"स्वदेशी" खरा जनक कोण?

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे जनक म्हणून महात्मा गांधीना पाहीले जाते. ते खरोखरच ह्या विचाराचे जनक आहेत का? की ह्या विचाराचा जनक दुसराच कोणीतरी आहे ह्या बाबत मी शोध घेत होतो. आणि अहो आश्चर्यम. मला बहुदा ह्या विचाराचा जनक सापडला.

वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी "स्वदेशी" वापर करा हा विचार मांडनारा फटका लिहनारा बालक होता विनायक दामोदर सावरकर. त्याने हे पत्र प्रसिध्द ही केले होते. ह्या पत्राअंतर्गत त्याने लोकांना स्वदेशी वापरन्याची महती सांगीतली व विदेशी गोष्टी सोडून स्वदेशी आग्रह केला. ह्या फटक्यात लेखकाने जनमाणसांतील विर वृत्तीला जूने वैभव सांगून जागृत करन्याचा प्रयत्न देखील केला.

लिखान साल १८९३.
गांधीजी सन १८९३ ते १९१४ अफ्रिकेत असल्यामूळे भारतातील घडामोडींचा अंदाज त्यांना न्हवता तसेच तेंव्हा त्यांनी समाजकारनासाठी जिवन व्यतीत करायचे का नाही हे ही ठरविले न्हवते. शिवाय १९०५ मध्ये ही बंगालात, बंगाल फाळनी झाल्यावर मोठ्या प्रमानावर विदेशी वस्त्रांची होळी झाली होती. त्या काळी पंजाब, महाराष्ट्र व बंगालच्या मातीतून क्रांतीकारक जन्मले व समान विचारांच्या युवकांनी ह्या तिन्ही राज्यात धूम केली होती. सावरकरांनी इंग्लडात शिकत होते तेंव्हा भिकाजी कामा, वर्मा, बापट व इतरांसोबत स्वदेशीची पत्रके गुप्तरितीने भारतात पाठवीली होतीच, त्यामूळे नायरांसारखे इतिहासकार असे मानतात की सावरकरांच्या अश्या पत्रंकामूळेच दक्षिन भारतात स्टूंडट अनरेस्ट सुरु झाली.

१९०५ मध्ये तर गांधी भारताच्या राजकिय पटलावरही न्हवते पण स्वदेशी चळवळीचे श्रेय त्यांनाच दिले जाते. का बरें? महात्मा गांधीनी तूकारामाचे विचार लोकांना सांगीतले हे आपणाला माहीत असेलच, त्यांचा वैचारिक विरोध करनार्‍या स्वातंत्र्यविराचा विचार ही त्यांनी पुढे नेला, पण योग्य ते श्रेय त्यांना दिले नाही.
गांधी ग्रेट की सावरकर ह्या या लेखाचा मुद्दा नाही. दोघेही ग्रेटच आहेत.

पण मग गांधीनी ही गोष्ट आम जनतेला का नाही सांगीतली हा आमचा सवाल?

ह्यावर अजुन संशोधन करुन इतिहासकारांनी योग्य ती दखल घ्यावी व योग्य तिथे इतिहास निट लिहीला जावा असे मनापासून वाटते.

हा घ्या पुरावा.

"देशी फटका'
लिखान साल १८९३.

आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा ।
हटा सोडनी कटा करुया म्लेंच्छ पटां ना धरु कदा ।।१।।

काश्मीरच्या शाला सोडिनु अल्पाकाला कां भुलतां?।।
मलमल त्यजूनि वलवल चित्ती हलहलके पट कां वरितां?।।२।।

राजमंहेद्री चिटा त्यजुनि विटके चिट हे कां घेतां?।।
दैवे मिळता वाटि, इच्छितो नरोटि नाही कां होता! ।।३।।

येविल सोडिनु पितांबरांना विजार करिन्यांसाठि महा ।।
बेजारचि तुम्ही नटावयामधि विचार करितो कोणि न हा ।।४।।

केलि अनास्था तुम्हिच स्वत: मग अर्थातच ती कला बुडे ||
गेले दिन हे नेले हिरूनी मेले तुम्हि तरि कोण रडे? ।।५।।

अरे आपणच होतो पूर्वी सर्व कलांची खाण अहा ।।
भरतभूमिच्या कुशीं दिप ते कलंक आतां आम्ही पहा ।।६।।

जगभर भरुनी उरला होता नुरला आतां यापार ।।
सकलहि कलाभिज्ञ तेघवां अज्ञ अतां अरिही थोर ।।७।।

निर्मीयली मयसभा आम्हिच ना? पांडव किरीटी आठवारे ।।
मठ्ठ लोकहो! लाज कांहितरी? लठ्ठ असुनि शठ बनलोरे ।।८।।

आम्रफलाच्या कोयीमध्ये धोतरजोडा वसे सदा ।।
होते जेथे प्रतिब्रम्हेंची धिक मी जन्मुनि अपवादा ।।९।।

हे परके हरकामीं खुलविती भुलविती वरवर वाचेने।।
यवहार रीती ऐशि बरोबर सदा हरामी वृत्तीने ।।१०।।

कामधेनुका भरतभूमिका असूनि मग कां ही भिक्षा ||
सहस्त्र कोसांवरुनि खासा पैका हरतो प्रभूदिक्षा ।।११।।

नेती कच्चा माल आमुचा देती साचा पक्व रुपे ।।
आमुच्या वरतीं पोट भरीति परो थोरि कशाची तरी खपे ।।१२।।

पहा तयांची हिच रित हो! भिती नसे त्या लबाडिला ।।
नाना कर्मे नाना वर्मे देश आमुचा लुबाडिला ।।१३।।

निमुली हातामधलीं फडकीं फडकत नाना ध्वज वरतीं ।।
हडलहप्पसे करुनि शिपाई निघत स्वारी जगभर ती ।।१४।।

नाना परिचे रंग भरीती रंग पुंप ते दंग करी ।।
मोर, कावळे, ससे, पारवे, श्वापद विचरती तीं बकरीं ।।१५।।

राजगृहीं गोपुरी झळकती मजले सजले त्यामधुनी ।।
सुंदर नारी दु:ख हर्ष भरि त्या बघित शोभा तरुणी ।।१६।।

नाना जाती पिकली शेती गार हिरवे वस्त्र धरी ।।
भात बाजरी गहूं गाजरी आच्छादली हि भूमि बरी ।।१७।।

अगनग गेले गगन चुंबिण्या सर्व थोरबहु कोराकि ।।
भास पुरुषची निजांकि बसवी स्वानंदाने पोरां की ।।१८।।

चित्र ऐशीं दाविति छत्रे विचीत्र तूम्हा भुल धंदा ।।
तुम्हिंहि भुलतां पहातां घेतां क्षणांत स्वपटाला निंदा ।।१९।।

याला आतां उपाय बरवा एकी करवा मन भरवा ।।
ओतप्रोते अभिंमाने हरवा देशी धंदे पट करवा ।।२०।।

परके वरवर कितीहि बोलती गोड गोड तरि मिनं समजा ।।
सुंदर म्यानीं असे असिलता घातिच होइल झट उमजा ।।२१।।

रावबाजि तरि गाजि जाहले राज्य बुडालें तरि मुख्य ।।
सख्य असे परि परकीयांचें गोष्ट ऋदयिं ही धरु लख्ख ।।२२।।

वैर टाकुं या यास्वत लौकर खैर करो परमेश्वर ती ।।
निश्चय झाला मागें अपुला परदेशी पट ना धरती ।।२३।।

चला चला जाउं या घेउं या देशि पटांना पटापटा ।।
जाडे भरडे गडे कसेही असो सेवुं परि झटाझटा ।।२४।।

ना स्पर्शू त्या पशूपटाला मउ वरि विखार तर भावूं ।।
घेऊं खडतर अंतीं सुखकर धर्मचि मानुनियां राहूं ।।२५।।

द्रव्य खाणि हि खोरे घेउनि परकीपोरें खणतिरें ।।
एकचिंत करुनियां गड्यांनो! वित्त जिंकूया पुररपिरे ।।२६।।

विश्चेश्वरि ती नारायणि ही यमहरि हर अदि सुरवरिणीं ।।
कर्म सिध्दीसी दावो नेउनि मोद देति निज भक्त जनीं ।।२७।।

दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रविज्ञान ।।
वरावयाला रत्न पटांनां करो आर्य ते रणदान ।।२८।।

कवितारूपी माला अर्पी आर्यं बंधुसीं सार्थक हो ।।
भक्तांकरवी मन देवांसी सेवा त्याशीं अर्पण हो ।।२९।।

स्वांतत्र्यविर सावरकर.

विषय: 
प्रकार: 

भगव्यादेषाची आणि हरीतप्रेमाची कावीळ तुमच्यासारख्या निधर्मांधांनाच झाली आहे, आम्हाला नाही. त्यांचे कोणते कार्य सिद्ध झाले आहे हे विचारले तर त्याचे एकही उत्तर नाही तुमच्याकडे!

पुन्हा एकदा विचारतो, की त्यांचे नक्की कोणते कार्य सिद्ध झाले आहे आजवर?

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल ...

एवढं बास का? की आणखी लिहू?

जामोप्या,

काय बकवास लावलाय! १९४२ च्या चलेजाव चळवळीच्या दुसर्‍या दिवशी गांधींसकट सगळ्या काँग्रेसी नेत्यांना तुरुंगात टाकले सरकारने. आणि म्हणे यामुळे आजादी मिळाली.

भयाण कल्पनाविलासाचे प्रथम पारितोषिक तुम्हालाच! Proud

आझाद हिंद सेनेच्या विरुद्ध ब्रिटीश सरकारला खटले चालवायचे होते. तिला पाठिंबा दाखवण्यासाठी नाविक दलात बंडे झाली (साल १९४६). त्यामुळे ब्रिटिशांनी भारत सोडायचं ठरवलं.

जागोमोहनप्यारे, जागे व्हा लवकरात लवकर!

आपला नम्र,
-गामा पैलवान

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल ...

एवढं बास का? की आणखी लिहू?
------ १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. मनुष्यजातीच्या इतिहासांत, त्याच काळात १.२५ लोकांचे स्थालांतर झाले व किमान १० लाखाच्या वर कत्तल्ली झाल्या. अनेक अनेक लोकांचे स्वातंत्र्य मिळवण्यास हात भार लागले आहेत. फार थोडी नांवे ज्ञात आहेत पण अनेक सैनिकांची नांवे अज्ञात आहेत. त्या सर्वांना नाकारुन केवळ एकच नांव पुढे आणायचे आणि त्यालाच सर्व श्रेय द्यायचे हे मला इतर लोकांवर अन्याय करण्यासारखे वाटते. स्वातंत्र्य निव्वळ एका व्यक्तीने किंवा त्याच्या तत्वाने नक्कीच मिळालेले नाही आहे. माझ्यासाठी बोस, सावरकर, नेहेरु, गांधी सर्व सारखेच... सर्वांनी त्यांच्या परिने सर्वोच्च योगदान दिले.... आपण

>>पुन्हा एकदा विचारतो, की त्यांचे नक्की कोणते कार्य सिद्ध झाले आहे आजवर? <<

काहि वर्षांपुर्विचा एक प्रसंग. अट्लांटामध्ये गांधींच्या पुतळ्याचं अनावरण होतं. चर्चेत विषय निघाला कि गांधीचे विचार आजहि रेलवंट आहेत का? त्यावेळेस आलेला भारतीय उच्च्पदस्थ सनदि अधिकारी उपहासाने म्हणाला कि, "गांधीजीच्या विचारांना परदेशात आज जेवढं मोल आहे तेवढं भारतात अजिबात नाहि."

त्यांचे हे उद्गार काहि अंशी पटले होते... आज त्या वर शिक्कामोर्तब झालं. धन्य झालो.

अट्लांटामध्ये गांधींच्या पुतळ्याचं अनावरण होतं. चर्चेत विषय निघाला कि गांधीचे विचार आजहि रेलवंट आहेत का? त्यावेळेस आलेला भारतीय उच्च्पदस्थ सनदि अधिकारी उपहासाने म्हणाला कि, "गांधीजीच्या विचारांना परदेशात आज जेवढं मोल आहे तेवढं भारतात अजिबात नाहि."
----- निव्वळ पुतळा उभारला म्हणजे मोल कळाले असे असेल तर भारत सर्वात अग्रणी आहे :स्मित:.

अमेरीकेत फक्त कोणाचे पुतळे उभारू देतात याचा जरा अभ्यास करा; मग बोलू
------ जगातला सर्वाधिक हिंसाचार आज अमेरिका करत आहे. एका बाजुला अहिंसेच्या पुजकाचा पुतळा उभारायचा आणि त्याच वेळी इराक, अफगाणिस्थानात नाहक लोकांना मारायचे.

इराक मधे WMD आहेत... आमच्या कडे ठोस पुरावे आहेत असा खोटा गमजा मिरवायचा, पुढे कॉलिन पॉवेल कडुन युनोत खोटे सांगवुन घेतले, सर्वांनी माना डोलवल्या... आज १० वर्षाच्या अथक परिश्रमा नंतरही WMD चा पत्ता नाही. माफी नाही...

सत्य आणि अहिंसा दोन्ही बाबतीत अमेरिका जगात सर्वात मागच्या बाकावर बसते. सत्य आणि अहिंसेच्या पुजकाचे अशे १०० पुतळे अमेरिकेत उभारले तरी, कृती च्या बाबतीत अमेरिका कुठे आहे ते सांगा.

४-२ लोकल नेत्यांना जनतेला काही तरी करुन दाखवायची हौस असते.... मग पुतळे उभारणे अशी टुम निघते... त्यातल्या त्यात पुतळे उभारणे (मग ते कुणाचेही असेना का) सर्वात सोपे कार्य आहे. भारतात तेच केले... आता अमेरिकेतही तेच करायचा विचार आहे.

पुतळे आणि नोटांवर फोटो आले यात समाधान मानणे सोडा.... प्रत्यक्ष कृती मधे विष्वास ठेवा आणि त्याबद्दल बोला.

>>> दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल ...

भारताला 'बिना खड्ग बिना ढाल' एका व्यक्तीमुळे स्वातंत्र्य मिळाले अशी विधाने हा पराकोटीचा कृतघ्नपणा, मूर्खपणा व अज्ञान दर्शवित असून, १०० वर्षांहून अधिक काळ ज्या असंख्य सातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण दिले, तुरूंगवास पत्करला, अनन्वित छळ सहन केला व स्वतःच्या सर्वस्वाही होळी केली, अशा सर्वांचा घोर अपमान आहे. Angry

>>> त्यावेळेस आलेला भारतीय उच्च्पदस्थ सनदि अधिकारी उपहासाने म्हणाला कि, "गांधीजीच्या विचारांना परदेशात आज जेवढं मोल आहे तेवढं भारतात अजिबात नाहि."

अशी वाक्ये टाळ्या घेण्यासाठी छान असतात. वस्तुस्थिती वेगळीच असते. गांधीजींच्या विचारांना परदेशात किंवा भारतात, कुठेच मोल नाही. कोणता देश आज गांधीजींच्या विचाराने चालतो ते सांगा. शाकाहार, मद्यपानाला विरोध, अहिंसा, शत्रूला प्रेमाने वागवा, दुसर्‍याने एका गालावर थोबाडीत दिली तर त्याला न मारता दुसरा गाल पुढे करा व प्रेमळ कृतीने शत्रूचे विचारपरिवर्तन करा इ. त्यांचे विचार होते. आज जगातला कोणता देश या विचारांने चालतो? हिंदी-चिनी भाई भाई म्हणून चिन्यांना मिठी मारल्यावर चिन्यांनी त्याची परतफेड कशी केली? अहिंसेच्या मार्गाने जाणारा तिबेट कोणी घशात घातला? पा़किस्तानशी असंख्य वेळा शांतता चर्चा केल्यावर पाकड्यांनी त्याची परतफेड कशी केली? लादेनन २ टॉवर पाडल्यावर अमेरिकेने त्याचा खात्मा करायच्या ऐवजी अजून २ टॉवर पाड किंवा तुझं मनपरिवर्तन होईपर्यंत तुला जेवढे टॉवर पाडायचे तेवढे पाड, अशी भूमिका घेतली असती तर एव्हाना सगळ्या अमेरिकेची वाट लागली असती.

गांधीजींचे विचार भारतासहीत जगातला कोणताही देश आचरणात आणत नाही. त्यामुळे अशी वाक्ये केवळ निबंधात जास्त गुण मिळवायला किंवा सभेत टाळ्या मिळवायला चांगली असतात. प्रत्यक्षात अशा विचारांना मोल नसते.

गांधिजींची मते ही स्वयंसिद्ध होती.. त्यामुळे त्यानी कुणाला श्रेय द्यायचे कारणच नाही..
>>>>>>>>>>>> माझ्या वाचनात असे आले आहे कि सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग ही तत्वे गांधीजींनी थोरो या पाशाच्त्य विचारवंताकडून घेतली. (चूभूदेघे)

>>> >>> दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल ...

त्यांचे कोणते कार्य आजवर सिद्ध झाले आहे, या प्रश्नाला तुमच्याकडे अजिबात उत्तर नाही. म्हणून या कवितेतल्या २ ओळी इथे टाकून तुम्ही मोकळे झालात. पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारतो, की त्यांचे कोणते कार्य आजवर सिद्ध झाले आहे? जरा सविस्तर व सोदाहरण प्रतिसाद द्या.

आम्ही गांधीवादी आहोत, त्यामुळे आम्ही जास्त बोलत नाही व मौन पाळतो.. लांबलचक प्रतिसाद देत बसायला आम्ही काही हिंदुत्ववादी नाही..

गांधीजींची मते थोरोकडून घेतलीअसतीलही, पण इथे सांगितलेय त्याप्रमाणे ती व्यक्ती तुकाराम नव्हती हे नक्की.

>>> आम्ही गांधीवादी आहोत, त्यामुळे आम्ही जास्त बोलत नाही व मौन पाळतो..

सांगण्यासारखं काही नसलं की ही ढाल बरी असते. Light 1

बादवे, तुम्ही आजवर जे असंख्य धागे निर्माण केले आहेत व इतर काही धाग्यांवर जे अथक गरळ ओकत आहात, त्यावरून, तुम्ही गांधीवादी आहात आणि मौन पाळता ह्यावर अजिबात विश्वास बसत नाही.

आम्ही गांधीवादी आहोत, त्यामुळे आम्ही जास्त बोलत नाही व मौन पाळतो.. लांबलचक प्रतिसाद देत बसायला आम्ही काही हिंदुत्ववादी नाही..
----- आम्ही ढोंगी गांधीवादी आहोत.... Happy

महात्मा गांधीनी तूकारामाचे विचार लोकांना सांगीतले हे आपणाला माहीत असेलच, त्यांचा वैचारिक विरोध करनार्‍या स्वातंत्र्यविराचा विचार ही त्यांनी पुढे नेला, पण योग्य ते श्रेय त्यांना दिले नाही.

तुकारामानाही हिंदुत्ववाद्यानीच सदेह स्वर्गाला पाठवलं.. गांधिजीनाही हिंदुत्ववाद्यानीच हे राम म्हणायला लावलं...

आणि आता तुकारामाना गांधिजींचे गुरुही ठरवले !

वा! हिंदुत्ववाद्यानी सोमरस सोडून (स्व) देशी झोकायला सुरुवात केली की काय! Proud

Rofl

अण्णा,
असलं बोलू नये.
ते मास्तुरे अन त्यांचे चेले अत्ता रिक्षा फिरवतील बघा! मग तुमचा आमचा निभाव या संस्थळी लागावा कसा? =((

सावरकरवादी व हिंदुत्ववाले यानी खालील गोष्टी कराव्यात :

१. सावरकरांच्या नावाने उगाच्ग उदोउदो करण्यापेक्षा सैन्यात एखादी सावरकर फलटण काढावी. शक्य झाल्यास एखादी बामण रेजिमेंट अवश्य काढावी. देश अशा रेजिमेंटचे स्वागतच करेल.. मरायला बहुजन आणि चरायला बामण या आक्षेपातूनही बामण, सावरकरवाले, संघवाले, हिंदुत्ववाले या सर्वांची सुटका होईल.

२. ख्रिश्चन, मुस्लिम धर्माना/ धर्मियाना नावे ठेवणे बंद करावे. येशुही हिंदुच होता आणि तो आसिंधुसिंधु सोडून पार तिकडे कुठे तरी लांब जन्माला आला होता... त्यामुळे आसिंधुसिंधु व्याख्या आपोआअपच रद्दबातल ठरते.. कायद्याने हिंदु म्हणून जन्माला आलेला तो हिंदु, अशी साधी व्याख्या केली आहे.. शुद्धीकरण ( पक्षी हिंदु धर्मात येणे) याला कायदा काय दर्जा देतो हे माहीत नाही.. पण तरीही अशा व्यक्तीलादेखील कायद्याने हिंदु स्टेटस मिळत असणार.. तसे असेल तर हिंदुत्व या शब्दाची गरज नाही. तो बंद करावा.

३. मुस्लिमांप्रमाणे सर्वत्र हिंदु धर्म शिक्षण शाला काड्।आव्यात. तिथे जातीभेद सोडून सर्वाना समान संधी व प्रवेश द्यावा.. पौरोहित्य, देवदेवस्की,... ते अगदी शंकराचार्य होणे याबाबत सर्व जातीतील लोकाना समान संधी द्यावी.

४. आपल्या धर्मातील देवळाना सरकारी ( व खाजगी) मदत मिळेल असे करुन त्यांचा उद्धार, जीर्णोद्धार करावा. ( तसेही आता होत असतेच. सावरकरवाद्यानी आणखी चालना द्यावी.)

५. मोठ्या दर्जाच्या देवळांच्या पुजार्‍याना पेन्शन, मानधन सुरु करावे. याबाबत आकडेवारी कशी जमवावी, सरकारशी पाठपुरावा कसा करावा.. हे सगळे एखाद्या मदरशात चार दिवस राहून शिकून घ्यावे.

६. आपल्या धर्मातील घटस्फोटीत, विधवाना सरकारकडून अगदी किमान का होईना पण मानधन सुरु करावे.. जर अशा घटस्फोटीत बायकानी स्वतःच्या पायावर उभे रहानायाचा प्रयतन केला किंवा नवरा त्याना पोटगी देनार असेल तर तिची मदत बंद करावी, किंवा ही मदत अपत्याला मिळेल असे करावे.

७. जैन बौद्ध हे स्वतंत्र धर्म आहेत. त्यांचे सार्वभौमत्व मान्य करावे.. ते स्वतंत्र नाहीत, आपलेच तत्वज्ञान त्यानी घेतले असा खोटा अपप्रचार उगाच करु नये.

८. ख्रिस्त हाही थोरल्या सावरकरांच्या मते हिंदुच असल्याने त्या धर्मात वा मुसलमान ( वा बौद्ध किंवा कोंणत्याही) धर्मात स्वेचेछेने जाणार्‍या कुणालाही अडवू नये.

९. हिंदु धर्मातील सतीची चाल, जातीभेद हे काही एका रात्रीत नष्ट झाले नव्हते.. त्यामुळे बहुपत्निकत्व, बहु अपत्ये ही इस्लामची परंपरा हळूहळू कमी होईल, तशी ती होत असल्याची आकडेवारीही उपलब्ध आहे.. ( मायबोलीवरच कुठेतरी आहे.) त्यामुळे हळूहळू तो समाज सुधारेल याबाबत विश्वास बाळगावा... याबाबतीत ख्रिस्चनांचे वर्तन तर हिंदुंप्रमाणेच आहे.. एक लग्न, किमान अपत्ये.. त्यामुळे त्याना आपलेच मानण्यास काही संकोच करु नये.

खरं तर केदार यांचेशी व्यनि/खरडीतून संवाद साधण्याचा विचार होता. पण तिकडे हिंदुत्वाच्या धाग्यावर थोडे खटके आधिच उडालेत तेंव्हा व्यनि करणे शिष्टाचाराचे ठरेल की नाही हा विचार करीत शेवटी इथे लिहितो आहे.

केदरजी.
या धाग्यास स्लार्टी यांनी सुरुवातीला अतिशय संतुलित प्रतिसाद दिलेला आहे, अन तो वाचून तुमचे उत्तरही इतिहास संशोधकास साजेसे आलेले आहे. (पक्षी: स्लार्टी पुढे लक्षात ठेवेन.)

त्यानंतर तुमचे प्रतिसाद बदलले असते, तर तुम्ही 'जेन्युइन' संशोधक आहात असे म्हणून विषय सोडून दिला असता. इतिहासाचे वाचन व अभ्यास तुमचा भरपूर आहे. पण तो आपण एक चष्मा लावून करीत आहात असे दिसते. हे तुम्हाला दिसणार नाही, कारणे २. पहिलं मी तुमच्या विरोधी मते मांडलीत, तेंव्हा तुमचे उत्तर राहील की इब्लिसा, तुझ्यापेक्षा माझे वाचन्/अभ्यास जास्त, तेव्हा बडबडू नकोस.(चाल: तुझा पगार किति, तू बोलतो किती| तुझं वाचन किती, तू बोलतो किती) दुसरं, तुमचा चष्मा. तुम्ही एक गृहितक मनात धरून त्याची सिद्धता शोधण्याच्या उद्देशाने "संशोधन" करीत आहात. त्या गृहितकाबाहेरचे चूकच असे एक प्रिमायस तुम्ही डोक्यात धरले आहे.

उदा. 'आर्य बाहेरून आले नाहीत'
(अवांतर होते आहे हे मान्य.)
आर्य महाराष्ट्रात उत्पन्न झालेल्या प्रजातींपैकी आहेत का? तर नाही. ते आले, अन एक वेगळी संस्कृती इथल्या -सिंधूनदीभोवतालच्या सोडून इतर भारत देश- त्यांच्यापेक्षा जुन्या संस्कृतींशी संकर पावली. सिंपल सत्य. पण हे याच काँटेक्स्टमधे मी बोललो अस्तांना लग्गेच तिथे येउन 'अभ्यासपूर्ण' प्रतिसाद लिहिण्याची तुमची निकड तुमचा चष्माच दाखविते.

प्रचलित सत्ये ही चूक असे गृहित धरूनच संशोधक बर्‍याचदा सुरुवात करतात. पण, अंतिम निष्कर्ष काय निघेल, याबाबत त्यांनी निष्पक्षपाती असणे अध्यहृत असते. आपण आपल्याच सर्व निरिक्षणांचे अवलोकन/अध्ययन न करता 'अभ्यासपूर्ण' लेख लिहिता असे वाटते.

हा लेखही फक्त एकच 'हिडन अजेंडा' फॉलो करण्यासाठी लिहीण्यात आलेला आहे.

खुला अजेंडा : गांधी या माणसास संपविणे : गोडसेंनी केला.
हिडन अजेंडा: त्या माणसाचे विचार संपविणे. Only this will complete his murder.
तुमच्या दुर्दैवाने अन या देशाच्या सुदैवाने हे काही होत नाही. गेली ६० वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मग कणाकणाने एकेके वाक्य, एकेक कृती घेऊन त्या माणसाचे विचार क्षूद्र/ विकृत/ फालतू होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत रहायचा.

६० वर्षांनंतर त्यांचे बरेच विचार out of context असल्याने चुकीचे वाटतात. पण तसे ते सगळ्यांचेच होतात. सोडा ना. झालाय त्या माणसाचा खून करून. माणूसच होता तो. मेलाय. आजच्या घडीस ज्याला फाsर खुजली असेल तोच माणूस आज गांधी वाचून / समजावून घ्यायचा प्रयत्न करतो.

पण हे असले धागे वाचून काय होतं माहितेय का?
त्या स्लार्टींनी फार मार्मिकतेने लिहिलंय त्यांच्या सिग्नेचर मधे.


उसके दुश्मन हैं बहुत
आदमी अच्छा होगा

हा असा विचार करून, जे थोडे विचार करणारे असतात त्यांच्यात खाज उत्पन्न होते. अन ते, शोधून गांधी वाचतात. की अरे! मीपण याला शिव्या देण्याचे नवे मुद्दे शोधीन Wink पण होते उलट! नवे गांधीभक्त तयार होतात.

तुमच्याकडून इतिहासाबद्दल चष्म्या/बिनचष्म्याची सगळीच माहीती वाचण्यास आतूर,
(स्वदेशी सिग्नेचर मधे रमलेला)
इब्लिस

Pages