आणि हो, स्वजातीमधे पारंपारिक तर्‍हेने लग्न ठरवताना व लग्न झाल्यावर येणार्‍या संभाव्य अडचणीही तिला सांगाव्या; एका मुलीचा बाप म्हणून तेंहीं तापदायक असूं शकतं हें मीं व माझ्या जवळच्यानी पूर्वीं अनुभवलंय! ]

Bee, sagali bhist tumachyawar ae tar tumhi ase 'broad' wichar karayala kahi harakat nahi.

tumhala swatala he patat asel tar ani tumachyawar jababadari asel tar itar koni kai mhanatay he itak mahatvachnahi as mala vatat Happy

baki yogy to nirnay tumhi ghyalach.

mulichya pathishi thampane ubhe raha.

jaat vagaire kahihi nasat. incase kahi waeet ghadalach tar jatitala mulaga pahanyapeksha capable ani yogy, jababdar mula shodhanyawar bhar dyahi kalakalichi vinanti.

बी...

मुलगी तुमच्यातीलच आहे आणि तुम्हीच तिचे पालक आहात, जवळपास. त्यामुळे तिच्या मनाचा कल विचारात घेऊन तिच्याच नजरेने या लग्न प्रकरणाकडे पाहाणे योग्य ठरेल. ती स्वतःहून त्याच्यासाठी वाट पाहायला मी तयार आहे असे म्हणत आहे म्हणजे उद्या, देव करो असे ना होवो, जरी मुलाच्या निर्णयात उलटेपालटे झाले तरी मुलगी अन्यांना दोष देणार नाही...देऊ शकत नाही....सो बेटर लेट हर ड्राइव्ह द कार ऑन हर ओन.

आता मुख्य मुद्दा आहे तो मुलाच्या खात्रीशीर वर्तनाचा. तो म्हणतो नोकरीमध्ये सेटल व्हायला ३-४ वर्षे हवीत. एका दृष्टीने सेफ कार्डस घेऊन तो आहे, पण तीनचार वर्षे मुलगी आपली वाट पाहाणार आहे या गोष्टीचे गांभीर्य त्याला समजण्याइतपत तो समंजस आहे का ? तितपत मुलीने वा तुम्ही चाचपणी केली आहे का ? माझा याबाबतीतील अनुभव काहीसा कटु असल्याने मला ही काळजी वाटते. तीनचार वर्षात मुळामुठेतून खूप पाणी वाहून जाते. या दरम्यान मुलाला अन्यत्र उडण्याचे पंख फुटू शकतात. शिवाय ३-४ वर्षात सेटल होणारी नोकरी म्हणजे आता तो आहे तरी कोणत्या क्षेत्रात ? आय.टी. मध्ये असल्यास तिथे तर वर्षभरात सेटल होणारी मुलेमुली मी पाहिली आहेत.

थोडक्यात मुलीला हा इथला संवाद मुद्दाम वाचायला द्या तुम्ही....तुमच्याबरोबरीने अन्य लोकांचीही अशा वाट पाहाण्याबाबत काय मते आहेत हे तिला समजणे खूप गरजेचे आहे. अर्थात यातून अखेरीस चांगलेच घडावे ही प्रार्थना.

मुलासोबत माझे फार संवाद घडलेले नाहीत. पण ही दोघे नियमित भेटतात हे माहिती आहे. मुलीने कधी लपवाछपवी केलेली नाही. तिला विचारले ते सर्व ती खरखर सांगते. मुलाच्या आईशी तिचे नियमित बोलणे असते. कधीकधी त्यांच्या आईच तिला फोन करतात. ती त्यांच्या घरी गेलेली आहे. पण माझे आणि मुलाच्या कुटुंबियांशी फार सबंध नाही आलेत अजून. मला तिला किमान मास्टर्से पर्यंत शिकवायचे होते म्हणून मी मधे लग्नाचा विषय काढला नाही. आता कुठे सुरवात केली आहे. अरेंज मॅरेज जमवायला एक दीड वर्ष लागू शकत आणि तोवर तिचे मास्टर्से पुर्ण होईल म्हणून पहिले पाऊल उचलत आहे योग्य तो विचार करुन.

ही दोघे आयटीमधेच आहेत पण पदवीनंतर MBA करत आहेत. आधी बी.सी.ऐ. पुर्ण केले आता MBA. ही ह्यूमन रीसो. मधे करत आहे तर तो ईंटरनॅशनल बिझ. मधे.

मला तुम्हा सर्वाचे विचार आवडलेत आणि खरेच असे विचार वाचून मनावरचे मणभर ओझे उतरल्यासारखे वाटते आहे.

व्वा.... शैक्षणिक अर्हता तर प्रभावी आहेच आहे. त्यामुळे दोघानांही वेल सेटल्ड व्हायला काहीच हरकत नाही. तीनचार वर्षाचे अंतर एकदोन वर्षावर सहज आणू शकतील....एकमेकाशी चर्चा करून.

Honestly अमुक एक वयात लग्नं झालं पाहिजे वगैरे मेंटॅलिटी बदलायची गरज आहे.>>
९९

आणि वाट बघुन लग्न करायचे आसल्यास साखर्पुडा करायला हरकत नसावी

अशोक. आणि भाऊ यांनी खूप मुद्देसूद लिहिले आहे. मला पटले.

त्यासोबत असेही वाटते की त्या मुलीची इच्छा नसताना नातेवाईक काय म्हणतील किंवा पुढे जातीत लग्न जुळवायची वेळ आली तर आणि जुळले नाही तर ह्या कारणासाठी मुलीवर प्रेशर आणू नये असे माझे मत आहे.

मुलीचे २३-२४ च्या वयात लग्न व्हावे हा अट्टाहास का? मुलीने ठरवलेले लग्न काही कारणाने नाही झाले तर तिला जातीतलाच मुलगा शोधायला हवा हा अट्टाहास का? मुलगी चांगली शिकते आहे जर तिने आज ठरवलेल्या मुलाशी तिचे लग्न नाही झाले तर तेव्हा काय करायचं हे जेव्हा गरज असेल तेव्हा पाहाता येईल. आत्तापासून का चिंता?

मुलीला शिक्षण पूर्ण करू दे. नोकरीत सेटल होऊ दे.
प्रत्येक व्यक्ती केवळ मुलगीच नाही तर मुलगाही एक स्वतंत्र व्यक्ती असतात. समाजाशी बांधलेल्या असल्या त्या स्वतंत्र असतात प्रत्येकाला स्वतःच आयुष्य स्वतः जगायचं असतं स्वत:च्या कोणत्याही निर्णयाचे परिणाम स्वतः भोगायचे असतात. मग ते निर्णय स्वत;च्या मनाने घेतलेले असोत वा आईवडिलांच्या / पालकांच्या / समाजाच्या प्रेशर खाली घेतलेले असोत. असं असताना मग इतर कोणीही मुलं मॅच्युअर झाल्यावर त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना फोर्स का करायचं.

मी वर जे म्हणतेय त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे मुद्दे पालकांचे मुद्दे ह्यावर चर्चा होऊ नये. पण चर्चा करताना मुलांनी आपलं म्हणणं मानलच पाहिजे हा विचारही मनात ठेवू नये. उलट जर मला पटले तर मी तुझा मुद्दा मान्य करेन आणि नाही पटले तरी तुला माझा मुद्दा पटत नाहीये म्हणून मी माझा मुद्दा सोडून देइन असा विचार मनात ठेवूनच चर्चेला सुरुवात केला पाहिजे. याशिवाय जर काहीही कारनाने मुलांनी घेतलेले निर्णय चुकले तर "बघ मी तुला सांगितलं होत ना" असे म्हणू नये. जे होईल त्यातून बाहेर पडण्याला मुलांना साथ द्यावी.

साधारणपणे २३- २४ पर्यंत मुलांना काय योग्य काय अयोग्य हे समजायला लागलेलं असतं आणि अगदीच समजत नसेल आणि तरीहेए ते एइकत नसतील तर त्यांच नशीब म्हणून सोडून दिलं पाहिजे.

बी - हे तुम्हाला सांगतेय असं नाहीये. ह्या निमित्ताने बराच काळ मनात असलेला मुद्दा लिहिता आला. पुढे मागे मला असा प्रश्न पडेल तेव्हा कदाचित मी लिहिलेलं हे मलाच उपयोगी पडेल.

कृपया साखरपुडा वगैरे करून घेऊ नका. मुलगाच निर्णय बदलेल असं काही नाही. मुलगीही निर्णय बदलू शकते. दोघानीही या गोष्टीची तयारी ठेवायला हवी. तसंही करीयर च्या दृष्टीने दोघांची महत्त्वाची वर्षं आहेत. give them some time.

चांगली चर्चा. डिजे, नी यांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत.
भाऊ, अशोकजी आणि वल्लरी यांचे प्रतिसादही आवडले.

निर्णयावरून मुलगा मुलगी समंजस आणि मॅच्युअर्ड वाटत आहेत. तरीही तुमच्या काही शंका दूर करण्यासाठी तुम्ही मुलीसोबत विवाह समुपदेशकाकडे गेल्यास तुमच्या उर्वरित प्रश्नांचीही उत्तरे मिळतील कदाचित.

मुलाचे म्हणणे पडते की त्याला अजून तीन चार वर्ष हवे आहेत लग्न करायला. तोवर नोकरीमधे तो सेटल होईल. ही गोष्ट आम्हालाही पटते आहे त्या मुलाची की मुलासाठी २४ हे वय लग्नासाठी जरा कमी पडते. पण म्हणून आम्ही मुलीचे वय वाढू देण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही.>> एव्हाण ज्या नौकरीत आहे (असल्यास) त्या नौकरीमधे राहुन लग्न केल्यास पुढील शिक्षणात वा नौकरीत विशेष अडथळे येतील असे वाटत नाही. मुलीच्या दॄष्टीने २७ वय जास्त वाटते. शिवाय मुलाने नकार दिल्यास प्रश्न गंभीर होईल. एकमेंनी जर आणाभाकाच घेतल्या असतील तर मग नाईलाज आहे. वाट पहा.

दोघेही समंजस आहेत तर त्यांच्या कलेने घ्या ....
त्यांचे शिक्षण जर आत्ताच पुर्ण झाले असेल तर थोडी बॅचलर लाईफ जगू द्या. शेवटी लग्न ही एक जबाबदारीच आहे. त्या जबाबदारीमुळे त्यांच्या करिअरसाठी अडथळा नको, वयाचा प्रॉब्लेम आहेच पण त्याला फाटा द्यावा. मने जुळवण्यापेक्षा चांगले काम या जगात नाही.
( तसेही त्यांचे १२ वी पासून प्रेम असेल तर किमान ५ वर्षापासून आहे त्यांचे नाते तकलादू असते तर एव्हाना हा प्रश्नच उभा राहिला नसता सो . थोडी वाट पहा मला वाटते २-३ वर्षात जूळेल सगळे मनासारखे.)

कृपया साखरपुडा वगैरे करून घेऊ नका. मुलगाच निर्णय बदलेल असं काही नाही. मुलगीही निर्णय बदलू शकते. दोघानीही या गोष्टीची तयारी ठेवायला हवी. तसंही करीयर च्या दृष्टीने दोघांची महत्त्वाची वर्षं आहेत. give them some time.
>+१
तीन चार वर्षे थांबायचे असेल तर साखरपुडा मुळीच करु नका... कॉलेज आणि नोकरीचे लॉईफ पूर्ण वेगळे असते...

बी, शक्य असल्यास तू मुलाशी आणि त्याच्या घरच्याशी ओळख करून घे. त्यांच्या संपर्कात रहा.
दोघांचे शिक्षण पूर्ण होउन जॉब मध्ये जरा स्थिरावले की लग्न करता येइल. फक्त इतर नातेवाइक यात काही गोंधळ करणार नाहीत याची खबरदारी घे. लोक उगाचच मुलीच्या वयाचा/शिक्षणाचा बाऊ करतील. त्याकडे सपेशल दुर्लक्ष कर!

मुलीचे वय हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढे जाऊन जर मुलांचा विचार करायचा असेल तर..... नोकरी लागल्यावर एखाद वर्षांत लग्न केले तर बरं.....

मुलगी आज २३-२४ वर्षाची आहे. अजून ३-४ वर्षाने लग्न आणि त्यानंतर दोन वर्षाने मूल म्हणजे ३०.

मूल होण्याला ३० हे वय जास्त नाही. हे आज मेडिकल सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलय.

आणि मुळात मुलीच्या आणि तिच्या भावनांचा विचार करायचा का स्वप्नात सुद्धा नसलेल्या मुलांचा?

आणि समजा एखाद्या कपलने ठरवले असेल की आप्ल्याला मूल नकोच किंवा त्यांना मूल झालेच नाही तर? त्याकरता मुलीच्या बेसिक इच्छेवर का बोळा फिरवायचा

.

मुळात मुलीच्या आणि तिच्या भावनांचा विचार करायचा का स्वप्नात सुद्धा नसलेल्या मुलांचा?>>> अरे ती मॅच्युअर आहे ना? लग्न २८ ला झालेले चालेल विचार करता येतोय पण मुलं हवीत का नकोत? मग ती वाढवण्याच योग्य वय काय? असे मॅच्युअर विचार पण करता यायला नकोत?

मूल होण्याला ३० हे वय जास्त नाही. हे आज मेडिकल सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलय.>>>> हो माहित आहे. काल Law and Order मध्ये नवरा गेल्यावर दहा वर्षांनी बाईने त्याचे मूल जन्माला घातले. मूलं जन्माला काय कशीही येतात? नाही आली तर त्याची मोठी इंड्स्ट्री आहे, मूलं जबाबदारीनी वाढवायची मात्र कुठे इंड्स्ट्री दिसली नाही.

मी आधिच लिहिलं होतं मूलं हवं असेल तर .... नको असेल तर कधिही लग्न करा ..... नाही केलंत तरी फरक पडत नाही..... Happy लग्न न करता मूल झालं तरी बॉयफ्रेंड्ला द्यावा लागतो ..... तेवढा जबाबदार बॉयफ्रेंड असेल बिनलग्नाची मूलं जन्माला घालणारा ..... अश्या बर्‍याच जरतर बद्द्ल बोलतो आहोत आपण .... Happy

Rajasi, To be very frank tumhi agadich tokach bolata nehamich.

tyana honarya mulacha vichar Karun tyani dadpan gheun patkan lagn Karun mag mul plan Karun tyala janm dyava ani tyachya bhavitavyacha vichar karava he farach nahi ka hotey?

tyapeksha tyani adhi swataha vichar karayala hava.

ani 30-32 madhye jya palakana mul zalay te kahi tyana varyawar sodanar nahiyet nakkich.

kinva 30-32 vayachya palakani apalya mulanchya bhavitavyacha kahi vichar kelach nasel as tumach mhanan ahe ka?

tumhi ekandarach nehamich anek muddyanwar ugach akshep gheta he maz nirikshan ahe

Pages