द मेकिंग ऑफ 'आजोबा'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 5 May, 2014 - 23:35

त्याचं नाव 'आजोबा'.
माणसांमध्ये वावरत असूनही माणसाप्रमाणे वागणारा तो एकटाच, म्हणून त्याचं नाव 'आजोबा'.
अकोले तालुक्यातल्या एका विहिरीत तो सापडला. तिथून त्याची रवानगी झाली माळशेज घाटात.
आणि मग जंगलं, दर्‍या, रस्ते, रेल्वेरूळ, खाडी ओलांडत त्याचा प्रवास सुरू झाला, त्याच्या घराच्या दिशेनं.

'आजोबा'ला त्याचं घर सापडलं का?

सुजय डहाके दिग्दर्शित 'आजोबा' येत्या ९ तारखेला प्रदर्शित होतोय.
डॉ. विद्या अत्रेय या वन्यजीवअभ्यासक, सुजय डहाके हा तरुण दिग्दर्शक, उर्मिला मातोंडकर, हृषिकेश जोशी, ओम भूतकर, नेहा महाजन, श्रीकांत यादव, दिलीप प्रभावळकर असे तगडे अभिनेते, अशा अनेकांच्या परिश्रमांतून साकारलेला हा चित्रपट बनला कसा, याची उत्सुकता सर्वांना असेल.

तर सादर आहे, 'आजोबा' हा चित्रपट कसा तयार झाला, याची जबरदस्त कथा...खास मायबोलीकरांसाठी...

IMG-20140426-WA0004.jpg

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!

व्वा ...मस्त आहे . व्हिडीओ पूर्ण पहिला . आवडला . चित्रपटा संबंधित असणार्यांना शुभेच्छा . Happy

भारी!

आम्हीही बघणार.

अहो प्राण्यांची हत्या
करू नका तात्या
निसर्ग आपुला वाचवा

हे कॅची आहे एकदम! Happy
(संबळ वापरलंय का त्यात? )

उर्मिला मातोंडकर मराठी काय सुरेख बोलते! ट्रेलर आल्यापासून उत्सुकता होती! मेकिंग पाहून छान सिनेमा असेल असं वाटतंय!

>>उर्मिला मातोंडकर मराठी काय सुरेख बोलते!<< +१
नाहितर मादि.
अभिनयाबाबत सुद्धा बेस्ट आहे(तिचे काही हिंदी मूवीज बघून).

खूप सुरेख . नक्कीच बघणार.
आपल्या मराठी मध्ये असे वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे येत आहेत याचाही अभिमान वाटतोय. Happy