आत्महत्या ………एक भीषण कृत्य.

Submitted by s423 on 6 May, 2014 - 02:59

जीवन हे वाहत्या नदीप्रमाणे असते. जशी नदी समुद्राला मिळाल्यानंतरच थांबते. तसे आपले जीवन हि मृत्युपर्यंत जाऊन थांबते. वाहत असताना तिला वाटेत काटे कुटे, डोंगर -दरी सारखे अनेक अडथळे मिळतात पण ती त्या सर्वांतून मार्ग काढत पुढे जात असते. आपले तसे नाही आपल्या आयुष्यात काही संकट आले कि आपल्या पैकी बरेच जन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. प्रत्येकाला जीवनाच्या वाटेवर चालत असताना चांगल्या वाईट गोष्टीना सामोरे जावेच लागते मग तो या जगातील सर्वात श्रीमंत माणूस असो कि सर्वात गरीब. म्हणून कोणी जीवन जगायचे सोडणे म्हणजे केवळ मूर्खपणाच असतो. आपल्या आजूबाजूला आत्महत्येच्या पुष्कळ केसेस दिसतात पण आपल्या आयुष्यात एवढे वाईट दिवस येतात कि आपल्याला आत्महत्येशिवाय पर्यायच दिसत नाही का? आपल्याला देवाने एक अशी देणगी दिलेली आहे कि तिच्या जोरावर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. आपण या बुद्धीचा कधी वापर करणार आहोत? स्वताचे जीवन संपवून सर्व प्रश्न सुटतात का? जीवन हे संपविण्यासाटीच असत का?
पक्षी आपले वादळात उध्वस्त झालेले घरटे पुन्हा बंधू शकतात तर आपण माणूसच आहोत ना आपल्यात एवढी हिम्मत नाही का? जशा एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच सुख आहे तिथे दुखः पण आहे. ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतात असे वाटते तिथूनच एक नवा मार्ग आपल्यासाटी खुला असतो. फक्त एवढेच असते कि आपले मन, बुद्धी, जागृत ठेवायची. आयुष्यात सुख हे नेहमीच राहत नसत कधी कधी दुख पण सोसावच लागत. आलेलं दुख धैर्याने पचविण्याची हिम्मत असावी. म्हणतात ना जीवन हा सुखदुखांचा खेळ आहे. मी शाळेत असताना आम्हाला शिकवायला एक सर होते. भूगोल शिकवायचे. ते नेहमी म्हणायचे आता रडाल तर जीवनात पुढे हसाल. खरच स्वतः कष्ट करून जे येणार सुख असत, ते आपल्या जीवनात कायमच टिकेल अस तर नाही सांगू शकत पण ते जास्तीत जास्त काळ नक्कीच टिकणार असत.
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात नेहमी सुखच हव असत पण देवाने दुखः दिलच नसत तर सुखाची किंमत आपल्याला कधीच समजली नसती. म्हणूनच जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला हसून सामोरे जाण्याची आपली तयारी असली पाहिजे. आत्महत्या हा निव्वळ भित्रेपणा आहे. हे कुठेतरी थांबायला हव. प्रेम, हास्य, मदतीचा हात एकमेकांना पुरेपूर देण्याचा प्रयत्न करा.
जीवन हे हसण्यासाटी, फुलण्यासाटी आहे, या सुंदर जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी जीवन जगायचे सोडणे म्हणजे केवळ मूर्खपणाच असतो.>>> अत्यंत मूर्ख पणाचे वाक्य आहे. कोणीच बारिक सारिक कारणासाठी जीव देत नाही.

अश्याही काही समस्या असु शकतात की त्या घेउन जगणे शक्य नसते.

जन्माला आलो म्हणजे जगायलाच पाहीजे असे काही नाही.