जंटल , चार्मिंग आजोबा

Submitted by वर्षू. on 8 May, 2014 - 09:11

भर दुपारी मोबाईल खणखणला.. जिप्स्याचा फोन आला होता आणी तो विचारत होता ,' आजोबा' च्या प्रिमिअर
ला जाण्यात मला इंटरेस्ट आहे का म्हणून.. ते ऐकताच मी आळसावलेली दुपार ताडकन झटकून टाकली आणी
जिप्स्याला होकार ही देऊन टाकला.
गेल्या सात दिवसापासून येणार्‍या तापाला , आग्रहपूर्वक उतरवून टाकलं आणी दुसर्‍या दिवशी प्रिमिअर ला
जाण्याची स्वप्ने पाहू लागले. विजेत्या कच्चीबच्ची आणी कविन ला भेटण्याचीही ओढ होतीच.
ठरल्याप्रमाणे जुहू पीवीआर ला भेटलो .

प्रिमिअर ला हजर राहण्याची माझीही पहिलीच वेळ असल्याने त्या उत्साहाच्या भरात आपण दोन तास उभेच आहोत हे लक्षातच आलं नाही.
हळूहळू पडद्यावरची , पडद्यामागची, टीवी वरची कलाकार मंडळी जमा होऊ लागली. ९०% कलाकार मला ओळखता येत नसल्याने ,' हे कोण आहे नि ते कोण आहे' करून मी कविन आणी जिप्स्याला भरपूर पिडलं..

'आजोबा' चे दिग्दर्शक ,'सुजय' चे अश्या हटके विषयावर सिनेमा काढण्याबद्दल कौतुक वाटले. सुजय मात्र त्याने केलेल्या कामगिरीचा दर्प वगैरे न बाळगता अगदी सहजपणे सर्वांशी मैत्रीपूर्ण वागत होता. सुहास्य वदनाने सर्वांना त्याच्याबरोबर फोटो काढू देत होता.

इतकंच नव्हे तर आजोबा टीम च्या सर्व कलाकारांना अ‍ॅटीट्यूड चा फालतू रोग ना लागल्याचे पाहून खूप आनंद झाला. ते सर्व आमच्यातीलच एक वाटू लागले म्हणूनच आम्ही सर्व रिलॅक्स झालो आणी कलाकारांच्या गर्दीचा एक हिस्सा बनून गेलो.

सिनेमा सुरु होण्याच्या दहा मिनिटे आम्ही थेटरमधे स्थानापन्न झालो आणी सिनेमा सुरु झाल्या झाल्या
आजोबा च्या गोष्टीशी समरस झालो.

विहीरीत पडलेला बिबटा पाहून आधी भीती वाटली पण त्याच्या भवती पडलेल्या माणसांचा गराडा पाहून , त्याचीच कीव येऊ लागली. त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट च्या माणसांनी वर काढल्यावर त्याच्या गळ्यात रिसर्चर पूर्वा
(उर्मिला) जीपीएस ट्रांसमीटर डकवते आणी त्याचं नामकरण करते ,' आजोबा'
आजोबा ला माळशेज घाटात सोडून देण्यात येते आणी मग सुरु होतो आजोबा चा २९ दिवसाचा प्रवास..
माळशेज ते मुंबई च्या त्याच्या प्रवासात मधे खाडी, हाय वेज, रेल्वे लाईन्स आल्या कि त्या सुखरूप पार
करेस्तो आपल्याला आजोबा ची काळजी वाटत राहते, .. यातच दिग्दर्शक आणी इतर कलाकारां ना त्यांच्या मेहनतीची पावती मिळते.
पूर्वा ला मदत करणारे शिंदे आणी ज्ञानोबा तर क्लासिक जमलेत कॅरेक्टर्स.. आपापल्या भूमिकेत
ते इतके रममाण झाले आहेत कि थेटर बाहेर भेटले तरी ते अनुक्रमे श्रीकांत यादव आणी हृषिकेश जोशी म्हणून
वाटेचनात मुळी.. शिवा ( ओम ) चं काम करणार्‍या कलाकाराचा अभिनय ही खूप नॅचरल वाटला.

तर पळापळाला उत्सुकता वाढवणारा ,'आजोबा' उद्या प्रदर्शित होणार आहे . आजोबा चा प्रवास सर्वांनी
आवर्जून पाहावा असाच आहे.

आजोबा च्या प्रिमिअर ला उपस्थित राहण्याची संधी देण्याकरता मायबोली चे अनेक आभार!!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thodakyat pan chhan Happy

tuza photo khup mast alay.

jipsyala chalanar asel tar tikadun gheun ithe tuzya ya dhagyachya header madhye tak na Happy

jipsyala chalanar asel tar >>>>> मला का नाही चालनार? बिनधास्त घे. पाहिजे तर विदाऊट वॉमा वाला फोटो पाठवून देतो. Happy

छान लिहिलंय.
हॉलिवूड मधे ज्यावेळी असे चित्रपट निघतात त्यावेळी त्या प्रत्यक्षातील व्यक्तींचे पण दर्शन घडवतात ( एरीन ब्रोंकोवीच, द इमपॉसिबल.. ) तसे या चित्रपटात पण व्हायला हवे होते.

Model आणि Phographer दोघेही भारी असताना फोटो भारी येणारच >>> +१११

वर्षुताई, छान लिहिलंयस, तुमच्या सगळ्यांच्या लिखाणामुळे आणि भाऊच्या फोटोंमुळे खरचं उत्सुकता खुप वाढली आहे. शनी - रवी मध्ये पाहीन म्हणतेय, बघु कसं जमतय Happy

आजोबा चा प्रवास सर्वांनी
आवर्जून पाहावा असाच आहे. >> नक्की पहाणार Happy छान लेख.